Live महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे थेट प्रक्षेपण
x.com/i/broadcasts/1kJzDMMYqPwKv
Ajit Pawar
Ajit Anantrao Pawar (22 July 1959 – 28 January 2026) was an Indian politician who served as Maharashtra's longest-serving deputy chief minister for more than eight years, between 2010 and his death in 2026, for six terms. He held the office under various governments, including the cabinets of Prithviraj Chavan, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, and Eknath Shinde. More on Wikipedia
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
LIVE: महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप.. x.com/i/broadcasts/1BRJjgPleywxw
-
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान चार पदरी महामार्गास मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान मेट्रो मार्गिका क्रमांक 8 ची 35 किमी जोडणी, नाशिक शहराचा 66 किमी परिक्रमा मार्ग तसेच गडचिरोलीतील नवेगाव मोर–सुरजागड चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. तसेच, नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली 'ऑटो मोड' वरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून महामार्गाच्या बाजूला जागेची तरतूद करण्यात यावी.
पायाभूत प्रकल्पांविषयी माहिती खालीलप्रमाणे...
✅ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 द्वारे जोडण्यास मान्यता
✅ मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किमी, भूमिगत मार्ग 9.25 किमी, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत
✅ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके
✅ घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकांपर्यंत उन्नत स्थानके, 2 स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किमी
✅ 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी ₹388 कोटींचा खर्च अपेक्षित
✅ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण ₹22,862 कोटींचा खर्च अपेक्षित
✅ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किमी, या प्रकल्पासाठी एकूण ₹3954 कोटींच्या खर्चास मान्यता
✅ प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50% भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय
✅ गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किमी लांबीस मान्यता. 4 पदरी सिमेंट काँक्रीटचा महामार्ग
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @cbawankule
#maharashtra #devendrafadnavis #infrastructurecommittee -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure. DCM Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक। इस दौरान उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.15pm | 27-1-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.१५ वा.| २७-१-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @cbawankule
#maharashtra #devendrafadnavis #infrastructurecommittee -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या विश्वासू राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय :
✅ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'पीएम सेतू' योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार. पीएम सेतू (Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार.
(कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता)
✅ कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform). सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार - उद्योजकांसाठी सुविधा.
(सार्वजनिक बांधकाम)
✅ धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस.
(वस्त्रोद्योग)
✅ वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार.
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
✅ केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय.
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो..!
#republicdayThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह!🙏🏻
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज, पुण्यातील पोलीस संचलन मैदानात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदींना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल या दलांकडून संयुक्त संचलन करण्यात आलं. सर्व दलांना सन्मानपूर्वक सलामी दिली. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांना संबोधित केलं.
या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पोलीस दल, सशस्त्र दल, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, डॉग स्कॉड तसंच सांस्कृतिक पथकांनी शिस्तबद्ध संचलनातून तिरंग्याला मानवंदना दिली. पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता जागृती रथाच्या माध्यमातून स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
विविध जाती-धर्मांनी नटलेल्या देशाला एकत्र बांधून संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची मजबूत पायाभरणी करण्यात आली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत देश व राज्य प्रगतीपथावर आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर जबाबदार भारतीय नागरिकत्वाची भावना जोपासणं हेच तिचं खरे बळ आहे, असा संदेश दिला.
#republicday -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
पाणी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बळावर महाराष्ट्र आज अधिक सक्षम आणि समृद्ध होत आहे. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#republicday
#प्रजासत्ताक_दिनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
तमाम देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिन आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची आठवण करून देतो. संविधानानं दिलेल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवत, लोकशाही अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामध्ये सामाजिक सलोखा, समावेशक विकास आणि राष्ट्रहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येकानं आपल्या परीनं योगदान द्यावं, असं आवाहन करतो.
एकजुटीनं, सकारात्मक विचारांनी आणि प्रामाणिक प्रयत्नांनीच सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी शक्य आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. चला, विकसित भारताच्या प्रवासात आपण सर्वजण जबाबदार नागरिक म्हणून सहभागी होऊया.
#republicday
#प्रजासत्ताक_दिन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी आणि श्री गुरु गोबिंद सिंह जी यांच्या कार्याला, विचारांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा समावेश आहे. कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय सेवा तसंच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या मान्यवरांचा गौरव राज्यासाठी अभिमानास्पद आहे. मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असून महाराष्ट्रातील मान्यवरांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही पावती आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा देशपातळीवर अधिक उंचावली आहे.
महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये कै. श्री धर्मेंद्र सिंह देओल (कला), पद्म भूषण पुरस्कारप्राप्त श्रीमती अलका याज्ञिक (कला), कै. श्री पियुष पांडे (कला), श्री. उदय कोटक (व्यापार व उद्योग) तसंच पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. आर्मिडा फर्नांडिस (वैद्यकीय सेवा), श्री. अशोक खाडे (व्यापार व उद्योग), श्री. भिकल्या लाडक्या धिंडा (कला), श्री. जनार्दन बापूराव बोथे (समाजसेवा), श्री. जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी), श्री. माधवन रंगनाथन (कला), श्री. रघुवीर तुकाराम खेडकर (कला), श्री. रोहित शर्मा (क्रीडा), कै. श्री. सतीश शाह (कला), श्री. सत्यनारायण नुवाल (व्यापार व उद्योग) व श्री. श्रीरंग देवाबा लाड (कृषी क्षेत्र) यांचा समावेश आहे.
यामध्ये कै. श्री. धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण, कै. श्री. पियुष पांडे यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण तर कै. श्री. सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या मान्यवरांच्या कार्यकर्तुत्वाचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे इतर सर्व पुरस्कार विजेत्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
#padmaawards2026 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पदक’, तसंच उल्लेखनीय सेवेसाठी विविध विभागांतील ५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. हे सन्मान महाराष्ट्राच्या पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे, शौर्याचे आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावाचे प्रतीक आहेत.
स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अधिकारी व जवानांचा हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. विशेषतः वीरता पदक मिळवणाऱ्या जवानांनी दाखवलेल्या धैर्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अधिक दृढ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी पुनश्च अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी तसंच श्री गुरु गोबिंद सिंह जी यांच्या ३५० व्या गुरुता गद्दी समागमच्या पवित्र सोहळ्यात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी होण्याचा योग आला.
धर्मस्वातंत्र्य, सत्य, त्याग आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या गुरु तेग बहादुर साहिब जींच्या सर्वोच्च बलिदानाचा आदर्श आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करत धर्म, देश व समाजाला नवी दिशा देणाऱ्या गुरु गोबिंद सिंह जींचं कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
📍नांदेड
@Dev_Fadnavis
#hinddichadar #guruteghbahadursahibji -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वारा येथे आज दर्शन घेतले. सर्वधर्मसमभाव, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या पवित्र स्थळाच्या दर्शनानं मनाला समाधान मिळालं आणि जनकल्याणाच्या कामासाठी कार्यरत राहण्याची नवी ऊर्जा मिळाली.
📍नांदेड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A strong democracy is built on the pillars of awareness, responsibility and active participation.
#nationalvotersday2026 reminds us of the power of vote as the collective expression of citizens in shaping fair and informed decisions. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A well-developed tourism sector supports livelihoods, entrepreneurship and regional development- all of which contribute to inclusive economic growth.
On #nationaltourismday2026, let us promote responsible tourism that preserves our cultural legacy while supporting economic progress. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज बारामतीतील विविध सहकारी संस्थांचे संचालक तसंच बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतमधील नगरसेवकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, विकासकामांचा आढावा आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मॉडेल स्कूल अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार.. तशी ठोस योजना आम्ही आखली आहे.. निधीची कमतरता भासणार नाही..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करत विकासाची दिशा, ग्रामविकासाचे धोरण, शेतकरी-कामगार-महिला-युवकांच्या प्रश्नांवर पक्षाची ठोस भूमिका स्पष्ट केली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अखंड सुरू असून सर्व समाजघटकाला सोबत घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. लोकशाहीत जनतेचा विश्वास हेच सर्वात मोठं भांडवल असून, तो विश्वास जपण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख असल्याचं यावेळी सांगितलं.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर पारदर्शक कारभार, दर्जेदार विकासकामं आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारी धोरणं राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. एकजूट, संघटनशक्ती आणि विकासाच्या ठोस अजेंड्यावर ही निवडणूक लढवत जनतेच्या अपेक्षांना न्याय देऊ, असा विश्वास सर्वांना दिला.
📍कन्हेरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बदलापूरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकलीवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक, धक्कादायक आणि असह्य आहे. अशा अमानुष कृत्यांचा मी तीव्र निषेध करतो. यासंदर्भात कडक पाऊल उचलण्याबाबतचे निवेदन पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण समितीच्या सभापती सौ. प्रियंकाताई दामले यांनी माझ्याकडे सुपूर्द केले.
लहान मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पूर्व प्राथमिक शाळा, मुलांसाठीची वाहतूक व्यवस्था आणि शाळा व्यवस्थापनासाठी कडक व स्पष्ट प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजीतसिंह देओल यांना देण्यात आले आहेत.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दोषींना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही. मुलींची सुरक्षितता, पालकांचा विश्वास आणि शाळांमधील सुरक्षित वातावरण राखणं ह्या बाबी अनिवार्य आहेत. बदलापूर येथील प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपीला कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा दिली जाईल. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबई उच्च न्यायालयातर्फे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत जी यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर जी व त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींच्या वतीनं आयोजित हा सत्कार समारंभ महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो, संबोधित केलं.
मा. न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत जी यांचं राज्य सरकार व महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत व अभिनंदन केलं. तसंच त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. दीडशे वर्षांहून अधिक गौरवशाली परंपरा असलेल्या, देशातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित न्यायसंस्थांपैकी एक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक परंपरेत भारताच्या सरन्यायाधीशांचा सत्कार होणं हे अत्यंत गौरवास्पद आहे.
मा. न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत जी यांचा हरियाणातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सर्वोच्च न्यायिक पदापर्यंतचा प्रवास हा परिश्रम, निष्ठा, बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांचा प्रेरणादायी दाखला आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते भारताचे सरन्यायाधीश असा त्यांचा प्रवास देशासाठी प्रेरणादायी आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत जी यांनी घेतलेले निर्णय आणि न्यायालयीन प्रशासनातील सुधारणा करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्य सरकार न्यायव्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, निधी, नवीन न्यायालयीन इमारती आणि कोल्हापूर येथे सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी कटिबद्ध आहे. सामान्य नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचवणं हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे.
मा. न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत जी यांचा आगामी १५ महिन्यांचा कार्यकाळ संवैधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि समानतेला अधिक बळ देणारा ऐतिहासिक काळ ठरेल, असा विश्वास आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Every girl deserves the freedom to dream and the opportunity to learn and lead.
On #nationalgirlchildday2026, let us strive to build a society that provides our daughters the right environment to nurture their abilities and realise their aspirations. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
क्रीडा क्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, खेळाडूंना प्रोत्साहित करणं तसंच राज्याची आणि देशाची ओळख जागतिक स्तरावर उंचावणं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत..!
#bajajpunegrandtour2026This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या टप्प्यात म्हाळुंगे ते जे.एम. रोड या मार्गावर स्पर्धा पार पडत असून, विविध देशांतून सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या वेग, तंत्र आणि खिलाडूवृत्तीचा थरार स्पर्धेत अनुभवायला मिळत आहे. पुण्याच्या रस्त्यांवर रंगणारी ही स्पर्धा क्रीडा, संस्कृती आणि जागतिक सहभागाचा सुंदर संगम ठरत आहे.
📍बालेवाडी, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रस्ते बांधकाम क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, दर्जेदार बांधकाम आणि वेगवान कार्यपद्धतीच्या जोरावर राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडनं चार नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करत भारताला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या ऐतिहासिक व अभिमानास्पद यशाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व संस्थापक श्री. जगदीश कदम यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांचं मनापासून अभिनंदन केलं, कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती अधिक जाणून घेतली तसंच देशाच्या पायाभूत विकासात योगदान देणाऱ्या अशा यशस्वी उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद साधला.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिवसेनाप्रमुख, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Remembering Netaji Subhash Chandra Bose, the towering leader who dreamed of a strong self reliant India, on his birth anniversary.
His courage, sacrifice and un-shakeable resolve remain a guiding light for us all.
#netajisubhashchandrabose -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धैर्य, रणनीती आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक, उत्तम प्रशासक, सरलष्कर, स्वराज्याच्या बीजाची पेरणी करणारे, शहाजीराजे भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! मराठा इतिहासाला दिशा देणाऱ्या त्यांच्या कार्यातून नेतृत्व, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा सदैव मिळत राहील.
#शहाजीराजे_भोसले
#shahajirajebhosale -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या अभंग वाणीतून भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्यांचे विचार समाजाला सदैव मार्गदर्शक ठरतील.
#श्रीसंत_तुकाराम_महाराज
#shrisanttukarammaharaj -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून राज्याची, देशाची मान जागतिक स्तरावर जास्तीतजास्त उंचावेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत..!
#bajajpunegrandtour2026This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा तिसरा टप्पा सासवड नगर परिषद ते विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती या मार्गावर यशस्वीरीत्या पार पडला. या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजयी सायकलपटूंना पदक प्रदान करून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम करत पुढील स्पर्धात्मक वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
#bajajpunegrandtour2026 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The tragic accident in Doda, Jammu and Kashmir, in which we lost brave soldiers has left us all shaken and deeply saddened.
My thoughts and prayers are with the families affected by this devastating event. I also wish a speedy recovery to the soldiers injured in the accident. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्हा आज जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे अधोरेखित होत आहे. जगभरातील किमान ३५ देशांतून आलेले आंतरराष्ट्रीय सायकलपटू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सहकारी अधिकारी यांचं यावेळी मनापासून स्वागत केलं.
ही स्पर्धा केवळ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा नसून, पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा आणि पायाभूत विकासाचा वारसा ठरणार आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याची तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग व आयटी क्षेत्रातील अग्रगण्य ओळख आणि पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य या स्पर्धेला जागतिक स्तरावर वेगळी उंची देईल.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा भविष्यात जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळकपणे पुढे येईल. स्पर्धेसोबत राबवण्यात येणाऱ्या विविध पूरक उपक्रमांमुळे पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याचीही संधी मिळणार आहे. ही स्पर्धा पुणे व महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, यात विश्वास आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वांना माघी ‘श्री गणेश जयंती’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! या मंगलदिनी आपणा सर्वांच्या तमाम इच्छा-आकांक्षा व मनोकामना पूर्ण होवोत, घरोघरी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती व उत्तम आरोग्य नांदू दे, हीच सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना!
#श्री_गणेश_जयंती
#shriganeshjayanti -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
एआय च्या मदतीनं शेती आधुनिक पद्धतीनं करा, प्रगती साधा..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
My best wishes to Shri @NitinNabin on being elected as the new National President of @BJP4India.
I am sure that you will discharge your responsibilities in this new role with the same dedication and commitment as you have always done. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी सभापती श्री. शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून विकासाभिमुख धोरणं, लोकहिताचा अजेंडा आणि प्रगत विचारधारेच्या माध्यमातून जनतेसाठी निष्ठेनं कार्य करण्याचा ठाम संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
📍वराळे गावठाण, ता. खेड, जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांनी मातृभूमीच्या स्वाभिमान व सार्वभौमत्वासाठी अतुलनीय शौर्याच्या प्रचितीतून लढा देत, पराक्रम, त्याग आणि समर्पणाचा इतिहास घडवला. त्यांनी अफाट धैर्य, अटळ निश्चय आणि अमोघ युद्धकौशल्याच्या जोरावर स्वराज्याची ज्योत कायम प्रज्वलित ठेवली. वीर शिरोमणी, महाराणा प्रताप सिंह यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#महाराणा_प्रताप
#maharanapratap -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राज पुरोहित यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. अभ्यासू, आक्रमक आणि जनहितासाठी सातत्यानं काम करणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे न्याय, समता आणि मानवतावादी मूल्यांचे चालते-बोलते विद्यापीठ होते. राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक सुधारणा व आर्थिक प्रगतीचा दूरदृष्टीपूर्ण विचार मांडत त्यांनी भारतीय समाजमन घडवलं. घटनात्मक व सनदशीर मार्गांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे थोर समाजसुधारक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#महादेव_गोविंद_रानडे
#mahadevgovindranade -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कृषी विज्ञान केंद्र येथे १७ ते २४ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित भव्य कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन कुलगुरू मा. काशीनाथ खर्चे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते, आदरणीय मा.श्री. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलं. या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झालो. यानिमित्तानं शेती क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, सौरऊर्जेवर चालणारे हरितगृह युनिट, स्वयंचलित हवामान केंद्र, आधुनिक भाजीपाला उत्पादन पद्धती, AI आधारित ऊस शेती, विना माती शेती, नैसर्गिक शेती, विविध प्रजातींचे प्राणी, भरड धान्य, फुलशेती, AI पद्धतीनं केळी व मक्का लागवड अशा अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. AI च्या वापरातून प्रति एकर २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन कसं घेता येईल, कमी खर्चात, कमी पाण्यात व कमी मेहनतीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल, याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे.
शेतकरी बांधवांच्या फायद्याचं जे काही असेल ते करण्याची भूमिका ठेवून आयोजित करण्यात आलेलं हे प्रदर्शन म्हणजे शेती क्षेत्रातील विकासाची दिशा दाखवणारं महत्त्वाचं पाऊल आहे. विविध देशांतील आधुनिक तंत्रज्ञान, ऊस उत्पादन व साखर निर्मितीपासून ते नैसर्गिक शेतीपर्यंत सखोल माहिती इथं उपलब्ध आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी या कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन आधुनिक शेतीचे नवे मार्ग आत्मसात करावेत आणि शेती अधिक समृद्ध करावी.
📍माळेगाव, बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो.
यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मानवता, समानता आणि अध्यात्मिकरणाच्या विचारांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. न्याय, समता आणि विवेकाचे ते चालतेबोलते प्रतीक होते. बालविवाह व जातिभेदाविरुद्ध उभे राहणारे द्रष्टे समाजसुधारक व विचारवंत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#महादेव_गोविंद_रानडे
#mahadevgovindranade -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता आणि त्यागाचा तेजस्वी त्रिवेणी संगम. रयतेसाठी न्यायप्रिय व लोकाभिमुख कारभार करताना त्यांनी मानवी मूल्ये आणि लोकनिष्ठा जपली. अपराजित योद्धे, विद्वान कवी, कुशल प्रशासक आणि लोकहितदक्ष राजा म्हणून इतिहासावर अमिट ठसा उमटवणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज
#राज्याभिषेक_दिन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मतदारांचे कृतज्ञतापूर्वक आभार!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारामती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करताना फॉर्म भरण्यापासून ते आचारसंहितेच्या पालनापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. नगर उपाध्यक्ष पदाबाबत पक्षाची भूमिका मांडली तसंच संवाद साधताना शिस्त, पारदर्शकता आणि संघटनात्मक ताकद यावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून शेती व विकासकामांसाठी शिक्षण घेण्याचं शेतकरी बांधवांना सूचित केलं. साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेनं काम सुरू असून, नीरा/कऱ्हा प्रकल्पाचं कामकाज पूर्ण होत असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच हे शक्य होत असल्याची भावना व्यक्त केली. आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामं उभी करण्याचा संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात केला. पुढील पाच वर्षांत माळेगाव ही महाराष्ट्रातील आदर्श पंचायत बनेल, असा विश्वास व्यक्त केला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं आज पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करत मोठ्या संख्येनं जागरूक नागरिक मतदानासाठी बाहेर पडत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
#municipalcorporationelection
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील माजी जिल्हाध्यक्ष श्री. मनोहरभाऊ डोंगरे तसंच जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती श्री. विजयराज डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यशील सहकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासावर उभा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक बळकट होत आहे, याचा आनंद आहे.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिकूल आव्हानांवर मात करत, भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं. त्यांच्या ह्या कामगिरीनं भारताच्या कुस्ती क्षेत्राला विश्वपटलावर नवी ओळख निर्माण करून दिली. देशातील कुस्तीगीरांचे प्रेरणास्थान, महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The Indian Army stands as a symbol of valour, professionalism and service before self.
On #indianarmyday2026, we express our deep gratitude to our bravehearts who not only guard our borders but remain steadfast in safeguarding the sovereignty and integrity of our nation. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाश सोळंके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय, समानता व स्वाभिमानासाठीच्या अखंड संघर्षाची प्रेरणादायी आठवण. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी दिलेले विचार आजही समतावादी व प्रगत समाज घडवण्याचा मार्ग दाखवतात. या नामविस्तार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मकर संक्रांती हा नवचैतन्य, परिवर्तन आणि सकारात्मकतेचा सण आहे. सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांवर उभा असलेला हा सण जनमानसाला जोडणाऱ्या प्रेम आणि ऐक्याचा सुंदर धागा आहे. नववर्षाच्या या प्रारंभी, तिळगुळासारखा गोडवा वाटून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अधिक घट्ट करूया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#makarsankranti -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले श्री. नरेश अरोड़ा व त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा श्री. नरेश अरोड़ा व त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे.
या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे.
या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत आहे.
@nishuarora @DesignBoxed -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माझ्या बंधु-भगिनींनो, मी दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करून दाखवणारंच… हा दादाचा पक्का वादा आहे..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ३० मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, टँकर माफिया, कचरा व्यवस्थापन, वाढता प्रदूषणाचा प्रश्न आणि बोगस कारभार यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या सगळ्याला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका कर्जबाजारी करणाऱ्या, विकासाच्या नावाखाली लूट करणाऱ्या प्रवृत्ती बाजूला सारून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुनियोजित कारभार चालवण्यासाठी योग्य प्रतिनिधी आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि प्रदूषणमुक्त शहर हा ‘१ अलार्म - ५ काम’चा ठोस आराखडा नागरिकांसमोर मांडला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून पिंपरी-चिंचवडचा हरवलेला गौरव परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
📍दापोडी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे शहर उभं केलं. गेल्या २५ वर्षांत आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झाला नाही; उलट जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यासारख्या योजनांतून हजारो कोटींचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ७ मधील अधिकृत उमेदवार श्री. विराज विश्वनाथ लांडे, प्रभाग क्र. ७ (ब) मधील श्रीम. अनुराधा सुशील लांडगे, प्रभाग क्र. ७ (क) मधील श्रीम. अश्विनीताई निलेश फुगे, प्रभाग ७ (ड) मधील श्री. अमोल मधुकर डोळस आदी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात आणि महापौर श्री. योगेश बहल यांच्या कार्यकाळात शहराला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला होता. पण आज परिस्थिती काय आहे? ठेवी कमी होत गेल्या, कर्जरोखे काढले गेले, शहर कर्जबाजारी झालं. पाणी टंचाई, कचरा व्यवस्थेचा बोजवारा, रस्त्यांची दुरवस्था, SRA योजनेतील प्रचंड भ्रष्टाचार, टँकर माफिया, बोगस कामं आणि बिलांचा पाऊस यामुळे पिंपरी-चिंचवडचं वाटोळं झालं आहे.
७० लाखांचा पादचारी पूल ७ कोटींना कसा गेला? १२ कोटींचं सॉफ्टवेअर १२० कोटींना कोणी घेतलं? ६६६ कोटींचे ९५० CCTV कॅमेरे बसवले, पण ७० टक्के बंद का आहेत? ४२ कोटींचा ई-लर्निंग प्रकल्प का बंद पडला? ७ कोटी खर्च करूनही एकही झाड प्रत्यक्षात का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत कुणी दिलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनं कॉन्ट्रॅक्टर, टँकर माफिया किंवा महानगरपालिका लुटणारे उमेदवार दिलेले नाहीत. चांगले उच्चशिक्षित, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्यासाठी सातत्यानं काम करणारे तसंच स्वच्छता, सुरक्षितता व स्वावलंबनासाठी झटणारे उमेदवार आम्ही उभे केले आहेत. गेल्या तीन वर्षांत झालेला भ्रष्टाचार संपवायचा आहे. म्हणूनच घड्याळासमोरील बटण दाबून आमच्या कार्यक्षम उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं.
प्रत्येक घरात नळाद्वारे पुरेसं पाणी, खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीमुक्त शहर, ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये देशात अव्वल स्थान, हायटेक आरोग्य सुविधा, PCMC मॉडेल शाळा हे सगळं आम्ही करून दाखवणार आहोत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांसाठी मेट्रो आणि PMPML बस सेवा मोफत केली जाईल. यामुळे प्रदूषण कमी होईल, कारण पिंपरी-चिंचवडमध्ये २३ लाख आणि पुण्यात ३० लाख वाहनं आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त केली जातील. विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब देऊन शिक्षण अधिक सुलभ केलं जाईल. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी व व्यवसाय विस्तारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिलं जाईल. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पुनर्विकास करून भारतातील आधुनिक, ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम उभारलं जाईल, अशी ग्वाही दिली.
📍भोसरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नियतीसमोर माणूस कितीही कणखर असला, तरी कधी कधी तो हतबल ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदपूर येथील नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे. जनसेवेचा प्रामाणिक ध्यास असलेल्या शाहूताईंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादीची ओळख बनलीय कामानं.. राष्ट्रवादी पुढे प्रवास करतेय शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महान विभूतींच्या विचारानं.. पक्षाला मजबूत साथ दिलीय सर्व समाजघटकानं..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कामानं राष्ट्रवादीची ओळख आहे.. राष्ट्रवादीला जनतेची भक्कम सोबत आहे.. वेळ आता राष्ट्रवादीची.. घड्याळात वेळ विकासाची..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आमच्या शब्दात 'विश्वास' आणि कृतीत 'विकास' आहे.. म्हणूनच जनशक्ती आमच्यासोबत आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आम्हाला पाठबळ जनशक्तीचं.. लक्ष्य आमचं लोकाभिमुख विकासाचं.. दिलंय प्रामाणिक आम्ही वचन.. वचन नाही मोडणार.. वचनपूर्तीसाठी सदैव कार्यतत्पर राहणार..!
📍धायरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आता एकच निर्धार, विकासाची मालिका सुरू करणार, विकास कामांना वेग येणार, जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
फक्त पुणे महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या.. सुरू विकासकामं, रखडलेली कामं सगळी वेगानं मार्गी लावेन, हा माझा शब्द आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत, आमचे दैवत आहेत..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनो,
जाहीर सेवेबाबत कृपया आपला अभिप्राय कळवा.
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मोफत बस सेवा आणि मोफत मेट्रो सेवा या संदर्भात अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेकडे तुम्ही कसे पाहता?
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं प्रभाग क्र. ३७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. कैलास श्रीरंग भोसले, श्रीम. वर्षा तानाजी शिळीमकर, श्रीम. श्रद्धा गोरक्ष परांडे, श्री. विजय विठ्ठलराव क्षीरसागर व प्रभाग क्र. ३८ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. स्मिता सुधीर कोंढरे, श्री. दत्तात्रय बबनराव धनकवडे, श्रीम. सिमा युवराज बेलदरे, श्रीम. सारिका विकासनाना फाटे, श्री. प्रकाश विठ्ठलराव कदम आणि प्रभाग क्र. ३९ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. भारती रामनाथ परदेशी, श्री. प्रतिक प्रकाश कदम, श्रीम. अभिलाषा निरंजन घाटे, श्री. बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर तसंच प्रभाग क्र. ४० मधील अधिकृत उमेदवार श्री. बाळा उर्फ सुरेश लक्ष्मण कवडे, श्रीम. वर्षा सतीश मारकड, श्रीम. सपना अमोल धर्मावत, श्री. बधे अण्णा उर्फ गंगाधर विठ्ठल आदी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही केवळ प्रभागांची निवडणूक नाही, तर पुण्याच्या पुढील अनेक वर्षांची दिशा ठरवणारी लढाई आहे. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत आपल्याला सर्वांना मिळून पुण्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, पण आज टँकर माफिया, अस्वच्छ प्रभाग, ड्रग्सचं वाढलेलं प्रमाण आणि अल्पवयीन मुलांकडून निर्माण होणारी दहशत हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
आज पुण्यात ५० लाखांहून अधिक लोक राहतात, पण तरीही पूरक पाणी, स्वच्छता आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांना घेऊन महानगरपालिकेचं अपयश स्पष्ट दिसत आहे. भूमिपूजन करून वर्षे उलटली, तरी मेट्रो सर्वत्र पोहोचली नाही, कारण योग्य लक्षच दिलं गेलं नाही. हे चित्र बदलायचं असेल तर कारभारी बदलावे लागतील. म्हणूनच या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे काही अनुभवी आणि काही नवखे उमेदवार मैदानात उतरवत आहेत. मी कामाचा माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे. आम्हाला पूर्ण बहुमत द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे.
खड्डेमुक्त रस्ते, जिथं पाणी नाही तिथं दररोज पाणी, स्वच्छ शहर, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि सर्वांसाठी मोफत मेट्रो व PMPML बस सेवा, हा आमचा स्पष्ट अजेंडा आहे. यामुळे रिक्षा चालकांनाही रोजगार मिळेल आणि सामान्य पुणेकराचं जीवन सुलभ होईल. आता परिवर्तनाचा अलार्म वाजला आहे. घड्याळ आणि तुतारी या चिन्हांवर शिक्का मारा, आम्हाला भक्कम साथ द्या. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. पुण्यासाठी अतिशय चांगला, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करून दाखवू. येत्या १५ जानेवारीला आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा, असं आवाहन आहे.
📍कात्रज -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
एकदा घड्याळाचं बटण दाबून बघा.. पुण्याचं चांगलं करून दाखवतो..!
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं प्रभाग क्र. १४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीम. सुमन सोमनाथ गायकवाड, श्री. संदीप कैलासराव कोंद्रे, श्रीम. सुरेखा चंद्रकांत कवडे, श्री. बंडू तात्या उर्फ सुनिल जयवंत गायकवाड व प्रभाग क्र. १५ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. जोशीला नितीन कांबळे, श्री. पुरुषोत्तम शिवाजी थारवाडकर, श्रीम. शिवाणी रुपेश तुपे, श्री. अजित दत्तात्रय घुले आणि प्रभाग क्र. १६ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. वैशाली सुनील बनकर, श्रीम. वर्षा प्रशांत पवार, श्री. कमलेश हणमंत कापरे, श्री. योगेश दत्तात्रय ससाणे तसंच प्रभाग क्र. १७ मधील अधिकृत उमेदवार श्री. अशोक धाकू कांबळे, श्रीम. हेमलता निलेश मगर, श्रीम. संगिता दत्तात्रय तुपे, श्री. आनंद आण्णा आलकुंटे; त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ४१ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. अश्विनी योगेश सूर्यवंशी, श्री. निवृत्ती ज्ञानोबा बांदल, श्रीम. श्वेता सचिन घुले, श्री. सय्यद फारूख यासिन आदी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही केवळ निवडणूक नाही, तर पुण्याचं भवितव्य ठरवणारी लढाई आहे. आज या सभेत विविध जाती-धर्मांचे, वेगवेगळ्या विचारांचे पुणेकर मोठ्या संख्येनं एकत्र आले आहेत, हे दृश्यच दाखवतं की, पुणेकरांना बदल हवा आहे. स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ, शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत पुण्याला आदर्श, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख नगरी बनवण्याचा आमचा संकल्प आहे.
आजच्या घडीला पुणे हे देशातील वेगानं वाढणारं शहर असलं, तरी पाणी, वाहतूक, प्रदूषण, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर नियोजनशून्य व भ्रष्ट कारभारामुळे पुणेकर त्रस्त आहेत. काम न करता बिले काढली गेली, मूलभूत गरजा दुर्लक्षित राहिल्या आणि शहराचा बकालपणा वाढवला गेला. हे थांबवायचं असेल तर कारभारी बदलावे लागतील.
म्हणूनच आम्ही पुणेकरांसमोर स्पष्ट वचन देतो, तो म्हणजे १ अलार्म, ५ काम. दररोज नळाद्वारे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषणमुक्त पुणे आम्ही निर्माण करून दाखवू. मोफत मेट्रो आणि PMPML बस सेवेमुळे वाहतूक व प्रदूषण कमी होईल आणि पुणेकरांच्या हक्कांना प्राधान्य मिळेल. ही लढाई पुण्याच्या भविष्यासाठीची आहे. कुठलाही वेगळा विचार न करता पॅनल टू पॅनल आमच्या उमेदवारांना निवडून द्या. पुणेकरांचा विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे, असा विश्वास सभेच्या निमित्तानं दिला.
📍हडपसर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्तानं प्रभाग क्र. ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीम. उषा ज्ञानेश्वर कळमकर, श्री. सुनिल बबन खांदवे, श्रीम. उज्वला मिलिंद खांदवे, श्री. बंडू शहाजी खांदवे आणि प्रभाग क्र. ४ मधील अधिकृत उमेदवार श्री. नानासाहेब कोंडीबा आवनावे, श्रीम. वसुंधरा शिवदास उबाळे, श्रीम. दर्शना स्वप्नील पठारे, श्री. समीर दत्तात्रय भाडळे तसंच प्रभाग क्र. ५ मधील अधिकृत उमेदवार श्री. सचिन रंगनाथ भगत, श्रीम. सुनिता मारुती गलांडे, श्रीम. रूपाली विजय गलांडे, श्री. संदीप नामदेव जऱ्हाड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सर्वप्रथम माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या महान विभूतींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही अनुभवी, काही नवखे, पण सगळेच स्वच्छ प्रतिमेचे आणि काम करण्याची तयारी असलेले उमेदवार उभे केले आहेत. पॅनल टू पॅनल घड्याळ या चिन्हावर शिक्का मारण्याची हीच वेळ आहे. पुण्यात सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर कारभार कोणाच्या हाती द्यायचा, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आज पुण्यात भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे, रस्ते खराब आहेत, सोसायट्यांमधून कचरा उचलला जात नाही, पाणी मिळत नाही म्हणून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं. लोक कर भरतात मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून, पण सुविधा मिळत नाहीत.
पाणी हे आधी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि नंतर उद्योगासाठी आहे, अशी आमची भूमिका आहे. कोणाचंही सरकार असो, हा नियम बदलणार नाही. आज नगर रोड परिसरात ट्रॅफिकची मोठी समस्या आहे; मात्र फ्लायओव्हर, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारून ही कोंडी कमी केली जाईल. सोसायट्यांमध्ये टँकर माफियाची दहशत आहे आणि समोरील काही उमेदवारच टँकर माफियाचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही पुणे महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या, टँकर माफिया मोडून काढण्याची जबाबदारी माझी, अशी हमी सभेत नागरिकांना दिली.
आम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे आणि प्रशासनावर आमची पकड आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या मातीतला पक्ष आहे. पवारसाहेबांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे आणि पुण्यानं मला भरभरून दिलं आहे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
१ अलार्म - ५ काम हा आमचा ठाम अजेंडा आहे. दररोज नळानं पाणी, ट्रॅफिक व खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ शहर, सक्षम आरोग्य सुविधा, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पुणे आदी सर्व बाबींची पूर्तता आम्ही करणार. मोफत मेट्रो आणि बस सेवा सुरू केल्यावर वाहनं कमी होतील, रिक्षा चालकांच्या पोटावर पाय येणार नाही, उलट त्यांचा व्यवसाय वाढेल. कोयता गँगची दादागिरी, गुंडगिरी चालू दिली जाणार नाही. पुणे हे सुसंस्कृत शहर आहे.
यंदाची ही निवडणूक पुण्याचं भविष्य ठरवणारी आहे. ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं, तिला विसरायचं नाही, या मताचा मी आहे. येत्या १५ जानेवारीला घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍चंदननगर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
खराडी, वाघोली, विमाननगर आणि कल्याणीनगर परिसरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींशी आज थेट संवाद साधण्याचा योग जुळून आला. यावेळी विविध नागरी प्रश्नांना घेऊन सविस्तर चर्चा झाली.
पुणे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र मोठं आहे, पण दुर्दैवानं भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढलाय. टँकर माफिया, पार्किंगचा प्रश्न, पाण्याची टंचाई, ट्रॅफिक, कचरा व्यवस्थापन, हॉकर्स, ड्रग्स, कोयता गँग, अल्पवयीन मुलांची दहशत, रोड क्रॉसिंग, हॉटेल लायसन्स असे अनेक नागरी प्रश्न नागरिकांना दररोज भेडसावत आहेत. वाघोली वेल्फेअर सोसायटीसह सर्व भागांतील प्रश्न हे निवडणुका संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं आणि ठोस निर्णय घेऊन सोडवू, असा शब्द यावेळी दिला.
AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक सक्षम केलं जाईल. मोफत मेट्रो आणि PMPML बस सेवा, दर्जेदार रुग्णालय सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित शहर हे आमचं स्पष्ट ध्येय आहे, असं या बैठकीत स्पष्ट केलं.
१ अलार्म - ५ कामं या संकल्पनेतून शहराचा कायापालट करायचा आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी समोर येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करण्याची ताकद आमच्यात आहे, असं सूचित केलं. वडगाव शेरी, वाघोली, विमाननगर, कल्याणीनगर, नगर रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्षम उमेदवारांना पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाठबळ द्या, असं आवाहन उपस्थितांना केलं.
📍विमाननगर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनशक्तीचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मागून घेतलेला नाही, तर तो कामातून, जनसेवेतून आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे..!
📍वडगाव शेरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड पुन्हा नावारुपाला येणार, पुन्हा स्वच्छ होणार, प्रदूषण मुक्त होणार, आरोग्यदायी होणार, सुविधा युक्त होणार, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्का वादा...
मोफत मेट्रो व PMPML बस सेवा, हायटेक महापालिका रुग्णालयांत मोफत व सवलतीचे उपचार, दर्जेदार मॉडेल शाळा व डिजिटल शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि कामगार–मध्यमवर्गाला न्याय देणाऱ्या योजना या सगळ्यांमागे एकच उद्दिष्ट आहे, तो म्हणजे पिंपरी चिंचवडकराचं जीवन सुलभ करणं.
नळाद्वारे पाणीपुरवठा, मजबूत रस्ते व ड्रेनेज, स्वच्छ-हरित शहर, स्मार्ट ट्रॅफिक व ई-गव्हर्नन्स, झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुल योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानपूर्वक सुविधा हा विकास केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा ठोस संकल्प आहे. पिंपरी चिंचवडचा विकास म्हणजे घोषणा नव्हे, तर हमी आणि ही हमी राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्यक्षात उतरवणार.
आज पिंपरी चिंचवडला हवी आहे ती काम करणारी व्यवस्था, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवणारा निर्णयप्रक्रियेचा वेग...
AI, स्मार्ट तंत्रज्ञान आणि आधुनिक नियोजनाच्या माध्यमातून शहराचा प्रत्येक भाग सुरक्षित, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज केला जाईल. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार, व्यापारी अशा पद्धतीनं प्रत्येक घटकाचा विकास हा या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे.
जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेला हा विकासाचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदर्श महानगरपालिका बनवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर, सुलभ होणार.. कारण, रस्ते खड्डेमुक्त होणार, वाहतूक कोंडी नाही होणार, रस्ते दर्जेदार बनणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनो आपल्या हक्काची घरं घ्या आणि आनंदानं रहा.. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ० टक्के मालमत्ता कर..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भगिनी-मायमाऊलींना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ५ लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांना आता फक्त हवाय विकास.. त्यासाठी हवीत विश्वासाची, कामाची माणसं.. तो विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला आहे.. पिंपरी-चिंचवडकरांचं आता ठरलं आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सार्वजनिक वाहतूक सेवा तुमच्या हक्काची होणार.. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही इच्छित स्थळी जाण्यासाठी करा मोफत प्रवास..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनतेनं ठरवलं आहे, विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसवर बसवला आहे, जनतेनं प्रतिसाद दिला आहे, कामाच्या माणसाकडे जनांचा कौल झुकला आहे..!
📍 हडपसर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक सेवा मोफत करणार, ही पोकळ घोषणा नाही तर ते सत्य आहे.. आम्ही शब्दाला जागणारी माणसं आहोत..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार.. टँकर माफियाराज कायमचा संपवणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मागील नऊ वर्षांत नवी पिढी गुन्हेगारीकडे वळली.. याला जबाबदार कोण?
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी लोकाभिमुख व लोककल्याणकारी स्वराज्याची संकल्पना मांडली. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं आणि स्वराज्याला प्रथम छत्रपती लाभले. स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत, कुशल प्रशासक आणि रणकौशल्यसंपन्न स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राजमाता_जिजाऊ_माँसाहेब
#rajmatajijaumasaheb -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा जो मंत्र दिला, तो आजही तरुणाईला योग्य दिशा देणारा आहे. त्यांच्या विचारांतूनच सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारताची संकल्पना साकार होऊ शकते. चारित्र्य, धैर्य आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे, युवाशक्तीचे प्रेरणास्थान, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्व युवक-युवतींना राष्ट्रीय युवा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#swamivivekananda
#nationalyouthday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडमधील विकास आराखड्यावर आम्ही नव्यानं कामाला लागणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडला प्लास्टिक मुक्त करणार, देशातलं नंबर एकचं स्वच्छ शहर बनवणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांना सोयीचं पडेल अशा वेळेला आम्ही मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी नाही, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारा पक्ष आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ५ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. भिमाबाई पोपट फुगे, श्री. अमर परशुराम फुगे, श्री. प्रियंका प्रविण बारसे, ॲड. राहुल बाळासाहेब गवळी तसंच प्रभाग क्र. ७ मधील अधिकृत उमेदवार श्री. विराज विश्वनाथ लांडे, श्रीम. अनुराधा सुशिल लांडगे, श्रीम. अश्विनी निलेश फुगे, श्री. अमोल मधुकर डोळस यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
आज पिंपरी-चिंचवडसारख्या आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकेची अवस्था बिकट झाली आहे. ज्यांच्या हाती तुम्ही सूत्रे दिली, त्यांनी शहर नीट सांभाळलं नाही. टँकर माफिया, दहशत, दादागिरी, हफ्तेवसुली, कोयता गँग यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शहरात गुंडागर्दी वाढली आहे, तरुण पिढी वाया जात आहे आणि नवीन व्यावसायिकांनाही धमकावलं जात आहे.
आमच्या काळात आम्ही अनेक प्रश्न सोडवले, मोठी कामं केली, पण कधीही महानगरपालिकेला कर्जात ढकललं नाही. याउलट ठेवी वाढवल्या, भोसरीचा पूल चार पदरी केला, सक्षम व प्रामाणिक अधिकारी आणून काम केलं. आज मात्र नेहमीचा पाणीपुरवठा नाही, नियमित वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, घंटागाडी नाही, स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलीय, नागरिकांवर हल्ले होत आहेत; पण कुत्रा नसबंदीच्या नावाखाली पैसे खाल्ले गेले. महिलांवर अन्याय करणारे फतवे निघत आहेत. झाडांची मोजणी न करताच कोट्यवधींची बिलं काढली जात आहेत, हे पैसे कुठून येतात, कुठे जातात, हा प्रश्न जनतेचा आहे. सर्व निविदा जास्त टक्क्यानं काढून केवळ मलिदा खाण्यासाठी कामं सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली तिजोरी भरण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे महानगरपालिका कर्जबाजारी झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमक्यांचे फोन येतात, पण आम्ही दबावाला घाबरणारे नाही. हा भ्रष्टाचारी राक्षस संपवण्याचा आणि राक्षसी लंकेला सुरुंग लावण्याचा लढा आहे.
मी जाती-पातीचा, नात्यागोत्याचा विचार कधीच केला नाही. आम्ही सर्वांचा आदर करतो. हा लोकशाहीचा लढा आहे. भावनिक मुद्द्यांवर नाही तर विकासावर, कामावर आणि प्रामाणिकपणावर लढायचं आहे. आमचा स्पष्ट अजेंडा आहे, तो म्हणजे पिंपरी-चिंचवडला कर्जातून बाहेर काढायचं, भ्रष्टाचार थांबवायचा, पारदर्शकता आणायची, प्रदूषण कमी करायचं आणि नागरिकांना दिलासा द्यायचा. PMPML बस आणि मेट्रो सेवा मोफत करून सामान्य माणसाचं जीवन सुलभ करायचं.
पिंपरी-चिंचवडकरांनो बदल घडवायचा असेल, तुमचे चांगले दिवस परत आणायचे असतील, तर आमच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. हा लढा शहर वाचवण्यासाठी आहे आणि त्यासाठी तुमची भक्कम साथ आम्हाला हवी आहे.
📍भोसरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आता एकच वादा राष्ट्रवादीचा; तो विकासाचा, परिवर्तनाचा, लोकाभिमुखतेचा, सेवा तत्परतेचा..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल, तर महानगरपालिका सक्षम, स्वच्छ आणि प्रामाणिक हातात गेली पाहिजे. आज इथं भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय, बोगस बिलं काढली जात आहेत, जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. कर्जरोखे काढून महानगरपालिका कर्जबाजारी केली गेली आहे, पण नागरिकांच्या मूलभूत समस्या तशाच आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ६ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. वर्षा गणेश बढे, श्रीम. प्रियंका मयूर लांडे, श्री. संतोष काळूराम लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पाण्याची गैरसोय होत आहे, गढूळ पाणी मिळतंय, वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण झाले आहेत, रस्त्यांवर खड्डे पडलेत, प्रदूषण वाढलं आहे. कुत्र्यांच्या नसबंदीपासून स्वच्छतेपर्यंत सर्वच ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत. गुंडगिरी, दहशत, मद्यपी रस्त्यावर मोकाट यांसारखे शहरातील असुरक्षित वाटू देणारे दृश्य आम्हाला बदलायचे आहे.
आम्ही नागरिकांना जागं करायला आलोय. जनतेचा प्रत्येक पैसा नियोजनबद्ध, पारदर्शक पद्धतीनं खर्च झाला पाहिजे, हाच आमचा आग्रह आहे. आता AI आलंय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख करायचं आहे. बोगस कामकाज, दलाली आणि सत्तेतून पैसा कमावणाऱ्यांना थारा दिला जाणार नाही.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं सगळ्यांना समान न्याय, जातीय सलोखा आणि नियम सगळ्यांसाठी सारखे असणं, हेच आमचं धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा वारसा जपत समाजात तेढ नाही तर एकोपा आम्हाला निर्माण करायचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सात संकल्प पूर्ण करणार. दररोज नळाद्वारे मुबलक पाणी देणार, टँकर माफियाला कायमचा आळा घालणार, खड्डेमुक्त रस्ते आणि ट्रॅफिकमुक्त शहर बनवणार, नियमित स्वच्छता राखणार, हायटेक आरोग्य सुविधा उभारणार, PMPML बस आणि मेट्रो मोफत करून प्रदूषण कमी करणार, त्या माध्यमातून नागरिकांचं आरोग्य आपोआप सुधारणार.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पिंपरी-चिंचवडसाठी लढत आहेत. ग्रामीण-शहरी भागाची मला पूर्ण जाण आहे आणि तुम्हाला आधार देण्याचं काम आम्ही करून दाखवू. खरा बदल हवा असेल, भ्रष्टाचाराच्या राक्षसाला संपवायचं असेल, तर घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या उमेदवारांना विजयी करा. पिंपरी-चिंचवडला उत्तम शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचा हा निर्धार आहे.
📍भोसरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ८ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. सीमा रवींद्र सावळे, श्रीम. राजश्री अरविंद गागरे, श्रीम. अश्विनी संजय वाबळे, श्री. तुषार भिवाजी सहाने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी काही अनुभवी आणि काही नव्या दमाचे लोक गरजेचे आहेत. गेल्या काळात एवढे पैसे खर्च झाले, कर्जरोखे काढावे लागले, पण प्रत्यक्षात काम झालं नाही. ७० लाखांचा पूल ७ कोटींना गेला, शहर लुटलं गेलं. हा भ्रष्ट कारभार थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे.
आम्ही पिंपरी-चिंचवडसाठी ठोस जाहीरनामा सादर केला आहे. ‘एक अलार्म, पाच काम’, असा कामांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प आहे. दररोज नळाद्वारे पाणी, टँकर माफिया कायमचा बंद, ट्रॅफिक व खड्डेमुक्त शहर, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी PMPML व मेट्रो मोफत प्रवास आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
आम्ही चुकीची कामं होऊ देणार नाही. आता बदल करायची वेळ आली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदार राजानं आपली ताकद दाखवावी. सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि प्रभाग क्र. ८ मधील आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन आहे.
📍भोसरी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही कधीतरी आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची. आमच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला थारा दिला नाही, नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिलं आणि स्मशानभूमी, दफनभूमी, रस्ते, पूल, उद्योग-धंदे उभे करून विकास करून दाखवला. पण २०१७ नंतरच्या काळात शहराची दिशा भरकटली. प्रचंड भ्रष्टाचार, बोगस कामकाज, वाढतं प्रदूषण, ट्रॅफिकची कोंडी, खड्ड्यांचं साम्राज्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा बिघाड शहराला पोखरून काढत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. २ मधील अधिकृत उमेदवार श्री. आल्हाट रूपाली परशुराम, श्रीम. अश्विनी संतोष जाधव, श्री. विशाल विलास आहेर, श्री. वसंत प्रभाकर बोराटे तसंच प्रभाग क्र. ३ मधील अधिकृत उमेदवार सौ. अनुराधा दीपक साळुंके, श्री. प्रकाश बबन आल्हाट, सौ. पुनम अमित तापकीर, श्री. लक्ष्मणशेठ सोपानराव सस्ते पा. यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
आज शहरावर कर्जाचा बोजा आहे, मोशी-चिखलीसारखे भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अल्पवयीन गुन्हेगारीनं दहशत निर्माण केली आहे. हे चित्र बदलायचं असेल तर प्रामाणिक काम करणाऱ्या आणि महापुरुषांच्या विचारधारेनं चालणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यावी लागेल.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालून, सर्व जाती-धर्माचा सन्मान राखून आम्ही कामं केली. आता आम्ही जाहीर केलेल्या सुधारणा करून दाखवणार. दररोज नळाद्वारे पाणी आणि टँकर माफियाला पूर्णविराम, ट्रॅफिक व खड्डेमुक्त पिंपरी-चिंचवड, नियमित व पारदर्शक स्वच्छता व्यवस्था, हायटेक आरोग्य सुविधा आणि PMPML व मेट्रोसह मोफत आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक, पारदर्शक टेंडर प्रक्रिया, स्वच्छ कारभार आणि नियोजनबद्ध विकासातून पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा ‘बेस्ट शहर’ म्हणून नावलौकिक मिळवून द्यायचं आहे. त्याकरता येत्या १५ जानेवारीला प्रभाग क्र. २ आणि ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍 मोशी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसेवा करत असताना महापुरुषांच्या, विचारवंतांच्या आदर्श विचारांना पुढे घेऊन जाणं, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प आहे..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही केवळ शहरं नाहीत, तर ती कष्टकरी, कामगार आणि सर्व समाजांना सामावून घेणारी ‘मिनी भारत’ आहेत. मराठवाड्यातील हजारो कुटुंबं रोजगारासाठी इथं आली, इथं स्थिरावली आणि या शहरांच्या जडणघडणीत सहभागी झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं आयोजित मराठवाड्यातील मतदार बांधवांच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं.
१९९१ पासून मी या शहरांच्या विकासासाठी काम केलं आहे. पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलून दाखवला आहे, कारण मला कामाची आवड आहे आणि शब्दाला जागणं माहिती आहे. जिथं अन्याय होतो, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहते. मराठवाड्याची भूमी ही संतांची, कष्टकरी आणि धैर्यवान माणसांची आहे; बीडसारख्या जिल्ह्यानं नेहमीच मला ताकद दिली आणि त्या प्रेमाची परतफेड विकासाच्या माध्यमातून केली आहे.
बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्ग, CIIIT, सायन्स पार्क, कोट्यवधींच्या विकासकामांची भूमिपूजनं ही केवळ घोषणा नाहीत, तर केलेली कामं आहेत. पण आज दुर्दैवानं पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेचा अभाव, ट्रॅफिकची बोंब, वाढतं प्रदूषण आणि नियोजनशून्य कारभार दिसतो आहे. आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकांचा दर्जा धुळीला मिळवण्याचं काम काही लोकांनी केलं आहे.
आता बदल आवश्यक आहे. चुकीच्या लोकांना बाजूला करून प्रामाणिक आणि काम करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यावी लागेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सक्षम उमेदवार आम्ही दिले आहेत. तुमच्या कामासाठी मी धावून येईन, तुमच्या पाठीशी ठाम उभा राहीन. दबावाला घाबरू नका, जातीय सलोखा जपा, आपली अस्मिता आणि प्रामाणिकपणा टिकवा, असं आवाहन नागरिकांना केलं.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी तुमच्या पवित्र मतांची आम्हाला गरज आहे. घड्याळ आणि तुतारी चिन्हासमोरील बटण दाबा, विकासाच्या दिशेनं एक ठाम पाऊल टाका, असं सूचित केलं.
📍वल्लभ नगर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वसामान्यांसाठी मोफत मेट्रो आणि बस सेवा, घरांना मालमत्ता कर माफ, माता-भगिनींना पाच लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज.. आम्ही आमचं उत्तरदायित्व निभावणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिक्षणाचा दर्जा सुधारणार, वर्गखोल्या आधुनिक होणार, खेळ प्रकारांशी संबंधित सुविधांमध्ये भर घालणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, धार्मिक स्थळांचं रक्षण केलं जाणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आरोग्यसेवा अद्ययावत करणार, मोफत वैद्यकीय सेवा मिळणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी चिंचवडला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणू..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वाहतूक कोंडीपासून पिंपरी-चिंचवडकरांची सुटका होणार.. खड्डेमुक्त रस्त्यांमुळे प्रवास वेगवान होणार, वेळेची बचत होणार.. प्रवास सुलभ होण्यास मदत मिळणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नळाद्वारे दररोज, ठरलेल्या वेळेत आणि उच्च दाबानं पाणी पिंपरी चिंचवडकरांना मिळणार. पाण्याचं प्रदूषण आम्ही रोखणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. पिंपरी-चिंचवडला सोयी-सुविधापूर्ण बनवण्यासाठी आम्ही कुठेही कसूर बाकी सोडणार नाही. आम्ही मांडलेले सात संकल्प पूर्ण करणार, दिलेला शब्द पाळणार..!
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण, सुरक्षित आणि समृद्ध विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्पष्ट, ठोस आणि लोकाभिमुख जाहीरनामापत्र जाहीर!
✅ मेट्रो व पीएमपीएमएल बस प्रवास मोफत - कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा.
✅ महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मोफत/सवलतीचे आरोग्य उपचार, हायटेक महापालिका रुग्णालये.
✅ शिक्षणाला प्राधान्य - सुसज्ज मॉडेल शाळा, डिजिटल सुविधा, विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना.
✅ महिला सक्षमीकरण - सुरक्षित शहर, रोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगाराला चालना.
✅ कामगार व मध्यमवर्गासाठी न्याय - मूलभूत सुविधा, सामाजिक सुरक्षा, मालमत्ता करमुक्त.
✅ स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर - कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढ.
✅ नळाद्वारे पाणीपुरवठा, मजबूत ड्रेनेज व रस्ते - पायाभूत सुविधांचा वेगवान विकास.
✅ स्मार्ट सिटी उपक्रम - स्मार्ट ट्रॅफिक, सीसीटीव्ही, ई-गव्हर्नन्स.
✅ घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन - सर्वांसाठी सुरक्षित निवारा.
✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना - आरोग्य, विरंगुळा व सन्मान.
पिंपरी चिंचवडचा विकास म्हणजे केवळ घोषणा नाही, तर अंमलबजावणीची हमी.
जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या ठोस आराखड्यावर उभं राहिलेलं हे हमीपत्र म्हणजेच प्रगतीचा संकल्प.
#राष्ट्रवादीचे_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
दिलेला शब्द पाळणार, कामं करायला मागे नाही हटणार.. दिला वादा पूर्ण करणार..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुन्हा येतंय विकासाचं महाराष्ट्रवादी पर्व...!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे शहराचा विस्तार झाला, पण अपेक्षित विकास झाला नाही. पुणे महानगरपालिकेच्या कारभारात झालेला भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा याला कारणीभूत आहे. आता पुणेकरांना फक्त आश्वासनं आणि पोकळ घोषणा नकोत; ठोस उपाय, स्पष्ट दिशा आणि कृती हवी आहे. पुणे शहराला काम करणाऱ्या माणसांची गरज आहे.
याच दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सक्षम, कार्यशील, नव्या ऊर्जेचे आणि नव्या उमेदीचे उमेदवार पुणेकरांसमोर दिले आहेत. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही स्पष्ट विकास आराखडा तयार केला आहे तो म्हणजे, ‘पाच काम, पक्का वादा; तीन कामं करू जादा’.
मुबलक आणि दररोज पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका, प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी पुणे, स्वच्छ शहर, झोपडपट्टी पुनर्वसन व जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पुणेकरांसाठी मोफत सार्वजनिक बस सेवा तसंच पुणे स्कूल मॉडेलद्वारे शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा, ही आमची ठोस वचनं आहेत.
पुणेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या जीवनमानासाठी आणि विकासाच्या नव्या दिशेसाठी ही सर्व वचनं प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं पार पाडेल, अशी हमी देतो.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गोरगरिबांच्या मुलांना सुद्धा समान शिक्षणाचा हक्क आहे.. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत.. आजच्या स्पर्धेच्या युगात ही मुलं कुठेही मागे पडता कामा नये..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महत्त्वाची घोषणा | थेट प्रक्षेपण
पिंपरी-चिंचवडचा विकास गतीनं, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं PCMC साठी विशेष घोषणापत्र जाहीर करण्यात येणार आहे. शहरातील पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन सोयींना केंद्रस्थानी ठेवून हे घोषणापत्र आज, दुपारी ठीक ०४:०० वा. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलं जाणार आहे.
ही पत्रकार परिषद माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर थेट प्रसारित केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही लाईव्ह पत्रकार परिषद आवर्जून पहा.
धन्यवाद! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'जय जवान, जय किसान' हा मंत्र देत देशाला स्वाभिमान, साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून देणारे भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री जी यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! राष्ट्रसेवा, शेतकरी व जवानांच्या सन्मानासाठी त्यांनी बजावलेली भूमिका सदैव स्मरणात राहील.
#lalbahadurshastri -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रिक्षा-कॅब चालक-मालक बांधवांना आम्ही पूर्ण सहकार्य करणार.. ज्या योजना आखू आणि राबवू त्यातून त्यांच्या सुद्धा फेऱ्या वाढतील आणि उत्पन्नात भर पडेल.. त्यांना देखील भक्कम साथ देऊ..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
प्रचार रॅलीदरम्यान पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनाला स्पर्शून गेला. पुणेकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेला दृढ विश्वास अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो. पुण्याच्या विकासासाठी, शहराचं भवितव्य बदलण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हीच साथ आणि पुणेकरांचे हेच आशीर्वाद आम्हाला खरी ताकद देतात.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
घड्याळाचा अलार्म वाजलाय.. आता फक्त नागरिकांचे मतरुपी आशीर्वाद मिळाले की, मुबलक पाणी, चांगले रस्ते, वाहतूक कोंडी विरहित पुणे आम्ही करून दाखवू..!
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ३० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. स्वप्नील देवराम दुधाने, श्रीम. संगिता संजय बराटे, श्रीम. निवेदिता शैलेश जोशी, श्री. विजय रामेश्वर खळदकर तसंच प्रभाग क्र. ३२ चे अधिकृत उमेदवार श्रीम. अश्विनी किशोर कांबळे, श्रीम. किरण अरविंद बारटक्के, श्रीम. दिपाली प्रदीप धुमाळ, श्री. सचिन रामभाऊ बराटे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. यावेळी विविध पक्षातील व संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता पुण्याची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, हे ठरवण्याची निर्णायक वेळ आली आहे. हा निर्णय भावनेवर नव्हे, तर विकासाच्या ठोस आधारावर घ्यावा, असं आवाहन पुणेकरांना केलं. करवे नगर-हिंगणे होम कॉलनी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सक्षम, अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिले आहेत. सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करून विकासाला साथ द्यावी, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांसमोर मांडली..
गेल्या नऊ वर्षांत पुण्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं. पाणी, वाहतूक, रस्ते आणि मूलभूत सुविधांची अवस्था खालावली आहे. टँकर माफियामुळे पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हा माफिया पूर्णपणे संपवण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येक पुणेकराला दररोज नळाद्वारे पाणी देणं हा आमचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकल्प आहे. पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनानं जबाबदारी झटकू नये; सामान्य पुणेकर भरडला जाणार नाही, ही परिस्थिती आम्ही बदलू, अशी ग्वाही दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा, क्रीडांगण उभारून विकास करून दाखवला आहे. तोच विकास पुण्यातही नक्की शक्य आहे. आज पुण्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून ट्रॅफिकमुक्त पुणे हे आमचं दुसरं प्रमुख उद्दिष्ट आहे. खड्ड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही कामं होत नाहीत, हे थांबवून खड्डेमुक्त पुणे घडवण्याचा आमचा निर्धार आहे. नदी सुधार प्रकल्पांआधी पिण्याचं पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत गरजांना प्राधान्य दिलं पाहिजे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी न झाल्यामुळे खालच्या भागातील शेतकरी आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. नियमित स्वच्छतेचा अभाव आणि स्वच्छता व्यवस्थेमधील गैरप्रकार आम्ही थांबवू. अस्वच्छता आणि प्रदूषणामुळे आजार वाढत आहेत, हे आम्ही बदलणार आहोत.
पुण्यातील वायू प्रदूषण गंभीर असून प्रदूषणमुक्त पुणे हे आमचं पाचवं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अनियंत्रित बांधकामांमुळे पुणे काँक्रीटचं जंगल बनत चाललं आहे; हरित क्षेत्र वाढवणं अत्यावश्यक आहे. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत आम्ही हरित विकास करून दाखवला आहे.
रस्ते रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था देणं ही आमची जबाबदारी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास करून गरीबांना हक्काची घरं दिली जातील. केंद्र आणि राज्य सरकारच्या आवास योजनांची सांगड घालून गृहनिर्माणाचा प्रश्न सोडवण्याचा आमचा संकल्प आहे. पुण्यातील महापालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मॉडेल शाळांची उभारणी करू. गरीब कुटुंबातील मुलांना मराठीसोबत उत्तम इंग्रजीचं ज्ञान देणं ही काळाची गरज आहे, कारण शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूक असते, त्यातून सक्षम नागरिक घडतात.
सार्वजनिक वाहतूक मोफत केल्यास खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ट्रॅफिक आणि प्रदूषण घटेल. मोफत मेट्रो आणि बस सेवा योग्य नियोजनातून आर्थिकदृष्ट्या शक्य आहेत, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. यामुळे पुणेकरांचा वेळ, पैसा आणि इंधन वाचेल. महानगरपालिकेला स्वतंत्र अधिकार आहेत; सत्ता आल्यावर निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. अफवा आणि प्रलोभनांना बळी न पडता पुढील पाच वर्षांचा विचार करून मतदान करा, असं पुणेकरांना आवाहन आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे, तरुणांसाठी आधुनिक कौशल्य केंद्रे उभारली जातील. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्याचा विकास करण्याचा आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. मालकी हक्क, पुनर्वसन, डोंगर भाग विकास यांसारखे पुण्यातील स्थानिक प्रश्न प्राधान्यानं सोडवले जातील. पुणे आपलं शहर आहे. इथं विकास, स्वच्छता, सुविधा आणि भविष्य घडवण्यासाठी मला तुमच्या विश्वासाची आणि पाठिंब्याची मतांच्या रूपानं गरज आहे, अशा भावना व्यक्त केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनतेला जागं करण्यासाठी हा आमचा अलार्म आहे. ह्या अलार्मचा अर्थ असा आहे की, आता भ्रष्टाचाराला थांबवा, भूलथापांना बळी पडू नका, आता बस्स म्हणा..!
येत्या १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यशील, नव्या उमेदीच्या, नव्या ऊर्जेच्या उमेदवारांना आपलं बहुमूल्य मत द्या आणि आपली रखडलेली शहरातील विकास कामं मार्गी लावा, हा अलार्म वाजण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वांची आहे साथ म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस करतेय उद्याची बात.. येणारी वेळ ही जनतेची आहे, विकासाची आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे हे विद्या-संस्कृतीचं माहेरघर आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनंच आपण कायम पुढे जाणार आहोत. सातत्यानं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणं हेच माझं धोरण राहिलं आहे. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीम. प्रितम रमेश नागापुरे, श्रीम. अस्मिता विशाल शिंदे, श्रीम. रश्मी विक्रांत अमराळे, श्री. गौरव गणेश घुले तसंच प्रभाग क्र. २१ चे अधिकृत उमेदवार श्री. सुगत दसाडे, श्रीम. शोभा संतोष नांगरे, श्रीम. श्वेता संग्राम होनराव आणि श्री. बाळासाहेब अटल; त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ३६ चे अधिकृत उमेदवार श्री. सुभाष दिगंबर जगताप, श्रीम. अश्विनी नितीन कदम, श्रीम. नीलम गणेश गांधी, श्री. सुशांत सुनील ढमढेरे व प्रभाग क्र. ३५ च्या अधिकृत उमेदवार श्रीम. हर्षदा सुयोग गायकवाड या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही नवे, काही अनुभवी असे उमेदवार आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांची प्रतिमा स्वच्छ व चांगली आहे. पुण्यात आम्हाला खरा बदल घडवायचा आहे. टँकर माफियांवर लगाम लावायची आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी शाश्वत पाणीपुरवठा, मोठ्या भौगोलिक क्षेत्राच्या महानगरपालिकेसाठी ठोस नियोजन आखायचं आहे. दररोज नळामार्फत पाणी, दररोज स्वच्छ शहर व प्रभावी कचरा व्यवस्थापन, हायटेक आरोग्य सुविधा, ट्रॅफिक समस्या सोडवून वाहतूक कोंडीमुक्त पुणे आणि प्रदूषणमुक्त शहर अशी पाच कामं प्रामुख्यानं आम्हाला मार्गी लावायची आहेत.
बस-मेट्रो व्यवस्था सक्षम करू; मोफत बस सेवा व मेट्रो सेवेची दिशा देऊ. बोगस प्रकारांना आळा घालू, कायदा हातात घेणाऱ्यांना योग्य शिक्षा देऊ. साधू-संतांच्या विचारानं चालत सुसंस्कृत पुणे उभारु. पुण्यात दादागिरी व दहशतगिरीला अजिबात थारा राहणार नाही, अशी हमी सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली. CIIIT, AI सारख्या उपक्रमांतून नवी पिढी घडवू, उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करू, पुणे मॉडेल शाळांची उभारणी करू. महानगरपालिकेची सूत्र जनतेच्या हातात यावीत, हा माझा आग्रह आहे, असं स्पष्ट केलं.
आम्हाला बदल हवा आहे, पण तो मतदार राजाच्या आशीर्वादांनीच शक्य आहे. येत्या १५ जानेवारीला तुमचं पवित्र, बहुमोल मत आमच्या तमाम उमेदवारांना द्या आणि त्यांना निवडून आणा, असं आवाहन आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं आयोजित रिक्षा चालक-कॅब चालक मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व कष्टकरी रिक्षा चालक, कॅब चालकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे स्व. बाबा आढाव यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला व स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी झोपडपट्टी सुरक्षा दलानं दिलेल्या सक्रिय पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. आज विविध संघटनांकडून आलेली निवेदनं आणि मागण्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र बसून प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढू, असा शब्द कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला.
रस्त्यांच्या समस्या, दैनंदिन अडचणी, तुमच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आणि प्रदूषण यांची मला पूर्ण जाणीव आहे. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही; कष्टकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी आम्ही ठोस निर्णय घेऊ. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी खात्री दिली. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीम. प्रितम रमेश नागापुरे, श्रीम. अस्मिता विशाल शिंदे, श्रीम. रश्मी विक्रांत अमराळे, श्री. गौरव गणेश घुले तसंच प्रभाग क्र. २१ चे अधिकृत उमेदवार श्री. सुगत दसाडे, श्रीम. शोभा संतोष नांगरे, श्रीम. श्वेता संग्राम होनराव आणि श्री. बाळासाहेब अटल या उमेदवारांच्या प्रचारार्थ शारदा गजानन मंडळाच्या वतीनं आयोजित व्यापारी स्नेह संवादाच्या कार्यक्रमात सहभागी झालो.
पुण्याच्या भविष्यासाठी आज व्यापारी वर्ग सजगपणे पुढे येतो आहे, ही गोष्ट निश्चितच दिलासादायक आहे. मी इथं कोणाच्या स्वार्थासाठी नाही, तर माझ्याच स्वार्थासाठी आलो आहे. कारण पुणे सक्षम झालं, तर महाराष्ट्र मजबूत होणार आहे, असं स्पष्ट केलं.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ट्रॅफिक, प्रदूषण यांसारखे अनेक पुण्यातील प्रश्न प्रलंबित आहेत. पाणी टंचाईमुळे टँकर माफिया तयार झाले, पाणीपुरवठ्याच्या नावावर उमेदवार उभे राहिले. पुणे महानगरपालिकेत ठराविक कॉन्ट्रॅक्टरना डोळ्यांसमोर ठेवून कामं झाली, याचा फटका पुणेकरांना बसला. पुणे पूर्वी स्वच्छ होतं, आज मात्र घाणीचं साम्राज्य दिसतं. STP बसवली नाहीत, रस्ते रुंदीकरण झालं नाही, एक काम करायचं तर पाच वेळा अलार्म वाजतो, हे चित्र आपल्याला मिळून बदलायचं आहे.
दररोज नळानं पाणी; टँकरनं नाही. दररोज शहर स्वच्छता आणि कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावणार. हायटेक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार. ट्रॅफिक समस्या सोडवून पुणे खड्डेमुक्त बनवणार आणि शहराला प्रदूषणमुक्त करणार. ही सर्व पाच कामं आम्ही करून दाखवणार, अशी हमी आजच्या व्यापार स्नेह संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली.
खर्चाचं नियोजन नीट केलं जात नाही, हे वास्तव आहे. PMPML मोफत करता येऊ शकते, मेट्रोही मोफत करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. फक्त निर्णय घेण्याची हिंमत हवी. व्यापारी बांधव शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात, पण आतापर्यंत अनेकांनी फक्त घोषणा केल्या; काम झालं नाही.
माझ्या विचारांचे नगरसेवक जनतेनं निवडून दिले, तर बऱ्याच गोष्टी मार्गी लावण्याची जबाबदारी मी स्वतः घेईन. पुणे महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणू, फक्त टीका करणार नाही, तर काम करून दाखवू. त्यामुळेच व्यापारी बांधवांना एवढंच आवाहन आहे की, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि पुणे खऱ्या अर्थानं विकसित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन, ठिकठिकाणी स्वच्छता आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प आदी कामांना प्राधान्यानं हाती घेणार..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांना चांगल्या सवलती उपलब्ध करून देणार..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भविष्यात भासू देणार नाही.. तशा पद्धतीनं ठोस उपाययोजना आखल्या जात आहेत..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्रThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्याचा विकास हाच राष्ट्रवादीचा ध्यास..!
संवाद आपलेपणाचा, माणूस मी विश्वासाचा.. संकल्प केलाय पुणे विकासाभिमुख करण्याचा..!
पुणेकरांनी दिलेल्या प्रेमानं आणि पाठिंब्यानं जबाबदारीची जाणीव अधिक वाढली आहे.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गुणवत्तापूर्ण शिक्षक, दर्जेदार शिक्षण!
‘पुणे मॉडेल स्कूल’च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची खात्री मिळणार.
CBSE व ICSE मानकांनुसार विकसित शाळा, अत्याधुनिक वर्गखोल्या, विज्ञान-संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक आणि मराठी-इंग्रजी माध्यमातील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार.
कोणताही अतिरिक्त शुल्क न घेता, पारदर्शक व्यवस्थेतून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा संकल्प.
खासगी शाळांवरील अवलंबित्व कमी करणार, पुण्याच्या शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांसाठी उत्तम आणि दिलासादायक वाहतूक व्यवस्था!
मेट्रो आणि PMPML बससेवा सर्वांसाठी मोफत करून दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा करणार.
लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी व फीडर बससेवेच्या सुधारणा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणार. यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणात घट होणार. कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करणार.
सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहणार!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सन्मानानं निवारा, सुरक्षितपूर्ण विकास!
झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्याच्या नागरी विकासाला नवी दिशा देणार.
विस्थापितांचे हक्क सुरक्षित ठेवणार. वेळेच्या चौकटीत प्रकल्प पूर्ण करणार. पारदर्शक व ऑनलाईन प्रक्रिया, डिजिटल ट्रॅकिंगमुळे विलंबाला आळा देत विकासकामांना गती देणार.
शाश्वत पुनर्विकासाचं ठोस धोरण राबवणार..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
प्रदूषणमुक्त पुणे - शाश्वत विकासाची नवी वाट!
पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, पाणी साठवण आणि प्रभावी निचरा प्रणाली अंमलात आणणार!
नाले-ओढे पुनर्जीवित करून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणार. हरित क्षेत्रांचं संरक्षण-विस्तार आणि शहराचा इकोलॉजिकल नेटवर्क मजबूत केला जाणार.
जलशोषक रस्ते, ‘स्पॉंज सिटी’ संकल्पना आणि पर्यावरणपूरक शहरी विकासातून प्रदूषण कमी करून जीवनमान उंचावण्याचा संकल्प.
स्वच्छ हवा, सुरक्षित पाणी आणि संतुलित पर्यावरणासाठी पीसीएमसीची निर्णायक वाटचाल.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी हायटेक सुविधांचा ठोस आराखडा.
२०० राजमाता जिजाऊ क्लिनिक उभारले जातील, त्यामार्फत १००% मोफत तपासणी, प्राथमिक उपचार व औषधोपचार केले जातील. माता-शिशु आरोग्यास विशेष प्राधान्य, नियमित जनजागृती शिबिरे आणि सुरक्षित सेवा पुरवल्या जाणार.
MRI-CT स्कॅनसह आधुनिक डायग्नोस्टिक लॅब आणि नवीन रुग्णालयांतून बेडची कमतरता दूर केली जाणार.
शहरातील रुग्णालयांची क्षमता ४२५ बेडवरून २८०० बेडपर्यंत वाढवणार. पीएमसीच्या अखत्यारित स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय, आधुनिक बर्न वॉर्ड, स्वतंत्र कर्करोग रुग्णालय, डिजिटल टेलिमेडिसिन सेवा आणि PPP मॉडेलद्वारे कमी दरात आरोग्य सुविधा पुरवणार.
सुलभ, सक्षम आणि आधुनिक आरोग्यव्यवस्थेकडे पुणेकरांचा प्रवास..!
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वच्छ पुणे, सुदृढ भविष्य!
नियमित स्वच्छतेतून पुण्याला देशातील टॉप ३ स्वच्छ शहरांमध्ये नेण्याचा संकल्प.
१००% कचरा संकलन व वर्गीकरण, कचऱ्याचं कंपोस्टिंग, पावसाच्या पाण्याचं संवर्धन, सौरऊर्जेचा अतिरिक्त वापर आणि 'ग्रीन सोसायटी' च्या माध्यमातून पर्यावरणपूरक सोसायट्यांना प्रोत्साहन.. शाश्वत व वैज्ञानिक पद्धतींनी स्वच्छतेचं मजबूत मॉडेल उभं केलं जाणार.
ही केवळ घोषणा नाही, तर स्वच्छ, हरित आणि जबाबदार पुणे घडवण्याची अचूक दिशा आहे.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करत पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारा निर्णय.
वाहतूक कोंडी कमी करणं, प्रवासाचा वेळ वाचवणं आणि यासोबतच रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवणार.
स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिग्नल समन्वय, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांना प्राधान्य देत स्मार्ट पुणे - सुरक्षित पुणे या दिशेनं ठोस पावलं उचलली जाणार.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची!
पुणेकरांच्या दारात दररोज पाणी पोहोचवण्याचा ठाम संकल्प!
नळाद्वारे दररोज उच्च दाबानं पाणीपुरवठा, टँकरमुक्त पुणे, ठराविक वेळापत्रक, सेन्सरयुक्त गळती नियंत्रण आणि दीर्घकालीन जलनियोजन ह्या फक्त घोषणा नाहीत, तर पुण्याच्या मूलभूत गरजांवर आधारित ठोस हमी आहे.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांसाठी सदैव कार्यक्षम...
अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची!
पाच कामं ती म्हणजे नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा, प्रदूषणमुक्त पुणे; त्याचप्रमाणे यात अतिरिक्त आणखी तीन कामं ती म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन व जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पुणेकरांप्रती उत्तरदायित्व आणि ‘पुणे मॉडेल स्कूल’...
ही फक्त आश्वासनं नाहीत, तर पुण्याच्या सर्वांगीण विकासाची ठोस दिशा आहे.
पुणेकरांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि समृद्ध भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर ज्या “अलार्म”चा आवाज ऐकत आहे, त्यामध्ये पाण्याची टंचाई, वाढती वाहतूक कोंडी, ढासळती आरोग्य सेवा, पावसाळ्यातील पुरस्थिती आणि वाढतं प्रदूषण यांचा समावेश आहे.. या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर देणारा हा जाहीरनामा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडला. हे केवळ घोषणा पत्र नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा दस्तऐवज आहे.
आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्याचा पाया आहे “पाच काम - पक्का वादा”.
✅ दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा.. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार.
✅ रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार.
✅ पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार.
✅ स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या ९८० MLD सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.
✅ आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, ICU, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.
विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, स्वाभिमानानं उपजीविकेसाठी सहाय्य केलं जाणार.
शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच १५० “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज ९०% विद्यार्थी ऑनलाईन शिकू इच्छितात, त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स अत्यावश्यक आहेत.
हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांसाठी आहे. पूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या जशा पूर्ण केल्या, तसाच पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प आहे. हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, मोजमापासाठी आहे. दररोज पाणी नाही, रस्ते खराब झाले, आरोग्यसेवा मिळाली नाही किंवा प्रदूषण वाढलं, तर आम्हाला जाब विचारा. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मी हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवला आहे.
📍 पुणे
#राष्ट्रवादीचे_अष्टसूत्री_हमीपत्र -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांसाठी महत्त्वाची घोषणा आणि त्याचं थेट प्रक्षेपण...
पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं विशेष घोषणापत्र उद्या, ठीक सकाळी ९:०० वाजता शिवाजीनगर येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत. विकास, पूरक सुविधा आणि लोकहिताचा स्पष्ट रोडमॅप थेट तुमच्यासमोर मांडणार आहोत.
ही पत्रकार परिषद माझ्या तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. लाईव्ह जरूर पाहा, अपडेटेड रहा.
धन्यवाद!
#pmcelections2026 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
व्हिजन विकासाचं, गतिमान अमरावतीचं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
परभणीकरांसाठी परभणीमध्येच चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ.. जेणेकरून कोणाची गैरसोय होणार नाही. वेळेत चांगले व योग्य उपचार मिळतील..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर आपण लातूरचा विकास करू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आणि सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपस्थितांशी संवाद साधला.
आम्ही आमच्या कामाच्या जोरावर पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलून दाखवला आहे. काम कसं करायचं हे फक्त बोलून नाही, तर करून दाखवलं आहे. निवडणुका येतात-जातात, पण दर्जेदार कामं आणि टिकाऊ विकास हाच खरा कस आहे. अमरावतीत दररोज पाणी मिळालंच पाहिजे, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गरीब आणि वंचित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे. नुसती भाषणं करून आरोप केल्यानं लोकांची पोटं भरत नाहीत, त्यासाठी काम करावं लागतं, आणि ते आम्ही करतो, असं आजच्या सभेच्या निमित्तानं स्पष्ट केलं.
युवा वर्गाला आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी CIIIT सारख्या संस्था राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये उभारल्या जात आहेत. ३६ जिल्ह्यांचा समतोल विकास, अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व, महिला आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणं, ही आमची ठाम भूमिका आहे. आपल्या विचारांचे नगरसेवक निवडून दिले, घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबलं, तर गतीनं आणि सुनियोजित विकास करता येईल. कोणालाही वाऱ्यावर न सोडता, सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामं केली जातील. अमरावती शहर चांगल्या प्रकारचं विकसित शहर बनेल, असा विश्वास नागरिकांना दिला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं योगदान हे विसरता येणार नाही. त्यांची ओळख पुसून टाकण्याची भाषा ही निषेधार्ह आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
पक्के रस्ते, रस्त्यांवर वीज खांब आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालय इत्यादी मूलभूत सुविधांची पूर्तता करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिकता आहे. आम्ही तुमचे सेवक आहोत. येत्या १५ जानेवारीला तुमच्या अनमोल मतांच्या माध्यमातून सेवेची एक संधी आम्हाला द्या.
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कामाच्या नावाखाली निधीचे पैसे गिळणाऱ्यांना आता माफ करू नका.. आता बस्स म्हणा.. येत्या १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशील उमेदवारांना तुमची अमूल्य मतं देऊन जबाबदारी आमच्या हातात द्या. पुन्हा विकासकामं सुरु होताना बघा..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अल्पसंख्याक विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळायलाच हवा. यासाठी राज्य सरकार स्तरावर विशेष प्रयत्न सुरू असून परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात याचा सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे. विकास हा कोणत्या जाती-धर्मापुरता मर्यादित नसून तो सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं.
परभणी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी युती करून सर्व समाजांना प्रतिनिधित्व दिलं आहे. आम्ही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समतोल उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला असून शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनुसार कृतीतून समतेचा विचार अंमलात आणला जात आहे. अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय, महिला आणि युवकांना संधी देण्यात आली आहे.
अनुभवी आणि नव्या नेतृत्वाचा समन्वय साधून शहराचा कारभार चालवला जाईल. नव्या लोकांना घडवणं आणि पुढील पिढीसाठी सक्षम नेतृत्व तयार करणं, हे ही या निवडणुकीमागील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्या काळात मागील पंचवीस वर्षांत झालेला नियोजनबद्ध विकास हा परभणीसाठी आदर्श आहे आणि तसाच कायापालट परभणीत करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. फक्त महानगरपालिकेच्या करावर विकास शक्य नाही. केंद्र, राज्य, सीएसआर, जिल्हा वार्षिक योजना अशा सर्व निधी स्रोतांचा योग्य आणि पारदर्शक वापर करून विकास साधला जाईल. पाणीपुरवठा योजना, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि त्यानंतर दर्जेदार रस्ते ही कामं नियोजनबद्ध पद्धतीनं केली जातील. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून कामं लवकरच प्रत्यक्षात दिसतील, असं आजच्या सभेच्या निमित्तानं नागरिकांना स्पष्ट केलं.
पंतप्रधान आवास योजनेतून गरीब आणि बेघर कुटुंबांना हक्काची घरं दिली जातील. जात-धर्म न पाहता प्रत्येक गरजू माणसाला न्याय देण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. परभणी शहरासाठी नवीन बायपास रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारकडे मांडून वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर दिला जाईल, अशी हमी दिली. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर बीओटी तत्वावर कॉम्प्लेक्स उभारून स्वउत्पन्नाचे स्रोत निर्माण केले जातील, ज्यामुळे पालिकेची आर्थिक ताकद वाढेल. गोरगरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली जाईल. मराठीबरोबर दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्यावर भर दिला जाईल, असं देखील स्पष्ट केलं.
एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगासाठी परभणीतील विद्यार्थी तयार केले जातील. एनजीओ आणि खासगी संस्थांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. आरोग्य क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीनं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जाईल, जिथे गरीबांसाठी मोफत आणि इतरांसाठी किफायतशीर उपचार उपलब्ध असतील. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचाही विचार आहे. जीएसटीमधून महानगरपालिकेला अधिक निधी कसा मिळेल, यासाठी निवडणुकीनंतर विशेष बैठक घेतली जाईल आणि अर्थ विभाग यात स्वतः लक्ष घालेल. शहरातील ओपन स्पेस विकसित करून गार्डन, ओपन जिम आणि विरंगुळ्याच्या सुविधा सीएसआर निधीतून उभारल्या जातील, अशी माहिती नागरिकांना दिली.
परभणीला औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विस्तारित एमआयडीसी क्षेत्रात उद्योग आणून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली जाईल. उद्योगांना सवलती आणि प्रोत्साहन दिलं जाईल. परभणी महानगरपालिकेसाठी भव्य व आधुनिक प्रशासकीय इमारत उभारून नागरिकांना सुविधा देणारी सक्षम यंत्रणा उभी केली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल परभणीमध्ये उभारून युवकांना खेळासाठी योग्य संधी आणि सुविधा दिल्या जातील. परभणीला ‘आपलं शहर’ मानून हे शहर दत्तक घेऊन पुढील काही वर्षांत विकासाचं आदर्श मॉडेल बनवण्याचा आमचा निर्धार आहे. येत्या, १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा. परभणीचा विकास निश्चित आहे, असा विश्वास नागरिकांना दिला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून यंदाच्या अर्थसंकल्पात निधीला घेऊन तरतुदी करू. कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांनो,
ज्यांनी शहराची नासधूस केली, जे महापालिकेचा कारभार सांभाळण्यात असक्षम ठरले आणि ज्यांच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला, रस्ते खड्ड्यांनी भरले अशा कामचुकार लोकांना धडा शिकवण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. येत्या, १५ जानेवारीला आपलं बहुमूल्य मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्षम उमेदवारांना द्या आणि महापालिकेचा कारभार पूर्ववत करा.
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लातूर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात व्यापारी केंद्र म्हणून आहे. लातूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून आजच्या लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. इथं जातीभेद, मनभेदाला स्थान नाही. समाजातील प्रत्येक घटक हा आमच्या परिवाराचा भाग आहे, या भावनेतून आम्ही राजकारण करतो. त्यामुळेच या निवडणुकीत लातूर महानगरपालिकेसाठी ५६ उमेदवार आणि ५ पुरस्कृत असे एकूण ६१ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं उभे केले आहेत.
लातूरकरांनी अनेक वर्षे वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली, पण आजही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, स्वच्छतेचा अभाव आणि नागरी समस्या कायम आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जकात, एलबीटी आणि आता जीएसटीमुळे महानगरपालिकांचं उत्पन्न घटलं असून याचा मोठा फटका लातूर शहराला बसला आहे. इचलकरंजी महापालिकेवरील अन्याय आपण कॅबिनेटमध्ये दुरुस्त केला, तसाच न्याय लातूरलाही मिळवून देऊ. जीएसटीचा हिस्सा वाढवून देण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे, असं सभेत स्पष्ट केलं.
शहरातील स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेतले जातील. या निवडणुकीत आम्ही तरुण, सुशिक्षित आणि दृष्टी असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. परदेशातून शिक्षण घेतलेली बॅरिस्टर तरुणीही आमची उमेदवार आहे, हे लातूरच्या भविष्यासाठी आशादायक आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २५ वर्षे काम करताना रस्ते, पाणीपुरवठा, उद्यानं, क्रीडांगणं आणि भक्कम पायाभूत सुविधा उभ्या केल्या. तोच विकासाचा मॉडेल लातूरमध्ये राबवता येईल आणि ते करून दाखवण्याची ताकद आमच्याकडे आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची ओळख पुसून टाकण्याची भाषा करणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो. विलासराव देशमुख यांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान कधीही विसरता येणार नाही. महाराष्ट्राची परंपरा सर्व महापुरुषांचा सन्मान करण्याची आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये हा राज्य सहन करणार नाही.
संविधानामुळे श्रीमंत उद्योगपती आणि शेवटच्या लाडक्या बहिणीचे मत समान आहे. हाच लोकशाहीचा आत्मा आहे. श्री. संजय बनसोडे यांनी क्रीडा मंत्री असताना लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी ७५ कोटींचा निधी दिला, तर श्री. बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून २५ कोटींचं सहकार भवन मंजूर झालं, हे लातूरच्या विकासाचं उदाहरण आहे. शहराच्या बाहेर साचलेला कचरा, वाहतुकीचा बोजवारा, व्यापारी आणि महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गांभीर्यानं घ्यावे लागतील. दफनभूमी, स्मशानभूमी, भाजी मंडई, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल.
अर्थमंत्री म्हणून नियोजन, क्रीडा, अल्पसंख्याक, वक्फ आदी खाती माझ्याकडे आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी अधिक निधी देणार. जीएसटी अनुदान, वाढीव मालमत्ता कर आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारीही आम्ही घेणार आहे, असं सभेत स्पष्ट केलं.
लाडकी बहिण योजना, एआय आधारित शेती, यूपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण केंद्र, डिजिटल शाळा, अभ्यासिका, एआय ट्रेनिंग, एसटीपी प्रकल्प आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून लातूरला आधुनिक शहर बनवू. मुस्लिम, ओबीसी, लिंगायत, मागासवर्गीय, मराठा, आदिवासी, मारवाडी अशा सर्व समाजांना राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रतिनिधित्व दिलं आहे.
गुन्हेगारी, विकृत प्रवृत्ती आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कठोरपणे आवर घातला जाईल. या सगळ्या सुधारणा करण्यासाठी येत्या १५ जानेवारी रोजी, घड्याळाच्या चिन्हावर मतदान करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आरोग्य व्यवस्थेत आम्ही आधुनिक सुधारणा आणू, ज्याचा उपयोग सांगली-मिरज-कुपवाडमधल्या जनतेला होईल..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निमित्तानं प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६ आणि २० मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांशी सुसंवाद साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ राजकारणासाठी नसून शहराच्या दैनंदिन प्रश्नांसाठी असतात. काही अनुभवी आणि काही तरुण उमेदवारांना संधी देऊन सक्षम नेतृत्व उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात आणि या शहराचं प्रतिनिधित्व अनेक दिग्गज नेत्यांनी केलं आहे.
या निवडणुकीत ३३ उमेदवार दिले असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये आमचा पुरस्कृत उमेदवार असून त्याचं चिन्ह टेबल व घड्याळ आहे. आज आपल्या भागातील नागरिकांना उपचारांसाठी वेगवेगळ्या शहरात जावं लागतं, ही स्थिती बदलली पाहिजे. आम्ही कामाची माणसं आहोत, शब्दाचे पक्के आहोत. अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका ठाम आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचं नाव घेताना आपलं वागणं, बोलणं आणि कृतीही त्याच विचारांची असली पाहिजे. जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार करून समाज पुढे नेता येत नाही. त्यामुळे काळजी करू नका, माझ्या आवाजाला प्रतिसाद द्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही विकास करून दाखवला आहे. आता तोच विकास सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये करून दाखवायचा आहे. तुमच्या पवित्र मतांची आम्हाला गरज आहे. केंद्रातून निधी आणू, सांगली जिल्ह्यात विमानतळ उभं करू, पंचतारांकित एमआयडीसी विकसित करू. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करु. शेतकऱ्यांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करू, अशी हमी सभेच्या निमित्तानं दिली.
दररोज पाणी मिळालंच पाहिजे, बाजारपेठा अधिक सक्षम कराव्या लागतील, रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहतूक कोंडीमुक्त शहर घडवू. स्वच्छता, कचरा विल्हेवाट, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणासाठी विशेष मदत करू, असं नागरिकांना आश्वस्त केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सरकार आपलं आहे, सरकार आपल्या हक्काचं, हिताचं आणि विश्वासाचं आहे.. सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्ससारख्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा मी करेन, हा शब्द देतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
महापालिकेत कार्यक्षम अधिकारी असतील, तर कामं पटापट होतात.. नाले-ओढा सफाई, मान्सूनपूर्व तयारी अशी कामं प्राधान्यानं केली पाहिजेत, ती आम्ही करू.. आमच्या हातात कारभार द्या आणि तुमच्या डोक्यावरचा भार आम्ही कमी करू.. येत्या १५ जानेवारीला तुमचं बहुमूल्य मत आम्हाला द्या..!
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
तुमच्या तक्रारी कोणी आधी ऐकल्या नाहीत.. पण आम्ही ऐकू आणि त्यांच्यावर उपाययोजना त्वरित करू.. ना पाठपुराव्याची गरज, ना महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज.. लगेच आम्ही कामाला लागू.. त्याकरता जबाबदारी आमच्याकडे सोपवा.. येत्या १५ जानेवारीला आपलं मोलाचं मत आम्हाला द्या..!
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
पक्की घरं आणि घरापाशी मूलभूत सुविधा हे सगळं आम्ही उपलब्ध करून देऊ. कामाच्या माणसाला एक हाक द्या आणि चिंतामुक्त व्हा. येत्या १५ जानेवारीला घड्याळाचं बटण दाबा ; मग पुढची जबाबदारी आमची..!
#घड्याळाचा१अलार्म
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
घड्याळाचं बटण दाबा आणि मुबलक पाणी, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते, स्वच्छता, आधुनिक आरोग्य सुविधा व प्रदूषणमुक्त शहर ह्या पाच मुख्य कामांना मार्गी लावा..!
#घड्याळाचा१अलार्मThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, उद्योगनगरी आहे. राज्यातून, देशातून, वेगवेगळ्या जिल्ह्यांतून लोक इथे रोजगारासाठी येतात. त्यामुळे हे शहर म्हणजे मिनी भारत आहे. अशा शहरात कारभार करताना सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहिली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. मारुती गणपत जाधव, श्रीम. मयुरी निलेश साने, श्रीम. सत्यभामा संजय नेवाळे आणि श्री. नारायण सदाशिव बहिरवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजयी संकल्प सभेत’ उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सध्याच्या घडीला पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव पहायला मिळतोय. मधल्या काळात चुकीचे निर्णय घेतले गेल्यानं आज अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. काहींनी या शहराला लुटण्याचं काम केलं, ठेवी मोडल्या, महापालिका कर्जबाजारी झाली, शहराचा कारभार बेजबाबदारपणे चालवला.
आज आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे ढकललं जातंय. हे थांबवायचं असेल तर बदल करावा लागेल. महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या, तुमचे प्रश्न आम्ही सोडवू, अशी खात्री सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उभे केलेले उमेदवार हे स्थानिक प्रश्नांची जाणणारे उमेदवार आहेत. त्यांना एक संधी द्या, त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील, असा विश्वास दिला.
या सभेच्या निमित्तानं विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शहराला योग्य विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन केलं.
📍चिखली -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
१९९२ ते २०१७ या २५ वर्षांच्या काळात पिंपरी-चिंचवडचा विकास नियोजनबद्ध आणि सर्वांगीण झाला. या शहराची ओळख देशातील आदर्श औद्योगिक शहर म्हणून निर्माण झाली. त्या काळात कधीही जात, धर्म, लिंग यावर आम्ही भेदभाव केला नाही. ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, सर्वसामान्य समाजातील लोकांना समान संधी दिली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृह नेता, शिक्षण मंडळ अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर सर्व समाजातील प्रतिनिधींना संधी देण्यात आली. महिलांना मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिनिधित्व दिलं आणि तरुण नेतृत्व घडवलं.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १८ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. पूजा प्रशांत आगज्ञान, श्रीम. ज्योती सचिन निंबाळकर, श्री. अनंत सुभाष कोऱ्हाळे, श्रीम. अश्विनी गजानन चिंचवडे तसंच प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. रीना लहू तोरणे, श्री. दीपक हिरालाल मेवानी, श्रीम. सविता धनराज आसवानी आणि श्री. काळुराम मारुती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य विजयी संकल्प सभेत नागरिकांना संबोधित केलं.
पाणी, रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, डबल फ्लायओवर, मेट्रो, सर्व्हिस रोड यांसारख्या मूलभूत सुविधा आम्ही उभारल्या. शहर पवना धरणावर अवलंबून असतानाच भविष्यातील पाणीटंचाई ओळखून भामा आसखेड प्रकल्पातून आम्ही पाणी मंजूर करून आणलं. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील पिढीसाठी दीर्घकालीन पाणी नियोजन करण्याचा आणि टाटा कंपनीसोबत पर्यायी पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्याचा आमचा निर्धार आहे, अशी माहिती सभेत दिली.
पण २०१७ नंतरच्या नऊ वर्षांत महानगरपालिकेचा कारभार पूर्णपणे ढासळला, भ्रष्टाचार वाढला. सुमारे चार हजार कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेली पीसीएमसी कर्जबाजारी झाली. स्मार्ट सिटीसारखा २५० कोटींचा प्रकल्प अपयशी ठरला. सीसीटीव्ही, स्मार्ट क्लासरूम, सफाई कंत्राटे, कुत्र्यांची नसबंदी, रस्त्यांची कामं यामध्ये कोट्यवधींचे घोटाळे झाले. सफाई कामगारांच्या नावावर बनावट आकडे दाखवून बिलं काढली गेली. टेंडर रिंग करून आपल्या लोकांना कामं दिली गेली आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला. त्यामुळे अनेक चांगल्या अधिकाऱ्यांना बदली घ्यावी लागली किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.
शहरात गुंडगिरी, दादागिरी, कोयता गॅंगची दहशत वाढलीय. महिला आणि सामान्य नागरिक असुरक्षित आहेत. भाटनगरसारख्या झोपडपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून गरीबांना सन्मानानं जगता येईल, अशी घरं देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मिती, उद्योगपूरक वातावरण, कौशल्याधारित शिक्षण आणि इंडस्ट्रीला पोषक धोरण राबवून पिंपरी-चिंचवडला पुन्हा औद्योगिक राजधानी बनवायचं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारून सामाजिक सलोखा जपायचा आहे, असं स्पष्ट केलं.
सक्षम महिला उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसनं संधी देऊन त्यांच्यातील कार्य-कर्तृत्वाला न्याय दिला आहे. काही अनुभवी आणि काही नव्या उमेदवारांचा समतोल राखून मजबूत पॅनल आम्ही उभं केलं आहे. पॅनल टू पॅनल मतदान करा, कोणतेही अंतर्गत मतभेद ठेवू नका, असं सभेत सूचित केलं. तसंच महानगरपालिका पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करून विकासाचा वेग वाढवण्याची हमी दिली.
त्याचप्रमाणे येत्या १५ तारखेला घड्याळाच्या चिन्हाजवळील बटण दाबा आणि प्रभाग क्रमांक १८ व १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आठ उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांसाठी भामा आसखेडचं पाणी उपलब्ध करून दिलेलं असूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. टँकर माफियांची लूट सुरू आहे. महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली तर रोज नळाद्वारे पाणी देऊ आणि टँकर माफियाला कायमचा बंद करू. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आकुर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १४ मधील अधिकृत उमेदवार श्री. विशाल काळभोर, श्रीम. वैशाली काळभोर, श्रीम. अरुणा लंगोटे, श्री. प्रमोद कुटे तसंच प्रभाग क्रमांक १५ मधील अधिकृत उमेदवार श्री. धनंजय विठ्ठल काळभोर, श्रीम. प्रितमराणी शिंदे, श्रीम. सरिता साने आणि श्री. नीलेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य विजयी संकल्प सभेत नागरिकांना संबोधित केलं.
पिंपरी-चिंचवडशी माझं नातं हे १९९१ पासून आहे. ही कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी आहे. या शहराचा विकास करण्याची संधी मला मिळाली. पण आज लोकसंख्या वाढतेय, आव्हानं वाढतायत आणि त्याला साजेसा कारभार होत नाहीये. आज महानगरपालिका कर्जबाजारी झाली आहे. हजारो कोटींची देणी प्रलंबित आहेत. कामं झालीत असं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात ती दिसत नाहीत. मग हा पैसा गेला कुठे?
वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अपघात, प्रदूषण यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. रस्ते कमी करून फुटपाथ करणं हा विकास नाही. आपल्याला मोठे रस्ते, योग्य पार्किंग आणि ट्रॅफिकमुक्त पिंपरी-चिंचवड उभारायचं आहे. शहर घरासारखं स्वच्छ असायला हवं. प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध स्वच्छता, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाले दुरुस्ती आणि आरोग्य सुविधा सक्षम करणं ही आमची प्राथमिकता आहे. गोरगरीब, मध्यमवर्गीय आणि कामगारांसाठी दर्जेदार हायटेक हॉस्पिटल्स उभारण्याचा आमचा संकल्प आहे.
आज शहरात दहशत, दादागिरी वाढली आहे. आम्ही कुणालाही मोकळं सोडणार नाही. महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न, लीज डीड फ्री होल्ड, एनओसी, वारस नोंद हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ठोस निर्णय घेऊ. हॉकर्ससाठी नियोजित झोन, बहुमजली पार्किंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं नागरिकांना सुलभ सेवा देऊ.
मी कधीही जात, पात, नातं पाहिलं नाही. मला फक्त काम दिसतं आणि काम करणारे लोक दिसतात. अनुभवी आणि नव्या उमेदवारांचा मजबूत पॅनल आम्ही दिला आहे. येत्या १५ तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा. एकही मत वाया जाऊ देऊ नका. पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, असं आवाहन नागरिकांना केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडला नेहमी माझी कर्मभूमी समजून या ठिकाणी विकास केला..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडमध्ये गुलाबी रंगात उमटलेली ऐक्याची, विश्वासाची आणि परिवर्तनाची ताकद!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. श्रीम. निशा वसंत कांबळे, श्री. प्रसाद उत्तम शिंदे, श्रीम. उज्वला सुनील ढोरे आणि श्री. अतुल अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ उपस्थितांना संबोधित केलं.
या भागात सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलं की, नव्या पिढीला दिलासा मिळेल, त्यांचं भवितव्य सुरक्षित होईल, अशा पद्धतीनं काम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र आज वास्तव असं आहे की, वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या आणि वेळेचा अपव्यय या सगळ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत.
या भागात अनियमित पाणीपुरवठा, संत गोरोबा कुंभार उद्यानाची झालेली दुरावस्था, नागरी सुविधांचा अभाव हे सगळं नागरिक रोज अनुभवत आहेत. झोपडपट्ट्या दाखवून TDR घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रश्न साधा आहे की, कामं दिसत नाहीत, मग पैसे गेले कुठे?
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी, दादागिरी, दहशत, लुबाडण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. कोणी कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. तो अधिकार वापरून या लुबाडणुकीविरोधात उभं राहण्याची वेळ आली आहे. म्हणूनच या निवडणुकीत काही अनुभवी आणि काही नवखे उमेदवार आम्ही तुमच्यासमोर उभे केले आहेत. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा, आमच्या उमेदवारांना निवडून द्या. पुन्हा पिंपरी-चिंचवड विकासाच्या मार्गावर आणूया, असं आवाहन नागरिकांना केलं.
या सगळ्या समस्या दूर करण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “एक अलार्म, पाच काम” या संकल्पनेतून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमची साथ मिळाली, तर बदल नक्की होईल, असं सभेत सूचित केलं.
📍सांगवी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वच गरजा पूर्ण करणारं एक शहर अशी पिंपरी-चिंचवडची घडवणूक आम्ही केली. रोजगार, निवारा, उत्पन्न असं सगळं काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नव्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या, मत द्या.. आम्ही कामात कसूर नाही सोडणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
दैनंदिन जीवनात मूलभूत सुविधा पूरक असणं फार महत्वाचं आहे, हे आम्ही जाणतो. पाणी प्रश्न, पावसाळ्यातली पूर परिस्थिती, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य समस्या आदी सर्व अडचणींचा अलार्म आता बंद करण्याची वेळ आलीय. येत्या १५ जानेवारीला तुमचं अमूल्य मत आम्हाला द्या आणि सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून घ्या..!
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज कचरा वेचणाऱ्या महिला भगिनी तसंच नाभिक समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा ऐकून घेत त्यांचं निराकरण करू, असा विश्वास दिला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं चालणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या बैठकीत मांडण्यात आलेले प्रश्न गांभीर्यानं घेऊन त्यावर निश्चितपणे काम केलं जाईल, अशी ग्वाही दिली. शहरात जातीय सलोखा टिकून राहिला पाहिजे, हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, असं देखील बैठकीच्या निमित्तानं सूचित केलं.
यंदाच्या निवडणुकीत सर्वांची साथ, विश्वास आणि सहकार्य आम्हाला मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण सगळे मिळून न्याय, सन्मान आणि विकासाच्या मार्गानं पुढे जाऊया. येत्या १५ जानेवारीला सर्वांनी आपलं मोलाचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्षम उमेदवारांना द्या, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुन्हा आणू शाश्वत विकासाचं राष्ट्रवादी पर्व, आम्ही महाराष्ट्रवादी सर्व..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज माझ्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीनं लघुउद्योगांसाठी आयोजित उद्योजक मेळावा पार पडला. पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योग व्यावसायिक, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर मोठ्या संख्येनं या मेळाव्यात सहभागी झाले होते. यानिमित्तानं विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचं मनापासून स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित केलं.
२०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सूत्रे आमच्याकडे होती. त्या काळात उद्योग, रोजगार आणि विकास यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आज व्हिजन नसलेला कारभारी महापालिकेचा कारभार हाताळतोय. त्यामुळे कर्जरोखे काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. आज परिस्थिती इतकी भयावह आहे की, शहरात वेगवेगळ्या समस्या एकाच वेळी दिसून येताहेत. डेव्हलपमेंट करताना आणि प्रदूषणमुक्त शहर घडवताना जे दूरदृष्टीचं नेतृत्व लागतं, ते आज दिसत नाही. उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करणं, पायाभूत सुविधा देणं आणि प्रशासनाशी समन्वय राखणं या सगळ्यांसाठी स्पष्ट व्हिजन असणारं नेतृत्व आवश्यक आहे.
व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ, मार्ग कसा काढायचा हे आपण एकत्र ठरवू, अशी हमी मेळाव्यात दिली. लघुउद्योगांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे. काहीतरी उभं करायला मेहनत तर लागतेच, पण त्यासाठी अक्कल आणि धोरणात्मक विचारही लागतो आणि तो विचार आम्ही समजून घेतो. उद्योगांच्या कामात कोणालाही अनावश्यक हस्तक्षेप करू देणार नाही. लघुउद्योग, व्यापारी आणि उद्योजकांच्या प्रश्नांसाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा उद्योगस्नेही, विकासाभिमुख आणि सक्षम महानगरपालिका बनवणं, हाच माझा निर्धार आहे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जिथं तिथं समस्यांचा अलार्म वाजतोय.. सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतोय.. रस्त्यांवरचा प्रवास सुलभ कधी होणार? रस्ते खड्डेविरहित केव्हा होणार? अडचणी संपणार की नाही?
पण हे शक्य आहे. एक संधी आम्हाला द्या. येत्या १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्षम उमेदवारांना तुमचं अमूल्य मत द्या. आम्ही समस्यांचा शेवट करू, हा शब्द देतो.
#घड्याळाचा१अलार्मThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज अल्पसंख्याक समाजातील बांधवांसोबत बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचं पक्षात स्वागत केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज सर्वत्र महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनंच पुढे चाललो आहोत. पिंपरी-चिंचवड आणि माझं नातं १९९१ सालापासूनचं आहे. या शहरासाठी काय केलं आणि काय राहिलं, हे नागरिकांना चांगलं माहीत आहे, असं बैठकीत स्पष्ट केलं.
मी कधीही जात, पात, नाती, गोती पाहून राजकारण केलं नाही. सेक्युलर विचार घेऊनच कामं केली. या शहरात सर्व समाजांना सोबत घेऊन पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते अशा अनेक सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळावं, त्यांच्या प्रश्नांना वाचा मिळावी यासाठीही कायम प्रयत्नशील राहिलो.
दुर्दैवानं ज्यांच्या हातात नंतर कारभार गेला, त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आमच्या काळात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही, मोठ्या प्रमाणात विकासकामं केली. आज कर्जरोख्यांची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात शहरावर कर्जाचा बोजा वाढवण्याचं काम केलं गेलं.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक महापुरुषांची नावं आम्ही विकासकामांना दिली. आता काळ बदलतोय, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा करता येईल, यावरही आम्ही भर देत आहोत. पण सध्या जनतेची भ्रमनिराशा केली जात आहे, राजकीय पोळी भाजण्याचं प्रयत्न सुरू आहेत, असं सूचित केलं.
दरम्यान समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास, हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचं बैठकीत स्पष्ट केलं. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत कामं करतो, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आज वेगवेगळ्या संघटनांनी दिलेला पाठिंबा हीच माझ्या कामाची पावती आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वांनी साथ दिली, तर बदल नक्की घडेल. जे काही करावं लागेल, ते करण्याची ताकद आणि तयारी आमच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी कायम उभा राहील, असा विश्वास अल्पसंख्याक समाजातील बांधवांना दिला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या बैठकीत प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश गणेश काटे, श्रीम. शीतल विठ्ठल काटे, श्रीम. मीनाक्षी अनिल काटे आणि श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी सुसंवाद साधला.
आज शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यानुसार रस्ते रुंद व प्रशस्त करणं, सभागृहांची उभारणी, मूलभूत सुविधा मजबूत करणं या बाबी काळाची गरज आहेत. उमेदवारी देताना काही नवे तर काही अनुभवी चेहरे देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
यापूर्वीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी IT पार्कसारखे दूरदृष्टीचे निर्णय घेतले. हे शहर म्हणजे मिनी भारत आहे. पण आज शहराला दूरदृष्टी असलेलं नेतृत्व कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. AI, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या संधी यांचा योग्य वापर होणं गरजेचं आहे.
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली आहे. नको त्या लोकांच्या हातात सूत्र गेली आणि त्यामुळे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचं मोठं नुकसान झालं. ७० टक्क्यांहून अधिक CCTV कॅमेरे बंद आहेत, प्रदूषण वाढत आहे, झाडं जळत आहेत, याचे गंभीर परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. यंदाची ही निवडणूक व्यक्तीची नाही, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भवितव्याची निवडणूक आहे.
बदल हवा असेल तर संधी द्यावी लागते. मला सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि विश्वास मला हवा आहे. मी कुठेही कमी पडणार नाही, याची खात्री देतो. येत्या, १५ जानेवारीला मतांच्या रूपानं नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असं आवाहन आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
सार्वजनिक शौचालय असो, गटारं असो.. तुमच्या भागाला दुर्गंधीमुक्त व आरोग्यदायी बनवण्यासाठी आम्ही आहोत. समस्यांचा अलार्म आम्ही कायमचा बंद करू. फक्त तुमची साथ भक्कम हवी. येत्या १५ जानेवारीला आम्हाला मत द्या आणि चिंतामुक्त व्हा..!
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Saddened by the tragic news of Shri Agnivesh Agarwal, following a horrific skiing accident in the USA.
My deepest condolences to Shri Anil Agarwal, family and loved ones in this difficult time, may god give you strength to deal with this tragedy.
@AnilAgarwal_Ved
Anil Agarwal
@AnilAgarwal_Ved
Today is the darkest day of my life.
My beloved son, Agnivesh, left us far too soon. He was just 49 years old, healthy, full of life, and dreams. Following a skiing accident in the US, he was recovering well in Mount Sinai Hospital, New York. We believed the worst was behind us. But fate had other plans, and a sudden cardiac arrest snatched our son away from us.
No words can describe the pain of a parent who must bid goodbye to his child. A son is not meant to leave before his father. This loss has shattered us in ways we are still trying to comprehend.
I still remember the day Agni was born in Patna on 3 June, 1976. From a middle-class Bihari family, he grew into a man of strength, compassion, and purpose. The light of his mother’s life, a protective brother, a loyal friend, and a gentle soul who touched everyone he met.
Agnivesh was many things - a sportsman, a musician, a leader. He studied at Mayo College, Ajmer, went on to set up one of the finest companies Fujeirah Gold, became Chairman of Hindustan Zinc, and earned the respect of colleagues and friends alike. Yet, beyond all titles and achievements, he remained simple, warm, and deeply human.
To me, he was not just my son. He was my friend. My pride. My world.
Kiran and I are broken. And yet, in our grief, we remind ourselves that the thousands of young people who work across Vedanta are also our children.
Agnivesh believed deeply in building a self-reliant India. He would often say, “Papa, we lack nothing as a nation. Why should we ever be behind?”
We shared a dream to ensure that no child sleeps hungry, no child is denied education, every woman stands on her own feet, and every young Indian has meaningful work. I had promised Agni that more than 75% of what we earn would be given back to society.
Today, I renew that promise and resolve to live an even simpler life.
There was so much life ahead of him. So many dreams yet to be lived. His absence leaves a void for his family and friends. We thank all his friends, colleagues and well-wishers for always being there for him.
Beta, you will live on in our hearts, in our work, and in every life you touched.
I do not know how to walk this path without you, but I will try carrying your light forward. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज ख्रिश्चन बांधवांसोबत बैठक पार पडली.या बैठकीत उपस्थित सर्व धर्मगुरू, मान्यवर वकील तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी सखोल संवाद साधला. पुणे पिंपरी चिंचवड येथे ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येनं वास्तव्यास असून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं ही आमची जबाबदारी असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
आगामी काळात जातनिहाय जनगणना होणार असून माणुसकी हाच आपला खरा धर्म आणि जात आहे, हा विचार कायम ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. पुणे व पिंपरी-चिंचवडचा विकास आम्ही मनापासून केला आहे आणि एक चांगलं, प्रगत शहर म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. ख्रिश्चन बांधवांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असं आश्वस्त केलं.
चिंचवडमधील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचं नाव देणं हे समाजाप्रती आदराचं प्रतीक आहे. व्हिजन असणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहा, आम्ही कामं मार्गी लावणार, असा विश्वास ख्रिश्चन बांधवांना दिला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी सहकार्य करा. घड्याळ हे आपलं चिन्ह आहे. विकासाला मत द्या, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आता समस्यांचा अलार्म बंद होणार, विकासाचा शंख वाजणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी चिंचवडकरांनो,
जिथं अलार्म वाजला, तिथं राष्ट्रवादीचा शिलेदार आला, असं समजा.. फक्त येत्या १५ जानेवारीला मतांच्या रूपानं आम्हाला एक संधी द्या. नाले, गटारं स्वच्छ करू, पाणी-वीज पुरवठा सुरळीत करू. जिथं कोणी फिरकत नाही, तिथं आम्ही येऊ. केवळ तुमचा विश्वास हवा.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली आहे. पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारं समर्पित व्यक्तिमत्व हरपलं आहे. मी डॉ. गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, याचा वस्तुपाठ डॉ. गाडगीळ यांनी घालून दिला होता. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पर्यावरण संरक्षणात लोकांचा सहभाग घेण्यात त्यांना यश मिळालं.
निसर्ग वाचवायचा असेल तर तिथल्या स्थानिक माणसाला सोबत घेतलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. जल, जंगल आणि जमीन यावर स्थानिक लोकांचा अधिकार असावा, असं ते मानत. डॉ. गाडगीळ यांच्या निधनानं खाणकाम, मोठी बांधकामं आणि जलवायू बदल यांसारख्या धोक्यांविरुद्ध लढणारा एक प्रमुख आवाज हरपला आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संकटांवर मात करण्याची धमक आणि ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. फक्त तुमचं पाठबळ आम्हाला हवं..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
पुराच्या पाण्यात संसार वाहून जातानाच्या हृदयद्रावक स्थितीची जाण आम्हाला आहे. यावर आम्ही ठोस उपाययोजना आखू. नाले स्वच्छ करू, पावसाळ्यात तुंबणार नाही, असा बंदोबस्त करू. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. येत्या १५ जानेवारीला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं छत्रपती शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १२ आणि गोखलेनगर येथील प्रभाग क्रमांक ७ इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मतदार नागरिकांना मार्गदर्शन करत संबोधित केलं.
या सभेत प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवार सौ. निता दिलीप अलगुडे, श्री. दयानंद सिद्राम इरकल, सौ. निता आनंद मंजाळकर, श्री. बाळासाहेब ऊर्फ दीपक बोडके, तर प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार सौ. आशा राजेश साने, कु. अंजली विनोद ओरसे, ॲड. श्री. निलेश नारायण निकम, श्री. दत्ता बहिरट आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यशील उमेदवारांना नागरिकांनी भक्कम पाठबळ द्यावं, असं आवाहन केलं.
पुणे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामं, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीची भूमिका ही ठाम आहे. पुण्याचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक असल्याचं सभेत अधोरेखित केलं.
यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिण्याच्या पाण्याची अडचण, ढासळलेली आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, निकृष्ट दर्जाचे रस्ते इत्यादी सगळ्या समस्या ह्या धोक्याच्या अलार्म आहेत. या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी, धोक्याचा अलार्म बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम साथ द्या, तुमचं मत द्या.
#घड्याळाचा१अलार्मThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महानगरपालिका म्हणजे केवळ राजकारणाचं व्यासपीठ नाही, तर शहराच्या दैनंदिन प्रश्नांवर निर्णय घेणारी ती सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, व्यापारी प्रश्न, सुरक्षितता हे सगळे विषय थेट नागरिकांच्या जीवनाशी जोडलेले आहेत. त्यामुळे काम करणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारी स्वीकारणारे प्रतिनिधी महापालिकेत गेले पाहिजेत.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक २४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश शांताराम नवथारे, श्री. जयप्रकाश नारायण फुलावरे, सौ. सुजाता सदानंद शेट्टी, सौ. पूनम विनोद काळोखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी श्री. भोलासिंग अरोरा, श्री. रमीनदर सिंग राजपाल, श्री. सुरेंद्रसिंग छबाब, श्री. बबलू ओबेरॉय आदी मान्यवरांसह सर्व शीख समाजानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला, ही अतिशय समाधानाची बाब आहे. हा पाठिंबा विश्वास वाढवणारा असून सामाजिक सलोखा आणि एकतेचं प्रतीक आहे.
रास्ता पेठ, नरपतगिरी चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या मला माहिती आहेत. विकास हा कागदावर नको, तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसला पाहिजे. निधी आणायचा, योग्य नियोजन करायचं आणि काम वेळेत पूर्ण करायचं, हीच आमची भूमिका आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे.
मी नागरिकांना एवढंच सांगतो की, निवडणूक म्हणजे फक्त मतदान नाही, तर शहराचं भविष्य ठरवण्याची संधी आहे. कोण काम करू शकतो, कोण निर्णय घेऊ शकतो आणि कोण पुण्याच्या विकासाला गती देऊ शकतो, हे पाहून मत द्या.
पुण्याला अधिक सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध शहर बनवायचं आहे. त्यासाठी महापालिकेत मजबूत, अनुभवी आणि लोकांसाठी उभं राहणारं नेतृत्व आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांनी आपलं बहुमूल्य मत द्यावं, असं आवाहन करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
घड्याळावरील अलार्म वाजणं म्हणजे विकास कामांची मागणी करणं, जबाबदारी ठरवणं आणि विकास कामांना वेग आणणं तसंच पालिकेत प्रत्यक्ष कामं सुरू होणं..!
#घड्याळाचा१अलार्मThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनजागृतीचा अलार्म वाजणार, जनजागृती घडणार… मतदार राजा आता 'घड्याळ' निवडणार!
#घड्याळाचा१अलार्मThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशेवाडी येथील प्रभाग क्र. २२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीम. प्रिया विक्रम मोरे, श्री. हरेश लडकत, श्रीम. फिरोजा जावेद खान, श्रीम. शहानुर रशीद शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नागरिकांशी संवाद साधला.
पुणे शहर झपाट्यानं वाढत आहे. लोकसंख्या वाढतेय, गरजा वाढतायत, प्रश्न वाढतायत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक हे सगळे विषय रोजच्या आयुष्याशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत बसणाऱ्या प्रतिनिधींनी फोटोसेशन नाही, तर जबाबदारीनं काम केलं पाहिजे.
मी नेहमी सांगतो की, शहराचा विकास कागदावर नको, तो रस्त्यावर दिसला पाहिजे. नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. निधी उपलब्ध करून देणं, योग्य नियोजन करणं आणि काम वेळेत पूर्ण करणं ही आमची पद्धत आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे केवळ निवडणूक लढवत नाहीत, तर परिसराच्या विकासाची जबाबदारी स्वीकारायला पुढे आले आहेत. स्थानिक प्रश्न माहिती असलेले, लोकांमध्ये राहून काम करणारे प्रतिनिधी महापालिकेत गेले, तरच बदल शक्य आहे.
माझं मतदारराजाला एवढंच सांगणं आहे की, कोण काम करू शकतो, कोण निर्णय घेऊ शकतो आणि कोण शहराला दिशा देऊ शकतो, हे ओळखून मत द्या. भावनांवर नाही, तर अनुभवावर आणि कामगिरीवर विश्वास ठेवा.
पुण्याला सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार शहर बनवायचं आहे. त्यासाठी महापालिकेत मजबूत, काम करणारे आणि लोकांसाठी उभे राहणारे प्रतिनिधी आवश्यक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्या विश्वासास पात्र आहेत, अशी खात्री सभेच्या निमित्तानं दिली. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपूया.. १५ जानेवारीला साथ आपल्या घड्याळाला देऊया..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अलार्म वाजतोय, संकेत देतोय की, कारभारी बदला, आपलं बहुमूल्य मत द्या राष्ट्रवादीला.. मग नागरी समस्यांचा अलार्म होईल कायमचा बंद..!
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर नागरी समस्यांकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरातील मूलभूत सुविधा सातत्यानं अपयशी ठरत आहेत आणि त्याचा थेट फटका नागरिकांना बसतोय. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली.
आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा मोठा अलार्म वाजतोय. वस्त्या-वस्त्यांत साचलेला कचरा, ढासळणाऱ्या आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई.. हे सगळे अलार्म नागरिक रोज अनुभवत आहेत. जसं अलार्म आपल्याला वेळेत जागं करतो, तसंच हे प्रश्न प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी आहेत.
कागदावर पुण्याला दरडोई सुमारे ३०० लिटर पाणी दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात अनेक नागरिक आजही टँकरवर अवलंबून आहेत. कचरा व्यवस्थापनातही हाच प्रकार आहे. हजारो सफाई कर्मचारी असल्याचं सांगितलं जातं, पण शहरभर कचऱ्याचे ढीग दिसताहेत. म्हणजे सांगितलं एक आणि केलं दुसरं, ही परिस्थिती स्पष्टपणे समोर आली आहे.
आज पुण्याचा AQI २८० पर्यंत पोहोचला आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. नागरिक अक्षरशः प्रदूषित हवा श्वासात घेताहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. नसबंदी अपयशामुळे हजारो कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौटुंबिक आयुष्यावर होत आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “एक अलार्म, पाच काम” या स्पष्ट आणि ठोस संकल्पनेवर आधारित अलार्म कॅम्पेन सुरू करत आहे. खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम, कचऱ्याचा प्रश्न, पाणीटंचाई, अपुरी आरोग्यव्यवस्था आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे पाचही अलार्म थांबवण्यासाठी ठोस कृती केली जाणार आहे.
लोकांनी आता घड्याळ चिन्ह दाबून स्पष्ट संदेश द्यायचा आहे की, 'आता पुरे'. अलार्म दाबणं म्हणजे कामाची मागणी करणं, जबाबदारी ठरवणं आणि पालिकेची कामं पुन्हा वेगात, पारदर्शकपणे व प्रत्यक्षात दिसतील, अशा पद्धतीनं सुरू करणं.
नागरिकांना माहीत आहे की, थांबलेली कामं पुन्हा सुरू करण्याची आणि करून दाखवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. “एक अलार्म, पाच काम” या मोहिमेचा सविस्तर आराखडा आणि मुद्देसूद जाहीरनामा १० तारखेला जाहीर केला जाईल. या आराखड्यात ही प्राधान्याची कामं कशी पूर्ण केली जाणार आहेत, हे स्पष्टपणे मांडलं जाईल. ही लढाई राजकारणाची नाही, ही लढाई पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन सुधारित जीवनमानासाठी आहे.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarm -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही सुधारणार. तुमच्यापर्यंत गुणवत्तापूर्ण पाणी दररोज पोहोचणार. ड्रेनेज व्यवस्था, गटार साफसफाई, घाणीचं साम्राज्य नष्ट करणार. येत्या १५ जानेवारीला विश्वासरुपी तुमची मतं आम्हाला द्या.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणेकरांचं ठरलंय, साथ अन् मत केवळ राष्ट्रवादीला..!
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पक्षाला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हा खरोखरच समाधान देणारा आहे. पुणे हे फक्त शहर नाही, तर राज्याच्या प्रगतीत भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक मुख्य शहर आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणारी, सक्षमपणे निर्णय घेणारी आणि जबाबदारी स्वीकारणारी माणसं हवीत.
यंदाची ही निवडणूक म्हणजे भाषणांची नाही, तर कामांची परीक्षा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण हे मुद्दे तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. यावर ठोस काम करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
सामान्य पुणेकराचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी, भविष्यातील पुणे अधिक सुरक्षित, अधिक स्वच्छ आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी, तुमचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला हवा आहे.
मी शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवतो. पुण्याच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडणारच.
📍गोखलेनगर, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ताथवडेकरांनो,
तुमचा त्रास आम्ही समजतो. पावसाळ्यातील पूरस्थितीवर आम्ही तोडगा काढू. घाण-कचरा आणि मच्छरांचा बंदोबस्त करू, तुमचं आरोग्य राखू. वीज पुरवठा पूरक देऊ. पण त्याकरता आमच्याकडे जबाबदारी सोपवा. येत्या १५ जानेवारीला तुमचं अमूल्य मत आम्हाला द्या.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषद आज, दुपारी ठीक ४:०० वा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर.. नक्की पहा..
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपळे निलखकरांनो,
थेंब-थेंब नाही, तर पाणी चांगल्या प्रवाहानं घराघरात येईल. पुरेसं पाणी मिळेल. जागोजागी कचरा वेळेत उचलला जाईल. तुमच्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे.
येत्या १५ जानेवारीला तुमचं बहुमूल्य मत आम्हाला द्या, पुढची जबाबदारी आमची!
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या घरापाशी वाजणारा समस्यांचा अलार्म आम्ही बंद करू. कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छ परिसर, घंटा गाड्यांची नीट व्यवस्था, व्यवस्थित रस्ते अशा सगळ्या सेवा उपलब्ध होतील.
येत्या १५ जानेवारीला आमच्या उमेदवारांना तुमचं अमूल्य मत द्या. पुढची तुमच्या सेवेची जबाबदारी आमची, असा शब्द देतो.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची ही निवडणूक आहे.. त्यामुळे योग्य नेतृत्वाच्या हातात जबाबदारी द्या..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपण पिंपरी-चिंचवडला बेस्ट सिटी बनवली होती आणि आता पुन्हा बनवू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापकीर नगर, काळेवाडी येथील प्रभाग क्रमांक २२ आणि २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजय निर्धार सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी योग्य उमेदवार निवडून देण्याचं काम मतदारराजानं यंदाच्या निवडणुकीत करायचं आहे. प्रभाग क्रमांक २२ मधून श्रीम. मोनिकाताई नवनाथ नढे, श्रीम. उषाताई दिलीप काळे, श्री. मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर श्री. संतोष अंकुश कोकणे तसंच प्रभाग क्रमांक २७ मधून श्री. सुमित डोळस, सौ. अश्विनीताई तापकीर, सौ. अनिताताई थोपटे आणि श्री. सागर कोकणे या आमच्या कार्यतत्पर उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, जेणेकरून स्थानिक पातळीवरील सर्वच प्रश्न, समस्या यांचं निराकरण करणं शक्य होईल, असं स्पष्ट केलं.
आम्ही महापालिकेचं नेतृत्व करत असताना सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन या शहराचा कायापालट केला. रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल अशी मोठी कामं केली, पण कधीही शहरावर कर्जाचा बोजा टाकला नाही. आमच्या काळात महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आज मात्र कर्ज काढून शहराला भकास करण्याचं काम सुरू आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत आम्ही नेहमीच सामाजिक सलोखा जपला. जाती-पातीचं राजकारण कधी केलं नाही आणि करणारही नाही. सर्व घटकांना संधी देत, सर्वसमावेशक उमेदवारी देऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचे उमेदवार पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक सेवा, मैदानं आणि नागरी सुविधांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवतील, अशी खात्री सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
ही निवडणूक फक्त आजची नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे. सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचं पाणी, डीपी रस्ते, वीज, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे सर्व प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीनं सोडवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माझ्या जीवात जीव असेपर्यंत सर्व समाजघटकाला समान न्याय देण्याची माझी कायम भूमिका राहील.. सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहीन..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
या सभेत प्रभाग क्र. १६ मध्ये श्रीम. श्रेयाताई अक्षय गायकवाड, श्रीम. जयश्रीताई मोरेश्वर भोंडवे, श्रीम. आशाताई तानाजी भोंडवे आणि श्री. मोरेश्वर महादू भोंडवे तसंच प्रभाग क्र. १७ मधून श्रीम. मनिषाताई राजेश आरसुळ, श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर, श्रीम. शोभाताई तानाजी वाल्हेकर, श्री. शेखर बबन चिंचवडे; त्याचप्रमाणे प्रभाग क्र. १८ तून श्रीम. पूजाताई प्रशांत आगज्ञान, श्रीम. ज्योतीताई सचिन निंबाळकर, श्री. अनंत सुभाष कोऱ्हाळे, श्रीम. अश्विनीताई गजानन चिंचवडे या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं पक्षात स्वागत केलं, पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यादरम्यान प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. धनंजय विठ्ठल काळभोर, सौ. प्रितमराणी प्रकाश शिंदे, सौ.सरिताताई अरुण साने, श्री. नीलेश ज्ञानदेव शिंदे व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहात माझं स्वागत केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानत उपस्थितांशी मुक्त संवाद साधला.
📍पिंपरी चिंचवड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवडकरांनो,
२०१७ पर्यंत आम्ही सर्व कारभार पाहत असताना ज्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या; त्या सर्व सुविधा आम्ही तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून देऊ. मुबलक पाणीपुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छ परिसर यांसारख्या सर्व सुविधा पुन्हा तुमच्या दारापाशी आणू.
त्याकरता येत्या १५ जानेवारीला आमच्या सर्व उमेदवारांना मतांच्या रूपानं तुम्ही आशीर्वाद द्या.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी चिंचवडकरांनो,
आता प्रतीक्षा संपली. अलार्म वाजलाय. तुमच्या तमाम समस्यांचे, प्रश्नांचे अलार्म आम्ही बंद करू. पाणी प्रश्न असो, कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा असो अथवा स्वच्छतेचा विषय असो.. साऱ्या अडचणी मार्गी लावू.
त्याकरता येत्या १५ जानेवारीला आमच्या कार्यशील उमेदवारांना मतदान करा, सेवेची एक संधी द्या.
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarmThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीम. निकिताताई कदम, श्री. संदीप वाघेरे, श्रीम. प्रियंकाताई कुदळे आणि श्री. डब्बू आसवानी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नागरिकांना संबोधित केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण सुरू आहे. १९९२ ते २०१७ या काळात मी पिंपरी-चिंचवड शहराचं नेतृत्व केलं. विकास केला, पण कधीही महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं नाही. उलट ठेवी वाढवल्या, पारदर्शक कारभार केला आणि सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम केलं. हे शहर ‘फक्त श्रीमंत’ न राहता ‘देशात आदर्श’ कसं बनेल, याचाच मी सातत्यानं विचार केला.
आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका कर्जाच्या खाईत ढकलली गेली आहे. हजारो कोटींचं बजेट मांडलं गेलं, पण कामं दिसत नाहीत. ठेवी कमी झाल्या, भ्रष्टाचार वाढला, वाहतूक कोंडी वाढली, खोदाई माफिया वाढले. पण जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला मिळायलाच हवा. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार सुरू व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यशील उमेदवारांना मतदार राजानं मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावं, असं आवाहन आजच्या सभेच्या निमित्तानं मतदारराजाला केलं.
पिंपरी-चिंचवड हे मिनी भारत आहे. इथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षितता, युवकांसाठी शिक्षण-रोजगार, पर्यावरण, पाणी, कचरा व्यवस्थापन यांसंबंधीत सर्व समस्या व प्रश्न सोडवण्याची धमक आमच्यात आहे. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
AI, तंत्रज्ञान, इंडस्ट्री, स्टार्टअप्स यांचा काळ आहे. पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात आपल्या तरुणांना केवळ नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे बनवायचं आहे. त्यासाठी दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास केंद्रं आणि उद्योगांना पूरक धोरणं आवश्यक आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये विकासासाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही. नागरिकांचा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचण ही आमची जबाबदारी असल्याचं सभेत स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडचा विकास, विश्वास आणि प्रगती निश्चित करण्यासाठी आमच्या उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्व नागरी समस्यांना घेऊन वाजणारा अलार्म बंद करण्याचा एकमेव उपाय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष!
#घड्याळाचा१अलार्म
#ncpworks
#vajtoyalarm -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देत लोकहिताच्या राजकारणाला बळ दिलं आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत ही लढाई जनतेसाठी लढली जाणार आहे. शहराच्या विकासासाठी विचारांची एकजूट आणि जनसेवा कार्याची बांधिलकी अधिक मजबूत होत आहे. या पाठिंब्याबद्दल मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, मा.खा. चिराग पासवान जी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.
@iChiragPaswan -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज मराठी पत्रकार दिनानिमित्त पुण्यातील मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकार बांधवांनी माझी सदिच्छा भेट घेतली. सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सुसंवाद साधला.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी कलमाडी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनानं पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसंच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिलं. त्यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या 'पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ सारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
समाजाला विवेक, समता आणि सुधारणेच्या दिशेनं नेण्याचं ऐतिहासिक कार्य आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं. स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. आजच्याच दिवशी त्यांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू झालेला परिवर्तनाचा प्रवास मोठा आहे.
मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठी_पत्रकार_दिन
#आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रायगड जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून निधी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत होता, चालत आहे आणि सदैव चालत राहणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माणसं ओळखा, माणसं पहा आणि नेतृत्वाची जबाबदारी द्या..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याचबरोबर विविध पक्षांतील अनेक मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेला स्वीकारून जनसेवेची वाट धरली. या सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा दिला. राजकारणात मूल्य, संस्कार आणि विकास यांची सांगड कशी घालायची, हे त्यांनी शिकवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच विचारांवर चालणारा पक्ष आहे. श्री. किशोर जैन यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात समाजकार्यातून केली. शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की, भारत जगात अव्वल स्थानी जावा, अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, रोजगार व गुंतवणूक वाढावी. त्या पार्श्वभूमीवर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र विकासात मागे राहू नये, हीच आमची भूमिका आहे, असं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालून आपल्याला मिळून सर्वसमावेशक, समताधिष्ठित विकास करायचा आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये रोहा, कर्जत, मुरुड-जंजिरा इथल्या जनतेनं जे पाठबळ दिलं, त्याबद्दल आभार मानले. पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथे पर्यटन, कृषी पर्यटन आणि उद्योगांना मोठी संधी आहे. रिलायन्ससह विविध उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून स्थानिकांना रोजगार कसा मिळेल, यावर भर दिला जात आहे.
रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी दिली. जात–पात, नातेगोते न पाहता मूलभूत गरजा सोडवणं, पर्यावरणाचा समतोल राखणं, तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी देणं, लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना योजनांद्वारे मदत करणं हे आमचं प्राधान्य राहिलं आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभा आहे. रायगड जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये कुठलीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असा विश्वास दिला.
📍नागोठणे, ता. रोहा
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भविष्यकालीन सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेसह कौशल्यवर्धन महत्त्वपूर्ण..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मानवाप्रमाणेच ह्या वसुंधरेवर पशु-पक्ष्यांनाही जगण्याचा समान अधिकार आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज रायगड जिल्ह्यातील तळा येथे नागरी सेवा व सुविधा योजनेंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वप्रथम ग्रामदेवता श्री. चंडिका देवीचे दर्शन घेऊन राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दरम्यान या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे.
त्याचप्रमाणे प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२४–२५ अंतर्गत मोदी तलावाच्या सुशोभिकरण कामाच्या देखील भूमिपूजनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसंच तळा परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आहे.
विकास, विश्वास आणि प्रगतीच्या मार्गावर तळा तालुक्याला पुढे नेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत दर्जेदार कामं वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज महाराष्ट्रात आपलं महायुती सरकार जबाबदारीनं काम करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तळ्यासाठी महत्त्वाच्या कामांची सुरुवात होत आहे, ही समाधानाची बाब आहे. तळा प्रगतीच्या एका नव्या टप्प्यावर पाऊल टाकत आहे.
महिला भगिनींचा सन्मान आणि सहभाग हेच खऱ्या विकासाचं लक्षण आहे. CIIIT प्रकल्पामध्ये टाटा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तरुणांना आधुनिक शिक्षण दिलं जात आहे, जेणेकरून रोजगारासाठी बाहेर जावं लागणार नाही. AI चा वापर जगानं स्वीकारला आहे. आपले तरुण या बदलासाठी तयार झाले पाहिजेत, यासाठी सरकार काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत जगात अव्वल राहिला पाहिजे, हीच आपली दिशा आणि ध्येय आहे.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. ८ आणि ९ मधील तमाम अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औंध-बोपोडी मधील प्रभाग क्र. ८ चे अधिकृत उमेदवार श्री. विनोद बाळासाहेब रणपिसे, श्रीम. पौर्णिमा बाळासाहेब रानवडे, श्रीम. अर्चना मधुकर मुसळे आणि श्री. प्रकाश ज्ञानोबा ढोरे तसंच प्रभाग क्र. ९ मधील अधिकृत उमेदवार श्री. अमोल रतन बालवडकर, श्रीम. पार्वती अजय निम्हण, श्री. बाबुराव दत्तोबा चांदेरे आणि श्रीम. गायत्री मोहन मेढे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन मतदारराजाला केलं.
पुणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. विविध भागांतून लोक रोजगारासाठी इथं येतात. जुना बाणेर, पाषाण, औंध या परिसराचा इतिहास पाहिला तर विकासाची मोठी क्षमता इथं आहे; मात्र पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन असे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आम्ही जात-धर्माच्या भिंती उभ्या करत नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालतो. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांना संधी मिळायलाच हवी, ही आमची भूमिका आहे.
आज वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. प्रदूषणाच्या बाबतीत पुणे शहराचा जगात चौथा क्रमांक लागतो, ही चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी नियोजन असतानाही अंमलबजावणी का होत नाही? हा खरा प्रश्न आहे. ११३० कोटींच्या विकास निधीची तरतूद असूनही केवळ ६०० कोटींचाच खर्च झाला. पैसे असूनही खर्च का होत नाहीत? हे नागरिकांना समजायला हवं.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजाला दिशा दिली, तर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यात एकही लढाई हरली नाही. त्यांची जिद्द आणि संघर्ष आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आज AI चा काळ आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. CIIIT सारख्या उपक्रमांतून शिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी आम्ही काम करत आहोत.
मी कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. कोरोना काळात मी स्वतः मैदानात उतरून जनतेची काळजी घेतली, हे पुणेकर विसरलेले नाहीत. म्हणूनच घड्याळ
चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. विकासासाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही. तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिला.
यावेळी औंध, बापोडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण या भागांतील विविध पक्षांतील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
हे नवीन वर्ष विकासाचं जावो, सर्वसामान्यांच्या हिताचं जावो, राज्यभरात मूलभूत सोयीसुविधा परिपूर्ण होवो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संत वाणीतून समाज शिकतो, संत विचारांतून माणूस घडतो, संत सहवासातून विनम्रता रुजते, संत संगतीतून जीवनाचे सार कळते..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवा जोश, नवा उत्साह, नवी उमेद..!
घड्याळाचे शिलेदार जनसेवेला सज्ज.. येत्या १५ जानेवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा आणि सेवेची संधी द्या..!This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर माणुसकीचा दीप अखंड तेवत ठेवला. स्वतःच्या दुःख व संघर्षांवर मात करत त्यांनी अनाथ मुलांना आईची माया, संस्कार आणि आत्मविश्वासाची शिदोरी दिली. त्याग, करुणा आणि सेवाभावातून समाजाला संवेदनशीलतेचा मार्ग दाखवणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#सिंधुताई_सपकाळ
#sindhutaisapkal -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं आयोजित 'कीर्तन महोत्सव २०२६' या कार्यक्रमात सहभागी झालो. गेल्या ८ वर्षांपासून सातत्यानं हा महोत्सव आयोजित करून विठ्ठल परिवारानं मावळमध्ये एक सुंदर आध्यात्मिक परंपरा रुजवली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून केलेली ही सुरुवात निश्चितच प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित वारकरी बांधवांना संबोधित केलं. तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केलं.
या प्रसंगी पंगतीत बसून प्रसादरूपी भोजनाचा आस्वाद घेता आला आणि या सोहळ्याचा आत्मिक आनंद अनुभवता आला, याचा मला आनंद आहे. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून संतांचे विचार, शांतता, समृद्धी आणि सद्भावना समाजात कशी नांदेल, याचं सुंदर दर्शन इथं घडलं. साधू-संतांचे विचार, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची परंपरा हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आजही हजारोंच्या संख्येनं वारकरी बंधू-भगिनी इथं एकत्र आले, ही बाब अतिशय समाधानकारक आहे.
कोरोनासारख्या कठीण काळातही विठ्ठलाचा आशीर्वाद आणि संतांचे विचार आपल्यासोबत होते, हीच आपल्या संस्कृतीची ताकद आहे, अशा भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त केल्या. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राला मिळालेला अनमोल वारसा आहे. मानवी मूल्यांचा खजिना आहे. वारकरी संप्रदायाचे विचार हे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम सातत्यानं करत आहेत.
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी उभारलं जाणारं संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर हे या आध्यात्मिक परंपरेला अधिक बळ देईल. महिला भगिनींना पुरुषांच्या बरोबरीनं मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विचार आपण सर्वांनी कृतीत उतरवला पाहिजे. संस्कृती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची ही परंपरा अखंड सुरू राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज तळेगाव व लोणावळा नगरपरिषद तसंच वडगाव नगरपंचायत येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित केलं.
लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीम. अबोली ढोरे तसंच तळेगाव दाभाडे येथील नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध पक्षांतील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास व्यक्त केला, याचा आनंद आहे.
लोणावळा-मावळ परिसरात पर्यटनाच्या प्रचंड संधी आहेत. टायगर पॉईंटसारख्या ठिकाणांचा नियोजनबद्ध विकास करून स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच महिन्यात जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा होत असून, त्यासाठी रस्ते विकासाची कामं केली आहेत.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक हे लोकांचे विश्वस्त आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, STP प्रकल्प यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये दर्जा राखा, त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कार्यक्रमात मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकासाला मानणारा पक्ष आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करत औद्योगिक, पर्यटन आणि कृषी क्षेत्रात प्रगती करणारा मावळ-लोणावळा परिसर उभा करू, असा विश्वास दिला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी (रिपब्लिकन एकता मिशन) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यासंदर्भातील पाठिंब्याचं पत्र भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सिताराम सरुबाई रामजी गंगावणे यांनी आज माझ्याकडे सुपूर्द केलं.
संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व घटकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. हा पाठिंबा म्हणजे लोकशाही, संविधान आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या लढ्याला मिळालेली ताकद आहे. या पाठिंब्याबद्दल भीम आर्मीचे मनापासून आभार मानतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित व प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं. त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत, समाजात स्त्रियांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जातीव्यवस्था व अज्ञानाविरुद्ध प्रखर लढा देत, सामाजिक न्याय व समतेची शिकवण दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड जिल्ह्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी मी कटिबद्ध..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज लहुजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या वतीनं पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२६ साठी जाहीर पाठिंबा देण्यासंदर्भातील पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विकासभाऊ सातारकर, शहराध्यक्ष श्री. अविनाशभाऊ आडागळे व अन्य सहकाऱ्यांनी माझ्याकडे सुपूर्द केलं.
सामाजिक न्याय, समता, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढण्याची ही भूमिका निश्चितच बळ देणारी आहे. या पाठिंब्याबद्दल लहुजी परिवर्तन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण, लोकाभिमुख व समताधिष्ठित विकास घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊ, हीच अपेक्षा आहे.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवारांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी निवडणूक तयारी, स्थानिक विकास प्रश्न तसंच नवी मुंबईच्या सर्वांगीण प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी संघटनेची ताकद वाढवणं, कार्यकर्त्यांचा सन्मान करणं आणि लोकाभिमुख विकास साधणं हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र पोलीस दल हे राज्याच्या सुरक्षिततेचा मजबूत कणा आहे. समाजात शांतता, सुरक्षितता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी २४ तास अविरत सेवा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकपणाचं मूल्य जपणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजशास्त्राचा क्रियाशील व सखोल अभ्यास करत, समाजातील उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तत्कालीन समाजातून अस्पृश्यतेची भावना नष्ट करत, उपेक्षित समाजघटकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. समाजातील कुप्रथांविरुद्ध प्रखर वैचारिक लढा उभारून मानवी मूल्यांची रुजवण करणारे, थोर समाजसुधारक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ऊसतोड कामगार बांधवांच्या मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये.. प्रगतीच्या पायऱ्या त्यांनाही चढता आल्या पाहिजेत.. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर आमची वाटचाल सुरू आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नुसतं बोलणं नव्हे, तर कृतीतून विकासकामं करून दाखवण्याची धमक आमच्यात आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुल इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. ही इमारत बीडच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशी विकासकामं सातत्यानं सुरू राहतील. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नववर्षाच्या प्रथम शुभदिनी बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक सोहळा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद बीड अंतर्गत १३६३ विकास कामांचं भूमिपूजन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला.
बीड जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा शुभारंभ होत असून, ग्रामीण भागापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शाळांचं सुसज्जीकरण, समाजोपयोगी लघु विकासकामं यांवर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील १२०० हून अधिक शाळांची कामं सुरूअसून शिक्षण आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्यानं मदत दिली जात आहे.
बीडमध्ये इलेक्ट्रिक रेल्वे, विमानतळ प्रकल्प तसंच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
विकास कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दूरदृष्टीनं स्वराज्य उभारलं, त्याच प्रेरणेतून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विजयस्तंभाला अभिवादन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे, न्यायाचे विचार आम्ही जनमानसात रुजवू, असा आमचा निर्धार आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. श्री. राम शिंदे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
@Prof_RamShinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्या ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
#भिमा_कोरेगाव_शौर्यदिन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत आपल्या अतुलनीय शौर्यानं विजय मिळवणाऱ्या आणि वीरमरण पत्करणाऱ्या सर्व शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन! आजचा हा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समतेचा विचार जपण्याची प्रेरणा देतो. या शूरवीरांचं बलिदान सदैव स्मरणात राहील.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील जनतेला नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगानं पुढे घेऊन जाईल, अशी खात्री आहे. नववर्षाचं स्वागत उत्साहात, मात्र संयम आणि आरोग्यभान राखत करावं, असं आवाहन करतो.
महाराष्ट्रवासियांच्या एकजूट आणि निर्धाराच्या बळावर राज्यानं आतापर्यंत प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे मात केली आहे. ही एकजूट कायम ठेवत विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्याचा शासनाचा ठाम संकल्प आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्याअनुषंगानं राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा एकमेव अजेंडा असून, त्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणी, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच शहरी व ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रभावी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्यासाठी ठोस आणि निर्णायक पावलं उचलली जात आहेत.
कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार, कला-संस्कृती तसंच सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राचं अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत, असं आवाहन आहे.
#happynewyear
#welcome2026 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ह्या सहा पदरी महामार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळणं हे महाराष्ट्राच्या दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीनं अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी मजबूत होणार असून प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल.
या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व माननीय सदस्यांचे मनापासून आभार मानतो. हा महामार्ग राज्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीला नवी गती देणारा ठरेल, यात शंका नाही.
@narendramodi -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartiest congratulations to Arjun Erigaisi for clinching the Bronze at the FIDE World Blitz Chess Championship in Doha, showcasing remarkable skill, speed and consistency.
From the Rapid Championship to Blitz, excellence continues for our young grandmaster. It is truly heartening to witness India's growing dominance in World Chess, inspiring a new generation of aspirants across the country!
@ArjunErigaisi
#worldblitzchesschampionship -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A pioneer whose vision and dreams laid the foundation of the Indian space programme, Dr. Vikram Sarabhai's contribution to our scientific journey remains timeless.
Tributes to the visionary scientist on his death anniversary.
#vikramsarabhai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या प्रतिभासंपन्नतेतून शब्दांची विलक्षण मांडणी करून, मराठी साहित्य क्षेत्रात एक निराळं वलय निर्माण केलं. त्यांनी आपल्या काव्य व गीतांच्या माध्यमातून हास्य, आनंद, दुःख, समाधान व उत्साह अशा निरनिराळ्या मानवी भावभावनांचं तरल चित्रण केलं. ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#मंगेश_पाडगावकर
#mangeshpadgaonkar -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसंपर्कातून जनसेवा घडते आणि त्या माध्यमातून उत्तम लोकप्रतिनिधी उदयाला येतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनतेनं सांगावं आणि आम्ही ते करावं, अशी धारणा ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येऊन जोडले जात आहेत.. परिणामी, पक्ष कार्यशील आणि विकास गतिशील..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
My heartiest congratulations to Chess players Koneru Humpy and Arjun Erigaisi on winning bronze medals at the 2025 FIDE World Rapid Chess Championship in Doha in the women's and open category respectively.
Best wishes to you both for many more future accolades, may you keep the tricolour flying high.
@humpy_koneru @ArjunErigaisi
#worldrapidchesschampionship -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकासाच्या स्वप्नपंखांना बळ मिळतं, ते जिद्दीतून, चिकाटीतून आणि स्वतःमधील आत्मविश्वासातून.. कर्तृत्व आमच्यात आहे, नेतृत्व करण्याची धमक आहे.. विकास साध्य करण्याची हिंमत आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पुन्हा सुस्थितीत आणू.. मात्र त्यासाठी मतदारराजाची भक्कम साथ हवी..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा, हा महाराष्ट्र साधू संतांचा.. भावी काळातील महाराष्ट्राच्या घडवणुकीसाठी संतवाणी महत्त्वपूर्ण ठरेल..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे, पिंपरी-चिंचवड मधील वाढती लोकवस्ती, लोकसंख्या पाहता आगामी काळात आवश्यक तेवढ्या पाणी पुरवठ्याची योजना आम्ही आखत आहोत.. जेणेकरून पाण्याचा प्रश्न उभा राहणार नाही..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचाराचा नारळ फोडत आज निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. साधना नेताजी काशिद, कु. यश दत्ताकाका साने, सौ. संगीत प्रभाकर ताम्हाणे आणि श्री. विकास नामदेव साने यांच्या प्रचारार्थ उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात जी विकासकामं आम्ही मार्गी लावली, ती प्रामाणिकपणे आम्ही पार पाडली. १९९१ पासून जनतेनं दिलेल्या विश्वासाच्या बळावर जनोपयोगी सोयी-सुविधा आम्हाला उपलब्ध करून देता आल्या. हे शहर कष्टकरी, उद्योग आणि संधींचं शहर आहे. शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यावरण या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा आमचा निर्धार आहे. महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत तसंच शिव-शाहू-फुले यांच्या विचारानं सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास आम्हाला साधायचा आहे.
पूर्वी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेलं पिंपरी-चिंचवड आता पुन्हा सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनुभवी व नव्या नेतृत्वाचा योग्य समन्वय आवश्यक आहे. जनतेच्या भल्यासाठी जे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. पिंपरी चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या कार्यशील उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रोजगार, रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करून सर्वसामान्य नागरिकांना योग्य ती सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. शरद वसंत भालेकर, सौ. चारुलता रितेश सोनवणे, सौ. सीमा धनंजय भालेकर आणि श्री. पंकज दत्तात्रय भालेकर यांच्या प्रचारार्थ सभेत पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधला, विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. कष्टकरी, उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम केलं जाईल, असा विश्वास या सभेच्या निमित्तानं व्यक्त केला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेतून जातीभेदाला थारा न देता सर्वांना न्याय देणारा विकास घडवायचा आहे. नेतृत्वाला दूरदृष्टी असेल तरच शहराचा चेहरामोहरा बदलता येतो आणि ती जबाबदारी आम्ही पूर्ण ताकदीनं पार पाडू, अशी खात्री दिली.
नवीन आणि अनुभवी उमेदवारांना संधी देत, सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सातत्यानं केलं आहे. कार्यकर्ते हे पक्षाचा कणा असतात, त्यामुळे त्यांना जपलं पाहिजे, स्थानिक पातळीवर त्यांना लागेल ते सहकार्य केलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.
पिंपरी-चिंचवडला कर्जात ढकलणाऱ्यांना बाजूला सारून, विकासाच्या मार्गावर नेण्याचा निर्धार आज पुन्हा एकदा व्यक्त केला. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि शहराच्या प्रगतीत कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द भैरवनाथाच्या साक्षीनं दिला.
दरम्यान, अन्य पक्षातील काही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी नवीन सहकाऱ्यांना पक्षाची जनकल्याणाची विचारधारा समजावून सांगितली. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपली सर्व विकासकामं दर्जेदार, सुबक आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण असावीत. कुठलाही माणूस तिथं दोन घटका थांबला, तर त्याला समाधान, सुरक्षितता आणि सकारात्मकतेचा अनुभव यावा, हाच आमचा उद्देश आहे.
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विद्या प्रतिष्ठान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अविरतपणानं कार्य करत आलं असून, आता आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या संधी खुल्या करत आहे.
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. गौतमजी अदानी यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ नेते, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आनंदात पार पडला. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित केलं.
१९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि कृषी क्षेत्राला बळ देण्यासाठी ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ आणि ‘विद्या प्रतिष्ठान’ या संस्थांची स्थापना झाली. त्या काळी लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षरता समजली जायची; मात्र आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं (Al) शिक्षण घेतलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थानं साक्षर मानला जाईल, अशी गरज निर्माण झाली आहे.
ही काळाची गरज ओळखून विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकारचे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. आज विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक केंद्राच्या माध्यमातून त्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना नव्या युगातील संधी उपलब्ध करून देणारं हे केंद्र खऱ्या अर्थानं भविष्याची दारं उघडणारं आहे.
बारामतीच्या वैभवात भर घालणारी प्रत्येक गोष्ट करताना त्याचा लाभ तमाम बारामतीकरांना झाला पाहिजे, हीच आमची कायम भूमिका राहिली आहे. नव्या युगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, AI, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा योग्य संगम घडवण्याचं काम आज देशभरात सुरू आहे. या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी विद्या प्रतिष्ठाननं देशात एक ठोस आणि दिशादर्शक पाऊल उचललं आहे.
आज बारामतीत मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर, विद्या प्रतिष्ठान अशा विविध शैक्षणिक संकुलांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या उपलब्ध सुविधांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी बारामतीत शिक्षणासाठी येत आहेत. पुण्यानंतर ग्रामीण भागात बारामती हे एक शैक्षणिक हब म्हणून आकार घेत आहे.
याच वाटचालीत नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळाली असून इमारतीचा आराखडाही मंजूर करण्यात आला आहे. त्याच परिसरात भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस आहे. बारामतीचा नावलौकिक वाढवणारी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारी ही वाटचाल अधिक वेगानं पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज बारामती परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
इंदापूर रस्ता व बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण, सेंट्रल पार्क समोरील रस्त्याचं सौंदर्यीकरण, महापुरुषांच्या पुतळ्यांची कामं, स्विमिंग पूलचं प्रगतीपथावरील काम तसंच गौतम बाग ते फडतरे वस्ती या चारपदरी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
बारामती शहर आणि परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध व दर्जेदार विकास हाच मुख्य उद्देश आहे. विकासकामं वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पूर्ण व्हावीत, यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Paying tribute to Shri Ratan Tata on his birth anniversary.
A visionary leader whose contribution to India went far beyond industry, guided by integrity, compassion, and a deep sense of national responsibility.
#ratantata -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सोमेश्वर साखर कारखान्याला गाळप हंगाम २०२४-२५ साठी वसंतदादा पाटील सर्वोत्तम साखर कारखाना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
हा पुरस्कार उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्तम तांत्रिक क्षमता, ऊस विकास, नफा निर्देशांक व व्यवस्थापनाच्या जोरावर प्राप्त झालाय, यामध्ये कारखान्यात कार्यरत प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची शान वाढली आहे आणि बारामती सहकारी उद्योगाला राष्ट्रीय पातळीवर चांगली ओळख मिळाली आहे.
या यशामुळे महाराष्ट्राच्या सहकारी साखर उद्योगाचं भविष्य अधिक उज्ज्वल आणि उत्कर्षाच्या दिशेनं झेपावलं आहे.
याबद्दल मी कारखान्यातील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, तोडणी मजूर असं सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आपल्या दूरदर्शी कृषिविषयक निर्णयांनी देशातील कृषक समाजाच्या जीवनाला एक नवी दिशा दिली. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग व विविध आधुनिक तांत्रिक उपक्रमांसह आमूलाग्र बदल घडवून आणत, शिक्षण क्षेत्रातही अतुलनीय योगदान दिलं. देशाचे प्रथम कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे तसंच न्याय, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी प्राणाचे बलिदान देणारे, अद्वितीय वीरतेचे प्रतीक, शीख धर्माचे दहावे गुरू, गुरु गोविंद सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवी दिल्ली येथे वीर बाल दिनाच्या निमित्तानं देशभरातील गुणवंत बालकांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ नं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षी यानं विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या अभिनव कार्यासाठी हा सन्मान प्राप्त करत राज्याच्या नावलौकिकतेत भर घातली आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मी अर्णवचं तसंच सर्व पुरस्कार विजेत्या बालकांचं मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
अर्णव यानं लकवाग्रस्त रुग्णांसाठी एआय-आधारित पुनर्वास उपकरण व ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँड विकसित करून आपल्या कल्पकतेचा, जिद्दीचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श घालून दिला आहे.
कला-संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, शौर्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारी ही सर्व बालकं म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आशेची किरणं आहेत. या बालकांची प्रबळ आणि प्रगल्भ विचारसरणी निश्चितच 'विकसित भारत २०४७' चं स्वप्न साकार करण्यास प्रेरणादायी ठरेल.
#राष्ट्रीय_बाल_पुरस्कार_२०२५ -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष श्री. सचिन खरात जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सन्मानपूर्वक आघाडी करून काही जागांवर सहमती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांची एकत्र येण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. लोकहिताच्या मुद्द्यांवर समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन काम करणं, ही काळाची गरज आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा आणि समन्वयातून पुढील वाटचाल निश्चितच सकारात्मक ठरेल, असा मला विश्वास आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The valour and courage of Sri Guru Gobind Singh ji's 4 Sahibzades is beyond compare and serves as an inspiration for us all to follow the path of righteousness with utmost conviction.
We bow down to their supreme sacrifice on Veer Bal Diwas.
#veerbaldiwas -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सांगलीतील माजी नगरसेवक श्रीम. स्नेहलताई सावंत, श्री. अभिजित भोसले आणि श्रीम. नसीमा नाईक तसंच सामाजिक कार्यकर्ते श्री. रज्जाक नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सामाजिक स्तरावर कामं मार्गी लावण्याच्याकरिता तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत, याचा आनंद आहे. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
On the first death anniversary of former Prime Minister Dr. Manmohan Singh Ji, we remember a statesman whose life was defined by intellect, integrity, and unwavering service to the nation.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी नंदनवन उभारलं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्याग व समर्पण भावनेतून त्यांनी समाजसेवेसह वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणासाठी अतुलनीय कार्य केलं. वंचित-निराधारांचे आधार, मानवतावादी विचारांचे मूर्तीमंत प्रतीक, पद्मविभूषण बाबा आमटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Remembering Former PM Shri Atal Bihari Vajpayee Ji on his birth anniversary.
A respected statesman whose public life reflected dignity, constitutional values, and a deep commitment to democratic traditions. His legacy continues to be remembered across the nation.
#atalbiharivajpayee -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Wishing everyone a blessed and joyous Christmas.
May the warmth of the festive season bring happiness, peace and a renewed hope for a brighter tomorrow.
#merrychristmas -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न व कामं मार्गी लावण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली, आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केलं.
या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे मतदारराजानं दाखवलेला विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि संघटनेची ताकद आहे. जनतेनं दिलेल्या या विश्वासाला योग्य न्याय देत स्थानिक विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताची कामं अधिक वेगानं पूर्ण होतील, अशी मला खात्री आहे.
त्याचप्रमाणे विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि ताकदीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला.
📍राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता आणि सामर्थ्य सिद्ध केलं आहे. देशाच्या महामहीम राष्ट्रपती मा. श्रीम. द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार २०२५ अंतर्गत सन्मानित झालेल्या सर्व मान्यवर शास्त्रज्ञांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
ज्येष्ठ शास्त्रज्ञांपासून ते तरुण संशोधकांपर्यंत अनेकांनी आपल्या बुद्धिमत्ता, परिश्रम आणि संशोधनाच्या जोरावर देशाला व महाराष्ट्राला जागतिक पातळीवर गौरव मिळवून दिला आहे. ही बाब प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.
स्व. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला विज्ञान रत्न पुरस्कार असो तसंच अणुऊर्जा, अभियांत्रिकी, पर्यावरण, गणित, संगणकशास्त्र आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील मान्यवरांना मिळालेले सन्मान असोत. हे सर्व पुरस्कार भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा मजबूत पाया अधोरेखित करतात.
संशोधन, नवसर्जन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हाच भविष्याचा मार्ग आहे. महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांनी दिलेलं हे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. सर्व पुरस्कारार्थींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो.
@rashtrapatibhvn
#राष्ट्रीय_विज्ञान_पुरस्कार_2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी, लोकाभिमुख, संवेदनशील व मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्यानं लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला. आदिवासी विकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचं योगदान मोलाचं राहिलं आहे. साधी जीवनशैली आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे ते ‘जनतेचे आमदार’ म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एका अनुभवी, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेत्याच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाला आहे. आदिवासी, ग्रामीण व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. नाईक कुटुंबियांना व कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय:
✅ ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार.
(सामान्य प्रशासन विभाग)
✅ राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार.
(ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
✅ धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा.
(महसूल विभाग)
✅ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार.
(नगर विकास विभाग)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A proud milestone for India’s space sector.
The successful LVM3-M6 mission of placing the #bluebirdblock2 satellite- the heaviest payload ever launched from Indian soil into its precise orbit- reflects India’s growing heavy-lift capability and expanding role in the global commercial launch market.
Congratulations to the scientists and engineers of ISRO for this remarkable achievement that strengthens India’s leadership in next-generation satellite communication.
@isro -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
साने गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना स्वयं शिस्तीच्या धड्यांसह बंधुभाव व समता ह्या मूल्यांची शिकवण दिली. त्यांनी आपल्या समर्पक राष्ट्रहिताच्या विचारांनी भारताच्या युवा पिढीत नवी चेतना निर्माण केली. अस्पृश्यता, अनिष्ट रूढी-परंपरा व जातीभेदाचा विरोध करत, सामूहिक सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणारे, महान स्वातंत्र्यसेनानी, थोर विचारवंत व समाजसुधारक साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#साने_गुरुजी
#saneguruji -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लक्ष्य एकच जनसेवा करणं, दक्ष आम्ही कोणावर अन्याय न होऊ देणं, ध्येय एकच जनकल्याणाची कामं अखंड करत राहणं..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Our farmers are the backbone of our economy, feeding the nation at all times and nurturing generations.
On #nationalfarmersday, which also commemorates former PM Chaudhary Charan Singh's birth anniversary, we celebrate the unyielding spirit of our farmers and their contributions in sustaining our society and our economy. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Air Force Common Admission Test (AFCAT) या परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. नक्षत्रा राजेंद्र पाटणकर हिनं आज माझी सदिच्छा भेट घेतली.
नक्षत्रानं आपल्या बुद्धिमत्ता, परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संपादन केलेल्या ह्या उज्ज्वल यशाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान आहे. तिचं यश हे असंख्य तरुण-तरुणींना प्रेरणा देणारं आहे.
या भेटीदरम्यान नक्षत्राचं मनापासून अभिनंदन केलं, तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
इंदूर येथे पार पडलेल्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप (२०२५-२६) स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात बारामतीचा सुपुत्र कु. सक्षम सचिन यादव यानं रौप्यपदक पटकावलं. सक्षमच्या या कामगिरीनं राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची मान उंचावली असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या यशाबद्दल सक्षमचं मनापासून अभिनंदन केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नेपाळ येथे पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करणारी बारामतीची सुपुत्री कु. पूर्वा तानाजी पाटील हिनं आज माझी सदिच्छा भेट घेतली. आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्याच्या जोरावर पूर्वानं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवलं. तिची कामगिरी ही अन्य युवा खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
या भेटीदरम्यान पूर्वाचं तिनं मिळवलेल्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील जनतेचे मनापासून आभार व नवनिर्वाचितांचे अभिनंदन!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The results of the recently concluded Municipal Council and Municipal Panchayat General Elections 2025 clearly reflect people of Maharashtra’s strong support for the ideology of Shiv–Shahu–Phule–Ambedkar upheld by the Nationalist Congress Party, and their endorsement of the development-oriented governance of the Mahayuti. This mandate is a resounding victory for democracy.
Under the decisive leadership and guidance of Honourable Prime Minister, Shri. Narendra Modi ji, the Mahayuti’s successful journey will undoubtedly continue with renewed momentum. I also express my sincere thanks to the Union Home Minister and Minister of Cooperation, Shri. Amit Shah ji, for his continued support and leadership.
@narendramodi @AmitShah -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेला दिलेली साथ आणि महायुतीच्या विकासाभिमुख विकास कार्याला दिलेली दाद आहे. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा मोठा विजय आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महायुतीची यशस्वी घोडदौड अशीच निरंतर सुरू राहील, यात काही शंका नाही. या ऐतिहासिक यशाबद्दल मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा.श्री. अमित शहा जी यांना देखील धन्यवाद देतो.
@narendramodi @AmitShah -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
With knowledge-led nation building and evidence-based governance at the forefront, Srinivasa Ramanujan's contribution to nurturing analytical thinking and scientific temper remains timeless.
On #nationalmathematicsday2025, tributes to the great mathematician whose brilliance transcended boundaries and continues to inspire science and research. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे.
ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर जनतेच्या विश्वासाची, विकासाच्या दिशेनं घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती आहे. प्रत्येक मतदार बंधू-भगिनींनी दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्या कामाची खरी ऊर्जा आहे. या ऐतिहासिक यशासाठी सर्व मतदारराजाचे मनापासून कोटिशः आभार!
आपण दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत विकास, पारदर्शकता, सुशासन आणि सर्वसामान्यांच्या हिताचं राजकारण अधिक ताकदीनं पुढे नेण्याचा संकल्प आम्ही पुन्हा एकदा दृढ करतो.
आपल्या सहभागामुळेच लोकशाही अधिक बळकट होते आणि आपल्या पाठिंब्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनकल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.
कृतज्ञ!
जय राष्ट्रवादी! जय लोकशाही!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या कराटे पटूंनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
प्रशिक्षक स्मिता सोदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साईराज भोडिहोडू, आर्यन संघाटि, आराध्या नाईक, श्रद्धा नाईक या कराटे पटूंनी केलेली कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवलेलं हे यश अनेक खेळाडूंना प्रेरणा देणारं आहे.
सर्व विजेत्या खेळाडूंचं, कुटुंबियांचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भविष्यातही असंच यश संपादन करून आपल्या राज्याचं, देशाचं नाव उज्ज्वल करत रहावं, अशा शुभेच्छा देतो.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कोटिशः आभार!
लोकशाहीच्या या प्रवासात मतदारराजानं दिलेल्या प्रत्येक मतासाठी आम्ही सदैव ऋणी आहोत. आपण दाखवलेला विश्वास, दिलेला पाठिंबा आणि विकासाच्या मार्गावर ठामपणे उभं राहण्याची तुमची भूमिका, हीच आमची खरी ताकद आहे.
तुमच्या आशीर्वादामुळेच जबाबदारीनं काम करण्याची उमेद आणि नवी ऊर्जा मिळते. या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतकांनी घेतलेली मेहनत, दाखवलेली एकजूट आणि समन्वय यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी, आमदार व सरचिटणीस श्री. संजय खोडके जी यांच्या अपघाताची नुकतीच माहिती मिळाली. कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना हा अपघात झाला असून त्यांना दुखापत झाल्याचं कळलं. यासंदर्भात मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधला असता, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो तसंच ते पुन्हा जनसेवेच्या कार्यात नव्या जोमानं रुजू होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निधनानं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
स्व. वसंतदादा पाटील यांना आयुष्यभर खंबीर साथ देत शालिनीताईंनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात मोलाचं योगदान दिलं. पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज मुंब्रा येथील विविध पक्षातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. नवीन सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा त्यांना समजावून सांगितली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कर्मयोगी संत गाडगे महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसेवेप्रती समर्पित केलं. गाडगे बाबांनी जातीभेद, अनिष्ट रुढी-परंपरा व अज्ञानाविरुद्ध समाज प्रबोधनाची ज्योत पेटवली. कीर्तनाच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ वैचारिक दृष्टिकोनातून समाजाला अंधश्रद्धेच्या बेड्यांतून मुक्त करत त्यांनी सामूहिक स्वच्छतेतून सर्वांगीण ग्रामोन्नती साधण्याचा संदेश दिला. महान समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्याची संधी चालून आली आहे. आपलं शहर, आपला परिसर विकास कामांच्या अनुषंगानं योग्य नेतृत्वाच्या हाती देण्याची ही सुवर्ण वेळ आहे.
जागरूक नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या शहराच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या.
घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा आणि विकासाला मत द्या!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास न होता एका लोकप्रतिनिधीनं विकास कामं मार्गी लावली पाहिजेत.. लोकप्रतिनिधीकडे विकासाचं व्हिजन असलं पाहिजे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्व समाजघटकाला सोबत घेऊन विकास साधायचा आहे.. समाजा-समाजात एकोपा राखून आपल्याला एकजुटीनं विकासाच्या प्रवाहात पुढे जायचं आहे..!
-
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
आज सकाळपासून विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पक्षाचे नेतृत्व मा. श्री. अजितदादा पवार यांच्यासह बारामती कार्यालयाला बदनाम करण्याच्या हेतूने एक खोटा, एआयद्वारे तयार केलेला व्हिडिओ जाणीवपूर्वक प्रसारित केला आहे.
या प्रकरणी पक्षाने तातडीने दखल घेत पोलीस तक्रार दाखल केली असून, एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅब) अहवालात हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे.
खोटी माहिती पसरवणे आणि डिजिटल बनावटपणा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. राजकीय लढत करायची असेल तर ती राजकारणात करा, निवडणुकीत आमच्यासमोर उभे राहा आणि जनतेचा कौल घ्या, अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई निश्चित होईल.
Since this morning, a fake, AI-generated video was circulated by our opponents to deliberately malign the NCP and target Hon. Ajitdada Pawar and the Baramati office. The party acted immediately by filing a police complaint. An FSL forensic report has now conclusively confirmed the video to be fabricated.
Misinformation and digital forgery will not be tolerated. *Contest us politically, face us in elections, and seek public mandate.* Such acts will be pursued firmly and lawfully. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्यास.. उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. या मेळावा निमित्तानं माजी महापौर श्री. मैनुद्दीन बागवान, माजी महापौर श्री. आनंदा देवमाने यांच्यासह माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. सर्वसमावेशक विकास हा आमचा संकल्प आहे. नवीन नेतृत्वाला संधी देणं, कार्यकर्त्यांना पुढे आणणं आणि सामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणं, हेच आमचं ध्येय राहिलं आहे, असं यावेळी स्पष्ट केलं.
शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेती, शिक्षण, कला, कौशल्य विकास, तीर्थक्षेत्र विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान (AI) यांचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याकरिता आम्ही नवनवीन उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकणं, अशी आमची भूमिका कायम राहिली आहे. जनतेला विश्वासात घेऊन, कायदा-सुव्यवस्था राखून लोकसेवेच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचं सभेत स्पष्ट केलं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी समन्वयानं कामं करणं आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याबाबतीत नवीन सहकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यशैली उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
📍जि. सांगली -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नमस्कार बारामतीकरांनो,
तुमची मला आजवर असलेली भक्कम साथ आणि आशीर्वाद यापुढेही सोबत राहू द्या. बारामतीच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय गाठण्यासाठी तुमचं पाठबळ, विश्वास यापुढेही संगतीला असू द्या. उद्या, २० डिसेंबरला पार पडणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोकसेवेकरिता उभ्या केलेल्या सर्व कार्यशील उमेदवारांना बारामतीकरांनी आपल्या बहुमूल्य मतांनी निवडून द्यावं. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून विकासाभिमुख विचारांना मत द्यावं, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चला, आपण सगळे मिळून पुढील ५ वर्षांत बारामतीत विकासाच्या दृष्टीनं आमूलाग्र बदल घडवून आणू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. सध्या सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली, प्रत्यक्ष पाहणी केली आणि जिथं गरज आहे, तिथं अधिकाऱ्यांना स्पष्ट व महत्त्वाच्या सूचना केल्या.
कारखाना अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून चालावा, हाच मुख्य उद्देश आहे.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी-सुविधांच्या बाबतीत बारामती समृद्ध बनत चालली आहे.
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज बारामती नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२५च्या निमित्तानं आयोजित प्रचार समारोप सभेला उपस्थित राहून मतदार बांधव, महिला-भगिनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. सचिन सदाशिव सातव यांसह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहन केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे जात, बारामती शहरासोबतच ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आतापर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक विकास साधता आला, याचा मला अभिमान आहे. शहरात फिरताना काम केल्याचं समाधान मिळतं, हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे. बारामती आज विद्येचं माहेरघर म्हणून पुढं येत असून नवनवीन प्रशिक्षण केंद्रे, पायाभूत सुविधा, शिवसृष्टीसारखे प्रकल्प आणि नागरिककेंद्री विकासकामं वेगानं सुरू आहेत, अशा भावना या सभेच्या निमित्तानं व्यक्त केल्या.
बारामतीच्या समृद्धी आणि विकासासाठी एकजुटीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठबळ देऊया. याकरिता सर्वांनी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या, असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे सभेच्या निमित्तानं पक्षात अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला, सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍उद्योगभवन, बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या बैठकीदरम्यान संस्थेच्या ITI प्रशिक्षणाची दिशा व ध्येय धोरणं, नवीन बांधकाम प्रस्ताव, संस्थेअंतर्गत सुरू असलेली विविध विकासकामं, व्यावसायिक अभ्यासक्रम, परिसरातील सोयीसुविधा तसंच विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती घेतली.
विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक सक्षम व कौशल्याधारित घडवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा पार पडली, यावेळी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले आणि संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.
यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली, त्यांच्या नवकल्पनांचं कौतुक केलं व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.
संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.
सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Maharashtra Cabinet Minister and my party colleague Shri Manikrao Kokate has submitted his resignation to me following the outcome of the Hon’ble Court’s verdict. In keeping with our party’s long-standing philosophy that the rule of law is supreme and above all individuals, the resignation has been accepted in principle.
I have forwarded Shri Kokate’s resignation to the Hon’ble CM for due consideration and acceptance, in accordance with constitutional procedure.
Our party has always believed that public life must be guided by constitutional morality, institutional integrity, and respect for the judiciary. We stand firmly by the rule of law and will continue to act in a manner that upholds democratic values and public trust. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली. त्यांची प्रत्येक शिल्पे अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानानं प्रदान करण्यात आला होता. आणि अभिजात भाषा दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन राम सुतार यांनी दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयतेनं, आपुलकीनं बोलत. साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला, तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांच्या निधनानं भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज धुळे शहरातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन सहकाऱ्यांच्या मदतीनं धुळे शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल. तसंच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या आपल्या पक्षाच्या विचारधारेला नवी ऊर्जा मिळेल. विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या ध्येयानं प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर राष्ट्रवादी परिवारात सहभागी होत आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान लेकीनं इतिहास घडवला...
देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमीच्या (IMA) ९३ वर्षांच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच एका महिला ऑफिसर कॅडेटनं यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मान मिळवला असून, हा ऐतिहासिक सन्मान कोल्हापूरच्या सई जाधव हिनं मिळवला आहे. कठोर शिस्त, अविरत परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर तिनं सहा महिन्यांचं अत्यंत आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पद प्राप्त केलं, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा, SSB मुलाखत आणि शारीरिक-मानसिक कसोटी यांवर मात करत सई जाधव हिनं दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची निष्ठा ही केवळ तिच्या यशाचीच नव्हे, तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या कुटुंबातून आलेल्या सईनं आपल्या कर्तृत्वातून त्या परंपरेला नवा सन्मान मिळवून दिला आहे.
सई जाधव हिचं हे यश लाखो तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. मी सईचं मनापासून अभिनंदन करतो आणि तिच्या उज्ज्वल लष्करी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.
#indianmilitaryacademy #saijadhav -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नमस्कार नेवासाकरांनो,
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२५मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. सचिन विलासराव कडू पाटील यांच्यासह आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन करतो.
आपल्या शहरात विकासकामांना गती मिळावी, यासाठी नवी उमेद, नवी ऊर्जा असणारे उमेदवार आम्ही तुमच्या सेवेकरिता उमेदवाराच्या रूपानं उभे केले आहेत.
येत्या २० डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जागरूक नागरिक या नात्यानं आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या शहराच्या शाश्वत विकासाची दारं खुली करा. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, अशी खात्री देतो.
‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटण दाबा आणि विकासाभिमुख विचारांना मत द्या, असं आवाहन करतो.This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नमस्कार धर्माबादकरांनो,
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२५च्या निमित्तानं आपलं शहर विकासाच्या दिशेनं वेगानं पुढे घेऊन जाण्यासाठीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
येत्या २० डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जागरूक मतदार बना, मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या शहराच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. मतदान करणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजेच कामाच्या माणसाला मत..!
‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटण दाबा आणि विकासाला मत द्या, असं आवाहन करतो.This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज सोलापूर महानगरपालिकेचे माजी उप-महापौर श्री. राजेंद्र कलंत्री व अन्य पक्षाचे गटनेते श्री. रियाज खरादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मान्यवरांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात पक्षसंघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं तसंच पक्षाची विचारधारा जनमानसांत पोहोचवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचं योगदान महत्वाचं ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या आध्यात्मिक कार्यातून मानवता, भक्ती आणि सद्भावनेचा संदेश देणारे, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला शब्दरूप देऊन महाराष्ट्रभूमीला संतविचारांनी पावन करणारे, थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवी विकासदृष्टी घेऊन, समविचारी वाटचालीतून..
पुढे निघालो आम्ही सर्वांगीण प्रगतीकडे!This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव कामी येईल आणि त्यातून जनसेवा घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज सौ. साधना नेताजी काशिद यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन सहकाऱ्यांच्या मदतीनं पिंपरी–चिंचवड भागातील संघटन अधिक मजबूत होईल आणि पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून केवळ देशाच्या क्रीडा क्षेत्रालाच नव्हे, तर पुण्याच्या निसर्ग व सांस्कृतिक पर्यटनालाही वैश्विक स्तरावर चालना मिळणार आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे व पिंपरी चिंचवडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाने सदैव सजग राहत, अधिकाधिक सुरक्षित वातावरण निर्माण करावं. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartiest congratulations to Shri @NitinNabin for being appointed as the National Working President of @BJP4India. Confident that you will continue to work tirelessly to further strengthen the party and the NDA under the visionary leadership of Hon’ble PM Shri @NarendraModi ji and HM Shri @AmitShah ji.
My sincere appreciation to Shri @JPNadda for his invaluable contribution and dedicated leadership in strengthening the BJP across the nation. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या सुमारे ३००० कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
पुणे शहराच्या पायाभूत विकासाला योग्य दिशा आणि आवश्यक गती देण्यासाठी सरकार म्हणून आम्ही जवळपास ४०,००० कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मेट्रोचे जाळे अधिक विस्तारले जात असून, ही कामे करताना पुढील ५० वर्षांचा दूरगामी विचार, AI तंत्रज्ञानाचा वापर आणि उच्च गुणवत्तेवर विशेष भर दिला जात आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होत असलेली पाण्याची समस्या लक्षात घेता, येत्या काळात टाटा समूहाच्या धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विकासकामांसोबतच शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे त्यासाठी सरकार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने काम करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं.
पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळणार असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास व शहर सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. तसंच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस खात्याला सरकारचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहिले आहे आणि पुढेही राहील. पुणे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुसह्य जीवन मिळावे यासाठी पोलीस दलाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना या निमित्ताने पोलीस दलास दिल्या.
येत्या काळात पुणे मेट्रोचा विस्तार सुमारे २०० किमीपर्यंत करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
@Dev_Fadnavis
#punemunicipalcorporation #mahametro -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रातील महानगरपालिकांसाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुका म्हणजे केवळ निवडणूक प्रक्रिया नाही, तर लोकशाही अधिक बळकट करण्याची आणि सर्वसमावेशक विकासाची संधी आहे.
✅ मतदान - १५ जानेवारी २०२६
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील एकूण २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यामध्ये १,४४२ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, ३४१ जागा अनुसूचित जातींसाठी (SC), ७७ जागा अनुसूचित जमातींसाठी (ST) तसंच ७५९ जागा इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. हे आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे.
चला, आगामी निवडणुकांच्या माध्यमातून शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन, मजबूत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्धार करूया. सक्षम नेतृत्वाला साथ देऊया, मजबूत महाराष्ट्र घडवूया.
विकासासाठी मतदान करा. स्थैर्यासाठी मतदान करा. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartiest congratulations to our amazing Squash Team comprising of Joshna Chinnappa, Abhay Singh, Velavan Senthil Kumar and Anahat Singh on winning their first ever first-ever World Cup title at SDAT Squash World Cup 2025.
You all have done us proud!
This win speaks volumes about their commitment and dedication towards the sport, which will go a long way in encouraging other young players to pursue Squash.
@joshnachinappa
@abhaysinghk98
@Anahat_Singh13
#squashworldcup -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संघराज्याच्या एकत्रिकरणात अग्रणी भूमिका बजावत, देशाच्या एकसंधता व अखंडतेला बळकटी प्रदान केली. आपल्या उपपंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी क्रांतिकारी निर्णयांतून स्वतंत्र भारताच्या विकसनशीलतेला नवा आयाम दिला. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#sardarvallabhbhaipatel -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील मारकवार तसंच नागपूर येथील अनेक मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी, प्रशासनाचा अनुभव आणि जनहिताची तळमळ असलेले नेते व कार्यकर्ते पक्षात सहभागी झाल्यानं पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
राज्यात सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या ध्येयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं काम करत आहे. या वाटचालीत नव्या सहकाऱ्यांसोबत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा संकल्प अधिक मजबूत झाला आहे.
📍नागपूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या अलौकिक शब्दकौशल्यातून अजरामर गीते व काव्यांची निर्मिती करणारे, भावसंपन्न साहित्यनिर्मिती, तरल पटकथालेखनासह अभिनय क्षेत्रातही आपली छाप सोडणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पद्मश्री ग. दि. माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#ग_दि_माडगूळकर
#g_d_madgulkar -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्य सरकारच्या वतीनं टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू असून, सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्याच्या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली असून सदर चर्चेनंतर झालेल्या निर्णयानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत यु.जी.सी. मार्फत विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करुन अधिछात्रवृत्ती योजनेचे निकष उच्च व तंत्रशिक्षण विभागानं तयार करावेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक प्रगती अहवाल तपासून उर्वरित अनुदान वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा समावेश करुन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना तंत्र शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.
शिष्यवृत्ती देताना प्रत्येक घटकासाठी लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शैक्षणिक टप्प्यावर किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. शिष्यवृत्ती मंजूर करताना संबंधित अभ्यासक्रमांचा राज्य व समाजाच्या विकासासाठी होणारा उपयोग तसंच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीचा सखोल विचार करण्यात येत आहे.
#हिवाळीअधिवेशन२०२५
#wintersession2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
📙 Release of the second volume of ‘Vidhan Parishadene Sammat Keleli Mahattvapurn Vidheyake, Tharav ani Dhorane’ on the occasion of the centenary celebrations of the Maharashtra Legislative Council, at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari.
Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Ajit Pawar, Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Minister Chandrakant Patil and other dignitaries were present.
📙 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त 'विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे' या व्दितीय ग्रंथाचे प्रकाशन.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
📙 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके करकमलों से महाराष्ट्र विधानपरिषद शताब्दी महोत्सव के अवसर पर 'विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे' इस द्वितीय ग्रंथ का विमोचन।
इस अवसर पर विधान परिषद के सभापति प्रा. राम शिंदे, विधानसभा के अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕘 9.05am | 13-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | स. ९.०५ वा. | १३-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @Prof_RamShinde @rahulnarwekar @AjitPawarSpeaks @neelamgorhe @ChDadaPatil
#maharashtra #devendrafadnavis #centenarycelebrations -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नागपूर येथील सुयोग विश्रामगृहात विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५ निमित्त आलेल्या पत्रकार बांधवांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज्यातील समकालीन घडामोडी, विकासविषयक मुद्दे तसंच जनतेशी संबंधित विविध प्रश्नांवर मोकळी आणि सकारात्मक वातावरणात चर्चा झाली.
#हिवाळीअधिवेशन२०२५
#wintersession2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यावर आपल्या सरकारचा भर आहे. पुणे ते सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आधीच्या प्लॅनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नव्या प्रस्तावाला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिली आहे. नव्या प्लॅननुसार हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून उड्डाणपूल सुरू होईल आणि तो थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे. सदर काम लवकरात लवकर मार्गी लागेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
#हिवाळीअधिवेशन२०२५
#wintersession2025 -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
पुणे महानगराचा स्ट्रक्चरल प्लॅन जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, नागपूर येथे 'पुणे महानगर नियोजन समिती'ची बैठक पार पडली.
राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासियांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांच्या अंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी ₹32,523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे महानगरसाठी विहित कालमर्यादेत 'स्ट्रक्चर प्लॅन' तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा. प्लॅन तयार करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. विकासाचे नियोजन करताना विविध प्राधिकरणांकडे काही क्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी न देता संपूर्ण क्षेत्राचा विकास एकाच प्राधिकरणाने करावा.
पुणे महापालिकेत 30 जून 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन पुणे महापालिकेने करावे. ‘पुणे ग्रोथ हब’साठी विकास आराखडा शासनाच्या मित्रा संस्थेकडून करण्याबाबत पडताळणी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
पुणे शहरामध्ये ‘माण- म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग’ योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. शहरामध्ये एकीकृत टाऊन प्लॅनिंगच्या 15 योजनांवर काम सुरू असून यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. वेळेत योजना पूर्ण झाल्यास त्याचा लाभ सर्वांना होतो, त्यामुळे कुठेही विलंब न लावता या योजनांची कामे पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे विद्यापीठ जवळील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची वाट न बघता नागरिकांच्या सेवेसाठी तो सुरू करावा. पुणे महानगर समितीच्या सर्व सदस्यांसमवेत कार्यक्रमाचे आयोजन करावे, त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेत पुणे शहरासाठी भविष्याचा वेध घेणारा 'कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन' तयार करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देशित केले.
पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेली विकासकामे
✅पुणे महानगरात 589 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची 127 कामे सुरू
✅शहरांतर्गत 83 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प
✅पुणे शहरा अंतर्गत विकास केंद्र, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ जोडणीसाठी रस्त्यांची कामे सुरू
✅पूल आणि उड्डाणपुलाची तीन कामे सुरू
✅गृहनिर्माण प्रकल्पांची तीन कामे पाणीपुरवठा योजनांची चार कामे सुरू असून वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण
पुणे महानगरात सुरू होणारी कामे
✅पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची 3 कामे
✅चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 17 कामे, 10 पर्यटन विकास केंद्रांची कामे
✅स्कायवाॅकचे एक काम, मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची 5 कामे लवकरच सुरू होणार
येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग
✅येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे
✅या महामार्गाच्या फिजीबिलिटी पडताळणीचे काम सुरू असून यासाठी अंदाजीत ₹7500 कोटींच्या निधीची आवश्यकता
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @PMCPune
#maharashtra #devendrafadnavis #urbandevelopment -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
पुणे महानगराच्या पायाभूत विकासाला गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, नागपूर येथे 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'ची बैठक संपन्न झाली.
बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनि:स्सारण योजनांच्या 27 गावांमधील ₹1209.8 कोटींच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी शिल्लक ₹300 कोटींच्या निधीचा उपयोग पुणे महानगरात अग्निप्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात यावा. पुणे महानगरातून जाणाऱ्या नद्यांचे पुनरुज्जीवन करून नद्यांचे प्रदूषण रोखावे. नद्यांमधून प्रदूषित पाणी जाणार नाही, याची यंत्रणांनी काळजी घ्यावी.
नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीडी या महामार्गांवरील सेवा रस्त्यांची कामे सुरू करावीत. नवले पुलाजवळ सेवा रस्ते निर्माण करून अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही विचार करून त्यांचा उपयोग करावा. यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत, भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुणे शहरातील माण - हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो लाईन-3 चे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे. मेट्रो लाईन प्रवाशांच्या सेवेत उद्दिष्टपूर्तीनुसार येईल, या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @OfficialPMRDA
#maharashtra #devendrafadnavis #urbandevelopment -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदं भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली.
लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Deeply saddened by the passing away of former Union Home Minister Shri Shivraj Patil.
His long years in public service and nation building shall always be remembered, and so will be his soft and poised demeanour.
My condolences and prayers are with his family members and loved ones. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विद्यार्थी चळवळीपासून आमदार, विरोधी पक्षनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत, संघर्षमय वाटचालीत लोकांचा अपार विश्वास संपादन करणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सदैव लोकहिताची भूमिका घेतली. ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांना बुलंद आवाज देत, विकसनशील समाजकारणातून राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
@PawarSpeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
खर्चावर कठोर नियंत्रण, काटेकोर आर्थिक शिस्त, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि राज्यात नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. जीएसटी, उत्पादन शुल्कसह खाणकाम विभागांद्वारे राज्याचा महसूल वाढवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. कोणताही वित्तीय निर्देशांक बिघडू न देता राज्याचा विकास वेगात ठेवणं हे आमचं धोरण आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेत सर्व वित्तीय निकषांचं काटेकोरपणे पालन करुनच निधीचं वाटप करण्यात आलं आहे.
हिवाळी अधिवेशनात एकूण ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असून यातील ३८ हजार ६०० कोटींचा निधी केवळ जनकल्याण योजनांसाठी व केंद्राच्या हिस्स्यासाठीचा आहे. यामध्ये पुरग्रस्त शेतकरी मदत, बळीराजा वीज सवलत, सिंहस्थ कुंभमेळा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांसाठी वाढीव तरतुदींचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून १० हजार ६०० कोटी मिळणार असून राज्यावर येणारा निव्वळ वित्तीय भार ६४ हजार ६०० कोटी रुपयांचा आहे.
वित्त आयोगानं घालून दिलेल्या निकषांनुसार राज्याचं काम सुरु आहे. वर्ष अखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून व आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यात सरकार नेहमीच यशस्वी झालं आहे. चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्तोत्र तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
वस्तु व सेवाकर (जीएसटी), उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन तसंच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत राहील, याची दक्षता घेण्यात येईल. राज्याची वित्तीय शिस्त कुठेही बिघडलेली नाही.
#हिवाळीअधिवेशन२०२५
#wintersession2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज, अन्य पक्षाचे नाशिक येथील पदाधिकारी श्री. अतुल शंकरराव मते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्ह्यातील विकास, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍नागपूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर (शहर व ग्रामीण) तर्फे आयोजित भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश मेळावा आज उत्साहात पार पडला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच महिला भगिनींचा मान-सन्मान जपला आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या प्रगतिशील विचारधारेनंच आपण चालत आलो आहोत आणि त्याच मूल्यांवर पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. सेक्युलर विचारधारा राज्यासाठी किती महत्वाची आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, असं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना सूचित केलं.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण करण्याचा आपल्यासमोर आदर्श ठेवला. देश आणि राज्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं योगदान हे अपूर्व आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं सामाजिक कार्य आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या निधनानं आपण एक थोर समाजभूषण व्यक्तीमत्त्व गमावलं आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
नागपूर परिसर हा बहुभाषिक, विविध संस्कृती स्वीकारणारा प्रदेश आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जनसेवेखातर सदैव तयार राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारा माणूस लोक कधीही विसरत नाहीत, असं सूचित केलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या कामाचं नियोजन करावं. एकमेकांना समजून घेत समन्वयानं कामं करावीत. जनसंपर्क वाढवा, लोकांच्या कामी या. पक्ष हा सर्वांचा आहे, पक्ष आपला परिवार आहे. लाडकी बहीण, शेतकरी बांधव, तरुण, महिला अशा प्रत्येक समाजघटकांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा सूचना केल्या.
राज्याच्या एकूण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं अतिशय आवश्यक आहे. कोणीही वंचित राहू नये, हीच आपली भूमिका आहे. सर्व समाजघटकाला सोबत घेऊन विकास साधायचा आहे, असं स्पष्ट केलं. -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸 CM Devendra Fadnavis chaired the meeting of the 'Pune Metropolitan Region Development Authority'.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'ची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' की बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕐 1.05pm | 11-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | दु. १.०५ वा. | ११-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @OfficialPMRDA
#maharashtra #devendrafadnavis #urbandevelopmentThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting of the 'Pune Mahanagar Planning Committee'.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, local MLAs and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे महानगर नियोजन समिती'ची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पुणे महानगर नियोजन समिति' की बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, स्थानीय विधायक एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕧 12.30pm | 11-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | दु. १२.३० वा. | ११-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ChDadaPatil
#maharashtra #devendrafadnavis #urbandevelopment -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी आज, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि महायुतीतील सर्व आमदारांसोबत अल्पोपहाराचा आनंद घेतला.
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणं बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल.
#हिवाळीअधिवेशन२०२५This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लातूर येथील माजी उपमहापौर श्री. चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा नवीन सहकाऱ्यांना समजावून सांगितली, त्या विचारांवर इमानेइतबारे चालण्याचा संकल्प त्यांनी केला.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Human rights are the foundation of inclusive progress- not privileges, but basic entitlements of every individual.
On #humanrightsday, let us come together to safeguard these essential rights that shape a fair and equitable society. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे पत्रकार प्रतिष्ठानला जागा उपलब्ध झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी, पत्रकार बांधवांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली, सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं. यानिमित्तानं विविध राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली.
पत्रकार बांधव हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील तथ्यपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य ते अत्यंत निष्ठेनं पार पाडतात. त्यांच्या कामासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षित व सुसज्ज कार्यपरिसर मिळणं ही सरकारची जबाबदारी आहे.
नवीन जागा उपलब्ध झाल्यामुळे प्रतिष्ठानची भविष्यातील योजना अधिक गतीनं पुढे जाईल, पत्रकारांच्या कार्यातही नवी ऊर्जा निर्माण होईल. संवाद, प्रशिक्षण, पत्रकारिता अभ्यास आणि माध्यम क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास या सर्वांसाठी ही जागा एक महत्त्वाचं केंद्र ठरेल, अशी मला खात्री आहे.
पुण्याच्या प्रगतिशील परंपरेला अनुसरून पत्रकार बांधवांनी नेहमीच बांधिलकीनं जनतेचा आवाज बुलंद केला आहे. पुढेही हीच परंपरा अधिक बळकट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीनं सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य केलं जाईल.
📍नागपूर -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister ShivendraSinh Raje Bhonsle and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕐 1.10pm | 9-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | दु. १.१० वा. | ९-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @Shivendraraje11
#maharashtra #devendrafadnavis #infrastructurecommittee -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸 Launch of ‘Zebru - Road Safety Awareness Mascot’ at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Pratap Sarnaik, MoS Madhuri Misal and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'झेब्रु - रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकर'चे अनावरण.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'झेब्रु - रास्ता सुरक्षा जनजागृति शुभंकर' का अनावरण।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य मंत्री माधुरी मिसाल एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.10pm | 9-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | दु. २.१० वा. | ९-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Shivendraraje11 @PratapSarnaik @madhurimisal
#maharashtra #devendrafadnavis #zebru #roadsafety -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘पुणे पुस्तक महोत्सव - २०२५’ लवकरच सुरू होत असून, त्या निमित्तानं आयोजित ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या अभिनव उपक्रमात सहभागी झालो.
📍विधानभवन, नागपूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधून सहभागी झालेल्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत संवाद साधला आणि विधानभवन परिसरात छायाचित्र काढली.
यावेळी तरुणाईची जिज्ञासा, संसदीय परंपरांविषयीचा अभ्यासू दृष्टिकोन आणि प्रशासनाविषयीची तळमळ पाहून आनंद झाला. या तरुण पिढीतूनच उद्याचे सक्षम लोकप्रतिनिधी, प्रशासक आणि धोरणकर्ते घडणार आहेत, याची खात्री पुन्हा अधोरेखित झाली.
📍विधान भवन, नागपूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. मी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचं कार्य बाबा आढाव यांनी केलं. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणं, हाच त्यांचा ध्यास होता.
संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचं मोठं बळ होतं. बाबा आढाव यांचं कार्य म्हणजे समाजहितासाठीचं निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसं असावं, याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचं अपरिमित नुकसान झालं असून महाराष्ट्रानं समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या सदस्या, गडचिरोली महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. गीताताईंच्या आकस्मिक निधनानं गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठ्या आपुलकीनं कार्यरत असणारं व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थना करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आजपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत विधानसभेचे अध्यक्ष श्री. ॲड. राहुल नार्वेकर जी तसंच विधानपरिषदेचे सभापती प्रा. श्री. राम शिंदे जी यांची सदिच्छा भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @rahulnarwekar @Prof_RamShinde
#हिवाळीअधिवेशन२०२५ -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
📍विजयगड, नागपूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, कामगार, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवतींचे हित विचारात घेऊन तसंच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे, लोकहिताचे निर्णय सभागृहात घेतले जातील, अशी ग्वाही देतो.
#हिवाळीअधिवेशन२०२५ -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
श्री संताजी जगनाडे महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या सान्निध्यात राहून आपल्या आध्यात्मिक अनुभूतीतून अभंगरचनेद्वारे समाजाला मानवता, सद्भावना आणि समतेचा संदेश दिला. संतवाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत समाजोन्नतीचं कार्य करणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळानं घातलेला घाला अतिशय हृदयद्रावक आहे. गणपती पॉईंट परिसरात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The news of the fire tragedy in Goa is extremely distressing. My thoughts and prayers are with the families who have lost their loved ones. Wishing strength to them in this difficult time, and hoping for the quick and complete recovery of the injured.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Our armed forces uphold the integrity and security of our nation, serving at the frontlines and standing resolute against all odds.
On #armedforcesflagday, my tributes to our bravehearts who laid down their lives in the line of duty, and warm regards to those continuing to serve the nation. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वातंत्र्यलढ्यातील धगधगती मशाल क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कणखर लढा उभारला. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, अंधश्रद्धा व विषमतेच्या निर्मूलनसाठी प्रयत्न करत, शिक्षण प्रसार आणि वाचन संस्कृतीला उभारी देण्याचंही कार्य केलं. प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजात समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये दृढ करून सामाजिक परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करणारे, वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे तसंच देशाला जगातील सर्वोत्तम संविधान प्रदान करणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, प्रज्ञासूर्य, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
#babasahebambedkar -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी परिवारातील माझे सहकारी, राज्याचे सहकार मंत्री तथा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बाबासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र ‘राजभवन’ आता ‘लोकभवन’ म्हणून ओळखलं जाणार!
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, महाराष्ट्र राजभवनाचं नाव अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असं करण्यात आलं आहे. माननीय राज्यपालांचं हे निवासस्थान आणि कार्यालय राज्यातील सर्व समाजघटक, युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग, आपला अन्नदाता शेतकरी बांधव, संशोधक तसंच नागरी संघटनांसोबत सुसंवाद घडवणारं एक सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख केंद्र आहे.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व सुशासनाला बळकटी देण्याकरिता ‘लोकभवन’ हे कायम एक महत्वपूर्ण प्रशासनिक केंद्र म्हणून कार्य करत राहील.
Governor of Maharashtra
@maha_governor
महाराष्ट्र राजभवन झाले लोकभवन
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्यात आले असून या संदर्भात राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बुधवारी रात्री (दि. ३ डिसें) बदलण्यात आले. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Deeply saddened by the passing of former Governor of Mizoram and noted Advocate Shri Swaraj Kaushal Ji.
My heartfelt condolences to his daughter, MP Bansuri Swaraj ji, family and friends in this difficult time.
@BansuriSwaraj -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Warm greetings to our inspiring Naval officers, engineers, technicians and staff on the occasion of #indiannavyday.
Your vigilance, dedication and commitment towards safeguarding our maritime borders is truly remarkable. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
॥अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त॥
आपणा सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! श्री दत्त महाराजांचे कृपाशिर्वाद आपल्यावर सदैव राहो. सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, यश आणि शांती लाभो, हीच प्रार्थना. -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis at the meeting of the Legislative Council Business Advisory Committee, chaired by Legislative Council Chairman Prof. Ram Shinde.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Minister Chandrakant Patil, MLC Pravin Darekar and concerned officials were present.
🔸विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸विधान परिषद सभापति प्रा. राम शिंदे इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में विधानपरिषद कामकाज सलाहकार समिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, विधायक प्रवीण दरेकर एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕧 12.40pm | 3-12-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १२.४० वा. | ३-१२-२०२५📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis @Prof_RamShinde @mieknathshinde @AjitPawarSpeaks @neelamgorhe @ChDadaPatil @mipravindarekar
#maharashtra #devendrafadnavis #mumbai -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis at the meeting of the Legislative Assembly Business Advisory Committee, chaired by Assembly Speaker Adv. Rahul Narwekar.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Chandrakant Patil, Minister Radhakrishna Vikhe Patil and concerned officials were present.
🔸विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में विधानसभा कामकाज सलाहकार समिति की बैठक.
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕛 12.05pm | 3-12-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १२.०५ वा. | ३-१२-२०२५📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @RVikhePatil
#maharashtra #devendrafadnavis #mumbai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ज्येष्ठ समाजवादी नेते, 'दैनिक मराठवाडा'चे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनानं भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जुना समाजवादी पक्ष, जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. 'चले जाव' आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक, राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात झालेल्या भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या 'आपलं घर' मधून अनेक मुला-मुलींची आयुष्य घडली आहेत.
पन्नालाल सुराणा यांच्या निधनानं समाजवादी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
@SayajiShinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A society truly progresses when no one is left behind. On ‘International Day of Persons with Disabilities’, let us renew our resolve to empower and uplift persons with disabilities, and work together to build a more accessible and equitable world.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या आशयसंपन्न काव्यसुमनांतून शेतकरी व स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचे यथार्थ चित्रण करणाऱ्या, साध्या-सोप्या व रसाळ शब्दरचनांतून व्यवहारी जगातील मानवी भावनांना अलगद स्पर्श करणाऱ्या, प्रतिभासंपन्न कवयित्री, निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या अदम्य धैर्य, रणनीती आणि पराक्रमाच्या बळावर उत्तरेत स्वतंत्र सामर्थ्यशाली राज्य उभं केलं. देशाच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांविरुद्ध उभारलेला त्यांचा लढा त्यांच्या रणशूरतेचा तेजोमय वारसा आणि राष्ट्रस्वाभिमानाची अखंड प्रेरणा देतो. मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अपराजित योद्धा, लोककल्याणकारी राजे यशवंतराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधान निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे, निःस्वार्थ राष्ट्रप्रेम, उच्च विचारसरणी आणि प्रखर कर्तव्यभावनेनं देशसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे देशाचे पहिले राष्ट्रपती, महान स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कृतज्ञ!
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारराजानं दिलेल्या प्रत्येक मताबद्दल आम्ही ऋणी आहोत.
आपण दाखवलेला विश्वास, दिलेला आशीर्वाद आणि विकासाच्या बाजूनं ठाम उभं राहणारी तुमची साथ, हीच आमची खरी ताकद आहे. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा आणि सामर्थ्य मिळतं.
त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी आणि पक्षाचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांनी तसंच हितचिंतकांनी जी मेहनत घेतली, एकमेकांना सहकार्य केलं, समन्वय राखून कामं केली, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
मतदारराजाचे पुनःश्च आभार! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हिंसाचाराला आपल्या लोकशाहीत कोणतंही स्थान नाही. निवडणूक ही पवित्र प्रक्रिया आहे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात, कोणाच्याही दबावाखाली न येता मतदानाचा आपला मूलभूत हक्क बजावता आला पाहिजे.
आपलं अमूल्य मत कोणाला द्यायचं, कोणाला निवडून आणायचं हे जनतेला ठरवू द्या. आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन, जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीनं मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे. अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Some incidents of violence have been reported from parts of Maharashtra, and I want to state this unequivocally: violence has no place in our democracy. Elections are a sacred process, and every citizen must be able to vote without fear or intimidation. Let the people decide who they want to elect. Alliance dharma must be honoured by all partners, but even beyond that, anyone who tries to disturb peace or influence voters through force is acting against the Constitution and against Maharashtra’s values. Such behaviour will not be tolerated.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
हिंजवडी परिसरात झालेल्या खासगी बस अपघाताची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांनी प्राण गमावल्याची घटना हृदय विदारक आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक व्यवस्थेबाबत तातडीनं आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळता येतील. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartfelt birthday wishes to Shri @JPNadda Ji.
May you be blessed with good health and continued success in your public journey. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५ ही लोकशाही मजबूत करण्याची, आपल्या शहराचा विकास निश्चित करण्याची योग्य संधी आहे.
जागरूक मतदार बना, मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या शहराच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. विकास, पारदर्शकता आणि शाश्वत प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा द्या.
घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा आणि विकासाला मत द्या! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपळगाव बसवंत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार इंजि. गोपाळकृष्ण (शरद) हरिश्चंद्र गायकवाड आणि अन्य सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
पिंपळगाव बसवंत ही बाजारपेठ कांदा व्यवहार आणि राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखली जाते. विविध जाती-धर्माची लोकं एकत्रितपणे राहणारी आणि ‘मिनी दुबई’ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे. इथल्या विकासासाठी राज्य सरकारच्या विविध योजना, निधी आणि प्रकल्पांचा आम्ही पुरेपूर उपयोग करून देऊ. तुम्ही सक्षम नेतृत्वाला संधी दिली, तर हा संपूर्ण परिसर नव्या दिशेनं पुढे नेऊ, अशी खात्री दिली.
इंजि. गोपाळकृष्ण (शरद) हरिश्चंद्र गायकवाड हे अत्यंत प्रामाणिक, अनुभवी आणि सक्षम उमेदवार आहेत. त्यांनी शहरासाठी दूरदृष्टीचा विचार मांडला आहे. त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा अनुभव पिंपळगाव बसवंतच्या विकासाला मोठा आधारदायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळेच आज प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार मिळालेला आहे. हा अमूल्य अधिकार वापरून शहराचा विकास करणाऱ्या उमेदवारांना विजयी करा. बारामती आणि पिंपरी-चिंचवड येथे आम्ही दर्जेदार विकासकामं केली आहेत, त्याच धर्तीवर पिंपळगाव बसवंतमध्ये सुद्धा गुणवत्तापूर्ण विकास आम्ही घडवून आणू. स्वच्छ, सुंदर, नियोजनबद्ध आणि आधुनिक पिंपळगाव बसवंत उभं करू, अशी खात्री दिली. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घनकचर्याचा आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचं आश्वासनही यावेळी दिलं.
पिंपळगाव बसवंतच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या सर्व उमेदवारांना उद्या, २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असं आवाहन केलं.
📍 ता. निफाड, जि. नाशिक -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रज्ञाताई हेमराज जाधव आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ओझरकरांशी संवाद साधला, महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही विकासाचं राजकारण करत आलो आहोत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी दिलेला लोकशाहीचा वारसा आमच्या कार्याला दिशा देणारा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून दिल्यास ओझर शहराचा सर्वांगीण विकास करून दाखवू, असा ठाम विश्वास सभेच्या निमित्तानं व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदाच्या आमच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रज्ञाताई हेमराज जाधव या सुशिक्षित, पदवीधर आणि कार्यक्षम उमेदवार आहेत. एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून त्या उमेदवारीसाठी योग्य निवड आहेत, असं स्पष्ट केलं. बारामती आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांचा ठसा राज्यभर उमटला आहे; त्याच धर्तीवर ओझरमध्येही कामांची गती वाढवू, अशी खात्री दिली.
ओझर हे विविध जाती-धर्मांचं, संस्कृतींचं संगमस्थान आहे. म्हणूनच ‘मिनी भारत’ म्हणून या शहराची ओळख आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता या सर्व क्षेत्रांत दर्जेदार काम होणं गरजेचं आहे. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये, स्वच्छ रस्ते, उत्कृष्ट रुग्णालये या सर्व गोष्टींसाठी आवश्यक निधी केंद्र, राज्य, जिल्हा नियोजन व CSR मार्फत आम्ही उपलब्ध करून देऊ. नदी सुधार कार्यक्रमाला प्राधान्य देऊन स्वच्छ आणि सुंदर ओझर उभं करू, अशी हमी ओझरकरांना दिली.
श्री. हेमराज जाधव यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमधील सक्रिय सहभाग कौतुकास्पद आहे. प्रज्ञाताई आणि आमचे सर्व नगरसेवक उमेदवार निर्धार, धाडस आणि काम करण्याची चिकाटी ठेवून ओझरचा कायापालट करतील, याची मला पूर्ण खात्री आहे. ओझरच्या सर्वांगीण विकासाकरिता उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन केलं.
📍जि. नाशिक -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना (चिन्ह-मशाल) युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भगूरच्या विकासाचा व्यापक आराखडा जनतेसमोर मांडला.
नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेरणाताई मेहनती आहेत. त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. भगूरच्या विकास कामांसाठी त्या योग्य उमेदवार असल्याचं ठामपणे सांगितलं. भगूरमध्ये विकासाचे निर्णय, निधी आणि योजना अंमलात आणण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. बारामती आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही उत्कृष्ट विकास कामं करून दाखवली आहेत. तशीच चांगली, दर्जेदार विकास कामं भगूरमध्येही करणार, अशी खात्री भगूरकरांना दिली.
भगूरमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माची, समाजाची लोकं गुण्यागोविंदानं राहतात. विकासाच्या प्रवाहात सर्व समाजघटकाला सोबत घेऊन पुढे जायचं असतं, ही शिकवण शिव-शाहू-फुले-आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. भगूरमध्ये शाश्वत विकास आपल्याला घडवून आणायचा आहे. चांगले रस्ते, पाणी नियोजन, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजा सुधारण्यावर आम्ही भर देणार आहोत.
भगूरच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारराजानं कमळ, मशाल आणि घड्याळ या खुणा लक्षात ठेवाव्यात. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व कार्यशील उमेदवारांना आपलं पवित्र मत देऊन त्यांना सेवेची संधी द्यावी, असं आवाहन केलं.
📍जि. नाशिक -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिंदखेडाकरांनो,
विकामकामं करावीत तर ती वेळेत आणि दर्जेदार करावीत, अशी आमची भूमिका कायम राहिलेली आहे. शिंदखेडामध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्हाला एक संधी द्या. उद्या, २ डिसेंबरला तुमचं पवित्र मत आमच्या सर्व उमेदवारांना देऊन मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नशिराबादकरांनो,
नशिराबादच्या शाश्वत विकासासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या उमेदवारांना मत देणं म्हणजे नशिराबादच्या विकासाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असेल. म्हणूनच उद्या, २ तारखेला आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
म्हसवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (चिन्ह-तुतारी) आणि रासप यांच्या श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथाला स्मरून त्यांना वंदन केलं.
आज आपण मागचा इतिहास पाहिला, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण ही आपल्या संत-महात्म्यांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी दिलेली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही सगळेजण पुढे चाललो आहोत. या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांना उमेदवारी देऊन त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
म्हसवडमध्ये महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या बाबतीत भुवनेश्वरीताईंनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांना राजकारणाचा, समाजकारणाचा वारसा लाभलेला आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात त्या कायम सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्याकडचा राजकीय सामाजिक विकासाचा वारसा म्हसवडच्या विकासात नक्कीच उपयुक्त ठरेल, असा ठाम विश्वास सभेच्या निमित्तानं व्यक्त केला.
नगरपरिषदेची निवडणूक ही शहरातील विकास कामांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते. आपल्या शहराचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी या निवडणुकीत मिळते. म्हसवडमध्ये असलेली पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्याशिवाय चांगले रस्ते, उद्यानं, क्रिडांगणं, जॉगिंग ट्रॅक यांसारख्या सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं ही आमची जबाबदारी आहे.
म्हसवडकरांनी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला एक संधी द्यावी. आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहावं, सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्यावं, असं आवाहन केलं.
📍ता. माण, जि. सातारा
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सावदाकरांनो,
सर्वांगीण विकास हा सर्व समाजघटकाला सोबत घेऊन साधला जातो, ह्या विचाराचे आम्ही आहोत. आम्हाला एक संधी द्या. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना आपलं बहुमूल्य मत देऊन बहुमतानं निवडून द्या.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कन्नडकरांनो,
सर्व मूलभूत सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत. फक्त विश्वासाचा हात तुमचा आमच्या पाठीशी हवाय. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना तुमचं आशीर्वादरुपी मत देऊन सेवेची एक संधी द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
फैजपूरकरांनो,
आगामी निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक पातळीवर विकासाची कामं मार्गी लावण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ही कामं पूर्ण करण्याची ताकद आमच्या उमेदवारांमध्ये आहे, अशी खात्री देतो. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अरणीकरांनो,
राष्ट्रवादीचा प्रत्येक शिलेदार आणि कार्यकर्ता हा जनसेवेसाठी समर्पित आहे. तुमच्या सेवेची एक संधी आम्हाला द्या. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना तुमचं अमूल्य मत देऊन विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वारकरी संप्रदायचा अमूल्य वारसा आळंदी शहराला लाभलेला आहे. या पावन भूमीत विकासाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, हीच आमची भूमिका आहे. आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
आळंदी शहरासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या माध्यमातून पुढील काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नदीवरील पुलाचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात येणार आहे. आळंदी शहराच्या विकासासाठी २१७ कोटी रुपयांचा आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांची विकास कामं सुरु आहेत. आळंदी शहराला जोडणारा नवीन पूल, बाह्यवळण रस्त्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सभेत दिली.
पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी भामा-आसखेड ते आळंदी ही ४७ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. स्वच्छ, सुंदर आळंदीसाठी घण कचरा व्यवस्थापन केलं जाणार आहे. मलनि:सारण योजनेसाठी सहा कोटींचा निधी दिल्याचं स्पष्ट केलं. घाट परिसरातील पाणी स्वच्छ रहावं आणि वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती कामं मार्गी लावणं गरजेचं आहे. वारकरी व भाविक संख्येचा विचार करता मोठी पार्किंग सुविधा उभारणं आणि भव्य वारकरी भवन उभारणं, या संदर्भात कामाची आखणी केली जात असल्याची माहिती दिली.
आळंदीतील युवकांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून नवीन क्रीडांगणं उभारण्याचा संकल्प सभेत मांडला. विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लागणारा निधी हा आणण्याची ताकद आमच्यात आहे. आळंदीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार सक्षम आहेत, असा ठाम विश्वास सभेत व्यक्त केला.
आळंदीच्या प्रगतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना उद्या, २ डिसेंबरला प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍ता. खेड, जि. पुणे
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
एरंडोलकरांनो,
योग्य वेळेला योग्य मत योग्य उमेदवाराला देणं, हेच विकासाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल समजावं. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व कार्यशील उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. भाग्यश्रीताई विवेक वाडेकर आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
चाकण शहरातील वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रमाणात वाढ करणं, ही गरज बनली आहे. वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, पुरेशा घरांचा प्रश्न, स्मशानभूमी-दफनभूमी, मुलांना खेळायला मैदानं, उद्यानं आदी सर्व बाबींना घेऊन अडचणी आहेत. यासारख्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व उमेदवार कार्यतत्पर आहोत, असा विश्वास सभेच्या निमित्तानं चाकणकरांना दिला. त्या दृष्टीकोनातून चाकणसाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचं स्पष्ट केलं.
इंदूरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये चाकणचा समावेश करण्यात आलेला आहे. समाजामध्ये लाडक्या बहिणींना मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपलं सरकार कायमच करत आलं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही पुढे चालत आहोत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विकासाभिमुख विचारांचं आचरण आम्ही करत आहोत.
चाकण शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही काही अनुभवी व काही नव्या ऊर्जेचे, नव्या दमाचे उमेदवार उभे केले आहेत. चाकणचे सगळे प्रश्न सुटतील, विकास होईल, असं आश्वस्त केलं. चाकणकरांनी एक संधी आम्हाला द्यावी, आमच्यावर विश्वास ठेवावा. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, असं आवाहन केलं.
📍ता. खेड, जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
उमरीकरांनो,
जिथे विकास घडतो, त्याचं पहिलं श्रेय तिथल्या लोकप्रतिनिधीला नव्हे, तर नागरिकांना जातं. कारण, तुम्ही योग्य व्यक्ती तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडता, त्यामुळेचं त्या भागाचा विकास घडतो. अशीच एक संधी आम्हाला द्या. आमच्यावर विश्वास ठेवा. उद्या, २ डिसेंबरला आमच्या सर्व कार्यक्षम उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राजगुरूनगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. किरण आहेर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सर्वप्रथम राजगुरुनगरचे सुपुत्र, थोर स्वातंत्र्यसेनानी, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांना विनम्र अभिवादन केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत असताना या राजगुरुनगरमध्ये सुद्धा विकास झाला पाहिजे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानं मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मतदार राजा आहे. आगामी निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं, हा निर्णय तुमच्या हातात आहे.
राजगुरूनगरमध्ये विकास साधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी याठिकाणी योग्य पद्धतीनं कसा वापरायचा, त्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना व सीएसआर फंडच्या माध्यमातून देखील निधी विकास कामांकरिता याठिकाणी आणता येईल. याशिवाय भूमिहीनांना म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणं, अशी कामं आम्ही सुरू केलेली आहेत.
सध्याच्या घडीला राजगुरुनगरमध्ये लोकसंख्या ही एक लाखाच्या घरात गेलेली असून त्यादृष्टीनं मूलभूत सुविधांची पूर्तता होणं अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगानं याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी व दफनभूमीची कमतरता यांसारख्या अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी श्री. किरण आहेर हे समर्थ आहेत. त्यांना राजगुरूमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची जाण आहे. सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्यात आहे. श्री. किरण यांनी सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. खेड पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले. त्यांना राजकीय व सामाजिक वारसा आहे.
विकासाची वेगवान वाटचाल ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी असावी. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देत शहराच्या भविष्याचा विचार आम्ही करत आहोत. राजगुरूनगरच्या नागरिकांनी आम्हाला एक संधी द्यावी. उद्या, २ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करा, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍ता. खेड, जि. पुणे
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
निवड करण्याची पहिली बारी तुमची, विकास करण्याची दुसरी बारी आमची..!
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
On #worldaidsday, let us honour resilience and renew our commitment to a healthier, stigma-free world.
Knowledge and awareness remain our strongest shield against AIDS as we work towards building an AIDS-free tomorrow. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Warm greetings to all our BSF personnel whose selfless service and unwavering resolve to guard the frontiers remain a pillar of our nation's strength.
Let us express heartfelt gratitude to our bravehearts whose duty defines courage in the truest sense- never pausing, never wavering in spirit.
@BSF_India -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शहादाकरांनो,
तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही.. शहादा शहराच्या परिपूर्ण प्रगतीसाठी लागणाऱ्या कामात आम्ही कुठेही कसूर बाकी ठेवणार नाही.. गरज आहे तुमच्या आशीर्वादाची, भक्कम सोबतीची.. येत्या २ डिसेंबरला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गंगापूरकरांनो,
गंगापूरमध्ये विकासाची गंगा जागोजागी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याठिकाणचे स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य नागरिकांचे सगळे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आमचे उमेदवार समर्थ आहेत. येत्या २ डिसेंबरला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
खुलताबादकरांनो,
विकासाच्या पायऱ्या रचण्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे.. येत्या २ डिसेंबरला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या नव्या उमेदीच्या उमेदवारांना तुमच्या अमूल्य मतांनी विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा पुरस्कृत जनमत विकास आघाडीच्या वतीनं आयोजित निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थितांना संबोधित केलं. माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना माळेगावकरांचं पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा गाडा पुढे जात असतो, प्रश्न सुटत असतात, हे आम्ही लक्षात ठेवून आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण आम्ही करतो. अंडरग्राउंड ड्रेनेज, अरुंद रस्ते, गोरगरिबांसाठी घरकुल कार्यक्रम आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. पुढील ५ वर्षांकरिता जनमत विकास आघाडीला माळेगावकरांच्या मजबूत पाठिंब्याची गरज आहे.
केंद्र आणि राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, CSR फंड ह्या सगळ्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. जनकल्याणासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलेलं आहे. त्यामुळे माळेगावकरांनी त्यांचं पवित्र असं बहुमोलाचं मत येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या १८ उमेदवारांना द्यावं, असं आवाहन केलं.
📍ता. बारामती, जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अकलूजकरांनो,
विकासाच्या वाटेवर कृतिशील नेतृत्वाचा हात धरा.. आमच्या तमाम उमेदवारांना आशीर्वादरुपी तुमचं मत द्या.. येत्या २ डिसेंबरला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पलूसकरांनो,
समर्पित भावनेनं कामं करणाऱ्या प्रतिनिधींच्या हातात आपल्या शहराचा कारभार देणं गरजेचं आहे. आमचे उमेदवार तुमच्या अपेक्षांवर खरं उतरतील, अशी खात्री देतो. येत्या २ डिसेंबरला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धाराशिवकरांनो,
विकासाची गंगा धाराशिवच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमच्या भक्कम पाठबळाची गरज आहे. ते बळ येत्या २ डिसेंबरला मतांच्या रुपानं द्या. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आमच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून आणा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
इंदापूरच्या स्थानिक पातळीवरील विकासासाठी पुढील ५ वर्षे कामाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, यासंदर्भातील निर्णय महिला भगिनींना, बांधवांना, व्यापारी मित्रांना, नोकरदारांना, प्रतिष्ठित नागरिकांना घ्यायचा आहे. इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. भरत सुरेशदास शहा यांसह बाकी सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. तत्पूर्वी इंदापूरचं ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेवाचं तसंच निरानरसिंहपूरच्या श्री लक्ष्मी नृसिंहाचं स्मरण करून त्यांना वंदन केलं.
महाराष्ट्रात कुठेही कामं करत असताना शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आम्ही कधीच सोडलेली नाही. इंदापूर शहराला आध्यात्मिक, पुरातत्व असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इंदापूर हे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचं संवर्धन आणि हजरत चांदशाहवली बाबा दर्ग्याच्या विकासासाठीचा आराखडा आम्ही तयार केला आहे. याबाबतीतील विकास कामं करताना तिथलं ऐतिहासिक महत्त्व जपण्याचं काम देखील केलं जात आहे.
राजकारणात राहून समाजकारण करत असताना आम्ही कधीही जात-पात-धर्म-पंथ पाहून कामं केलेली नाहीत. सर्वांना सोबत घेऊन विकास करणं, ही महापुरुषांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीचं आम्ही अनुकरण करतो. इंदापूरच्या विकासासाठी समर्पित भावनेनं कार्य करणारं एक अनुभवी नेतृत्व म्हणून श्री. भरतशेठ शहा यांची ओळख आहे. त्यांनी सहकार, सामाजिक उपक्रम, संघटन व्यवस्थापन असं सगळ्याच बाबतीत आपली उल्लेखनीय भूमिका निभावलेली आहे. इंदापूर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रामध्ये शहा परिवारानं आपलं अमूल्य असं योगदान दिलेलं आहे.
इंदापूरचा विकास अधिक वेगानं श्री. भरतशेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली होईल, यात काही शंका नाही. इंदापूरकरांच्या राहणीमानाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या शिरसोडी ते कुगाव दरम्यानच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठा पूल उभारण्याच्या कामाला आम्ही मंजुरी दिली. त्यासाठीचा आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला. या पुलामुळे इंदापूर व करमाळा इथल्या दोन्ही मोठ्या बाजारपेठा जोडल्या जाणार आहेत. यांसारखी अनेक विकासकामं आम्ही मार्गी लावू. परंतु त्यासाठी आमच्या उमेदवारांना इंदापूरकरांनी एक संधी द्यावी. येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, असं आवाहन केलं.
📍जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मतदार बंधू-भगिनींनो,
विकास हा मर्यादित नसावा, तो सर्वांगीण असावा.. कामं नुसती दिसायला चांगली नसावीत, तर ती दर्जेदार असावीत, या विचाराचे आम्ही आहोत.. त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून आणा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मतदार बंधू-भगिनींनो,
आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या कार्यशील उमेदवारांना एक संधी द्या. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असं आवाहन करतो.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मा. नगरसेवक श्री. राजेश शामराव जाधव यांचं दुःखद निधन झालं. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. राजेश यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चोपडाकरांनो,
एक संधी द्या, एकदा विश्वास ठेवून बघा.. कामाच्या माणसांना तुमचं बहुमूल्य मत द्या, निवडून आणा.. शेवटी विकास हा कृतिशील नेतृत्वाच्या माध्यमातूनच घडतो..!
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (चिन्ह-मशाल) व मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांसह बाकी सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व समाज घटकाला समान न्याय मिळवून देण्याची शिकवण ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांतून आम्हाला मिळाली आहे. दौंडचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आपण निधी उपलब्ध करून देऊ. शेवटी हा पैसा जनतेचाच असल्यानं तो योग्य त्या ठिकाणीच सत्कारणी लागला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. रस्ते रुंदीकरण, पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन, चांगली आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक सुविधा इत्यादी सर्वच मुलभूत गरजांची पूर्तता करून देण्याची संधी आता आली आहे, असं सूचित केलं.
आमच्या उमेदवार दुगादेवीताईंना राजकीय वारसा लाभलेला असून जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी त्या सक्षम आहेत. आम्ही एकूण २७ उमेदवार उभे केले असून त्यापैकी ५ अनुभवी आणि २२ नव्या दमाचे, नव्या उमेदीचे उमेदवार आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना आम्ही संधी दिली असून हे सगळेच कार्यतत्पर असे लोक आहेत. राज्य पातळीवर मंजूर झालेली कामं स्थानिक पातळीवर पूर्ण करून घेण्याचं काम आमची माणसं करतील. कायद्याच्या चौकटीत जी कामं बसतील, ती सर्व कामं आम्ही करू, अशी खात्री दिली.
आम्ही दौंडकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. इथल्या सर्व समाज घटकाच्या गरजा वेळोवेळी आम्ही पूर्ण करत जाऊ. दौंडच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या उमेदवार दुर्गादेवीताई यांसह अन्य सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणा, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. पुणे
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भोर एज्युकेशन सोसायटीचं राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विद्यालय व सोसायटीच्या कामकाजाची माहिती घेतली. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. रामचंद्र श्रीपती आवारे आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यानिमित्तानं अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उमेदवार म्हणून उभे असलेले आमचे सहकारी, आमदार श्री. शंकर मांडेकर यांच्या पाठीशी भोरकर, राजगडकर, मुळशीकर हे खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. मतदार राजानं त्याचं काम केलं, त्या पुढे मतदार राजाचं काम करण्याची संपूर्ण जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते. कोणत्याही कामात कसूर बाकी राहणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आलो आहोत.
जनतेकडून मिळणाऱ्या पाठबळातून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आपण सदैव कामी यावं, हीच आमची भूमिका राहिली आहे. क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन, आरोग्य व स्वच्छता, लहान मुलांसाठी उद्यान, वॉकिंग ट्रॅक, पाण्याचं नियोजन, सार्वजनिक शौचालय, क्रिडांगण आणि स्ट्रीटलाइट आदी सर्व भोर शहरातील कामं ही आम्ही मार्गी लावू, असा विश्वास दिला. त्याचप्रमाणे उद्योग-व्यवसाय वाढवणं, रोजगार निर्मिती या गोष्टींकडे सुद्धा प्राधान्यानं आम्ही पाहू, असं स्पष्ट केलं.
आम्ही टप्प्याटप्प्यानं बारामती आणि पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला. भोर शहराचा विकासही आपल्याला साधायचा आहे. त्याकरता आतापर्यंत ४५ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम निधी म्हणून आम्ही उपलब्ध करून दिली आहे. पुढे आवश्यकतेनुसार आणखी निधी आम्ही देऊ, अशी खात्री भोरकरांना दिली.
एक संधी देऊन बघा, विकास आम्ही घडवून दाखवू, असा विश्वास देत घड्याळासमोरील बटण दाबा आणि श्री. रामचंद्र यांसह आमच्या २० उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'सत्ता' ही विकास साधण्यासाठी असते.. 'विकास' हा लोकांचा हित जपण्यासाठी असतो..!
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्त्री-शक्तीला बळ दिलं पाहिजे.. महिला सक्षमीकरणाला चालना दिली पाहिजे.. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आपल्याला हीच शिकवण देतात..!
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
उपलब्ध मूलभूत सोयी-सुविधांमध्ये आणखी सुधारणा, त्यात अजून भर घालणं म्हणजे विकास म्हणावा..!
#nagarparishad2025This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गेवराई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे आणि सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
गेवराई शहरात वेगवेगळ्या जाती-धर्मातील नागरिक पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आले आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीकोनातून शितलताईंना आम्ही उमेदवारी दिली आहे.
या शहराचा सर्वांगीण विकास करणं हा आमचा ठाम निर्धार आहे. पाणीपुरवठा योजना, सुधारित रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, खड्डेमुक्त शहर ही सर्व कामं आमच्या प्राधान्य क्रमावर आहेत, असं स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाची कामं याठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. अतिवृष्टीनं त्रासलेल्या शेतकरी बांधवांना मदत देण्यात आली, गेवराईसाठीच्या पाणीपुरवठा योजनेला वेग देण्यात आलाय, विमानतळ प्रकल्पाची कामं पुढे नेण्यात आली आहेत, CIIIT प्रकल्पाचं कामं सुरू असून त्याचा लाभ बीड जिल्ह्याला मिळणार आहे, अशी माहिती दिली.
बीडमध्ये सायन्स पार्क उभारण्याचा आमचा मानस आहे. शहरात येणाऱ्या मार्गांचं सुशोभिकरण झालं पाहिजे. सार्वजनिक वापरासाठी बहुउद्देशीय सभागृह असायला पाहिजेत. वृक्षलागवड व स्वच्छता मोहीम राबवल्या गेल्या पाहिजेत. स्वच्छतागृहांची उभारणी व दुरुस्ती झाली पाहिजे, आदी सगळ्या कामांकडे आम्ही जातीनं लक्ष देऊ, अशी खात्री सभेच्या निमित्तानं दिली. याशिवाय Sewage Treatment Plant उभारण्यावर भर देऊ तसंच CSR फंडातून विकासकामांना चालना देऊ, असं स्पष्ट केलं.
अनुभवी आणि नव्या दमाचे उमेदवार आम्ही जनसेवेखातर उपलब्ध करून दिले आहेत. आम्ही गेवराईचा कायापालट करून दाखवू. शहराचा विकास हेच आमचं उद्दिष्ट असल्यानं आमच्या उमेदवार शितलताई यांसह अन्य सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (चिन्ह-धनुष्यबाण), शिवसंग्राम आणि स.पा. ह्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अन्य पक्षाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सभेच्या निमित्तानं आमच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीम. प्रेमलताताई दादासाहेब पारवे यांच्या हस्ते विकासाचा जाहीरनामा (वचननामा) प्रकाशित करण्यात आला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महान विभूतींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सर्वांनी बीड शहराचा विकास साधण्याचा निर्धार केला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. बीडमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. विमानतळाच्या कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटले आहेत, रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला आहे, CIIIT प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे, सहकार भवनाचं कामही सुरू आहे.
याशिवाय शहरातील ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, भुयारी गटार, वाहतूक कोंडी, नाले तुंबण्याची समस्या, मोकाट जनावरं, जालना रोडचं अपूर्ण काम आदी सर्वांवर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. बीडचा सर्वांगीण विकास करणं, हेच आमचं ध्येय असल्याचं सभेत स्पष्ट केलं. क्रीडा संकुलाचं काम, कंकाळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम, वसतिगृहाची उभारणी, कॅथलॅबसाठी निधी, हरित बीड अभियान ही सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण केली जाणार, अशी हमी दिली.
विकासाच्या बाबतीत बीड कुठेही मागे राहणार नाही. आमच्या अधिकृत उमेदवार श्रीम. प्रेमलताताई आणि अन्य सर्व उमेदवारांना एक संधी द्या, प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं.
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माळेगावकरांनो,
कामाच्या माणसाला जबाबदारी दिली की, ती पार पाडली जातेच, यावर माझा ठाम विश्वास आहे.. आमचे सर्व उमेदवार तुमची सेवा करण्यास तत्पर आहेत.. संधीच्या रूपानं तुमचं अमूल्य मत त्यांना द्या..!This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. अशोकराव हिंगे यांचे वडील स्व. सुखदेवराव यशवंतराव हिंगे पाटील यांचं दुःखद निधन झालं. आज बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. स्व. सुखदेवराव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
तळोदेकरांनो,
आश्वासनांतून नव्हे, तर कृतीतून विकास घडतो.. आणि शाश्वत विकास घडवण्यास आम्ही सक्षम आहोत.. त्यामुळे आम्हाला मत म्हणजेच विकासाला मत..!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धर्मगुरु मौलाना बाकी साहेब यांचं दुःखद निधन झालं. आज बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, विचारपूस केली, सहसंवेदना व्यक्त केल्या.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवापूरकरांनो,
प्रतिनिधीच्या कर्तृत्वातून कृती घडते आणि त्यातून विकासाची गंगा वाहते.. असे प्रतिनिधी आम्ही तुमच्या सेवेखातर उपलब्ध करून दिलेत.. त्यांना पाठबळ आणि आशीर्वाद द्या..!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड येथे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक व इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात तमाम मान्यवरांशी मुक्त संवाद साधला. यानिमित्तानं बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसंग्राम ह्या लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रेमलता दादासाहेब पारवे आणि अन्य सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असं आवाहन केलं.
बीडमधील रस्ते, पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आदी सर्व बाबींमध्ये सुधारणा आणायची असल्यास कार्यशील लोकांच्या हातात बीड सोपवणं गरजेचं आहे. आम्ही बीड प्रशासनात चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली, विमानतळाच्या संबंधित अडलेले प्रश्न मार्गी लावले, रेल्वे सेवेचा प्रश्न सुद्धा सोडवला, CIIIT प्रकल्प आणला, सहकार भवनाचं काम सुरू झालं. कृतिशील नेतृत्व असलं की, कामं बरोबर होतात, हे मेळाव्याच्या निमित्तानं पटवून सांगितलं.
बीडचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, तर नगरसेवक तुमच्या विचाराचे, विकासाच्या भूमिकेचे निवडून आले पाहिजेत. येत्या २ तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून सौ. प्रेमलता पारवे आणि आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शहादाकरांनो,
विकास हा ठेवलेल्या विश्वासावर घडतो.. तुम्ही आम्हाला 'मत'रुपी आशीर्वाद द्या.. आम्ही तुम्हाला एक आदर्शवत शहर घडवून दाखवू!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. फारुक पटेल यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यानं ते विश्रांती घेत आहेत. आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली. ते लवकर बरं होऊन जनसेवेच्या कार्यात पुन्हा जोमानं कामाला लागतील, अशा शुभेच्छा दिल्या.
📍बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामतीकरांनो,
साथ-सोबत कायम ठेवा, आशीर्वाद असू द्या, मतांची ताकद पाठीशी राहू द्या.. आपल्याला विकासाचे अजून बरेच पल्ले गाठायचे आहेत..!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कन्नडकरांनो,
आपलं बहुमूल्य मत सर्वांगीण विकासासाठी, सर्वसमावेशक महाराष्ट्रवादी भूमिकेसाठी आणि लोकाभिमुख स्थानिक सुशासनासाठी!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली, सर्वांची विचारपूस केली. संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून या गुन्ह्यातील सर्व दोषींना नक्कीच शिक्षा मिळणार, असा विश्वास धनंजय देशमुख यांच्याकडे व्यक्त केला.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कळंबकरांनो,
तुमचं प्रत्येक मत विकासाच्या दिशेनं टाकलेलं गतिमान पाऊल असेल.. पाठबळ आम्हाला, मत जाईल विकासाला..!
#nagarparishad2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धारूर शहराचा इतिहास मोठा आहे, अभिमानाचा आहे. सरसेनापती नेताजी पालकरांच्या शौर्याचा वारसा या भूमीला लाभला आहे. किल्ले धारूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. बालासाहेब रामदेव जाधव आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना भावना व्यक्त केल्या.
धारूरच्या पूर्व बाजूस असलेली गरम पाण्याची ‘सीतेची न्हाणी’ ही जगात मोजक्याच ठिकाणी आढळते. धारूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोन्या-चांदीचं मोठं बाजारपेठ राहिलं आहे. असा इतिहास असलेल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, असं स्पष्ट सूचित केलं.
धारूर शहरात विकासाची प्रचंड क्षमता आहे, खूप काही बदल घडवून आणता येऊ शकतो. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहं उभारण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी हॉस्पिटलच्या उभारणी व सुधारणा विषयक बैठका सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ असावं, यासाठीही आम्ही नियोजन करत आहोत. CIIIT सारखा २०० कोटींचा मोठा प्रकल्प बीडमध्ये सुरू आहे. रोजगार, उद्योग, सेवा क्षेत्र असं सर्व क्षेत्रात संधी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जात आहोत. कुठल्याही समाज घटकाला आम्ही एकटं पडू देणार नाही. सर्वांना समान हक्क आणि समान संधी, हीच आमची भूमिका आहे. मतदार राजानं विश्वासानं घड्याळाच्या चिन्हावर मतदान करावं. बालासाहेब यांसह आमचे सगळे उमेदवार जनसेवेखातर कटिबद्ध असल्याची खात्री दिली. शहराचा विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती पार पाडण्याचं वचन नागरिकांना दिलं.
आज तुम्ही आम्हाला साथ द्या, उद्याच्या धारूरचा विकास हा पूर्ण ताकदीनं आम्ही करू, असा विश्वास दिला.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून मंचर शहराच्या मुलभूत व पायाभूत सुविधांच्या विकासकामांना नवी गती प्रदान करणार!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजलगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मेहरूनबी खलील पटेल आत्तार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला.
माजलगाव शहर आणि तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खलील पटेल आत्तार यांच्या परिवारानं अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मेहरूनबी खलील पटेल आत्तार यांच्या रूपानं आम्ही योग्य उमेदवार उपलब्ध करून दिला असल्याचं सभेत स्पष्ट केलं. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही वाटचाल करतोय. माजलगाव स्वच्छ, सुंदर, आधुनिक व्हायला हवं. त्यासाठी निधीचा योग्य वापर होणं अत्यावश्यक आहे, त्या अनुषंगानं आमची उमेदवारांची निवड बरोबर आहे.
माजलगावमधील एस.टी. स्टँडची अवस्था दयनीय आहे, ती सुधारण्याची जबाबदारी आमची आहे. माजलगाव शहरात अजूनही पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते-खड्डे, अतिक्रमण अशा अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे फंड, CSR निधी, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना इत्यादी सगळं आणू. कारण, महायुतीचं सरकार आहे, आमदार श्री. प्रकाश सोळंके हे आपले आहेत, ते काम करणारं असं नेतृत्व आहेत. माजलगावात विमानतळ सर्वेक्षण, CIIIT ची स्थापना, रोजगारनिर्मिती यांसारखी कामं गतीनं सुरू होतील, मात्र त्याकरता सक्षम प्रतिनिधित्व करणारी लोकं हवीत, जी आम्ही दिली आहेत.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूल्यांचा आपण आदर केला पाहिजे. सत्ता येत-जात असते; पण सत्तेत राहून लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं, हे आमचं कर्तव्य आहे, अशी भावना सभेत व्यक्त केली. सर्व समाजघटकाला विकासाच्या प्रवाहात सोबत घेऊन जाणं, हीच आमची भूमिका आहे.
येत्या २ तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं. माजलगाव शहराचा चेहरामोहरा आम्ही बदलवून दाखवू, असं वचन दिलं.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बांग्लादेशच्या ढाका येथे झालेल्या राष्ट्रीय विश्व चषक कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताचा मान कबड्डीपटू सोनाली विष्णु शिंगोटे हिनं उंचावला. आज सोनालीनं माझी सदिच्छा भेट घेतली, तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोनालीची जिद्द, मेहनत आणि खेळातील निष्ठा अनुकरणीय आहे. तिची कामगिरी ही नव्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या सुवर्णकामगिरीनं महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. तिच्या आगामी कारकिर्दीत ती आणखी उंच भरारी घेईल, असा विश्वास आहे.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ पाहिजे.. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे.. लाडक्या बहिणींचं सहकार्य पाहिजे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (चिन्ह-मशाल), शेकाप ह्या युतीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुनील पाटील आणि इतर सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
खोपोलीला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे खोपोलीत वीज आली, पाणी आलं. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे खोपोलीला जोडला गेलेला आहे. खोपोलीपासून नवी मुंबईचं नवीन विमानतळ हे अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली ते मुंबई लोकल सेवा सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र यात आणखी एका वाहतूक व्यवस्थेची भर म्हणून मेट्रो सुविधा देखील खोपोलीकरांसाठी उपलब्ध झाली पाहिजे. नवी मुंबई विमानतळापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. खोपोलीपर्यंत मेट्रो सेवेचा विस्तार होईल, या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत आहोत, असं आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं स्पष्ट केलं.
सध्याच्या घडीला खोपोलीत रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला आहे, ऑडिटविना जुन्या इमारतींची दुरावस्था झालेली आहे. खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे अधिकृत उमेदवार डॉ. सुनील पाटील यांच्यासह सर्व उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे. स्थानिक पातळीवरील समस्या, प्रश्न व अडचणींचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीतील अचूक मतदान फार महत्त्वाचं ठरतं.
खोपोलीच्या पुढच्या विकासाला गती देणारी ही निवडणूक आहे. उमेदवार डॉ. सुनील पाटील यांना खोपोली शहराची चांगलीच जाण आहे. खोपोलीतील प्रश्न ते चांगलेच जाणतात. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. खोपोली शहराचा विकास हेच आमच्या आघाडीचं उद्दिष्ट आहे. खोपोली शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था अत्याधुनिक करण्याचं कामं हाती घेणार आहे. कोणतंही शहर हे वाढत असताना मूलभूत सुविधा त्याठिकाणी पूरक असल्या पाहिजेत, असा आमचं ठाम मत आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या तमाम योजनांचा लाभ हा सर्व समाजघटकाला मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहराला चांगल्या पद्धतीचं स्वरूप यावं, याकरता केबल वायर्स ह्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत आमचा विचार आहे. खोपोलीत उद्योग-व्यवसाय येतील, रोजगार वाढतील, त्या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
खोपोलीमध्ये मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी डॉ. सुनील पाटील व इतर आमचे उमेदवार हे कार्यतत्पर राहतील, अशी खात्री या सभेच्या निमित्तानं दिली. मात्र त्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. रायगड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आम्ही विकास कृतीतून प्रत्यक्षात आणलाय, यापुढेही पुनरावृत्ती घडवून दाखवू!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (चिन्ह-मशाल), शेकाप ह्या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पाताई दगडे आणि इतर सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना व कार्याला वंदन केलं.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याला स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. याठिकाणी रायगड किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते शिवराय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा नागोजी कातकरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महान विभूतींना आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं विनम्र अभिवादन केलं.
नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पाताई दगडे यांना समाजसेवेची जाण असून त्यांच्या कुटुंबात सामाजिक सेवेची परंपरा रुजलेली आहे. त्यांचे वडील स्व. नामदेव गोविंद दगडे यांनी कर्जतमध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. सामाजिक व आध्यात्मिक एकात्मतेसाठी त्यांनी प्रयत्न केले. पुष्पाताई ह्या सातत्यानं तीन टर्म नगरपालिकेवर निवडून गेलेल्या आहेत. ताईंच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महालक्ष्मी महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ५५ महिला बचत गट त्यांनी उभे केले. त्यामुळे शेकडो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या.
आम्ही यावेळेस २२ उमेदवार देत असताना त्यापैकी ११ जण अनुभवी आणि ११ जण हे नव्या उमेदीचे, नव्या ऊर्जेचे उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाजघटकाला पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेला आचरणात आणणारा हा पक्ष आहे. सर्व जाती-धर्म, पंथांचा आदर आम्हाला आहे. समाजात वावरत असताना आपण एकमेकांना सन्मानानं वागवलं पाहिजे, एकमेकांच्या सणांमध्ये सामील झालं पाहिजे, सुख-दुःखात आणि आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही शिकवण हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना, रयतेचं राज्य स्थापन करताना शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे.
निकृष्ट दर्जाचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचा अभाव, ढासळलेली आरोग्य व्यवस्था यांसारख्या अनेक मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर आमचे उमेदवार निवडून आल्यास महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं, महिलांसाठी हेल्पलाइन सुरू करणं, सेफ झोन पॉईंट सुरू करणं, मातांसाठी पोषक आहार योजना सुरू करणं, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणं, मुलींसाठी डिजिटल शिक्षणाच्या शिष्यवृत्तीची व्यवस्था करणं, बचत गट व व्यवसाय सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणं आदी सर्व बाबी पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे सर्व उमेदवार हे वचनबद्ध राहणार आहेत. मात्र त्याकरता सर्वसामान्य नागरिकांनी आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं, असं आवाहन केलं.
📍जि. रायगड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शतकांपासून व्यापाराची संस्कृती, गोदाकाठची समृद्ध परंपरा, संत साहित्याचा वारसा आणि कौशल्यसंपन्न युवा पिढी ही कोपरगावची खरी ताकद आहे. आज कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. ओमप्रकाश दादाप्पा कोयटे आणि इतर सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली करणारे क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाला मान-सन्मानानं आणि अधिकारानं जगण्याचा हक्क हा संविधानानं दिला आहे. संविधानिक मूल्यांना धरूनच आपला पक्ष कामं करत आला आहे.
सहकार, सामाजिक कार्य, संघटनशक्ती या सर्व क्षेत्रांत श्री. ओमप्रकाश दादाप्पा कोयटे अर्थात कोयटे काकांनी कोपरगावला कायमच योग्य दिशा दाखवली आहे. ३५–४० वर्षे सहकार क्षेत्रात सातत्यानं काम केलेलं, आर्थिक शिस्त पाळणारं, संस्थेचा कारभार योग्य पद्धतीनं चालवणारं असं हे अनुभवी नेतृत्व आहे. नगराध्यक्ष पदासाठी सर्वात योग्य, अनुभवी आणि विश्वासू उमेदवार म्हणजे कोयटे काका आहेत, असं आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं ठामपणे सांगितलं.
कोपरगावचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास मूलभूत सुविधा मजबूत केल्याशिवाय पर्याय नाही. उत्तम रस्ते, परिसर सुशोभिकरण, कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट, पाणीपुरवठा योजना, वृक्षारोपण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. खेळ व नाट्यसंस्कृतीसाठी क्रीडा संकुल, इनडोअर स्टेडियम, जॉगिंग ट्रॅक, कला मंच आदी सुविधा उपलब्ध करून देणं, याकडे आम्ही प्राधान्यक्रमानं लक्ष देणार आहोत.
त्याकरता मतदारराजानं आम्हाला पाठबळ द्यावं, आशीर्वाद द्यावा. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमचे उमेदवार श्री. काका कोयटे यांसह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असं आवाहन केलं.
📍जि. अहिल्यानगर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज जुन्नर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्नेहल निलेश खोत आणि इतर सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अन्य पक्षाच्या माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी शहराध्यक्ष अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जुन्नर हा इतिहास, संस्कृती आणि वारशानं समृद्ध असा प्रदेश आहे. शिवशाहीची प्रेरणा देणारी ही पवित्र भूमी आहे. या भूमीचा विकास, प्रगती आणि समृद्धी ही आमची जबाबदारी आहे. जुन्नर भागातील पायाभूत सुविधा आणखी पूरक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशील नेतृत्वाकडे कामाची जबाबदारी सोपवणं आवश्यक आहे. चांगले रस्ते, मुबलक पाणी, चांगली शिक्षण व्यवस्था, उत्तम आरोग्य व्यवस्था आदी सर्वच बाबींची पूर्तता करण्याची धमक आमच्यात आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत आम्ही बेरजेचं राजकारण करत आहोत. सर्वांना सोबत घेऊन, शांततेनं आणि विकासाच्या मार्गानं पुढे जात आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आदर्शवत विचारांवर पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
स्नेहलताई यांसह आमचे सर्व उमेदवार अनुभवी, अभ्यासू आणि लोकांच्या समस्या जाणणारे आहेत. म्हणूनच घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या प्रचारार्थ आज, आयोजित जाहीर सभेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. या सभेच्या निमित्तानं शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जागं करण्याचं काम ज्या थोर समाजसुधारकांनी केलं, ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला व स्मृतींना विनम्र अभिवादन केलं.
या जाहीर सभेच्या निमित्तानं माजी नगरसेवक, माजी सभापती अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नवीन सहकाऱ्यांना पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.
शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मिती अशा सर्व बाबींमध्ये सुधारणा आणणं, हे प्राधान्यक्रमानं आम्हाला सर्वोतोपरी आहे. आपण सर्वांना मिळून शिरूर शहरात पायाभूत सुविधांचं जाळं तयार करायचं आहे, असं सूचित केलं.
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार श्री. दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ज्या-ज्या जबाबदाऱ्या अथवा जी कामं त्यांच्या हाती आली, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांसारख्या प्रत्येक ठिकाणी दोन्ही मान्यवरांनी भरीव अशी कामगिरी केली आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आपण पुढे चाललो आहोत. सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व चालू योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा, यासाठी आम्ही लक्ष देऊन आहोत.
शिरूर शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास, हाच आमचा ठाम निर्धार आहे. घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विदर्भातील ख्यातनाम कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनानं महाराष्ट्रातील हास्यव्यंग कवी संमेलनातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
हसता हसता लोटपोट करणं आणि त्यातून समाजप्रबोधन करणं हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं खरं हास्य कसब होतं. त्यांचा 'जांगडबुत्ता ' हा शब्द कोणत्याही विनोदाला गोळीबंद स्वरूपात वापरण्यासाठी सगळ्याच व्यासपीठावर वापरला जात होता. सामाजिक एकोपा आणि सामाजिक विषयांवर त्यांची नेमकी टिपणी समाजाला अंतर्मुख करायची.
वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी हास्यमैफिलीतून निरोप घेतला. त्यांच्यासारख्या वैविध्यपूर्ण मांडणी करणाऱ्या साहित्यिकामुळे राज्याची कवितेच्या प्रांतात वेगळी ओळख निर्माण झाली होती. जवळपास २० कविता संग्रह त्यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. हल्लीच्या तणावाच्या वातावरणात सर्वसामान्यांना हलक्याफुलक्या मराठी साहित्यातून प्रफुल्लित करण्याचं कसब त्यांच्या काव्यरचनेत होतं. त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्य सृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. मोनिका बाणखेले यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प जनसभेत आज पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. दरम्यान क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार आमच्या राजकारणाचा आधार आहे. शिव-शाहू–फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्या तत्त्वांवर आम्ही ठाम आहोत. सर्वसामान्य जनतेला मान–सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे; हा अधिकार त्यांना भारतीय संविधानानं दिला आहे. त्या अधिकारासाठी, त्या प्रतिष्ठेसाठी आमचं महायुती सरकार काम करत आलं आहे.
शेतकरी बांधवांच्या हितासाठी आम्ही अनेक योजना राबवत आहोत. आपला अन्नदाता सुखी राहिला पाहिजे; तो मोडला तर राज्य मोडतं, हे आम्हाला ठाऊक आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा उभं करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आमच्या लाडक्या बहिणींना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला पाहिजे, सशक्त झाला पाहिजे, हे आमचं ध्येय आहे, अशा भावना जाहीर सभेच्या निमित्तानं व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी, माजी मंत्री, आमदार मा. श्री. दिलीप वळसे पाटील जी यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक प्रकारची विकासकामं करून दाखवली. आंबेगाव तालुक्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत इथल्या नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. चांगलं शिक्षण, चांगले रस्ते, मुबलक पाणी, चांगली आरोग्य व्यवस्था तसंच अन्य पायाभूत सुविधा हे सगळं सर्वसामान्य नागरिकांना उपभोगता आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. स्थानिक व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांना सक्षम करण्यासाठी आमचं सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे, असं स्पष्ट केलं.
सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांचं व अडचणींचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार कार्यतत्पर आहे. आगामी निवडणुकीत मतदारराजा महायुतीच्या पाठीशी भक्कम उभा राहील, पाठबळ देईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर मोनिकाताई यांसह आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍 ता. आंबेगाव, जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुलेवाडा येथे भेट दिली. त्याठिकाणी फुले दांपत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं.
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत फुले दांपत्यांनी पेटवली; ती अधिक प्रखर करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रगतीची, विकासाची संधी पोहोचली पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षमय व्यक्तिमत्त्व, तत्वचिंतक, सशस्त्र क्रांतिकारक सेनापती बापट यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! मुळशी सत्याग्रहाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संघटित करण्याचं त्यांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी तिमिराकडून तेजाकडं घेऊन जाणारा ज्ञानाचा मार्ग दाखवत, बहुजन समाजाला पुरोगामी विचारांतून परिवर्तनाची नवी दिशा दाखवली. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि एकतेची मूल्ये या महाराष्ट्र भूमीच्या मातीत रुजवली. देशातील स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत, नारीशक्तीच्या भविष्यकालीन सक्षमीकरणाची नांदी घडवून आणली. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. संतोष फकीरा सरोदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
फुरसुंगी-उरुळी देवाची परिसराचा सर्वांगीण विकास हा आमचा निर्धार आहे. पुढील काळात एकजुटीनं, वेगानं आणि प्रामाणिकपणे कामं केली, तर हा परिसर प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाणं शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी निवडणुकीत मतदारराजा विकासाला, कामाला आणि स्थैर्याला पाठिंबा देईल, यात शंका नाही. या भागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, अन्य पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था या सर्व प्राथमिक गरजांवर नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही काम करू. यासोबतच नवीन उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास नागरिकांना दिला.
तुमचा विश्वास, तुमचं सहकार्य आणि तुमची ताकद सोबत असेल, तर फुरसुंगी–उरुळी देवाचीचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तळमळीनं आणि जबाबदारीनं काम करू, अशी हमी दिली. फुरसुंगी–उरुळी देवाची परिसराच्या विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या कार्यक्षम उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना सभेच्या निमित्तानं केलं.
📍जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
उरुळी देवाची फाटा ते उरुळी गाव रोड दरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माता-भगिनींनी माझ्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव, दाखवलेला विश्वास, दिलेले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे..!
📍फुरसुंगी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सक्षम नेतृत्व, समर्थ नेतृत्व, कुशल नेतृत्व.. याच कार्यक्षम नेतृत्वाच्या बळावर विकास घडतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. जयदीप दिलीपदादा बारभाई यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. दरम्यान सर्वांचं आराध्य दैवत श्री खंडेरायांना प्रथम वंदन केलं.
श्री. जयदीप दिलीपदादा बारभाई यांनी गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून कामाची जबाबदारी यशस्वीपणे निभावली. त्यांचे वडील श्री. दिलीपदादा बारभाई हे स्वतः गेली अनेक वर्षे जेजुरीच्या राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. त्यांनी आम्हाला नेहमीच खंबीरपणे साथ दिलेली आहे. जयदीप यांच्याकडे शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, विकासाचा दृष्टिकोन आहे.
आपल्या जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच नगरपालिकेचं काम हे पुढील ५ वर्ष उत्तम व्हावं, या दृष्टिकोनातून आम्ही २१ अनुभवी उमेदवार याठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असं आवाहन नागरिकांना केलं. त्याचबरोबर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. संतोष खोमणे, श्री. संदीप जगताप, श्री. रोहिदास कुंभार, श्री. गणेश निकुडे, श्री. रमेश बयास यांसह अनेक मान्यवरांनी उत्तम पद्धतीनं आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सर्वात वेगानं विकसित होणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका राहणार आहे. पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या संदर्भात काम सुरु आहे. त्याशिवाय संपूर्ण पुणे जिल्ह्यात मेट्रोचं जाळं पसरवण्याबाबत राज्य सरकार पावलं उचलत आहे. यासोबतच वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उड्डाणपुलं, बोगदे, रेल्वे सेवा, रिंग रोड यांवर आपण भर देत असल्याचं सभेत स्पष्ट केलं. याशिवाय पाण्यासंबंधित प्रश्न देखील आपण मार्गी लावू, असं आश्वस्त केलं.
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वागीण विकास साधायचा आहे. समाजातील सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन विकास साधणं, हाच आमचा उद्देश आहे. जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार न करता सक्षम, समर्थ उमेदवारांना मतदारराजानं आपलं अमूल्य मत द्यावं. घड्याळाच्या शेजारचं बटण दाबून आमच्या कार्यतत्पर उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन केलं.
📍ता. पुरंदर, जि. पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रहिमतपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेच्या वतीनं आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. दरम्यान माता चौंडेश्वरी देवी, श्री भैरवनाथ आणि श्री रोकडेश्वर यांचं स्मरण करून त्यांना वंदन केलं. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. नंदना सुनील माने यांच्यासह अन्य सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचं आवाहन सर्वसामान्य नागरिकांना केलं.
महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना समान न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं तसंच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बेरजेच्या राजकारणानं आम्ही पुढे चाललो आहोत. सत्तेचा सदुपयोग करून सर्व समाजघटकांचा विकास साधला जाईल, याकरता आम्ही कार्यतत्पर आहोत. जनसेवा करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचं काम आम्ही करत आलो आहोत, असं स्पष्ट केलं.
राजकीय वारसा राहिलेल्या कुटुंबातून नंदनाताई येत असून त्यांना राजकीय, सामाजिक, विकासाचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. रहिमतपूरमधील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी, महिला बचत गटाच्या बळकटीसाठी तसंच शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात नंदनाताईंचा सदैव सहभाग राहिलेला आहे. रहिमतपूरच्या प्रगतीत आणखीन भर घालण्यासाठी नंदनाताई सक्षम असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
रहिमतपूर नगरपालिकेचा आजवरचा प्रवास, इथली प्रगती आणि विकास हे सगळं सामाजिक ऐक्य जोपासणारं राहिलेलं आहे. जात-पात-धर्म न पाहता राजकीय जीवनात सर्वांना समान न्याय देण्याची आमची भूमिका कायम राहिली आहे. आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून, समन्वय राखून काम करत आहे. कोणत्याही परिसराचा विकास हा कृतीतून होत असतो. पुढील ५ वर्षांतील अपेक्षित विकास कामं पूर्ण करण्यासाठी तसंच रहिमतपूरमध्ये शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते, वाहतूक व्यवस्था, क्रीडांगणं, उद्यानं यांसारख्या सुविधांना सुधारायचं असेल, तर नंदनाताई यांसह आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍ता. कोरेगाव, जि. सातारा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Wonderful news as India has won the bid to host the special Centenary Commonwealth Games 2030 in Ahmedabad.
Our rising sporting prowess, strong sporting ecosystem, and the visionary leadership of Hon’ble PM Shri @NarendraModi ji have paved the way for this milestone, a moment that every citizen should proudly celebrate.
#commonwealthgames2030 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कुर्डूवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आर.पी.आय (आ.) च्या वतीनं आयोजित संयुक्त जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. सुरेखा निवृत्ती गोरे यांच्यासह अन्य उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचं आवाहन सर्वसामान्य नागरिकांना केलं.
यानिमित्तानं कुर्डूवाडी शहरातील प्राथमिक व मूलभूत गरजा, नवीन उद्योग-व्यवसाय व रोजगार निर्मिती, औद्योगिक विकास आदी मुद्द्यांवर नागरिकांना संबोधित केलं. शहराच्या विकासाला आता गती देण्याची वेळ आली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे आणि ह्या गरजांवर आपण ठोसपणे काम करणार आहोत, अशी हमी दिली.
शहरात औद्योगिक गुंतवणूक वाढली तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यवसायाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास युवकांच्या हाताला सुद्धा कामं मिळतील. यासाठी आपल्या सरकारचं संपूर्ण सहकार्य कुर्डूवाडीला मिळेल, याची खात्री दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं.
आपल्या सर्वांना एकत्र येऊन कुर्डूवाडीचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास साधायचा आहे. त्यासाठी सुरेखाताई यांसह आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या. मतदारराजाचा मोलाचा पाठिंबा आवश्यक आहे. चला, एकत्र येऊया आणि येणाऱ्या काळात कुर्डूवाडीला नाविन्यपूर्ण, सक्षम आणि विकासाच्या मार्गावर वेगानं पुढे नेऊया, असं आवाहन केलं.
📍ता. माढा, जि. सोलापूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आमदार श्री. सुभाष बापू देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेच्या संकुलात उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतलं, पूजा केली.
📍सोलापूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सोलापूर जिल्ह्यातील मौजे वडाळा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. बळीरामकाका साठे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षात नव्यानं सामील झालेल्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत केलं, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना संबोधित केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. आधुनिक महाराष्ट्र घडवणारे, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाच्या मार्गावर आपण पुढे जात आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी चव्हाण साहेबांनी जे काम केलं, त्याच कार्यातून, त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आम्ही जनसेवेचं काम करत आहोत, असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट केलं.
श्री. बळीरामकाका साठे यांनी अन्यायाविरोधात उभं राहण्याची भूमिका कायम घेतली. २४ वर्ष सरपंच म्हणून, नंतर जिल्हा परिषद सभापती तसंच नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली. आपलं काम सांभाळताना त्यांनी कधी कोणाला दुजाभाव दाखवला नाही. पक्षात त्यांच्या येण्यानं जनकल्याणाच्या कार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मौजे वडाळामध्ये विकास घडवून आणणं ही आमची जबाबदारी आहे. कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही, अशी खात्री दिली. शेतकरी सुखानं राहिला पाहिजे. शेतकरी मोडला तर राज्य मोडतं, ही वस्तुस्थिती असल्याची भावना व्यक्त केली. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-२ अंतर्गत मार्गिका ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका ४अ (नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग) या मार्गांना मंजुरी मिळाली. याबद्दल मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो.
मार्गिका ४ (खराडी ते खडकवासला) : ही मुख्य मार्गिका सुमारे २५ किलोमीटर लांबीची असून ती खराडी आयटी पार्कपासून सुरू होऊन हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासलापर्यंत पोहोचेल. यामुळे आयटी हब, औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडलं जाईल. मार्गिका ४अ (नळ स्टॉप ते माणिकबाग) ही मार्गिका ६.१ किलोमीटर लांबीची असून ती नळ स्टॉप ते वारजे आणि माणिकबाग यांना जोडेल. यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बसचं जाळं विस्तारेल, प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, असा विश्वास आहे.
मेट्रो रेल्वेचे हे दोन्ही मार्ग एकत्रितपणे ३१ किलोमीटर लांबीचे आहेत आणि यामध्ये एकूण २८ स्थानकांचा समावेश असेल.
#maharashtra #punemetro -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी मुक्त संवाद साधला, त्यांना संबोधित केलं. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं आपण जपली पाहिजेत, असा संदेश आज भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांना देत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा ही फक्त दोन शहरं नाहीत, तर ही संतांची, महापुरुषांची, पराक्रमी इतिहासाची पवित्र भूमी आहे. संत चोखोबा यांच्या पाऊलखुणा इथल्या मातीत आहेत, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची ही भूमी आहे. म्हणूनच ह्या दोन्ही नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि रिपाई (आठवले गट) यांच्या महायुतीला द्या. महायुतीकडे सक्षम नेतृत्व आहे, अनुभवी नेतृत्व आहे आणि विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व आहे, असा विश्वास नागरिकांना दिला.
सिंदखेड राजा नगरपरिषदेचे आमचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. श्याम किसनराव मेहेत्रे हे अनुभव असलेलं, दानत असणारं, सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारं असं व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार माधुरी तुषार शिपणे ह्या उच्चशिक्षित, सुशिक्षित कुटुंबातून आलेल्या, सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची क्षमता ठेवणाऱ्या आहेत. हे दोन्ही उमेदवार तुमचा अभिमान वाढवतील, विकासाच्या दृष्टीनं तुमचं शहर पुढे नेतील, असा विश्वास सभेत व्यक्त केला.
हा तालुका देशभरात 'सीड हब' म्हणून ओळखला जातो. याठिकाणी पर्यटनाला प्रचंड संधी आहे. योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर विकास झपाट्यानं होऊ शकतो. पुणे-सातारा-कोल्हापूर-सांगलीमध्ये शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजानं कर्ज दिलं जात आहे. संस्था, कारखाने, विकासकामं आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पुढे नेत आलो आहोत, असं स्पष्ट केलं.
केंद्र सरकार, राज्य सरकार, DPC निधी, विविध योजना, CSR अशा पद्धतीनं आम्ही सर्व पातळ्यांवर निधी आणू, जेणेकरून इथल्या नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. इथले पालकमंत्री श्री. मकरंद पाटील हे देखील आमच्या परिवारातील सदस्य असल्यानं विकासाला गती मिळणारच, अशी खात्री दिली.
घड्याळ आणि कमळ या दोन्ही चिन्हावर नागरिकांनी विश्वास ठेवावा आणि आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्यावं. दोन्ही शहरांत सुविधा सुधारू, विकास साधू आणि तुमचा मान, अभिमान वाढवू. चांगल्या विचारांच्या, विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं आवाहन केलं.
दरम्यान, बालाजी मंदिरात जाऊन श्री बालाजी महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं. देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा ह्या दोन्ही शहरांचा सर्वांगिण विकास व्हावा, अशी प्रार्थना केली.
📍बुलढाणा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश नारायणराव गावंडे आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन सभेत उपस्थितांना संबोधित केलं. सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
चिखलीतील पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी, मूलभूत सोयींच्या समस्या व अन्य प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी नेतृत्वाला अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांसह बाकी आमच्या उमेदवारांना सार्वजनिक कामातील भक्कम अनुभव आहे. काही उमेदवार नवे आहेत, काही अनुभवी आहेत, पण सर्वांमध्ये काम करण्याची क्षमता आणि तयारी आहे, अशी खात्री सर्वसामान्य नागरिकांना दिली.
चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. विकासकामांना सर्वोतोपरी मदत करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. अनेक भागांमध्ये CSR च्या माध्यमातून निधी आणण्याचं काम आम्ही केलं आहे आणि हे काम पुढेही वेगानं सुरू राहील, असं स्पष्ट केलं. उमेदवार श्री. निलेश गावंडे यांचा प्रामाणिकपणा आणि ज्ञान चिखलीच्या विकासासाठी मोठी ताकद ठरेल. सर्व कामं दर्जेदार, उत्कृष्ट आणि पारदर्शकपणे पार पडावीत, हीच आमची भूमिका आहे. चिखलीला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणं, हे आमचं उद्दिष्ट आहे. चिखलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा भावना आजच्या परिवर्तन सभेच्या निमित्तानं व्यक्त केल्या.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यांच्या नावासमोरील बटन दाबा आणि चिखलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे या, असं आवाहन केलं.
📍बुलढाणा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचं आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शेतकरी बांधव माझा परिवार.. शेतकरी माझा आणि मी त्यांचा आहे.. त्यांच्या अडचणीत त्यांना पुन्हा खंबीरपणे उभं करण्यासाठी मी आणि आपलं सरकार कटिबद्ध आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाचे शिल्पकार, घटनातज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत, २६/११ च्या मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना, आपला जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहत आज, मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत उपस्थितांशी संवाद साधला.
मलकापूर हे विदर्भ-खानदेश जोडणारं एक महत्वाचं शहर आहे. पण इतक्या महत्वाच्या शहरात आजही पाणी, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, उद्यानं आणि अन्य मूलभूत सुविधा पूरक प्रमाणात नाहीत, ही खेदाची बाब आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं चालत असताना आपण भेदभाव न करता सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असं स्पष्ट केलं.
याठिकाणी श्री. प्रसाद जाधव हे नगराध्यक्ष पदाचे आमचे अधिकृत उमेदवार आहेत. ते जबाबदार नेतृत्व म्हणून हाती घेतलेली कामं पूर्ण करतील, यात शंका नाही. बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर तसाच विकास मलकापूरमध्ये आपण करू शकतो. या शहराचा कायापालट करायचा असेल तर अशी जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून आणणं आवश्यक आहे, असं सभेत सूचित केलं.
अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता यावं, याकरता आपल्या सरकारनं दरवर्षी ४० लाखांची योजना सुरू केली आहे. सर्व समाजघटकांना न्याय देणं, मदत करणं हाच आमचा उद्देश आहे. आम्ही कामाची माणसं आहोत. अतिवृष्टीमध्ये भरभक्कम पॅकेज देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभं राहिलो. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा आमचा आहे, ही बाब स्पष्ट केली.
येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हावरील बटण दाबून मोठ्या मताधिक्यानं श्री. प्रसाद जाधव आणि सर्व उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन सभेत नागरिकांना केलं. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.
📍बुलढाणा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून खामगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
च्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत उपस्थितांना संबोधित केलं. तत्पूर्वी मस्तान शाह दर्ग्यावर जाऊन दर्शन देखील घेतले. तसंच सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन केलं.
खामगाव ही भूमी सांस्कृतिक वारशाची, परंपरेची आणि सर्वधर्मसमभावाची ओळख असलेली भूमी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो असून जातीपातीत भेदभाव करत नसल्याचं स्पष्ट केलं. खामगावचा विकास, इथल्या नागरिकांचे प्रश्न, मुलांचं भविष्य ह्याच उद्देशानं ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्याच दृष्टीकोनातून आम्ही काही अनुभवी आणि काही नवीन दमदार उमेदवार हे खामगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी उभे केले आहेत.
खामगावचा कायापालट करण्यासाठी तितकेच कार्यशील प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार चेतनाताई संजय शर्मा ह्या प्रामाणिक आणि कामाबाबत कटिबद्ध आहेत. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमीच अग्रणी राहिलो आणि राहणार. खामगावमधील रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी सक्षम करायच्या आहेत. उद्योजकता वाढेल, रोजगारनिर्मिती होईल, शहर आधुनिक होईल, यासाठी आम्ही राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून भरीव निधी घेऊन येणार आहोत, अशी माहिती प्रचार सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
विकासाच्या मुख्य प्रवाहात खामगावला आणण्यासाठी मतदारराजानं आम्हाला भक्कम साथ द्यावी, पाठिंबा द्यावा. चेतना ताईंना आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्यावं, असं आवाहन केलं.
📍बुलढाणा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्याचा सर्वांगीण, सर्व समाजघटकाचा विकास साधण्यासाठी नवी उमेद, नवी ऊर्जा, विकासाचा नवा दृष्टिकोन ठेवणाऱ्या लोकांकडे कामाची जबाबदारी सोपावणं, हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय-धोरण आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज भारतीय संविधान दिनानिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. त्याचबरोबर 'संविधान प्रत'ला वंदन केलं.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातील अधिकारी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शहीद स्मृती स्मारकाला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
📍मुंबई पोलीस आयुक्तालय -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या अतुलनीय शौर्य, धैर्य आणि पराक्रमानं सुरक्षा दलांच्या शूर जवानांनी मातृभूमीसाठी, सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी मुकाबला केला, वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली. राष्ट्रासाठी त्यांनी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान सदैव स्मरणात राहील. मुंबईतील या अमानुष दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना, शूर जवानांना आणि मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या भारतीय संविधानानं तमाम देशवासियांना समानता, सामाजिक न्याय व स्वातंत्र्य ही सर्वोच्च मूल्ये प्रदान केली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट संविधानाची निर्मिती करत, देशाची अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखत एकसंधतेला नवा आयाम दिला. आजच्या संविधान दिनी, आपल्या संविधानाला सर्वोतोपरी मानत, भारताच्या संविधानिक व लोकशाही मूल्यांना प्राणपणानं जपण्याचा दृढ संकल्प करूया!
सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#constitutionday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लातूरचे माजी महापौर श्री. विक्रांत गोजमगुंडे आणि नाशिकचे डॉ. झाकीर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनसेवेच्या कामात आणखी नवीन सहकाऱ्यांची भर पडल्यानं कामाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
तीर्थस्थळांचा विकास, पूरक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून बीडमध्ये पर्यटनाला चालना देणार..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती, पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर आपल्या बीड जिल्ह्याचा विकास साधणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीडकरांनो, आम्हाला भक्कम साथ द्या.. बीड जिल्ह्यात विकासाची गंगा कानाकोपऱ्यात पोहोचवू. वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, उत्तम शिक्षण व्यवस्था इ. सगळंच आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यासाठीच्या कामात कुठेही कसूर राहणार नाही, निधी कमी पडणार नाही, असा शब्द देतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात CIIIT राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघानं विश्वविजेतेपद पटकावलं. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्रीशक्तीचं विराट सामर्थ्य अधोरेखित केलं आहे. हा विजय केवळ क्रीडा क्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय महिलांची विक्रमी कामगिरी नव्या भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असून, त्यांच्या खिलाडू वृत्तीसह कठोर परिश्रमाला मी मनापासून सलाम करतो. भारतीय महिला कबड्डी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी तसंच खेळाडूंच्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो.
भारतीय महिला कबड्डी संघानं दाखवलेली जिद्द, तंत्र आणि संघभावना प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या निर्णायक चढायांमुळे अंतिम फेरीत भारतानं आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. प्रशिक्षक तेजस्विनी बाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघानं पुन्हा एकदा जागतिक कबड्डीवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
देशातील महिला क्रीडा क्षेत्र अभूतपूर्व उंची गाठत आहे. सर्वप्रथम महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय अंध महिला क्रिकेट संघानं कोलंबोमध्ये झालेला पहिलाच अंध टी-२० विश्वचषक जिंकला आणि आता महिला कबड्डी विश्वचषकातही भारतानं विजेतेपद पटकावलं. फक्त महिनाभरात भारताच्या मुलींनी मिळवलेल्या या तीन विश्वविजयांनी संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. भारतीय महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा हा सुवर्णकाळ सुरू झाला असून भारतीय महिलांचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही. देशातील प्रत्येक मुलीसह खेळाडूंसाठी हा प्रेरणादायी क्षण आहे.
#kabaddiworldcup2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartiest congratulations to our amazing Women’s Kabaddi Team on winning the Kabaddi World Cup 2025!
Your dedication to sport shone through your performance, making our hearts swell with pride and joy! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, त्यांच्या वेदना, त्यांच्या प्रश्नांची खरी जाण असणारे लोकच शहराचा कायापालट करू शकतात. आणि म्हणूनच आपण ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर बीडच्या विकासासाठी लढतोय, अशा भावना बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या निमित्तानं पार पडलेल्या प्रचार सभेत व्यक्त केल्या.
यावेळी लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे यांना बहुमतानं विजय करा, असं आवाहन केलं. श्रीमती प्रेमलताताई यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलं आहे. चांगली प्रशासकीय समज, लोकांशी जवळीक आणि स्थानिक समस्यांकडे पाहण्याची योग्य दृष्टी ही त्यांची मोठी ताकद आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या नवीन सहकार्यांचं मनापासून स्वागत केलं, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. विविध जाती-धर्माची लोकं इथं एकत्र राहतात. सर्व समाजघटकांना, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन विकास साधायचा, हीच आमची भूमिका आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं प्रेरित होऊन आम्ही कामं करत आलो आहोत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘रयतेचं राज्य’ स्थापन केलं, त्याच तत्वावर आम्हाला काम करायचं आहे. बीड शहर हे जिल्ह्याचं मुख्यालय असताना देखील अनेक वर्ष विकासाच्या बाबतीत मागे राहिलं. आरोग्य सुविधा जशा हव्यात तशा नाहीत. सांडपाणी, पाणीपुरवठा, रस्ते अशा पद्धतीनं सगळीकडे सुधारणेची गरज आहे. त्याकरता पुढील ५ वर्ष लोकविकास महाआघाडीचा उमेदवार निवडून आणून देणं गरजेचं आहे, असं स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्यातील लोकांना महानगरीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. १२ महिने पाणी, जलशुद्धीकरण प्रकल्प, नवीन STP, कचरा व्यवस्थापन, उत्तम आरोग्य सुविधा, आधुनिक प्रकल्प, रोजगाराच्या संधी आदी सर्व उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
काल बीडमध्ये व्यापारी बांधवांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्तानं लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्यासह अन्य तमाम उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असं आवाहन केलं. श्रीमती प्रेमलताताई ह्या नायब तहसीलदार म्हणून काम केलेल्या, सुशिक्षित, अनुभवी आणि सर्व समाजाला न्याय देणाऱ्या आहेत, अशी खात्री मेळाव्याच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
बीड शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आपल्या दारात उभा आहे. या निवडणुकीत लोकविकास महाआघाडीनं ५३ उमेदवार उभे केले आहेत. हे अनुभवी आहेत, त्यांच्यात नवी उमेद आहे, ऊर्जा आहे. बीड शहर हे विविध जाती-धर्मांचं, विविध प्रवाहांचं शहर आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन करून दाखवलं; त्यांची प्रेरणा घेऊन आपणही लोककल्याणाचं काम पुढं नेत असल्याचं सांगितलं. व्यापाऱ्यांसाठी बीड हे प्रादेशिक व्यापारी केंद्र बनावं, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
CIIIT सारख्या प्रकल्पांमुळं कौशल्य विकासाला नवी दिशा मिळत आहे. क्रीडा संकुलासाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये कचरा व्यवस्थापन, आधुनिक प्लांट्स, चांगले अधिकारी आम्ही उपलब्ध करून दिलेत. त्याच धर्तीवर बीडमध्ये देखील या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असं स्पष्ट केलं. विमानतळासाठीची जागा, सायन्स पार्क, दर्जेदार रस्ते ही सगळी कामं सुरू आहेत. बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा आम्ही सुरू केली. आता या रेल्वे सेवेला पुण्यापर्यंत, त्यानंतर मुंबईपर्यंत न्यायचं आहे, यासंदर्भातील माहिती दिली.
बीडच्या ऐतिहासिक व धार्मिकतेचं प्रतीक असलेल्या कंकाळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. शहराचा कायापालट व्हावा म्हणून पुढची ५ वर्षे पूर्णपणे काम करण्याची संधी आम्हाला मिळणं गरजेचं आहे. हे शहर उभं राहताना कोणालाही वंचित ठेवायचं नाही. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो किंवा सामान्य नागरिक असो. सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. अतिवृष्टी असो वा संकट, तत्काळ मदत आम्ही पोहोचवत आलो आहोत, अशा भावना मेळाव्याच्या निमित्तानं व्यक्त केल्या. बीडकरांना १२ महिने पाणी मिळावं, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प, एसटीपी, कचरा व्यवस्थापन याबाबतीतील कामं वेगानं सुरू करणार असल्याचं सांगितलं. चांगल्या संधी, चांगल्या पायाभूत सुविधा आणि सर्वांचा विकास, हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं.
विकासकामं मार्गी लागावीत, यासाठी नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांना आणि लोकविकास महाआघाडीच्या सर्व ५३ उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आम्हाला तुमची साथ द्या, असं आवाहन केलं.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीड ते अहिल्यानगरपर्यंतची रेल्वे सेवा ही पुढे पुणे, मुंबईपर्यंत धावेल याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत.. आरोग्य सेवा देखील दर्जेदार करण्याच्या दृष्टीनं आपण उचलली आहेत..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणामुळे आणि विकासाच्या दूरदृष्टीमुळे आधुनिक महाराष्ट्राचा पाया अधिक भक्कम झाला. राज्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि औद्योगिक विकासात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी विचारांचा वारसा देणारे लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मराठी भाषेची जननी असलेल्या या अंबाजोगाईच्या पवित्र भूमीत येऊन बोलताना नेहमीच अभिमान वाटतो. ह्या भूमीत स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासारखं आशिया खंडातील पहिलं तालुका ठिकाणचं महाविद्यालय उभं राहिलं, ही आपली ओळख, आपला इतिहास आहे, अशा भावना अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत व्यक्त केल्या.
लोकविकास महाआघाडीनं अंबाजोगाईसाठी उमेदवार देत असताना सर्व घटकांचा विचार केला आहे. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार राजकिशोर मोदी हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे, विश्वास पात्र व्यक्तिमत्व आहेत. ३२ पैकी ३२ जागा लोकविकास महाआघाडीला मिळाल्यास आम्ही अंबाजोगाईला बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर विकसित करू, असा विश्वास नागरिकांना दिला. अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून सर्व मिळून प्रामाणिकपणे कामं करतील, अशी खात्री दिली. केंद्र आणि राज्य स्तरावर आवश्यक त्या बाबींची पूर्तता मी करेन, असं आश्वस्त केलं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला सक्षमीकरण करायचं आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्तम सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, उत्तम दर्जाचे प्लांट बसवायचे आहेत. अंबाजोगाई पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित करायचं आहे, जेणेकरून स्थानिकांच्या हाताला पूरक रोजगार मिळतील. अहिल्यानगर ते बीड दरम्यान सुरू झालेली रेल्वे सेवा ही पुढे पुणे, मुंबईपर्यंत सुरू करण्याच्या अनुषंगानं उपाययोजना आखल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातील विमानतळाचा विकास पूर्ण झाल्यावर संपूर्ण चित्र बदलून जाईल, अशी खात्री सभेत दिली.
लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हे उमेदवार समर्थ आहेत. अनुभव, जाण आणि विकासाचा ठाम दृष्टिकोन ह्या उमेदवारांमध्ये आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अंबाजोगाईचा विकास मोठ्या प्रमाणात करणार आहोत, असं आवाहन नागरिकांना केलं.
📍जि. बीड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकासकामं मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या अंगात धमक असावी लागते..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
केवळ भाषण नव्हे, तर कृतीतून शब्द खरे करून दाखवतो..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कंधार ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी आहे. या शहराला स्वातंत्र्य लढ्याचा वेगळा वारसा आणि इतिहास लाभलेला आहे. १९६३ साली स्थापन झालेली कंधार नगरपालिका आजही त्या वारशाचा अभिमान बाळगते. कंधार आणि लोहा ह्या दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं. जनकल्याणाच्या कार्यात आमचे उमेदवार कुठेही कमी पडणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंधार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. स्वप्नील (हनुमंत) विश्वनाथ लुंगारे, लोहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. शरद पवार आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित करताना आज माझ्या भावना व्यक्त केल्या.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनं राष्टवादी काँग्रेस पक्ष पुढे चालत राहिला आहे. कंधार शहरात एक तरुण, शिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभा केला आहे, तर लोहा येथे शेतकरी कुटुंबातील आमचा सहकारी, उमेदवार म्हणून उभा आहे. ही निवडणूक कंधार आणि लोहाच्या विकासाची निवडणूक आहे. पुढील विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि शहरी क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ही निवडणूक आहे.
कंधारच्या विकासासाठी जेवढी मदत करता येईल ती आम्ही करू. विकासाला गती देणं आवश्यक आहे. आम्ही पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत उत्तम पद्धतीनं विकासकामं मार्गी लावली आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे. अत्याधुनिक व्यापारपेठ, वाढत्या शहरासाठी मजबूत मूलभूत सुविधा हे सगळं उभारायचं आहे, असं सभेच्या निमित्तानं स्पष्ट केलं.
चालू असलेली विकासकामं पूर्णत्वास न्यायची आहेत. आम्ही काम करणारी माणसं आहोत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्ही साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. काही नवे आणि काही अनुभवी उमेदवार दिले आहेत. नव्या-जुन्याचा समन्वय साधून कंधार आणि लोहाचा विकास साधायचा आहे. दोन्ही शहरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही टीम उभी केली आहे. घड्याळावरील बटण दाबा आणि आमचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन केलं.
📍जि. नांदेड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो.
#dharmendradeol
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Saddened by the demise of celebrated actor Dharmendra ji, who was an icon of the Indian Film Industry. From young to
old, his fandom consisted of all generations, and his body of work will continue to entertain us even in the times to come.
My thoughts and prayers are with his family members, and dear ones. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती साबिया बेगम कफिल फारुकी आणि नगरसेवक पदाचे २५ उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शहराचा विकास साधण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून योग्य व्यक्ती निवडून येणं हे फार महत्त्वाचं असतं, याचा विचार मतदार राजानं केला पाहिजे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही ठामपणे विकासाची भूमिका घेतली आहे. केंद्राचा निधी कसा आणता येईल, प्रत्येक घटकापर्यंत विकास कसा पोहोचवता येईल, यासाठी सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत.
जिंतूर शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करत, शहराला पुढे नेण्याची जबाबदारी सक्षम नेतृत्वाकडेच दिली पाहिजे. म्हणूनच श्रीमती साबिया बेगम कफिल फारुकी यांना भारी मतांनी नगराध्यक्ष बनवा, असं आवाहन सभेच्या निमित्तानं नागरिकांना केलं. आमच्या पॅनलमध्ये सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. काही अनुभवी तर काही नवखे आहेत; परंतु सगळे जिंतूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असं स्पष्ट केलं. पिंपरी–चिंचवडचं, बारामतीचं चित्र बदललंय कारण, मी शब्दाचा पक्का आहे आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे. जिंतूरच्या विकासकामामध्येही कुठेही कसूर सोडणार नाही, अशी खात्री दिली.
जिंतूर हे नेहमीच धर्मनिरपेक्ष चेहरा असलेलं शहर राहिलेलं आहे. एकाच समाजाला नाही तर सर्व समाजांना डोळ्यासमोर ठेवून काम करणं हेच आमचं धोरण आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर स्वर्गीय कफिल फारुकी यांना खरी श्रद्धांजली देण्याची ही वेळ आहे. जितके उमेदवार तुम्ही निवडून द्याल, तितकी आमची जबाबदारी वाढणार आहे. जिंतूरचं चित्र बदलण्याचा निर्धार आपण सर्वांनी एकत्र केला पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
जिंतूरकरांनी घड्याळ चिन्हावरील बटन दाबावं आणि जिंतूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या कार्यात आमच्यासोबत मजबूतीनं उभं रहावं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सारे मिळून काम करूया, असं आवाहन केलं.
📍जि. परभणी -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Congratulations to Justice Surya Kant ji on being sworn in as the 53rd Chief Justice of India.
My good wishes for a successful and inspiring tenure ahead. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धर्म, मानवता आणि सत्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, अन्यायाविरुद्ध निडरपणे उभे राहण्याची आणि दुर्बलांच्या संरक्षणाची प्रेरणा देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सिख धर्म के नवें गुरु श्री गुरु तेग बहादुर जी के 350वें शहीदी दिवस पर उन्हें श्रद्धापूर्वक नमन।
आपके द्वारा स्थापित बलिदान, मानवता, समभाव व दया के उच्चतम मानक प्रत्येक मनुष्य के लिए प्रेरणा हैं।
आपके बलिदान की समस्त मानव सभ्यता ऋणी है।
Paying heartfelt tribute to Shri Guru Tegh Bahadur Ji on his Martyrdom Day.
His unparalleled sacrifice for the protection of faith and humanity continues to inspire generations.
May his principles guide us towards courage and compassion. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांना उभारी कशी देता येईल, विकास कसा साधता येईल, त्या दृष्टीकोनातून आपण पुढे पावलं टाकत आहोत.. दिलेला शब्द पाळणं हेच आमचं काम आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा, नवी धोरणं आणि क्रीडा संकुलांच्या उभारणीसंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचप्रमाणे सदर बैठकीत निवड झालेल्या नवीन महासचिवांसह सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन केलं, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना व क्रीडा प्रबोधिनीद्वारे खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक तालुका, जिल्हा आणि विभागात नवे क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा निर्णय आहे. अनेक ठिकाणी कामं पूर्ण झाली असून, काही ठिकाणी उर्वरित निधीची आवश्यकता आहे, तो आम्ही आगामी अर्थसंकल्पात निश्चितपणे देऊ, अशी ग्वाही दिली.
शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत; त्याच धर्तीवर नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला देखील राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू आहे. संभाजीनगर, नाशिक आणि इतर विभागीय संकुलांमध्ये सुविधा विकासाची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यातील क्रीडा संकुलांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अपग्रेड करण्याची कामं हाती घेतली आहेत. युवा आणि क्रीडा विकासासाठी राज्यातील मूलभूत क्रीडा सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत आहोत, अशी माहिती बैठकीत दिली.
क्रीडा संघटनांनी आर्थिक व्यवस्थापन आणि निवड प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक ठेवणं आवश्यक आहे. महिला खेळाडूंसाठी विशेष योजना, सुरक्षित वातावरण आणि संधी वाढवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. क्रीडा क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवणं, हे सर्वांचं संयुक्त कर्तव्य आहे, ही बाब स्पष्ट केली.
क्रीडा क्षेत्र शिस्तबद्ध, सक्षम आणि उत्तम खेळाडू घडवण्याचं काम करतं. स्पर्धा आयोजित करण्यापुरता क्रीडा संघटनांचा रोल मर्यादित नसून खेळाडू घडवणं, त्यांच्या प्रगतीसाठी योग्य दिशा दाखवणं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, असं बैठकीत स्पष्ट केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.. त्यांच्या सुविधेसाठी 'अल्पसंख्याक कक्ष' उपलब्ध करून दिलं आहे.. 'अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था' अर्थात 'मार्टी' संस्था आपण स्थापन केली आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे अधिकृत उमेदवार श्री. संजय बताले यांचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू आणि नळदुर्गचा इतिहास, संस्कृती, गरजा उत्तम प्रकारे जाणणारं नेतृत्व आहे. नळदुर्गच्या विकासासाठी ते योग्य उमेदवार असल्याचा विश्वास आयोजित प्रचार सभेत व्यक्त केला. याचबरोबर प्रभागातील अन्य उमेदवारांच्या योग्यतेबाबत देखील नागरिकांना आश्वस्त केलं.
मराठवाड्याला जे काही देता येईल ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ह्या वर्षी पावसानं मोठं नुकसान केलं. शेतकरी बांधवांना उभारी देण्यासाठी आम्ही ३२ हजार कोटींचं आणि नंतर आणखी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. शेतकरी हा माझा धर्म आणि माझी जात आहे, म्हणून त्यांच्या अडचणीत मी कधीही मागे हटणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या.
नळदुर्ग म्हटलं की, किल्ला आणि इथली सांस्कृतिक परंपरा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. विविध जाती-धर्मातील लोक इथं एकोप्यानं राहतात. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जात आहे. जात-धर्म न पाहता सर्वांना सोबत घेऊन पुढे चालणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.
ही फक्त नगरपरिषद निवडणूक नाही, तर ही नळदुर्ग शहराला विकास देणारी निवडणूक आहे. अनुभव संपन्न आणि नवख्या अशा २ अनुभवी तसंच १९ नवख्या उमेदवारांना आपण संधी दिली आहे. एकत्र काम केलं तर समाजाचा आणि शहराचा भलं होणारच. आता पुढच्या काळात नळदुर्ग व तुळजापूर यांचं संयुक्त ब्रँडिंग करणं, पर्यटन वाढवणं, रोजगार निर्मितीस चालना देणं, या अनेक कामांसाठी आम्ही सज्ज आहोत. दक्षिण आणि उत्तरेकडील भारताला जोडणारा हा भाग महत्त्वाचा आहे. इथं स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी उत्तम संधी आहे. ग्रीन एनर्जीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. नळदुर्गसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. दर्जेदार आणि टिकाऊ विकासकामं आम्ही इथे उभी करू. प्रत्येकाला हक्काचं घर देण्याचा आमचा संकल्प आहे.
बारामती, पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांची उदाहरणं तुमच्यासमोर आहेत. तुम्ही घड्याळ चिन्हाला साथ दिलीत तर नळदुर्गलाही तसाच विकास आम्ही करून दाखवू, अशी खात्री दिली. त्यामुळे घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि श्री. संजय बताले व सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहन केलं.
📍धाराशिव -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आ. श्री. राणाजगजितसिंह पाटील यांचे चि. मल्हार आणि श्री. विवेक खरबंदा यांची कन्या चि. सौ. कां. साक्षी यांच्या विवाह सोहळ्यात सपत्नीक सहभागी झालो. याप्रसंगी वधू-वरांस शुभाशीर्वाद दिले आणि भावी सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या.
📍तुळजापूर, जि. धाराशिव -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मी सर्व समाजघटकाला सोबत घेऊन पुढे चालत राहिलो आहे.. कालही, आजही आणि उद्याही..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती परवीन नवाबोद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती परवीन नवाबोद्दीन शेख या अनुभवी आहेत, संयमी आहेत आणि औसाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देऊ शकतात. त्या सर्व समाजांना सोबत घेऊन चालतील, असा विश्वास या सभेत व्यक्त केला. औसाकरांनी येत्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावर विश्वास ठेवा, बटण दाबा आणि औसा शहराच्या विकासाला गती द्या, असं आवाहन केलं.
मी माझ्या ३५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कधीही जात, पात, नाती-गोती यांचा विचार केला नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही चालत आलो आहोत. समता, न्याय आणि विकास हाच आमचा मार्ग आहे. महिलांचा सन्मान, अल्पसंख्याकांचा विश्वास आणि सर्व समाज घटकांचा समान सहभाग, हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, असं स्पष्ट केलं.
औसा हे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक वैविध्य जपणारं शहर आहे. इथं दोन्ही धर्मांतील बंधुभाव, सौहार्द आणि एकोप्याचा वारसा आहे. हा वारसा टिकवणं आणि पुढे नेणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. गेल्या २० वर्षांत औसा तालुक्यात अफसर शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारं नेतृत्वच लोकांच्या मनात स्थान मिळवतं. निवडणुकीच्या दिवशीच नव्हे, तर वर्षभर लोकांसाठी उभं राहणं ही खरी राजकारणाची ओळख आहे.
औसातील विकासकामांसाठी आर्थिक पाठबळ कमी पडणार नाही, अशी खात्री दिली. औसा शहराची लोकसंख्या वाढत आहे, गरजा वाढत आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्मशानभूमी, कब्रस्तान आणि सर्व मूलभूत सुविधा व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
आपण सर्वांनी एकोप्यानं, जातीय सलोखा जपत पुढे जायचं आहे. मी शब्दाचा पक्का आहे. आपल्या भगिनी श्रीमती परवीन शेख यांना पुढील पाच वर्षांसाठी विजयी करा. औसाचा विकास आम्ही करून दाखवू, अशी हमी दिली.
📍लातूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शांताबाई बाबुराव हिवाळे तसंच सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज जाहीर सभा उत्साहात पार पडली. यानिमित्तानं काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.
ह्या निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असताना या काळात परतूरवासीयांची साथ, विश्वास आणि पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शांताबाई हिवाळे या प्रामाणिक, जमिनीवर पाय ठेवून काम करणाऱ्या महिला आहेत. अनुभवी, नवीन, तरुण वर्ग अशा पद्धतीनं सर्वांचं मिश्रण असलेले उमेदवार पक्षाच्या वतीनं जनसेवेखातर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही निवडणूक फक्त निवडणूक नाही; ही परतूरच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जाणारा कार्यकर्ता म्हणून मी सर्व महामानवांना आणि परतूरच्या आराध्य दैवत पातेश्वर महादेवाला नमन करतो. परतूरचा विकास फक्त नियोजनबद्ध नसावा, तर तो सर्वसमावेशक असला पाहिजे. सर्व समाज, सर्व घटक, सर्व पिढ्या सोबत घेऊन जाणारा असला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुढील ५ वर्ष निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही, अशी हमी सभेच्या निमित्तानं दिली. ज्या पद्धतीनं बारामती, पिंपरी–चिंचवडमध्ये विकासकामं झाली आहेत, त्याच पद्धतीनं आता राज्यभर आणि परतूरमध्येही विकास घडवून आणायचा आहे, असं स्पष्ट केलं.
परतूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, सर्व समाजात सलोखा टिकवण्यासाठी सौ. शांताबाई हिवाळे यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार प्रामाणिकपणे काम करतील, यात काही शंका नाही. त्यामुळे मतदारराजानं फक्त घड्याळ चिन्हावर बटण दाबावं, असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं, असं देखील सूचित केलं.
📍जालना -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामतीतील सिद्धेश्वर महादेवाचे अभिषेक करून मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतले. त्यानंतर बारामती नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्याचप्रमाणे बारामतीतील ८ ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन केलं, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्यानं सातत्यानं काम करत राहण्याचा निर्धार देखील यावेळी केला.
आपण हाती घेतलेली कामं ही दर्जेदारच असायला हवीत, हीच आपली काम करण्याची पद्धत सदैव राहिली आहे. बारामतीमध्ये आपण सर्व महापुरुषांचे पुतळे उभे करणार आहोत, अशी माहिती प्रचाराच्या निमित्तानं दिली. आपल्या परिसरात भव्य अशी शिवसृष्टी उभारण्याचं काम सुरू आहे. आज महाराष्ट्रात क्रमांक एकचा शहर म्हटलं की, बारामतीचं नाव घेतलं जातं. पण इथेच न थांबता बारामतीला आणखी उत्कृष्ट, आणखी विकसित कसं करता येईल, यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत, असं स्पष्ट केलं.
बारामतीत नवीन उद्योग उभे राहिले पाहिजेत, नवीन गुंतवणूक आली पाहिजे. यातून बारामतीचा आणि इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे. तिरंगा चौक असो, जलतरण तलाव असो, बारामतीमध्ये नागरिकांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
महिलांना मान-सन्मान आणि त्यांच्या सुरक्षेला आमच्या सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य आहे. महिलांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय श्री. यशवंतराव चव्हाण साहेबांचा अमूल्य वारसा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे.
बारामती नगरपरिषद निवडणूक २०२५ चा प्रचार विनम्रपणे प्रत्येकानं करावा. प्रत्येकाचा मान-सन्मान राखून करावा. एकीनं, समन्वयानं करावा. बारामतीचा सन्मान वाढेल अशा पद्धतीनं करावा, अशा सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री भैरवनाथ महादेवाचे दर्शन घेऊन, अभिषेक करून केला. माळेगावच्या विकासासाठी कार्यरत महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ह्या शुभारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.
आजपर्यंत बारामतीकरांनी मला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या विश्वासानं साथ दिली, त्याच विश्वासानं माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना देखील भक्कम साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आपण शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती-धर्माला, सर्व समाजघटकाला एकत्र पुढे घेऊन चाललो आहोत. ही निवडणूक फक्त निवडणूक नाही; ही माळेगावच्या विकासाची मोठी संधी आहे. योग्य उमेदवार निवडणं ही मतदारांची मोठी जबाबदारी आहे. नगराध्यक्ष पदासाठी आम्ही श्री. सुयोग सातपुते यांच्यावर विश्वास टाकला आहे. मला खात्री आहे की, मतदार राजा त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करेल.
माळेगावचा विकास पारदर्शक झाला पाहिजे, नियोजनबद्ध झाला पाहिजे. नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, रस्ते, पाणी, नवीन शासकीय इमारती आणि अत्याधुनिक सोयी मिळाल्या पाहिजेत. ह्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी सत्ता मिळणं आवश्यक असतं. त्या दृष्टीनं आम्ही ते काम करण्यासाठी तत्पर आहोत. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांमध्ये ‘एक नंबरची नगरपंचायत’ माळेगावची व्हावी, हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The horrific Tejas aircraft crash in the #dubaiairshow today is absolutely devastating, resulting in the tragic death of our pilot.
My condolences and prayers are with the family and dear ones who have lost a loved one. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजयसिंह पंडित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@VijaysinhPandit -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रातील जनतेनं मराठी अस्मितेला अग्रस्थानी मानत, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपलं सर्वस्व पणाला लावलं. ह्या लढ्यात आपल्या हक्काच्या महाराष्ट्रभूमीचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी, १०७ वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या ह्या मराठी अस्मितेसाठीच्या समर्पण, त्याग आणि बलिदानातूनच भविष्यकालीन गौरवशाली महाराष्ट्राचा पाया रचला गेला. महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील तमाम वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण आदरांजली!
#महाराष्ट्र_राज्य_हुतात्मा_स्मृती_दिन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Attended the oath taking ceremony of Bihar Chief Minister Shri @NitishKumar, Deputy CMs- Shri @Samrat4BJP & Shri @VijayKrSinhaBih and other Ministers, wishing them the best for steering the state towards a new direction of good governance and prosperity.
Happy to see that Bihar has continued to choose the double engine model of governance with NDA under the able leadership and vision of Hon'ble PM Shri @NarendraModi ji and Union Home Minister Shri @AmitShah ji.
📍Patna -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाची बैठक पार पडली. बेकायदेशीर व्यवहारामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये, या दृष्टीनं कोणकोणती पावलं उचलली जावीत, याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला. यावेळी अनधिकृत लॉटरी प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवीन फौजदारी कायद्यांवरील (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा) प्रदर्शनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये मोठे बदल करण्याचा संकल्प केला आणि त्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करून नवीन, सक्षम आणि आधुनिक कायदे देशाला उपलब्ध करून देणं.
महामानव, कायदेतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानं देशाची पायाभरणी केली, परंतु कालानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत. समाजामध्ये काही विकृती, काही वाईट प्रवृत्ती कायम असतात. त्यांना आळा घालण्यासाठी आणि न्याय अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी हे नवीन कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या प्रदर्शनामागचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, तो म्हणजे संपूर्ण देशभर, प्रत्येक राज्यात अशीच प्रदर्शनं भरवून जनतेपर्यंत या कायद्यांचा संदेश पोहोचवायचा आहे. व्हिडिओ, लघुपट, चित्रफिती, फ्लेक्स बोर्ड, माहिती स्टॉल यामधून लोकांना थेट संवाद साधता यावा, नवीन बदल समजावेत आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेची गती वाढेल, पारदर्शकता निर्माण होईल आणि विशेषत: महिला व मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. बाल लैंगिक शोषणाविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही अनेक विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
हे नवीन कायदे आपल्या सर्वांच्या हिताचे असून देश विकसित राष्ट्र बनण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रदर्शन केवळ पाहण्यासाठी नसून शिकण्यासाठी आहे. सर्व पोलीस दलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रदर्शनातून मिळणारा लाभ सर्वांनी घ्यावा, असं आवाहन करतो.
📍आझाद मैदान, मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Happy to see our kids from Pune exploring their ambitions & aspirations, and leaving a solid impression.
Kudos to CEO Zila Parishad Pune for this wonderful initiative.
@PuneZp
Amb Vinay Mohan Kwatra
@AmbVMKwatra
Enriching interaction with the bright young school students representing 14 rural tehsils in Pune, Maharashtra who are on a study tour to U.S.A. Their enthusiasm to learn, ambition, belief in themselves, passion to be a good human before anything else was instructive as also infectious!Commendable initiative by CEO Zila Parishad Pune @PuneZP
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
On her birth anniversary, remembering former Prime Minister Smt. Indira Gandhi and her contribution to India's administration and foreign policy outlook.
#indiragandhi -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी भारतीय स्वातंत्र्यसमरातील प्रथम सशस्त्र संघर्षात अग्रणी भूमिका बजावली. ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून टाकला. मातृभूमीची स्वातंत्र्यप्राप्ती हेच सर्वोच्च ध्येय मानत, त्यांनी अद्वितीय रणकौशल्य आणि अभेद्य रणनीतीच्या जोरावर नारीशक्तीच्या वीरतेचा अविस्मरणीय इतिहास घडवला. शौर्य, साहस आणि स्वाभिमानाचं मूर्तीमंत प्रतिक, महान स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ranilakshmibai -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the 'Human-leopard conflict in Maharashtra state'.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Minister Ganesh Naik, Minister Girish Mahajan and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्यातील मानव-बिबट संघर्षा'संदर्भात आढावा बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीष महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ‘महाराष्ट्र राज्य में मानव-तेंदुआ संघर्ष’ के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीष महाजन समेत अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜 1.30pm | 18-11-2025📍Mantralaya, Mumbai | दु. १.३० वा. | १८-११-२०२५📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @NaikSpeaks @girishdmahajan
#maharashtra #devendrafadnavis #wildlifeprotection -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्र बोरिवली व अंधेरी' कार्यालयाचे लोकार्पण केले (ऑनलाईन).
@Dev_Fadnavis
#maharastra #devendrafadnavis #mumbai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील वाढता बिबट्या-मानव संघर्ष नियंत्रणात आणणं, बिबट्यांसाठी निवारा केंद्र, मानवी सुरक्षेला घेऊन विविध उपाययोजना, पशुधन संरक्षण आदी मुद्द्यांवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
📍मुंबईThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नाशिक जिल्ह्याच्या येवला येथील माजी आमदार श्री. मारोतराव पवार, येवला पंचायत समितीचे मा. सभापती श्री. संभाजी पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गोरे यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षात समविचारी कार्यकर्त्यांची भर पडत असल्यानं पक्षाची जनकल्याणाची विचारधारा घरोघरी पोहोचण्याच्या कार्याला आणखी वेग येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍मुंबई -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister ShivendraSinh Raje Bhonsle and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐 1pm | 18-11-2025📍Mantralaya, Mumbai | दु. १ वा. | १८-११-२०२५📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @Shivendraraje11
#maharashtra #devendrafadnavis #infrastructuremeeting -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) नवनिर्वाचित संचालक मंडळानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेळ व खेळाडूंशी संबंधित सर्व बाबींमध्ये शासन स्तरावर आवश्यक ती मदत सर्वोतोपरी करण्याचं आश्वासन यावेळी दिलं.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या विविध समस्या ह्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यावरील उपाययोजनांबाबत आज बैठक पार पडली. पालिका टॅक्स, दस्त नोंदणी, विकास आराखडे, जलशुद्धीकरण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक विषय बैठकीत हाताळण्यात आले.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या कार्यशील सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय :
✅ राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण.
(नगर विकास विभाग)
✅ बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार.
(गृहनिर्माण विभाग)
✅ भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेच्या प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होणार.
(मदत व पुनर्वसन विभाग)
✅ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता ३३९ पदांची निर्मिती. शिक्षकांची २३२ आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता.
(कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
✅ महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळणार.
(महिला व बाल विकास विभाग)
✅ महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज शिवाजीनगर, पुणे येथील साखर संकुल परिसरात 'सहकार संकुल' प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक पार पडली.
या बैठकीत प्रस्तावित इमारतीचे आराखडे, आवश्यक सुविधा आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे सहकार विभागाच्या कार्यालयांना वस्तू व सेवाकर भवन, वडाळा, मुंबई येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
सहकार क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आणि नियोजन अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The news of the horrific accident near Medina, Saudi Arabia, in which several precious Indian lives were lost, is truly saddening.
Sending my condolences to those who have lost their loved ones in this incident, and wishing speedy recovery to those injured. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मराठी माणसाच्या स्वाभिमानाला आणि प्रादेशिक अस्मितेला नवी दिशा देणारे, आपल्या व्यंगचित्रांतून आणि प्रभावी वक्तृत्वानं मराठी माणसाच्या मनात न्याय-हक्काच्या लढ्याची भावना जागरूक करणारे, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#balasahebthackeray -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
रूप पाहता लोचनी, सुख झालें वो साजणी ||
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा ||
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठलीं आवडी ||
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर ||
गीतेचे सुगम विवेचन करत श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विश्वकल्याणाचा संदेश देत, कर्मयोगाचे महत्त्व उलगडून सांगणारे, विलक्षण अध्यात्मिक अनुभूतीतून तत्त्वज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्रिवार वंदन!
#श्रीसंत_ज्ञानेश्वर_महाराज -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Met Hon’ble Home Minister @AmitShah ji and extended my congratulations on the NDA’s massive victory in Bihar.
The mandate reflects the people’s trust in stable and accountable governance.
Wishing the leadership a successful term ahead. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
On the occasion of National Press Day, celebrating the unparalleled contributions of our journalists and press professionals who uphold ethical principles of journalism against all odds.
#nationalpressday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सना मलिक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@sanamalikshaikh -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'जल-जंगल-जमीन' हा आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा पाया जाणून, 'उलगुलान' बंड पुकारत भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी अस्मिता आणि पर्यावरण संरक्षणासाठी परकीय राजवटीविरुद्ध निर्णायक हाक दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या सार्वभौम व स्वाभिमानी विचारांवर चालत, निसर्गपूजक आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात सदैव अग्रणी भूमिका बजावली आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध निर्भीडपणानं लढण्याची, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याची, समानता व समाजउद्धाराची, संघटन व नेतृत्वाची आणि निसर्गप्रेमाची दिलेली शिकवण हाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या कार्याचा मूलाधार मानला आहे.
आजच्या भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन!
#birsamundaThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नैतिक सामाजिक शिकवणीला व्यावहारिक कृतीची जोड देत विनोबा भावे यांनी संपूर्ण जीवन भारतीय समाजसेवेसाठी अर्पण केले. भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली!
#आचार्य_विनोबा_भावे
#acharyavinobabhave -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांनी आदिवासी, शोषित आणि वंचित समाजाचा कणखर आवाज बनून, अत्यंत मर्यादित साधन-सामग्रीतून परकीय सत्तेविरुद्ध चिवट लढा उभारला. देशातील युवा पिढीत राष्ट्रभावना आणि स्वातंत्र्याची नवी क्रांती चेतवली. आदिवासी समाजात स्वाभिमान आणि आत्मगौरव जागवून, त्यांना सामर्थ्यवान बनविण्यात अमूल्य योगदान दिले. भगवान बिरसा मुंडा हे देशवासियांच्या स्मरणात सदैव अजरामर राहतील. महान स्वातंत्र्यसेनानी आणि जनजातीय अस्मितेचे प्रतीक, जननायक भगवान बिरसा मुंडा यांना १५०व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#भगवान_बिरसा_मुंडा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जगप्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील विलक्षण आणि अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सुतार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं नोयडा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल श्री. सुतार यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि २५ लाखांचा धनादेश असं स्वरूप असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचा हा सन्मान हा राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आदर, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहास, कला आणि सांस्कृतिक वैभवाला अधोरेखित करणारा हा सन्मान राम सुतार यांच्या कार्याचा अभिमानपूर्वक गौरव करतो. त्यांच्या अद्वितीय कलाकृतींसाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
श्री. राम सुतार यांनी देश–विदेशातील शेकडो भव्य शिल्पांद्वारे भारतीय इतिहास, संस्कृती आणि चिंतनपरंपरा प्रभावीपणे साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या महामानवांची त्यांनी साकारलेली स्मारकशिल्पे ही त्यांच्या असामान्य कलाकौशल्याचं आणि त्या विभूतींबद्दलच्या आदराचं द्योतक आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच दादर येथील चैत्यभूमीवर उभारण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ही त्यांच्या कलेची भव्य उदाहरणं आहेत. त्यांच्या या अद्वितीय शिल्पनिर्मितीद्वारे त्यांनी भारतीय इतिहास, मूल्ये आणि महामानवांचे विचार जागतिक स्तरावर जिवंत ठेवण्याचं मोलाचं कार्य केलं आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde
#maharashtrabhushan -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकासकामं केली की, जनाधार मिळतोच. आम्ही काम करणारे आहोत, त्यामुळं आगामी निवडणुक देखील सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरणार आहे.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लाड़ली बहनों का आशीर्वाद
बिहार फिर NDA के साथ
बिहार में NDA की ऐतिहासिक विजय हमारी महिला सशक्तीकरण, सर्व कल्याण व जनहितैषी योजनाओं का प्रमाण है।
यह विजय NDA पर जन विश्वास की मुहर है। यह परिणाम बिहार की प्रगति को गति देंगे। बिहार के इस जनादेश का सविनय अभिवादन।
इस प्रचंड जनादेश के लिए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री श्री अमित शाह जी, बिहार के मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार जी व गठबंधन दलों को हार्दिक बधाई।
@narendramodi @AmitShah @NitishKumar
#biharelection2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळवलेला विजय हा खरोखरच ऐतिहासिक असून देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री मा. नितीश कुमार यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे.
बिहारमध्ये एनडीए सरकारनं समाजकल्याणाच्या विविध क्रांतिकारी आणि जनहितैषी योजना प्रभावीपणे राबवल्या. विशेषतः राज्यातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने दिलेला पाठिंबा हा या विजयाचा महत्त्वपूर्ण आधार आहे. बिहारच्या जनतेनं डबल इंजिन सरकारच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा भक्कम विश्वास प्रकट करून भरघोस बहुमतानं समर्थन दिलं आहे. या अभूतपूर्व विजयाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
हा विजय केवळ संख्याबळाचा नसून तेथील सुशासन आणि सामाजिक न्याय यांच्या धोरणांचा विजय आहे. हा एनडीएच्या एकजुटीचा आणि स्थिर नेतृत्वाचा विजय आहे. या विजयामुळं बिहारच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती मिळेल आणि राज्याला नवी दिशा मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये बिहार आणखी वेगानं प्रगती करेल, असा विश्वास आहे.
@narendramodi @AmitShah @NitishKumar
#biharelection2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Bihar has voted for good governance and a progressive future, by choosing NDA to lead the state and its people.
Congratulations to Hon'ble PM Shri @NarendraModi ji, Union Minister Shri @AmitShah ji, Chief Minister Shri @NitishKumar and the entire NDA on this victory.
#biharelection2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘वात्सल्यसिंधू’, ‘अनाथांची माय’, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सिंधुताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत असंख्य अनाथ मुलांना आश्रय दिला, त्यांचं संगोपन केलं आणि मातृत्वाचा निःस्वार्थ आधार दिला. सिंधुताईंनी आपल्या करुणा, ममता, माया आणि सेवाभावातून अनेकांचं आयुष्य सावरलं, त्यांना नवी उमेद दिली.
#sindhutaisapkal -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतभूमीला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्याचं स्वप्न मनात बाळगून ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा संदेश देत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#लहुजी_वस्ताद_साळवे
#lahujivastadsalve -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Humble tributes to India's First Prime Minister Pt. Jawaharlal Nehru, on his birth anniversary.
His birthday also celebrated as Children's Day, is an apt reminder that our children are the torchbearers of a secure and stable future, and we all must empower their dreams for a progressive society.
#jawaharlalnehru -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माळेगाव बु. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत इच्छुक उमेदवारांशी भेटीगाठी केल्या. यावेळी प्रत्येक प्रभागातील स्थानिक परिस्थिती, विकासकामं, मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा तसंच आगामी निवडणूक धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या निमित्तानं एकूण १७ प्रभागांतील उमेदवारांशी संवाद साधला. त्यांच्या कामगिरी, स्थानिक जनाधार व संघटनात्मक योगदानाचं मूल्यमापन करण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्वांना निवडणुकीच्या कालावधीत शिस्त, जनसंपर्क आणि पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार वर्तन ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपलं सभोवतालचं परिसर स्वच्छ राखण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे.. स्वच्छता ठेवली की आरोग्य देखील चांगलं राहील..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती नगर परिषद आणि माळेगाव बु. नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज, भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या निमित्तानं पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.
शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक सेवा, शैक्षणिक व सामाजिक सुविधा यांसारख्या मूलभूत विकासाच्या कामांसाठी योग्य दिशा ठरवणाच्या दृष्टीकोनातून आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शहर वाढत असताना रस्ते, शाळा, मैदानं आणि पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. आगामी काळात आपल्याला एकजुटीनं विकासाच्या गतीला अधिक वेग द्यायचा आहे. प्रत्येकानं पक्षाची विचारधारा आणि शिस्तीला प्राधान्य देत एकजुटीनं काम करणं गरजेचं असल्याच्या सूचना केल्या.
तुम्ही साथ दिलीत, तर विकासाचा रथ आणखी वेगानं पुढं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या कामगिरीवर उभा आहे. बारामती आणि माळेगाव बु. येथील नागरिकांच्या प्रगतीसाठी आपण सर्व मिळून काम करणार आहोत, अशा भावना व्यक्त केल्या.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज बारामती तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यादरम्यान प्रत्येक प्रभागातील स्थानिक परिस्थिती, सुरू असलेली विकासकामं, मतदारांच्या अपेक्षा आणि आगामी निवडणूक धोरण याबाबत सविस्तर चर्चा केली.
प्रत्येक उमेदवाराची कामगिरी, स्थानिक जनाधार आणि संघटनात्मक योगदान याचं बारकाईनं मूल्यमापन करण्यात आलं. निवडणुकीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्काला प्राधान्य द्या. पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार वर्तन ठेवा, अशा सूचना उमेदवारांना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच पारदर्शकता, विकास आणि लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो, हीच आपली ताकद आहे, असं स्पष्ट केलं.
📍बारामती -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची वैचारिक व सर्वसमावेशक, पुरोगामी, परिवर्तनवादी समाजाभिमुख भूमिका आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक व प्रभावीरीत्या पोहोचावी आणि राष्ट्रवादी विचारांतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकासाची नवी नांदी व्हावी, हीच सदिच्छा!
@AjitPawarSpeaks @SunilTatkare
#ncp #maharashtra -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचला. सहकार व कृषी क्षेत्राला निर्णायक वळण देऊन त्यांनी राज्याचा सर्वांगीण विकास साधला.
#vasantdadapatil -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
धनकवडी येथे पुणे महानगरपालिका आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ‘दत्तक रस्ता' योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. या उपक्रमाद्वारे नागरिक सहभागातून शहरातील रस्त्यांची देखभाल आणि सौंदर्यीकरण होईल, हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे. शहरातील विकासकामं वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची कामं करण्याची गती आणि नागरिकांचा सहभाग या दोन्हींचा समन्वय घडवणं, हेच आपल्या पुढील वाटचालीचं बळ आहे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ चौक ते निलगिरी चौक या दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ आज झाला. हा केवळ एक रस्ता नाही, तर शहराच्या दक्षिण भागातल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणारा, सर्व सामान्य नागरिकांचं जीवन सुलभ करणारा तसंच पुण्याच्या स्मार्ट सिटी या स्वप्नाला बळ देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पुण्याचा विकास हा मोठ्या वेगानं होत आहे. पुण्यात मेट्रो सेवा देखील सुरू झाल्या आहेत. मेट्रोच्या विस्ताराबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील मेट्रोचा विस्तार करण्याबाबत पावलं उचलली जात आहेत. त्याचबरोबर भविष्यात महाराष्ट्रातला आंतरराष्ट्रीय दर्जाचा, दोन धावपट्ट्या असणारा विमानतळ पुरंदरमध्ये उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पुण्यात आयटी इंडस्ट्री, ऑटो इंडस्ट्री लक्षणीय प्रमाणात असून मोठी गुंतवणूक याठिकाणी होताना दिसते. चाकण, तळेगाव, रांजणगाव यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय येत आहेत. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण पुढे पावलं टाकत आहोत. त्या दृष्टिकोनातून मेट्रोचं जाळ आपल्याला पसरवायचं आहे. त्याचप्रमाणे पुण्यात वाढती रेल्वे प्रवाशांची संख्या पाहता हडपसरला नवीन रेल्वे स्टेशन सुरू केलं जाणार आहे.
पुण्यात पिण्याचं पाणी, रस्ते, सुलभ वाहतूक व्यवस्था, वृक्षारोपण, क्रिडांगण, उद्यानं यांसारख्या सुविधांना पूरक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं आम्ही उपाययोजना आखत आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याला आमचं प्राधान्य आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वांना सोबत घेऊन संगतीनं पुढे चालायचं आहे.. सर्वांना विकासाच्या प्रवाहात बरोबरीनं पुढे न्यायचं आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढणार, आपलं राज्य आरोग्य क्षेत्रात प्रगतीची पावलं पुढे टाकणार..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बीड जिल्ह्यातील आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री. भीमराव धोंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला. यासोबतच जळगाव, बीड, जालना, वाशीम, पालघर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या सर्वांचं पक्षात स्वागत केलं आणि मार्गदर्शनपर संबोधित केलं.
आपला पक्ष हा जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा, विकास आणि स्थैर्याला प्राधान्य देणारा पक्ष आहे. सर्वांनी एकजुटीनं काम करून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळ द्यावं, असं आवाहन यानिमित्तानं केलं. श्री. भीमराव यांच्या पक्ष प्रवेशानं शिक्षण, आरोग्य, शेती यांसारख्या क्षेत्रातील त्यांचा दीर्घकालीन अनुभव पक्ष बळकटीकरणात नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. आपल्या बीड जिल्ह्यात अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं, याकरता वेगवेगळ्या भागात हॉस्टेल उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात ज्यांनी शिक्षण घेतलं आहे, त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, हेच सत्य आहे. आधीपासून संगणकाचं शिक्षण मुलांना दिलं जात होतं, पण आता त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाची देखील भर पडली आहे.
कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय क्षेत्राचं महत्त्व आपल्या सर्वांना पटलं आहे. रुग्णालय, डॉक्टर्स, नर्सेस, आधुनिक औषधोपचार सुविधा ह्या बाबी अतिशय महत्त्वाच्या असल्याचं अधोरेखित झालं. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आपल्या स्तरावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असून आपलं राज्य सरकार देखील त्या दिशेनं कार्यशील आहे. या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आशियामधील पहिलं तालुकास्तरीय मेडिकल कॉलेज उभारण्यात येत असून अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून या कॉलेजचा कायापालट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जळगावमध्ये देखील हॉस्पिटलचं काम सुरू असून पालघरमध्ये सुद्धा हॉस्पिटलचं काम हाती घेण्यात येईल. जालना, वाशीम याठिकाणी सुद्धा वैद्यकीय सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतले जात आहेत.
टाटा ट्रस्टच्या मदतीनं प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) आपण स्थापन करत आहोत. बीड जिल्ह्यात देखील सीआयआयआयटी स्थापन केली जाणार असून विमानतळाचं काम सुद्धा हाती घेतलं जाणार आहे.
कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो. जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, त्या सर्वांना सन्मानानं वागवलं जाईल, त्यांना बळ दिलं जाईल, असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सहकाऱ्यांना दिला.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय :
✅ नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल.
(सहकार विभाग)
✅ न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधिशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
✅ पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता. अंमलबजावणीचा कालावधी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार.
(वित्त विभाग)
✅ हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
(जलसंपदा विभाग)
✅ हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तलाव (ता. सेनगाव) प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी.
(जलसंपदा विभाग)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad was a pioneering architect of India’s education system, whose vision helped shape an enlightened and progressive nation.
Tributes to our first Education Minister and visionary leader on his birth anniversary.
#nationaleducationday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
The news of precious lives lost in the car blast near the Red Fort in Delhi is absolutely heartbreaking.
We stand with the families in this difficult hour and send our prayers and best wishes to those injured in this horrific tragedy. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकास केवळ घोषणेतून नव्हे तर कृतीतून घडतो.. राष्ट्रवादी विचारांतून आम्ही विकासाची नवी परिभाषा घडवतो...!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) सन २०२४ च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या आगामी सेवावाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना सर्वसामान्य माणसासाठी काम करा, विकासाचा दृष्टिकोन ठेवा, असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे प्रशासनातील अनुभव, जबाबदाऱ्या आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केलं. यादरम्यान शासनाच्या प्रत्येक विभागात तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Science shapes innovation and empowers sustainable growth.
On #worldscienceday, let us commit to using knowledge and technology for the progress of society. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीवर आणि सर्वसमावेशक भूमिकेवर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसंच हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व नव्या सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात मनापासून स्वागत केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानिमित्तानं उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. मी ज्यावेळेस १९९९ साली कॅबिनेट मिनिस्टर झालो, त्यावेळी सातारा जिल्हाचा पालकमंत्री म्हणून काम केलं. त्यामुळे या जिल्ह्यासोबत माझा अगदी जवळचा संबंध आहे. तेव्हापासून मी या जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते जोडले, अनेक कार्यकर्त्यांना विविध संधी दिल्या. शेवटी कार्यकर्ता हा लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे, तो लोकांमध्ये रमला पाहिजे. त्याच उद्देशानं स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची वैचारिक बैठक या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली.
आपण कालही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत होतो, आजही त्याच विचारधारेचे चालतो आहे आणि पुढेही चालत राहणार आहोत. आपण प्रत्येक जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणार आहोत, ‘सर्वधर्मसमभाव’ हीच आपल्या समाजकारणाची ओळख आहे.
आजच्या पक्षप्रवेशामुळं सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच वाढली असून, येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचं यश दिसून येईल, असा विश्वास आहे. आपण कामाची माणसं आहोत, जनसेवेतून आपलं काम दिसून आलं पाहिजे. त्यामुळे येत्या काळातही आपण सर्वांनी एकजुटीनं आणि जबाबदारीनं पक्षाची विकासाभिमुख विचारधारा घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन केलं.
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी विचारांची कास धरलीय तरुणाईनं,
निघालो आम्ही गतिमान विकासाच्या वाटेनं..!This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
स्त्रियांना शिक्षण, आत्मविश्वास आणि सन्मान मिळवून देणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! ते खऱ्या अर्थानं एक सुधारणावादी आणि पुरोगामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध लढा देत स्त्रीशिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. आधुनिक, प्रगत महाराष्ट्राची पायाभरणी केली. समाज परिवर्तनाची दिशा त्यांनी दाखवली. त्यांच्या अमूल्य कार्याला व स्मृतींना वंदन!
#महर्षी_धोंडो_केशव_कर्वे
#maharshidhondokeshavkarve -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संघर्षातून सुवर्णयशाचा प्रवास!
पुण्यातील लोहगाव परिसरातील झोपडपट्टीतून उभा राहिलेला १७ वर्षीय कुस्तीपटू सनी फुलमाळी यानं बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
आज कुस्तीपटू सनी यानं पुण्यात माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्याचं मनापासून अभिनंदन केलं तसंच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अत्यंत साध्या परिस्थितीतून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या सनीच्या या कामगिरीत त्याच्या परिश्रमाचा, चिकाटीचा आणि प्रशिक्षक श्री. संदीप अण्णा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. मी त्याच्या पालकांचं आणि प्रशिक्षकांचं देखील अभिनंदन करतो.
सनीच्या या विजयानं केवळ त्याचंच नव्हे, तर पुणे आणि महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उजळलं आहे. त्याच्या उत्तुंग कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज माजी नगरसेवक श्री. अनंत कोऱ्हाळे आणि माजी नगरसेवक श्री. जितेंद्र ननावरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे. पक्षाच्या विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन सहकारी निश्चितच मोलाचं योगदान देतील, असा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेच्या जोरावर पुढे चालला आहे.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुरंदर, सासवड, जेजुरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकवासला व खडकवासला ग्रामीण भाग तसंच पुणे शहर आदी ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं उमेदवार निवड प्रक्रियेच्या निमित्तानं बैठका पार पडल्या.
या बैठकीदरम्यान स्थानिक नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी, योग्य उमेदवारांची निवड व्हावी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे निर्णय घेता यावेत यासाठी आवश्यक त्या सूचनाही केल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच खरी जनसेवा घडते. पक्षाचे सर्व कार्यकर्ते असंच प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच अधिक सक्षम होईल, यात शंका नाही. पक्षाची विचारधारा जनतेच्या मनात अधिक ठसावी आणि विकासाच्या वाटचालीला नवा वेग मिळावा, हेच आपल्या सर्वांचं सामूहिक ध्येय असलं पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
📍राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मध्यवर्ती कार्यालय, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुळशी व भोर तालुक्यातील विविध पक्षांतील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत केलं, पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना संबोधित केलं.
यावेळी पक्षाच्या शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसमावेशक आणि लोकहिताशी केंद्रित विचारधारा नव्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. आपला पक्ष कायम विकासाभिमुख कामांशी, संघटनात्मक बांधिलकी आणि जनतेशी प्रामाणिक नातं जपणारा राहिला आहे. आज या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे पक्षात नव्या ऊर्जेचा संचार झाल्याची भावना व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वांनी एकजुटीनं, योजनाबद्ध पद्धतीनं आणि उत्साहानं काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच अधिक बळकट होईल. यासोबतच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण अधिक परिणामकारकपणे काम करू शकू. आपल्या पक्षात आलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांमुळे विकासाच्या वाटचालीला नवी गती मिळेल तसंच लोकांच्या प्रश्नांवर आणखी प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास आहे.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज शिवाजीनगर, पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात खेड, आळंदी, शिरूर व दौंड तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेच्या निमित्तानं बैठका पार पडल्या. यावेळी पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जनसंपर्क व जनहिताची कामं यामध्ये कार्यकर्त्यांच्या योगदानाचा आढावा घेत पुढील रणनिती आखण्यात आली.
याचबरोबर चाकणच्या श्रीम. विजया जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून पुणे अर्बन बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळ सदस्य, बँकेतील सर्व अधिकारी व सर्व सेवक आदींनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रू ५,०१,०००/- रुपयांचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला. सर्वांचे मनापासून आभार मानले.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, शिवाजीनगर येथे जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी उमेदवार निवड प्रक्रियेच्या निमित्तानं महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत स्थानिक नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपापल्या सूचना मांडल्या.
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे जनतेच्या विश्वासावर खरा उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
मुंबईतील वरळी डोम (NSCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय–धोरणांवर विश्वास ठेवून, गडचिरोली जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष श्री. जेसा मोटवानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला.
बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी संबंधित जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाची विद्यमान रचना, स्थानिक राजकीय परिस्थिती, आव्हाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीबाबत सखोल चर्चा करत पक्षाची संघटना अधिक बळकट करावी, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष आ. श्री. शिवाजीराव गर्जे, संघटन सरचिटणीस आ. श्री. संजय खोडके, ओबीसी विभाग प्रमुख श्री. कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख श्री. नाझेर काजी, पक्षाचे आमदार, प्रवक्ते, विविध सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @praful_patel @naikindranil @ChakankarSpeaks @KalyanAkhade
#ncp #maharashtra -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुलंच्या लेखणीत सर्वसामान्यांच्या जीवनाचं भावविश्व उलगडण्याचं अजब कसब होतं. आपल्या अचाट प्रतिभेनं साहित्य, रंगभूमी, अभिनय, पटकथा, दिग्दर्शन व संगीत अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला उत्तुंग कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आपल्या विशाल साहित्यसंपदेद्वारे मराठी मनांवर मोहिनी घालणारे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही. यासंदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही.
हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल. कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन, असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो. -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
आज मुंबईतील वरळी डोम (NSCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर (शहर व ग्रामीण) तसेच बुलडाणा जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीदरम्यान मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. संघटनेची विद्यमान स्थिती, स्थानिक राजकीय समीकरणे, पक्षाची बलस्थाने याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच संबंधित जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सूचना आणि शिफारसींची गांभीर्याने दखल घेत, पक्षविस्तार आणि निवडणूक रणनीतीबाबत मा. प्रफुलजी पटेल यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
या बैठकीदरम्यान मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत देऊळगाव-राजा येथील राष्ट्रवादी (श.प. गटाचे) श्री. विजय खांडेभराड तसेच लोणार येथील काँग्रेसचे नेते श्री. प्रकाश धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचं स्वागत करत पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री मा. श्री. बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आ. श्री. शिवाजीराव गर्जे, पक्षाचे संघटन सरचिटणीस आ. श्री. संजय खोडके, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नाझेर काजी, पक्षाचे मुख्य प्रवक्ते, विभाग प्रमुख, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
@SunilTatkare @praful_patel @babasahebpati1 @naikindranil @ChakankarSpeaks @KalyanAkhade
#ncp #maharashtra #ajitpawar -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
एकमेकांच्या भक्कम साथीनं मजबूत विणू आपण प्रगतीचा धागा, पूर्ण करू दिलेला विकासाचा वादा..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा मानधन स्वरूपात सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत. १९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!
ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
📍मुंबई
#iccwomensworldcup2025
@Dev_Fadnavis @mandhana_smriti @JemiRodrigues @Radhay_21
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज अमरावती शहर व ग्रामीण तसंच यवतमाळ जिल्ह्याचा सविस्तर आढावा जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीदरम्यान जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्याची बांधणी, त्याठिकाणी कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्ते यासंदर्भात माहिती घेण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न, समस्या, तक्रारी व मागण्यांची योग्य पद्धतीनं दखल घेणं, लोकांच्या अडचणींना प्रशासन व आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणं ही अतिशय महत्वाची कामगिरी आहे. ती प्रत्येकानं इमानेइतबारे पार पाडावी, असं आवाहन यावेळी केलं.
या बैठकीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Happy to have met a delegation from ‘Vingroup Asia’ of Vietnam, as we held productive talks regarding collaborating on establishing development projects in Maharashtra in the sectors of healthcare, education, advanced technology and smart townships.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Awareness brings in early detection and subsequent prevention, which is of utmost value when fighting a deadly disease as cancer.
National Cancer Awareness Day aims to raise awareness around cancer, uniting families and communities to fight this menace.
#nationalcancerawarenessday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Shri. CV Raman's contribution to the field of physics is immense, which was duly recognised in the Nobel Prize awarded to him in 1930 for his discovery of the 'Raman Effect'.
Today, on his birth anniversary, we remember the pioneering scientist and his unparalleled contributions.
#c_v_raman -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसेवा, जनहित आणि जनकार्याची भावना सदैव जपणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका राहिली आहे. याच भावनेतून आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत पुणे जिल्ह्यातील पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर सतावणाऱ्या समस्या व प्रलंबित प्रश्न तसंच जनसंपर्कातून त्यावरील उपाययोजना आणि त्या माध्यमातून नवीन लोकांना पक्षाशी जोडणं, पक्ष संघटन आणखी बळकट करणं यावर विचारविनिमय झाला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण सूचना केल्या, मार्गदर्शन केलं.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विकास असा घडवू, कामं अशी करून दाखवू की, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्राला कायमच अभिमान राहील..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज सांगली शहर व ग्रामीण तसंच सोलापूर शहर व ग्रामीण पट्ट्यात सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असलेली स्थिती, याबाबतची माहिती जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आली. पक्षाचा जनसंपर्क विस्तार, जनसामान्यांच्या नजरेत पक्षाची असलेली छबी, संघटनात्मक रचना, आगामी निवडणुकांची तयारी आदी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी इमानेइतबारे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडव्यात, असं आवाहन केलं.
या बैठकीदरम्यान सांगली जिल्ह्यातील विविध पक्षांतील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील नेते श्री.सुधीर खरटमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सातारा आणि धाराशिव या जिल्ह्यांचा आढावा आज आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती जाणून घेण्यात आली. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तळागाळात चाललेल्या तयारीची माहिती घेण्यात आली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.
सदर बैठकीदरम्यान धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील अन्य पक्षातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं तसंच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर सातारा जिल्ह्यातील वैभव आनंदराव जाधव हे MPSC परीक्षेत २७ वी रँक आणून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून स्वागत केलं, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तसंच परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विविध कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला आणखी बळकटी येईल आणि अधिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जनतेसोबतची नाळ अजून मजबूत होईल, असा विश्वास आहे.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबईतील वांद्रे (पू.) येथे नव्या उच्च न्यायालय संकुलाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा आज उत्साहात पार पडला. भारताचे सरन्यायाधीश मा.न्या. भूषण गवई जी यांच्या शुभहस्ते या संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा आहे. न्यायालयाचं विकेंद्रीकरण हा आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला न्याय सर्वांसाठी उपलब्ध व्हावा हा विचार आज प्रत्यक्षात उतरतो आहे, याचा मला आनंद आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. आता वांद्रे (पू.) येथे उभारण्यात येणाऱ्या या नव्या वास्तूमुळे न्यायदान व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी १५ एकर जागा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी १५ एकर जागा मार्च अखेरपर्यंत देण्यात येईल. या प्रकल्पासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्द या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला. न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी आपलं सरकार सदैव कटिबद्ध आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कार्यशील कार्यकर्ते राष्ट्रवादी विचारांशी जोडले जात आहेत, ताकद राष्ट्रवादीची वाढत आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
भिवंडी–निजामपूर, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि मुंबई या भागांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सद्यस्थितीची माहिती आज जिल्हानिहाय आढावा बैठकीत जाणून घेण्यात आली.
या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील स्थानिक पातळीवरील परिस्थितीबाबत माहिती दिली. जनसंपर्क आणि जनसेवा ह्या दोन गोष्टी आपल्याला जनहित कार्यातून साध्य करायच्या आहेत, त्याकरिता सर्वांनी समन्वयानं, एकमेकांना समजून घेऊन कार्यतत्पर राहण्याच्या सूचना केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या विश्वासाच्या बळावर विकास आणि प्रगतीच्या नव्या वाटा निर्माण करण्यासाठी तत्पर आहे.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जिथे विकासाचा मुद्दा आहे, तिथे आपलं सरकार निधी कमी पडू देणार नाही..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीच्या पुढच्या टप्पात ठाणे शहर, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत जिल्ह्यांतील पक्षाची सध्याची स्थिती, पक्ष संघटनाची रचना तसंच आगामी निवडणुकांच्या तयारीचा लेखाजोखा समजून घेण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पक्ष बळकटीकरण, संघटनात्मक विस्तार आणि जनतेशी अधिक घट्ट नातं निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केलं.
जनसंपर्क आणि जनहित ह्या बाबी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं फार महत्वपूर्ण आहेत. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकासाच्या प्रत्येक उपक्रमात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवणं, हेच आमचं ध्येय आहे. लोकांशी संवाद, प्रशासनाशी समन्वय आणि विकासाशी बांधिलकी या तिन्ही माध्यमांतून समाजहित साधण्याचं कार्य सातत्यानं सुरू आहे.
सदर आढावा बैठकीच्या दरम्यान माजी नगरसेवक श्री. प्रसाद वाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पालघर (वसई-विरार), रत्नागिरी आणि मिरा-भाईंदर या भागातील पक्षीय कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, पालघर जिल्ह्यासह वसई-विरार आणि मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पक्षाची संघटनात्मक ताकद, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि पक्षविस्तार या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
संबंधित भागातील पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कार्यअहवालातील सूचना आणि शिफारशींचा पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाकडून सर्वतोपरी सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत मार्गदर्शन करत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, महाराणी ताराबाईंच्या त्याग, शौर्य आणि कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या तसंच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी घडवलेल्या ह्या ऐतिहासिक, अध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर नगरीमध्ये आज दैनिक पुढारीचे प्रमुख, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त 'सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा' आणि 'सिंहायन' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.
या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो. यावेळी आदरणीय मा.श्री. शरद पवार साहेब देखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये पुढारी दैनिकाची स्थापना करणारे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. सत्यशोधक चळवळीचे संस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार अवलंबून त्यांनी या दैनिकाची स्थापना केली आणि आयुष्यभर समाजप्रबोधन, सामाजिक जागृतीचं कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेच्या कठीण परिस्थितीत, मर्यादित साधनसामग्रीमध्ये डॉ. ग. गो. जाधव यांनी आपल्या अविचल निष्ठेनं, राष्ट्रप्रेमानं, असामान्य चिकाटीच्या बळावर पत्रकारितेतील आव्हानांना यशस्वीपणे हाताळलं. आपल्या कार्यानं त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विश्वात आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तनाच्या लाटेत 'पुढारी' हा जनतेचा प्रखर आवाज त्याकाळी ठरला.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रबोधनपर विचारांचा वारसा पुढारीचे सध्याचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी समर्थपणे पुढे नेलेला आहे. पिता-पुत्रांना पद्मश्री प्राप्त होणं ही पत्रकारिता क्षेत्रातील एक प्रेरणादायी घटना आहे. डॉ. प्रतापसिंह यांनी पुढारीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आणि नव्या युगामध्ये त्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र श्री. योगेश जाधव यांनी पुढारी समूहाला 'पुढारी वृत्तवाहिनी' आणि 'टोमॅटो एफएम' माध्यमातून डिजिटल विश्वाशी जोडलं.
डॉ. प्रतापसिंह यांनी पुढारीच्या माध्यमातून गेली अनेक दशकं जनमानसाला दिशा देण्याचं काम तसंच पत्रकारितेद्वारे जनतेच्या हिताला कायमच प्राधान्य दिलं. सत्यनिष्ठा, निर्भीडपणा आणि लोकशाहीवर ठाम श्रद्धा या तीन स्तंभांवर पुढारी वृत्तपत्र उभं राहिलेलं आहे. वास्तुनिष्ठ वार्तांकन आणि साक्षेपी अग्रलेख यावर त्यांचा नेहमीच भर राहिला. पत्रकारितेमध्ये त्यांनी कधीही आपली राजकीय विचारसरणी आणू दिली नाही. व्यवसायापलीकडे जाऊन त्यांनी कायमच सामाजिक हित जपण्याचं काम केलं. त्यामुळेच पुढारी हे केवळ वृत्तपत्र नव्हे, तर ती आज एक संस्था बनलेली आहे.
📍कोल्हापूर
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोम येथे राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. २१,००,०००/- चा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी संचालक मंडळाच्या या संवेदनशील कृतीचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले.
यावेळी संबोधित करताना मा. अजितदादांनी 'राज्यातील अनेक भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे झालेले हे नुकसान केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिकही आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राहूरी बाजार समितीच्या संचालक मंडळाने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता खरंच कौतुकास्पद असून प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यायला हवी, असे आवाहन केले.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अरुण बाबुराव तनपुरे यांच्यासह संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते, प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks @mrhasanmushrif
#ncp #maharashtra -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Heartfelt greetings on Guru Nanak Jayanti.
May the divine teachings of Guru Nanak Dev Ji guide us towards harmony and righteousness.
#gurunanakjayanti -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असलेली ‘मराठी रंगभूमी’ ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाज परिवर्तनाची प्रेरक ताकद आहे. संवादातून विचार प्रकट करणारी, अभिनयातून समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करणारी आणि कलाकारांच्या प्रतिभेनं उजळलेली ही रंगभूमी आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं जिवंत प्रतीक आहे. मराठी नाटकाची ही अभिमानास्पद परंपरा येत्या काळात आणखी वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा!
सर्व कलाकार, रंगकर्मी आणि नाट्य रसिकांना ‘मराठी रंगभूमी दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठी_रंगभूमी_दिन
#marathitheatreday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संकल्प विकासाचा, निर्धार प्रगतीचा - हाच मार्ग महाराष्ट्रवादीचा!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील पक्षाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यानिमित्तानं जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांप्रती दाखवलेल्या निष्ठेबद्दल समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीकरणासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत बारामतीची सुपुत्री कु.वैभवी विजयानंद जगताप हिनं पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवलं. यामुळे वाणेवाडी गावातील पहिली महिला सीए म्हणून वैभवीचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं असून, हे यश तिच्या कुटुंबासह संपूर्ण बारामती तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.
देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत, अवघ्या २२ व्या वर्षी वैभवीनं हे यश संपादन करून बारामतीचा गौरव वाढवला आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचं, चिकाटीचं आणि कुटुंबानं दिलेल्या आधाराचं मला अतिशय कौतुक आहे.
वैभवीला पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आलं. या बैठकीदरम्यान कोल्हापुरातील अन्य पक्षांतील काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत असलेला पक्ष आहे. एकजुटीनं आणि जनतेच्या विश्वासानं आम्ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहोत.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.श्री. छगन भुजबळ जी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, त्यांना लवकर बरं वाटो तसंच ते पुन्हा जोमानं जनकल्याणाच्या कामात कार्यरत होवोत, हीच सदिच्छा.
@ChhaganCBhujbal -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या राज्य सरकारनं जनहितार्थ घेतलेले मंत्रिमंडळातील आजचे महत्त्वपूर्ण निर्णय:
✅ विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
✅ नागपूर येथील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआयटी) विद्यापीठ, नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता. सन २०२५-२०२६ ते सन २०२९-२०३० या कालावधीकरीता दरवर्षी ७ कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरीत करण्यात येणार. संस्था १९४२ मध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली संस्था.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
✅ सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी ( ता. दक्षिण सोलापूर) येथील असंघटित कामगारांच्या प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या गृहप्रकल्पास अनर्जित रक्कम, नजराणा रक्कम व अकृषिक करातून सवलत देण्यास मान्यता.
(महसूल विभाग)
✅ वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ ( ता.मानोरा) येथील मधील १.५२ हे.आर. जागा ग्रामपंचायत, वाईगौळ यांना भक्त निवास व यात्रेकरूंसाठीच्या सोयी-सुविधा उभारण्याकरिता विनामूल्य देण्यास मान्यता.
(महसूल विभाग)
✅ पुणे जिल्ह्यात घोडनदी (शिरुर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय यांची स्थापना होणार. त्यासाठी आवश्यक पद निर्मितीस मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
✅ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार. त्यासाठी आवश्यक न्यायीक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पद निर्मितीस मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
✅ राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी "MAHA ARC LIMITED" बंद करण्यास मंजुरी. केंद्राच्या नॅशनल अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापन केली होती, त्याच धर्तीवर राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३ मध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने, कायदेशीर दृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने, कंपनी बंद करण्याचा निर्णय.
(वित्त विभाग)
✅ ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा. कर्मचाऱ्यांना दिलासा.
(ग्राम विकास विभाग)
✅ मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना बँकाकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता.
(मत्स्यव्यवसाय विभाग)
✅ "हिंद-की-चादर" श्री. गुरुतेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता. नांदेड, नागपूर आणि रायगड जिल्ह्यांतर्गत राज्यभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ९४ कोटी ३५ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता.
(अल्पसंख्याक विकास विभाग)
✅ प्रस्तावित "महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश, २०२५" मधील तरतुदीमधील सुधारणांना मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)
✅ जमीन मुंबई उपनगर जिल्हातील मौजे वांद्रे (ता. अंधेरी) येथील ३० वर्ष कालावधीसाठी एक रुपया नाममाफ वार्षिक भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या ६४८ चौ.मी. शासकीय जमिनीसमोरील ३९५ चौ.मी. भुखंडावर आवश्यक अन्य सोयी-सुविधा पुरविण्यास मान्यता.
(महसूल विभाग)
✅ अकृषिक कर आकारणी तसेच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी व सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यात येणार.
(महसूल विभाग)
✅ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांच्या (Front Line Workers) मानधनात वाढ करण्यास मंजुरी.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
✅ राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
✅ राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणार. आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
✅ परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी.
(नियोजन विभाग)
(1/2)
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
✅ बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता. त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
✅ वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी.
(नगरविकास विभाग)
✅ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता. अभियानात १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्चाऱ्यांचे समकक्ष पदाव समायोजन. सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार. सार्वनजिक आरोगय विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय.
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
✅ चंद्रपूर जिल्हयातील मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्यात येणार. त्यासाठी आवश्यक ३९ शिक्षक व ४२ शिक्षकेतर पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
(2/2)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत धूळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील पक्षाची सध्याची कामगिरी, पुढील योजना तसंच पक्षाचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यावर विचारविनिमय झाला. येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना धरून पक्ष संघटन व जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केलं.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र बंड पुकारून स्वातंत्र्यसमराची ठिणगी पेटवली. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याची अखंड प्रतिज्ञा करत, गावा-खेड्यांतील युवाशक्तीची मोट बांधून, त्यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यास प्रेरित केलं.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतीचा पाया रचणारे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#वासुदेव_बळवंत_फडके
#vasudevbalwantphadke -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या सहज व प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या निधनानं मनोरंजन विश्वातील एक तारा निखळला आहे. त्यांनी वठवलेल्या दमदार भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. मराठी कला क्षेत्रातील त्यांचं योगदान मोठं असून त्यांचं निधन ही कला विश्वाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत परभणी, नांदेड, लातूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यांतील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची स्थिती तसंच आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून तळागाळात चाललेल्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीदरम्यान स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव आणि सूचना ऐकून घेतल्या. तसंच संघटन अधिक सक्षम करण्यासाठी काही आवश्यक त्या सूचना केल्या.
माझा विश्वास आहे की, परभणी, नांदेड, लातूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कार्यकर्ते जनतेशी घट्ट नातं जोडून पक्षाची ताकद आणखी वाढवतील. एकजुटीच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
📍मुंबई
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यांतील पक्षाची सध्याची स्थिती, संघटनात्मक रचना तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधला, सर्वांना संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि पुढील निवडणुकीसाठी उत्साहानं कामं करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर मला विश्वास आहे की, ते जनतेच्या मनात आपली छाप उमटवतील आणि पक्ष अधिक बळकट करतील.
एकजुटीनं आणि जनतेच्या ठाम विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज आहे.
@mahancpspeaks -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आजच्या आयोजित बैठकीत एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना केल्या. एकल महिला भगिनींना घरकुल योजनेच्या अंतर्गत प्राधान्यानं लाभ मिळावा यासाठी निर्देश दिले.
महिला सबलीकरण हे आपल्या समाजाच्या प्रगतीचं मूळ आहे, या दृष्टिकोनातून एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. एकल महिला स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगल्या पाहिजेत, ही राज्य शासनाची भूमिका आहे.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Hard work truly pays off!
Our Indian contingent has made the nation proud by winning 48 medals at the 3rd Asian Youth Games, marking their best-ever performance.
Congratulations on this fine achievement, may you all script more successes in the years to come.
#asianyouthgames2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज आयोजित बैठकीत बारामती (कऱ्हाटी) आणि पुरंदर (दिवे) येथे प्रस्तावित सौर ऊर्जा कॅप्टिव्ह प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील औद्योगिक विकास आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्र अधिक स्वावलंबी आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 'सर्व्हिकल कॅन्सर फ्री पुणे' या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम म्हणजे महिलांच्या आरोग्य संरक्षणाच्या दिशेनं घेतलेलं एक ऐतिहासिक पाऊल आहे.
स्त्रियांमधील सर्व्हिकल कॅन्सर या आजाराविरुद्ध जनजागृती, लसीकरण आणि वेळेवर स्क्रीनिंगच्या माध्यमातून प्रभावी प्रतिबंध करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पात WHO च्या ‘९०-७०-९०’ धोरणाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ९०% मुलींचं लसीकरण, ७०% महिलांचं स्क्रीनिंग आणि ९०% पॉझिटिव्ह स्क्रीनिंग झालेल्या महिलांवर उपचार केले जातील.
या उपक्रमात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जीविका फाऊंडेशन आणि अमेरिका इंडिया फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग आहे. शाळांमधून लसीकरणासोबतच आशा सेविका घराघरांत जाऊन महिलांपर्यंत स्क्रीनिंगची माहिती पोहोचवण्यात येईल.
पुणे जिल्ह्याच्या तीन तालुक्यांमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पुढील काळात संपूर्ण जिल्हा व्यापण्याचं नियोजन आहे. महिलांच्या आरोग्याचं रक्षण, समाजात रोगप्रतिकारशक्ती वाढवणं आणि HPV लसीकरणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन तयार करणं या दृष्टीनं हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल. महिला आरोग्य सक्षमीकरण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा या उद्दिष्टांसाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, असा विश्वास आहे.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) येथे भेट दिली, विविध दंतविषयक उपक्रम आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. 'हेल्दी स्माईल मिशन २०२५' या दूरदर्शी उपक्रमांतर्गत इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) आणि जिल्हा परिषद, पुणे (महाराष्ट्र शासन) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. या करारानुसार औंध, पुणे येथे अत्याधुनिक बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्राची स्थापना केली जाईल. सार्वजनिक दंत आरोग्याच्या क्षेत्रात हा एक क्रांतिकारी टप्पा ठरेल.
'हेल्दी स्माईल मिशन २०२५' अंतर्गत होणारा हा करार राज्याच्या आणि पुण्याच्या दृष्टीनं अत्यंत समाधानकारक बाब आहे. कोरोनानंतर समाजाला डॉक्टरांचं महत्त्व अधिक जाणवलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, ही आजच्या काळाची गरज आहे.
हा करार सार्वजनिक सेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. आजच्या काळात दातांचे आजार झपाट्यानं वाढत आहेत; लहान मुलांच्याही दातांची हानी होत आहे. त्यामुळे दंत आरोग्याबाबत जनजागृती आणि प्रतिबंध आवश्यक आहे.
“आरोग्य म्हणजे जनजागृती, प्रतिबंध आणि सेवा.” आम्ही मिळून एक उत्कृष्ट दर्जाचं दंत संशोधन केंद्र उभारू. या केंद्रासाठी आमच्याकडून कोणतीही अडचण येऊ देणार नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही अशी केंद्रे स्थापन करण्याची इच्छा असल्यास आम्हाला जरूर कळवा, असं इंडियन डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलं.
हे केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावं, यासाठी सरकारतर्फे सर्वोतोपरी सहकार्य देऊ. हा उपक्रम केवळ दंत आरोग्याचा नाही, तर 'आरोग्यदायी महाराष्ट्र' घडवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे.
📍औंध, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
We are the Champions!! 🏆
Fantastic teamwork by our Women's Cricket Team- not just today but throughout the championship.
They truly and rightly deserve to be crowned as the winners.
Shafali Verma and Deepti Sharma's performances both with the bat & the ball were truly outstanding. This historic win will go down as an inspiration for generations to come, both for men and women.
Congratulations on this superb victory- We are so proud of you all!
#iccwomensworldcup2025
#indwvsaw -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठीची निवडणूक पार पडली.
भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर खेळांच्या माध्यमातून आपल्या देशाचा गौरव वाढवण्याचे प्रयत्न कायमच केले आहेत. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.
राज्यातील खेळाडूंना अधिक संधी, सुविधा आणि प्रोत्साहन मिळावं, यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जिल्हा नियोजन समिती (DPC) मधून किमान १ टक्के निधी खेळासाठी वापरता येतो, त्याचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन यावेळी केलं.
राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून आगामी काळात खेळासाठीची आर्थिक तरतूद वाढवण्यात येईल. आपले उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी जनतेच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशाच्या क्रीडा नकाशावर अग्रस्थानी राहील, असा मला विश्वास आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बहरीन येथे पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये कबड्डी प्रकारात मुलींच्या संघात भांडुप येथील खेळाडू कु. सेरेना म्हसकर आणि मुलांच्या संघात कु. प्रसाद दिघोळे ह्या दोघांनी भारताचं प्रतिनिधित्व करताना देदीप्यमान कामगिरी बजावत सुवर्ण पदक आपल्या नावी केलं. आज दोन्ही युवा खेळाडूंनी माझी सदिच्छा भेट घेतली, मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जात आहेत, याबाबत त्यांना आश्वस्त केलं.
#asianyouthgames2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आता नाशिक आणि अमरावतीत सुद्धा सी-ट्रिपल आयटी केंद्र..!
नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आलं आहे, याचा मला फार आनंद आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग कौशल्यांच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे. सी-ट्रिपल आयटी केंद्रांमुळे नाशिक आणि अमरावतीतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि उद्योगसंलग्न प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळेल. स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळाल्यानं रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥
तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा !!
वारकरी संप्रदायाच्या उदात्त शिकवणीचा आणि मानवतेच्या परस्पर बंधुभाव व एकात्मतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या ‘कार्तिकी एकादशी’च्या पर्वानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
महाराष्ट्राचा अखंड भक्तिभाव, आध्यात्मिकता आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा युगानुयुगे अधिकाधिक फुलत राहो, हीच विठूमाऊलीच्या चरणी विनम्र प्रार्थना!
#कार्तिकी_एकादशी
#kartikiekadashi -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संत शिरोमणी नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची शिकवण देशभर पोहोचवून समाजाला प्रेम, श्रद्धा आणि समानतेचा अमूल्य वारसा दिला. आपल्या कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा विस्तार करणारे संत परंपरेतील महान व्यक्तिमत्व संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#नामदेव_महाराज
#namdevmaharaj -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हेच आमचं एकमेव ध्येय..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
श्री भैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट आणि सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कामांचं भव्य उद्घाटन, भूमिपूजन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिलो.
या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासन वचनबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. पाणी, वीज, रस्ते, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा प्रत्येक गावात पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे.
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे. म्हणूनच शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पिकविविधता, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंग साखळी मजबूत करण्यासाठी शासनाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील विकासकामांमुळे जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल आणि गावांच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या श्रमांचा सन्मान राखण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू या, असं आवाहन केलं.
📍निंबुत, बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपण एक परिवार असून एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे.. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.. पक्ष संघटनेतूनच तुम्हाला मला ताकद मिळते..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सन २०२५-२६ च्या ६४ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना संबोधित केलं.
या प्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबत मार्गदर्शन केलं. तसंच कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असा विश्वास दिला.
साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, या उद्योगाच्या माध्यमातून लाखो शेतकरी, कामगार आणि उद्योजकांच्या उपजीविकेचा प्रश्न जोडलेला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी पारदर्शक व कार्यक्षम कारभार करून शेतकऱ्यांचा विश्वास जपावा, हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधोरेखित केलं. हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढ यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ऊस शेतीत नवं तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज असल्याचं यावेळी नमूद केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अधिकचा भाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रीय स्तरावरून एनसीडीसीसारखी संस्था उभारली जाणार आणि राज्यासह देशातील सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक फायदा उचलण्याची संधी मिळणार..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवीन हार्वेस्टर मशीन व इनफिल्डर पूजन सोहळा तसंच दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. च्या सन २०२५-२६ या ६९ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झालो.
या कार्यक्रमात कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, कामगार व कार्यकर्त्यांची उपस्थिती उत्साहवर्धक होती. सर्वांनी एकत्र येऊन सहकार क्षेत्राची परंपरा आणि विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ऊस उत्पादकांना वेळेवर देयक मिळावे यासाठी नवनवीन उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्या दृष्टिकोनातून कारखान्यांनी सुद्धा आपला कारभार नियोजनबद्ध ठेवण्याच्या सूचना केल्या. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. आपल्या शेत कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब शेतकरी बांधवांनी करावा, असं आवाहन केलं. ऊस उद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे, प्रमुख जिल्हा मार्ग ८४ ते भवानीनगर दरम्यान जोडरस्त्याच्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलो. सोबतच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले या महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं.
त्यानंतर श्री छत्रपति सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं. १ चा ७० वा आणि युनिट नं. २ चा ९ वा, ऊस गळीत हंगाम शुभारंभ तसंच गव्हाण पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी मोठ्या संख्येनं ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या हंगामात उत्पादन क्षमता, शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऊस शेती, व्यवस्थापकीय नियोजन यांचा समन्वय साधला जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ऊसाची काळजी करू नये. त्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी आपण केली आहे, आश्वस्त रहा, असा विश्वास ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला.
📍भवानीनगर, ता. इंदापूर -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Remembering India's first and only woman Prime Minister Smt. Indira Gandhi, on her death anniversary.
#indiragandhi -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel worked tirelessly for national unity and integrity, laying the strong foundation of a united nation.
On his 150th birth anniversary, celebrated as #nationalunityday, paying tributes to the great unifier whose determination turned the vision of a united India into reality.
#sardarvallabhbhaipatel -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the farmers delegation regarding loan waiver.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar and Cabinet Minister were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कर्जमाफी संदर्भात प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में किसान ऋण माफी के संबंध में प्रतिनिधिमंडल के साथ बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडल के सदस्य उपस्थित थे.
🕘 8.55pm | 30-10-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | रा. ८.५५ वा. | ३०-१०-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#maharashtra #devendrafadnavis #mumbai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Outstanding performance by our Women in Blue! 🇮🇳
Chasing a mammoth score in the semi finals is never easy, yet our team displayed skill, temperament and teamwork against defending champions Australia, especially Jemimah Rodrigues and Harmanpreet Kaur and their strong batting performances.
Heartiest congratulations to the entire team and best wishes for the finals!
#indvsaus
#iccwomensworldcup2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपला आजचा युवक उद्याचं भविष्य आणि शेतकरी हा सुरळीत जनजीवनाचा आधार आहे. त्यामुळं युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अमरावती येथे दिवंगत नेते रा.सू. गवई अर्थात दादासाहेब गवई यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारक उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.श्री. भूषण गवई जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित केलं. दादासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं.
अमरावतीनं आजवर आपल्या देशाला एक राष्ट्रपती, एक सरन्यायाधीश, ४ राज्यांना राज्यपाल मिळवून दिले, ही अभिमानाची बाब आहे. विश्राम बेडेकर, गो.नी. दांडेकर, अरुण साधू यांच्यासारख्या महान साहित्यिकांच्या माध्यमातून साहित्यिक वारसा अमरावतीला लाभलेला आहे. विशेष म्हणजे दादासाहेबांचे चिरंजीव आणि देशाचे सरन्यायाधीश मा.न्या. भूषण गवई जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम आयोजित झाला, ही आनंदाची बाब आहे. येत्या ३ वर्षांनी दादासाहेबांचा जन्मशताब्दीचा वर्ष सुरु होणार असून तो वर्ष विविध कार्यक्रम राबवून साजरा केला जावा, असं मत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडलं.
दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेल्या आंबेडकरी विचारांचा जागर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी केला पाहिजे, तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आदरणीय दादासाहेबांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला साजेसं असं हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे, याचा मला आनंद आहे. सदर स्मारकाचं काम हे अतिशय उत्तम पद्धतीनं केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, कंत्राटदार तसंच अन्य तमाम कामगारांचं मी कौतुक करतो. त्याचप्रमाणे आपल्या कलेतून दादासाहेबांचं हुबेहूब पुतळा साकारणाऱ्या मूर्तिकारांचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन करतो.
दादासाहेब राज्यासह संपूर्ण देशात आवडीचं असं व्यक्तिमत्त्व होते. कोणतंही राजकीय पाठबळ नसताना कोणालाही हेवा वाटावा अशा पद्धतीनं दादासाहेबांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. दादासाहेबांनी ३० वर्षे आमदारकी, १३ महिने लोकसभा, ६ वर्षे राज्यसभा तसंच पुढे बिहार, केरळ, सिक्कीम ह्या राज्यांच्या राज्यपालाचं पद भूषवलं. त्यांनी शेवटपर्यंत आंबेडकरवादी विचार सोडले नाहीत. राजकीय क्षेत्रात अनेक पदं भूषवून देखील त्यांनी आपल्यातील साधेपण कायम जपलं. राजकारणात राहून मोठ्या प्रमाणावर त्यांनी समाजकारण केलं. आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाच्या बळावर दादासाहेबांनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं. सर्वधर्मसमभावाचं प्रतील मानल्या जाणाऱ्या नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारकाच्या कामाला दादासाहेबांनी गती दिली. दादासाहेबांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे आदर्शवत विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील, याची मला खात्री आहे.
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं. आज महाराजांच्याच विचारांवर आपण वाटचाल करत आहोत. त्याचप्रमाणे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची शिदोरी आपल्यासोबत आहे. यवतमाळ येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना माझ्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री. प्रवीणभाऊ देशमुख, श्री. साहेबराव जुनघरे, श्री. अरुणभाऊ राऊत, श्री. दिनेश गोगरकर, श्री. सतीश भोयर, श्री. सुनील भेले, श्री. आनंदराव जगताप आणि श्रीम. नंदिनीताई दरणे यांसह मान्यवरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्रात झालेलं मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या स्थितीची गंभीर दखल आपल्या राज्य सरकारनं घेतली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असून, नुकसानभरपाईसह सर्व आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच खर्च झाला पाहिजे. कामाचा दर्जा उच्च दर्जाचा असणं अत्यावश्यक आहे, हाच आमचा उद्देश आहे.
शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं अधोरेखित केली. महायुती सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शक्य तिथं पांदण रस्त्यांची कामं प्राधान्यानं करण्यात येतील; याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं कामाला लागावं, असं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. दिलीप वळसे पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!
@Dwalsepatil -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पाऊल पडती पुढे प्रगतीकडे, वाट आपली निघाली शाश्वत विकासाकडे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'इंडिया मेरीटाईम वीक २०२५' अंतर्गत आयोजित 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह' हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल मा.श्री. आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो.
या माध्यमातून भारताच्या सागरी क्षमतांचा, व्यापाराच्या संधींचा आणि नील अर्थव्यवस्थेच्या (Blue Economy) विकासाचा सखोल आढावा घेण्यात आला. सागरी क्षेत्रातील नव्या गुंतवणुकींना चालना देत, किनारपट्टी राज्यांसाठी शाश्वत विकासाचं नवीन क्षितिज उघडणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास आहे.
@narendramodi @maha_governor @Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'पुणे ग्रँड टूर २०२६' या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल.. युवा वर्गाला आरोग्यदायी जीवनशैलीची गोडी लागेल..!
#punegrandtour2026This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी परिवार आपला, समविचारी आपण सारे.. एकजुटीच्या बळावर परिवर्तन घडवू, राज्याचा सर्वांगीण विकास साधू!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
'बजाज पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या लोगो आणि जर्सीच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहिलो. ही स्पर्धा केवळ एक क्रीडा उपक्रम नसून महाराष्ट्राच्या तंत्रशक्तीचं, आरोग्य प्रेमाचं आणि एकतेचं प्रतीक ठरणार आहे.
२०२६ मध्ये ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दिशेनं आपलं राज्य सज्ज होत आहे. त्या दृष्टिकोनातून ही सायकल स्पर्धा त्या प्रवासातील एक भक्कम टप्पा ठरेल. ४३७ किमी लांबीची ही शर्यत सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाटांतून होणार असून राज्यातील युवकांना आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनशैलीकडे प्रेरित करेल.
या उपक्रमामुळे ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसंच सुमारे १० हजार रोजगार निर्मितीचं दालन देखील खुलं होईल. पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि सायकल संस्कृतीचा प्रसार घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या उपक्रमामागील कल्पक नेतृत्वाबद्दल पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो.
@Dev_Fadnavis @PuneGrandTour
#punegrandtour2026 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नीती आयोगाच्या Frontier Tech Hub तर्फे आयोजित 'Reimagining Manufacturing – India’s Roadmap to Global Leadership in Advanced Manufacturing' या महत्त्वपूर्ण रोडमॅपच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत सहभागी झालो.
भारताला उत्पादन क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवून देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डेटा ड्रिव्हन इकॉनॉमी आणि नवे तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि शाश्वत विकास साध्य करण्याचा यामागील दूरदृष्टीपूर्ण हेतू आहे.
भारताला 'Factory of the World' पासून 'Innovation Engine of the Global Economy' बनवण्याच्या दिशेनं हे पाऊल नक्कीच ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी ठरेल, असा विश्वास वाटतो.
📍यशदा, पुणे
@Dev_Fadnavis @NITIAayog
#maharashtra #advancedmanufacturing -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आशियाई युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताचा आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी भांडूपची कु. सेरेना सचिन म्हसकर हिचं मनःपूर्वक अभिनंदन!
सेरेनानं तिच्या मेहनतीतून, शिस्तीतून आणि चिकाटीतून नव्या पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. कबड्डीसारख्या पारंपरिक खेळात जागतिक पातळीवर यश मिळवणाऱ्या सेरेनाला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
#asianyouthgames2025 #kabaddi #maharashtrasports -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे सहकारी, वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद आबा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@makrandpatil99 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सर्व बाबींवर विधायक व परिणामकारक चर्चा झाली तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केलं.
या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. सदर बैठकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद आबा पाटील यांना त्यांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात यवतमाळ, पालघर, मुंबई आणि राज्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा प्रमुख या नात्यानं सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पक्षाच्या विचारांवर, नेतृत्वावर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याच्या आमच्या निर्धारावर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक पार पडली. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठानं सादर करावा, असे निर्देश यावेळी दिले.
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्य व्यवसाय विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तसंच इंदापूरपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता अंदाजे ११७ टीएमसी इतकी आहे. उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे ७० ते ८० किलोमीटर पर्यंत पसरलेले असून या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. इथं गोड्या पाण्यातील निर्यात करण्यायोग्य मासे उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय झाल्यास तेथील मत्स्यबीज संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणं शक्य होईल. याचबरोबर इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणावर शेततळे असल्यानं याचा उपयोग शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीसाठी करता येईल.
📍मंत्रालय, मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या 'नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०' या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, हवामान बदलाच्या परिणामांपासून शेतीचं संरक्षण करणं आणि टिकाऊ शेती पद्धती विकसित करण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला नवी दिशा आणि बळ देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास आहे.
📍मंत्रालय, मुंबई
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या राज्य सरकारनं घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय :
✅ विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील १६ संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत १०० उपक्रम निश्चित.
(नियोजन विभाग)
✅ सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्य शासनाच्या ५० टक्के हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता.
(गृह विभाग)
✅ सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार. सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) / Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach) अशा पदनाम विस्तारास मान्यता. याशिवाय परकीय थेट गुंतवणूक (FDI), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) आणि परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs) अशा तीन नवीन कार्यासनांच्या निर्मितीस आणि या कार्यासनांसाठी आवश्यक पदांना मंजुरी.
(सामान्य प्रशासन विभाग)
✅ महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.
(नगरविकास विभाग)
✅ ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास मान्यता.
(ग्रामविकास विभाग)
✅ धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय होणार. या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.
(विधि न्याय विभाग)
✅ वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाऊंडेशन, रिसोड यांना मौजे करडा (ता. रिसोड) येथील २९.८५ हे. आर जमीन. या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील ३० वर्षाकरिता नुतनीकरणास मान्यता.
(महसूल विभाग)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘वस्त्रहरण’ नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ओळख देणारे, ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर यांच्या निधनानं मराठी रंगभूमीसह मालवणी नाट्यजगतानं प्रतिभावान, संवेदनशील आणि सर्जनशील नाटककार गमावला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर हे मराठी रंगभूमीवरील प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक होते. त्यांनी मालवणी बोलीतील अस्सल जीवन, लोकसंस्कृती, विनोद आणि भावविश्व आपल्या लेखणीतून रंगमंचावर जिवंत केले. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवा आयाम देत प्रादेशिक भाषेतील नाटकांना मुख्य प्रवाहात स्थान मिळवून दिलं. त्यांची नाटकं ही केवळ मनोरंजन करणारी नव्हती, तर समाजमनाला स्पर्श करणारा आरसा होती.
ग्रामीण माणसाच्या जगण्यातील वेदना, विनोद आणि संघर्ष त्यांनी अत्यंत वास्तवतेनं मांडलं. त्यांच्या निधनानं आपण ज्येष्ठ नाटककार गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीत प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नांदेड जिल्हा हा शेतीप्रधान प्रदेश असून सिंचनाच्या सोयीसाठी सुरू असलेली ही सर्व कामं पूर्ण झाल्यास परिसरातील शेती, अर्थव्यवस्था आणि रोजगार यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही. या बैठकीच्या दरम्यान लोअर मानार प्रकल्पाच्या कॅनॉल लाईनिंगचं तसंच विष्णुपूरी प्रकल्पाच्या मारतळा भागातील कॅनॉल लाईनिंगचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जायकवाडी प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत धोंड प्रकल्पासाठी आवश्यक निधी लवकर उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. अंतेश्वर येथील बंधाऱ्यातून लोहा मार्गे लिफ्टद्वारे अहमदपूर (जि. लातूर) येथे देण्यात येणाऱ्या पाण्यापैकी लोहा परिसरालाही नियमित पाणीपुरवठा सुरू रहावा, याबाबत ठोस चर्चा झाली.
त्याचप्रमाणे बैठकीत शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या अंतर्गत डेरला व किवळा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी कामाला आवश्यक गती देण्याबाबत चर्चा झाली. सोबतच कंधार तालुक्यातील चिखली–हाळदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर अप्पर पैनगंगा कालव्याच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी लवकरात लवकर मिळवून ही कामं पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. सोबतच लेंडी आंतरराज्य (धरण) प्रधान प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन तसंच पुनर्वसित गावांतील विकासकामं लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सर्व प्रकल्पांमुळे नांदेड, लातूर आणि मराठवाडा विभागातील हजारो शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा लाभ होईल. जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पाला गती देणं आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करणं, हीच आपल्या सरकारची मुख्य भूमिका आहे.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या दर्जेदार कामगिरीनं लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं, अशी कामं आपण करू.. माणसाला माणुसकीनं जोडू आणि पुढे जात राहू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह जी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांच्या उद्घाटन व वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो.
या उपक्रमामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना नवसंजीवनी मिळेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता, सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. मत्स्यव्यवसाय हा किनारपट्टीवरील लाखो कुटुंबांचा प्रमुख आधार असून, या योजनेंतर्गत त्यांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे. मत्स्य व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि राज्याच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
@AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🌊 CM Devendra Fadnavis at the inauguration of 'India Maritime Week 2025' at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah.
Union Minister Sarbananda Sonowal, Gujarat CM Bhupendra Patel, Odisha CM Mohan Charan Majhi, Goa CM Dr. Pramod Sawant, Union MoS Shantanu Thakur, DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar and other dignitaries are present.
🌊केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'इंडिया मेरीटाईम वीक 2025' चे उदघाटन.
यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित.
🌊 केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'इंडिया मैरीटाइम वीक 2025' का उदघाटन।
इस अवसर पर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशा के मुख्यमंत्री मोहन चरण माझी, गोवा के मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकुर, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार एवं अन्य मान्यवर उपस्थित।
🕚 10.45am | 27-10-2025📍Mumbai | स. १०.४५ वा. | २७-१०-२०२५📍मुंबई.
@AmitShah @Dev_Fadnavis @sarbanandsonwal @Bhupendrapbjp @MohanMOdisha @DrPramodPSawant @Shantanu_bjp @mieknathshinde @AjitPawarSpeaks @imw_gov
#maharashtra #devendrafadnavis #hminauguratesimw2025 -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडिया मेरीटाइम वीक 2025' येथील प्रदर्शनाची पाहणी केली.
@AmitShah @Dev_Fadnavis @imw_gov
#maharashtra #devendrafadnavis #hminauguratesimw2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपण आपल्या मायमराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले किल्ले हे आपल्या इतिहासाचं, शौर्याचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहेत. या वारशाचं जतन हीच आमची जबाबदारी आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारची प्रत्येक कृती ही महाराजांच्या विचारांना वंदन आहे.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
एकजुटीनं राष्ट्रवादी परिवार वाढवू, राज्याला शाश्वत विकासाकडे नेऊ..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज वाई येथे अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. समाजहित आणि विकासाच्या मार्गावर चालत आपल्या कार्यक्षमतेनं आणि जिद्दीनं हे सर्वजण पक्षाची ताकद अधिक वाढवतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज वाई तालुक्यातील पसरणी येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची पाहणी केली आणि नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या स्मारकाच्या रूपानं महाराष्ट्राच्या लोककलेच्या समृद्ध परंपरेला नवं बळ मिळेल तसंच शाहीर साबळे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अधिक परिणामकारकपणे घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. कलावंत आणि प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक त्या आधुनिक सुविधा इथं उपलब्ध होणार आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
या सोहळ्याच्या निमित्तानं प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाद्वारे निर्मित ‘पद्मश्री शाहीर साबळे चरित्र ग्रंथा'चं प्रकाशन देखील पार पडलं. हे शाहीरांच्या कार्याला सन्मान देणारं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी आपण मराठी अधिकाधिक बोलली पाहिजे, असं देखील आवाहन उपस्थितांना केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज वाई तालुक्यातील मौजे एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची पाहणी केली. तसंच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात सहभागी झालो.
या स्मारकाद्वारे शाहीर साबळे यांनी प्रस्थापित केलेल्या लोककलेच्या समृद्ध परंपरेला नवी दिशा मिळेल. कलावंत आणि प्रशिक्षणार्थींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत हे स्मारक राज्यातील सांस्कृतिक चैतन्य अधिक दृढ करेल. त्याचप्रमाणे शाहीर साबळे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला समृद्ध करणारा ठरेल, असा विश्वास आहे. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Saddened by the news of popular actor Satish Shah's passing away.
He played many memorable roles, leaving a mark on the audiences' hearts.
My thoughts and prayers are with his family members, loved ones and fans. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संपूर्ण नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा संकल्प..!
आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्तानं विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, अनेक माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थितांना संबोधित करताना पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.
देगलूरची भूमी ही मराठवाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा ही सातत्यानं जपली गेलेली आहे. शिव-शाह-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या बळावर आम्ही सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय. समाजा-समाजात, धर्म-प्रांतात द्वेष बाळगून आपण पुढे जाऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. याउलट जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. देगलूरकरांनी नेहमीच या विचारांना जपलेलं आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कसून कामाला लागलं पाहिजे. अतिवृष्टीमुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारनं ३२ हजार कोटींची आर्थिक मदत देऊ केली आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं जी निवेदनं माझ्यापर्यंत पोहोचली आहेत, त्यांची दखल घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन कामं मार्गी लावली जातील. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, त्यामुळे निश्चिंत रहा, असा विश्वास यावेळी दिला.
मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं सगळीकडे विकास पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. विकासासाठी निधी कुठे कमी पडू देणार नाही, असा खात्री दिली. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शेतकरी बांधवांना पुन्हा उभं करणं आणि लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणं, हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे हजरत शाह जियावोद्दीन रफाई दर्ग्याचे दर्शन घेतले, चादर चढवली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री. शिरीष देशमुख गोरठेकर आणि श्री. कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५०० कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली, ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. मी तमाम नव्यानं पक्षात आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री दिली. त्याचबरोबर तरुण शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीचं प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होईल.
आज पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही तितक्याच सन्मानानं स्थान दिलं जाईल, वागवलं जाईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, अशा भावना व्यक्त केल्या. उमरीसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होत आहे, ही समाधानाची बाब आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभं राहू, सर्वांच्या समस्या व अडचणी दूर करू, अशी हमी दिली. -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
मा. अजितदादांचा ‘जनसंवाद’ म्हणजे मानवी जीवन अधिक सूसह्य करण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत सर्वसमावेशक हिताला प्राधान्य देणारा उपक्रम!
@AjitPawarSpeaks
#जनसंवाद #ncp #maharashtraThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भाऊबीज हा बहीण-भावाच्या स्नेह, प्रेम आणि विश्वासाचा असा पवित्र नात्याचा सण आहे. या सणातून नात्यातील आपुलकी आणि जिव्हाळा अधिक दृढ होतो. प्रत्येक भावाच्या आयुष्यात बहिणीच्या स्नेहाचा गोडवा सदैव नांदो आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
#भाऊबीज
#bhaubeej -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांच्या निधनानं देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रानं एक दूरदृष्टी असलेलं प्रगल्भ व्यक्तिमत्व गमावलं आहे. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या संशोधन आणि दूरदृष्टीमुळे भारतानं अवकाश क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली. १९७० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात दूरदर्शन पोहोचलं आणि माहितीचा नवा युगारंभ झाला. विज्ञान आणि समाजाला जोडणाऱ्या त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा मिळत राहील. मी डॉ. चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री मा.श्री. अमितजी शहा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
@AmitShah -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील जनतेला दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावली पाडवा म्हणजे नात्यांतील प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर विश्वास दृढ करण्याचा दिवस, तर बलिप्रतिपदा म्हणजे न्याय, समता आणि कल्याणाचे प्रतीक असलेल्या बळीराजाच्या सुवर्णराज्याची आठवण करून देणारा मंगल दिन आहे. या दीपोत्सवाच्या शुभप्रसंगी घरोघरी सुख, समृद्धीचा प्रकाश उजळो आणि बळीचे राज्य येवो, हीच मनोकामना!
#दीपावली_पाडवा
#बलिप्रतिपदा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात..!
'दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) तसंच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक घरकुलं विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. यानिमित्तानं बीडकरांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालं आहे. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यानं संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अधिकचे उद्दिष्ट मंजूर करून देऊन पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी राज्यातील सर्वसामान्य कुटुंबांच्या घरकुल स्वप्नाला नवं बळ दिलं आहे. राज्य सरकारतर्फे त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर यावं, हे आमचं पुढचं ध्येय आहे. यासाठी ही योजना आणखी वेगानं आणि प्रभावीपणे राबवण्यात येईल. बीड जिल्ह्यातील कोणतंही पात्र कुटुंब हक्काच्या घराशिवाय राहणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
@narendramodi -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, आमचे मित्र श्री. राजीवदादा देशमुख यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे.
राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटत, सतत जनसंपर्क ठेवत आपलं आयुष्य लोकसेवेला वाहून घेतलं. त्यांची साधी आणि लोकाभिमुख कार्यशैली ही अनेकांसाठी प्रेरणादायी राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मानवंदना आपल्या पोलीस जवानांच्या शौर्याला, धैर्याला, त्यागाला आणि बलिदानाला..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
With the demise of Shri. Asrani ji, a chapter in Indian cinema has come to an end. His immense contribution to our movies will always be cherished and remembered.
My deepest condolences to his family members, friends and fans in this difficult time. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र, पाषाण येथे आजच्या ‘पोलीस स्मृतिदिना’निमित्त देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’ देत भावपूर्ण आदरांजली वाहिली.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चीनच्या हल्ल्याचा शौर्यानं प्रतिकार करत सी.आर.पी.एफ.च्या १० जवानांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्या या अद्वितीय शौर्यस्मरणार्थ दरवर्षी हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारत माता की जय! 🇮🇳
#policecommemorationday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
On Police Commemoration Day, we pay our respects to all those bravehearts who have sacrificed their lives in the line of duty.
Their dedication and exemplary service will be always remembered.
#policecommemorationday -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
सौख्य, मांगल्य आणि समृद्धीचा मंगलमय संगम म्हणजे लक्ष्मीपूजनाचं पावन पर्व. ह्या मंगलमय समयी आपल्या जीवनातील आरोग्यसंपदा व धनसंपदेचा आलेख सदैव वृद्धिंगत व्हावा आणि दीपावलीच्या तेजोमय प्रकाशात अंध:काररूपी विघ्नं, अडी-अडचणी व नकारात्मकता नष्ट व्हावी, हीच सदिच्छा!
#लक्ष्मी_पूजन
#laxmipujan -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माजी मंत्री श्री. महादेवराव शिवणकर यांच्या निधनानं विदर्भाच्या विकासाचा ध्यास घेतलेलं एक समर्पित नेतृत्व आपण गमावलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
श्री. महादेवराव शिवणकर हे लोकसभेत काही काळ आणि अनेक वर्षे विधिमंडळातील आमचे सहकारी होते. कृषी आणि सिंचन क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळली होती. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. धर्मरावबाबा आत्राम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा.श्री. अमित शहा जी यांनी सन २०२५- २६ या वर्षातील राज्य आपत्ती मदत निधीचा महाराष्ट्रासाठीचा केंद्रीय वाटणीचा दुसरा हप्ता १ हजार ५६६ कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील बाधित झालेल्या लोकांना तत्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
या मदतीमुळे ऐन दिवाळीत पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय मदतही आता वेगानं करता येणार आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. या मदतीबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शहा जी यांचे मनापासून आभार मानतो.
@narendramodi @AmitShah -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@shelkesunilanna -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो, हीच सदिच्छा.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पशुधनाचं अतोनात नुकसान झालं आहे. या संकट काळात आपल्या शेतकरी व पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांचं जीवन पुन्हा उजळवण्यासाठी सर्वांनी एकदिलानं प्रयत्न करुया. अतिवृष्टी व पूरबाधित बांधवांना मदत करून त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याची महाराष्ट्राची सामाजिक परंपरा कायम राखूया.
दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उजेड नव्हे, तर मनातील अंधार दूर करण्याचा संकल्प आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय आणि अनिष्ट रुढी-प्रथांचा अंधार दूर करून विवेक, ज्ञान व प्रगतीचा प्रकाश आपल्या जीवनात आणूया. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सौहार्द यांची भावना दृढ करण्याचा हा सण आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी प्रगती, विकास आणि सहकार्याच्या वाटेवर एकत्र चालावं, अशी अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळीच्या या प्रकाशासोबत आपल्या राज्यात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरु व्हावा, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
#diwali -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
दोन दिवसांपूर्वी राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं दुःखद निधन झालं. सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारं नेतृत्त्व अशी त्यांची ओळख होती. आज बुऱ्हाणनगर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कर्डीले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, विचारपूस केली आणि सहसंवेदना व्यक्त केल्या. शिवाजीरावांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मानवी मूल्यांचा सन्मान, लोककल्याण आणि त्याच भावनेतून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार आम्ही केला आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अतुलनीय असं कार्य साधायचं आहे.. लोकसेवेतून लोकशाहीला बळ द्यायचं आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीनं उपचार मिळावेत तसंच अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माता-भगिनींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात राज्य शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभं आहे.
या अपघातातील जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पिंपळी येथे उभारण्यात आलेल्या भव्य ग्रामसचिवालय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या नूतन वास्तूमुळे गावकऱ्यांना सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली सुलभपणे उपलब्ध होतील.
या प्रसंगी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. विजय काळे यांनी पूरग्रस्तांसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. त्याचप्रमाणे श्री. सुयोग सातपुते यांनी ५१ हजार रुपये ऑनलाइनच्या माध्यमातून दिले. दोघांचे आभार मानले.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती येथे पार पडलेल्या बैठकीत सहकार क्षेत्रातील नव्या वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. कृषी क्षेत्रानंतर आता सहकार क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून संस्थांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेनं ठोस पावलं उचलण्यात येणार आहेत. निर्णय प्रक्रियेत वेग, डेटा व्यवस्थापनावर नियंत्रण, व्यवहारातील पारदर्शकता तसंच फसवणुकीची त्वरित ओळख आणि प्रतिबंध यांसारखे अनेक फायदे साध्य करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
क्रीडा क्षेत्राला विकासाच्या पायरीवर चढवू.. चांगल्या खेळाडूंना प्रगतीसाठी वाट मोकळी करून देऊ..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती येथील शासकीय विश्रामगृहाला भेट दिली, परिसरातील स्वच्छता, सुविधा आणि देखभालीची पाहणी केली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी विविध प्रश्न आणि अडचणी मांडल्या. त्या सर्वांचं म्हणणं बारकाईनं ऐकून घेतलं, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यादरम्यान सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यंदाचा दीपोत्सव स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सुनेत्रा, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या प्रेमळ सहवास आणि भक्कम पाठबळामुळे प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोरं जाण्याची ताकद मला मिळत राहिली आहे. हेच मुख्य कारण आहे की, मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आजवर निरंतर वाटचाल करू शकलो. माझ्या यशाचं गमक हे तुमच्या संगतीत आहे. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@SunetraA_Pawar -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राज्यातील जनतेला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान धन्वंतरीच्या कृपादृष्टीनं आपणा सर्वांना सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, आर्थिक सुबत्ता, ऐश्वर्य लाभो, अशी प्रार्थना करतो. बळीराजाला सुगीचे दिवस येवो, युवकांच्या हाताला काम मिळो, हीच सदिच्छा.
#dhanteras -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज दौंडमध्ये कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर केला, त्यांचं मनापासून स्वागत केलं. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. सर्वांना पर्यावरणपूरक आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शेतकरी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणं ही काळाची गरज आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षमतेनं काम करावं तसंच तरुणांमध्ये वाढणारे मोबाईल आणि ड्रग्सचं व्यसन रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असं सूचित केलं.
ज्या पद्धतीनं पिंपरी-चिंचवडमध्ये जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार न करता आम्ही विकास साधला; अगदी त्याचप्रमाणे आता दौंडच्या विकासालाही गती द्यायची आहे. दौंडमधील नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, नद्या आणि पर्यावरणाचं रक्षण हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, असं स्पष्ट सांगितलं.
आजच्या कार्यक्रमात श्री. स्वप्नील शहा यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झालो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामती पोलीस पाटील संघटनेतर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी ४० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यासाठी त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी नागरिकांना पर्यावरणपूरक आणि स्वच्छ-सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे नद्यांचं प्रदूषण रोखण्यात, कचऱ्याच्या योग्य नियोजनात आणि स्वच्छतेच्या कामात प्रत्येकानं हातभार लावावा, असं देखील आवाहन केलं.
शहरातील गुन्हेगारी, अतिक्रमण आणि अस्वच्छता टाळण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचं यावेळी नमूद केलं. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. कचरा टाकणाऱ्यास दंड आणि अस्वच्छता पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल, अशी माहिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली.
फूटपाथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत. ते स्वच्छ व मुक्त ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संत सावता माळी यांच्या शिकवणीप्रमाणे कर्तव्यनिष्ठ, परिश्रमी आणि प्रामाणिक राहून काम सर्वांनी केलं पाहिजे, असं सूचित केलं. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर शैक्षणिक संकुल येथे आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक भर देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
📍बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामतीतील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर शैक्षणिक संकुल आणि एडीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे भेट दिली. यावेळी विविध खेळांच्या स्पर्धांचा थरार अनुभवत उत्साहानं खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या जिद्दीचं आणि खेळाडू वृत्तीचं मनापासून कौतुक केलं.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानिमित्तानं सर्वांना वसुबारसच्या शुभेच्छा दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपलं आहे.
आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे. आमदार, राज्यमंत्री तसंच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासलं.
जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. शिवाजीरावांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. केंद्रातील विविध विभाग, प्रयोगशाळा आणि पिकांची सविस्तर पाहणी केली. आधुनिक शेतीत वापरलं जाणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाची प्रगती आणि नवकल्पनांचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून शेती अधिक कार्यक्षम, उत्पादनक्षम आणि शाश्वत कशी बनू शकते, यावर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Every family deserves to be treated with respect, not discrimination and contempt.
On #internationaldayoferadicationofpoverty2025, let us re-affirm our resolve to replace neglect with empathy and injustice with inclusion by striving for systems that uplift every family. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
दिवाळी उत्सवाची सुरुवात करणारा पहिला सण म्हणजे वसुबारस. घराघरांत पहिला दिवा प्रज्वलित होतो, दीपोत्सवाला सुरुवात होते. गोमाता-वासराच्या पूजनातून निसर्ग, शेती आणि संस्कृतीशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या मंगल दिनानिमित्त सर्वांना आनंदी व स्नेहमयी शुभेच्छा!
#वसुबारस
#vasubaras -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामती येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद संगई यांचे वडील आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक श्री. वर्धमान संगई सर यांच्या निधनानं एक आदर्श शिक्षक, सुसंस्कृत विचारांचे मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहिलेलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संगई कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिवनगर विद्या प्रसारक येथील वार्षिक सर्वसाधारण सभा आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांशी निगडित विविध प्रश्न समजून घेतले. त्याचप्रमाणे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना, ते जगात कुठेही शिक्षण घेत असले तरी, आवश्यक शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुरवण्याचं आश्वासन यावेळी दिलं. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याचबरोबर संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सखोल आणि धोरणात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा तसंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नव्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
📍माळेगाव, बारामती -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत मागील वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसंच आगामी काळात शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.
AI कॉलेज आणि स्मार्ट कृषी केंद्र या नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय झाले. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
समविचारी सारे आपण एकत्र येऊ.. विकसित, समृद्ध महाराष्ट्र घडवू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लोकशाही मूल्यांची जपणूक म्हणजे जनसंवाद.. सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणजे जनसंवाद..!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून द पूणा मर्चंट चेंबर तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी लाडू व चिवडा वितरण उपक्रमाचा आज शुभारंभ झाला.
या उपक्रमाच्या माध्यमातून २५०० कुटुंबांना दिवाळीच्या निमित्तानं आपुलकीची भेट म्हणून लाडू व चिवडा पाठवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं द पूणा मर्चंट चेंबरच्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
संवादातून जनसेवा हाच आमचा मुख्य उद्देश!
#जनसंवाद #चिंचवड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘दिशा कृषि उन्नती २०२९’ आणि ‘कृषि समृद्धी योजना २०२५-२६’ या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय आढावा बैठक आज पार पडली.
या बैठकीत कृषि विभागातील सध्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसंच आगामी काळातील कामकाज प्राधान्यक्रमानं निश्चित करण्यात आलं. पारंपरिक पिकांमध्ये सुधारणा आणि नव्या पिकांच्या प्रयोगावर भर देणं, शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, निधीच्या वितरणाची गती वाढवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणं आदी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येऊ देणार नाही, यावर सर्व लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका व्यक्त केली. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्धार करण्यात आला. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
📍विधानभवन, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मानव आणि बिबट्या यांच्यातील वाढतं संघर्ष व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान गेल्या पाच वर्षांतील घटनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली तसंच पुढील काळातील ठोस व दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे प्राण व मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या अधिक प्रभावी वापराबाबत विचारविनिमय झाला. त्या अनुषंगानं AI आधारित बिबट संरक्षण उपकरणांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.
बिबट्यांचे सुरक्षित आणि संरक्षित भागात स्थलांतरण, बिबट्यांच्या प्रजनन नियंत्रणासाठी उपाययोजना, स्पेशल लेपर्ड फोर्सची स्थापना, नियंत्रण कक्ष सुरू करणं, शिरूर येथे बिबट सफारी प्रकल्प सुरू करणं, माणिकडोह निवारा केंद्राचा विस्तार करणं, ग्रामीण भागात सौर कुंपण आणि सुरक्षित तंबू उपलब्ध करून देणं, बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा, बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळवणं इत्यादी विषय बैठकीत हाताळण्यात आले.
📍विधानभवन, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसंवादातून जनतेला सकारात्मक दृष्टिकोन देणं, त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणं, प्रश्न-समस्या यांपासून सुटका आणि दिलासा देणं, हीच माझी जबाबदारी आहे..!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सद्भावना, सदाचार, आपलेपण, माणुसकी, सेवा हाच आमच्या जनसंवादाचा पाया आहेत..!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
प्रबळ विश्वासातून घडतोय #जनसंवाद..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मा. रवी नाईक यांच्या निधनानं गोव्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसंवाद म्हणजे समाधान, जनसंवाद म्हणजे जनशक्तीचा सन्मान..!
आज चिंचवडमध्ये जनसंवाद साधताना मला भेटण्यास आलेल्या नागरिकांची मनःस्थिती समजून घेतली, त्यांना धीर दिला.. त्यांच्या समस्या व अडचणी ऐकून घेत त्या आपण नक्की सोडवू, काळजी करण्याचं काही कारण नाही, असा विश्वास दिला.
#जनसंवाद -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज पुण्यात शनिवार पेठ परिसरातील तानपुरा मेट्रो पुल आणि विविध विकासकामांची पाहणी केली. नव्यानं बांधण्यात आलेल्या तानपुरा पुलासह सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. नागरिकांनी नदी परिसर स्वच्छतेसंदर्भात मांडलेल्या सूचनांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्याचबरोबर कुंजीर चौक, पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक आणि रस्ते समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण, अव्यवस्थित पार्किंग व महावितरण संबंधित तक्रारींबाबत तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.श्री. छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभव असाच पक्षाच्या वाटचालीत मोलाचं योगदान देत राहो. तसंच आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@ChhaganCBhujbal -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चिंचवडकरांची काळजी मिटणार, त्यांचे रखडलेले प्रश्न, समस्या सुटणार.. चिंचवडकरांच्या भेटीसाठी मी सज्ज आहे.. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींतून मुक्त करणं, हेच मुख्य उद्देश आहे..!
आज सकाळपासूनच जनसंवाद सुरू होणार...
चिंचवडकरांनो, दूरध्वनी क्र. ७८८८५६६९०४ वर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा.. आपले विषय मांडा आणि समाधान मिळवा.
#जनसंवाद -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A scientist, teacher and visionary leader, Dr. APJ Abdul Kalam was, above all, a true patriot who devoted his life to India's progress and self-reliance.
On his birth anniversary, paying homage to the people's President whose life and legacy will forever remain a guiding light for all who pursue excellence through discipline and dedication.
#apjabdulkalam -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🛳️ CM Devendra Fadnavis & Union Minister Sarbananda Sonowal chaired a review meeting regarding the preparation of 'India Maritime Week 2025'.
DCM Ajit Pawar, Minister Nitesh Rane and concerned officials were present.
🛳️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली 'इंडिया मेरीटाईम वीक 2025' च्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नितेश राणे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🛳️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल इनकी अध्यक्षता में 'इंडिया मैरीटाइम वीक 2025' की पूर्व तैयारी के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नितेश राणे एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕚 10.45am | 14-10-2025📍Mantralaya, Mumbai | स. १०.४५ वा. | १४-१०-२०२५📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @sarbanandsonwal @AjitPawarSpeaks @NiteshNRane @imw_gov
#maharashtra #devendrafadnavis #indiamaritimeweek2025 -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मनमाड येथील अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांना पक्षाची लोककल्याणाची विचारधारा समजावून सांगितली.
📍मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पक्ष बळकटीकरण हेच आमचं ध्येय..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचं धोरण आणि संघटनेतील आगामी रचनात्मक बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार आणि अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज आनंदात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांत हजारो कुटुंबांना सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त घरं मिळणार आहेत. ही बाब म्हणजे खर्या अर्थानं 'नवी मुंबई, नव्या आशा' ची सुरुवात आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री मा.श्री. पीयूषजी गोयल यांसह अन्य मान्यवर नेते देखील उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित कॅन्सर विरोधी मोफत HPV लसीकरण मोहीम (दुसरा डोस) आज पार पडली.
दिवाळीच्या शुभप्रसंगी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांतील युवती व महिलांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी '१ लाख सॅनिटरी नॅपकिन वाटप मोहिमे'चा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. यानिमित्तानं सर्वांना मार्गदर्शन करत महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं.
📍महिला विकास मंडळ, नरिमन पॉईंट, मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वन हक्क कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात तसंच जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध विषयासंदर्भात आज बैठक पार पडली. याचबरोबर संबंधित जिल्ह्यातील वन हक्क धारकांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर आधारित महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत क्लस्टर उभे करणं, भिल्ल समाजाचे स्वतंत्र बेंच मार्क सर्वेक्षण करणं, चोपडा तालुक्यातील कर्जाने येथे महावितरणचे सब स्टेशन कार्यान्वित करणं इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
राज्यात सुमारे १७ हजार गावं सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्यानं कार्यवाही करावी. वंचित आदिवासी, गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत. अंशतः वन हक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीनं सुनावणी घेऊन जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते निकाली काढावेत, असे निर्देश बैठकीत दिले.
आदिवासी वनपट्टे धारकांना सातबारा प्रमाणे पीक कर्ज, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, वारसा हक्क आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वनपट्टे धारकांना फार्मर आयडी ओळखपत्र मिळेपर्यंत आधार कार्ड वर आधारित लाभ देण्यात यावा. वनपट्टा मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही लाभ मिळावा. वनपट्टे धारकांच्या पिकांचं नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी शासन निर्णयात योग्य त्या सुधारणा करण्यात याव्यात. राज्यातील सर्व वनपट्टे धारकांना विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य करून त्यांना कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
जळगाव जिल्ह्यात 'पेसा' क्षेत्र वगळता उर्वरित काही तालुक्यांमध्ये नऊ लाखांपेक्षा जास्त आदिवासींची संख्या असल्यामुळे व त्यांच्यासाठी एरंडोल हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी आदिवासी विकास विभागाचं उप प्रकल्प कार्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र)(पेसा) मध्ये १ हजार ७३४ आदिवासी बहुल गावांचा नव्यानं समावेश करण्याबाबत केंद्र सरकारकडे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रस्ताव पाठवावा. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांचं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेखाली प्रत्येक लाभार्थ्याला घरकुल मिळवून देण्याचं स्वप्न आहे. या योजनेची सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करून नियमाप्रमाणे सर्व कब्जाधारकांना जमिनीचा मालकी हक्क मिळण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना घरं देण्यात यावीत, असे देखील निर्देश दिले.
📍मंत्रालय, मुंबई -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या कार्यक्षम राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय:
✅ महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.
(उद्योग विभाग)
✅ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद.
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
#मंत्रिमंडळ_निर्णय
#cabinetdecisions -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
उद्याचा ‘जनसंवाद’ चिंचवडकरांसोबत..!
ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, महिला भगिनी.. सगळ्यांचंच म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घेणार, समस्यांचं निराकरण करणार..!
यासाठी त्वरित ७८८८५६६९०४ वर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा आणि आपल्या समस्या नोंदवा. ‘जनसंवाद’ कार्यक्रमात तुमच्या समस्या समजून घेत, योग्य तो तोडगा काढू.
#जनसंवाद #चिंचवड -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
या ना त्या कारणानं जनतेची रखडलेली कामं ही मार्गी लावणं हेच जनसेवक म्हणून माझी मुख्य जबाबदारी आहे.. कामाची हमी दिली म्हणजे काम होणारच..!
आता पुढची भेट येत्या १५ ऑक्टोबरला चिंचवडकरांची घेणार आहे. त्यांचे प्रलंबित विषय ऐकून घेत ते मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन..!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मागे वळून बघायचं नाही.. समविचारांचे लोक आपण मिळून विकासाची उंची नवी गाठू.. एकमेकांमध्ये आनंद वाटू..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चिंचवडकरांनो नमस्कार,
आता तुमच्या भेटीस मी येत्या १५ ऑक्टोबरला येत आहे. तुम्हाला सतावणाऱ्या समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडवणं हे या भेटीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपण भेटू, विश्वासाचा संवाद साधू आणि तुम्ही मांडलेल्या विषयांवर खात्रीशीर मार्ग काढू.
याशिवाय दूरध्वनी क्र. ७८८८५६६९०४ यावर कॉल करा, तुमचे प्रश्न व समस्या नोंदवा. त्यांचं निराकरण करू..!
‘जनसंवाद’ व्हॉट्सॲप चॅटबॉट लिंकवर क्लिक करा: wa.me/917888566904?text=Hi
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आजच्या चर्चासत्रात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसह साखर तंत्रज्ञानाबाबत विधायक चर्चा करण्यात आली.
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेमध्ये आयोजित नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहिलो. याप्रसंगी साखर अभियांत्रिकी व अक्षय ऊर्जा, साखर तंत्रज्ञान, मद्यार्क तंत्रज्ञान, तसेच कृषी आणि ऊस शेती क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर या विषयांवरील चर्चासत्रात सहभागी झालो.
बैठकीदरम्यान ऊस उत्पादनात वाढीसाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. -
Ajit Pawar reposted
MahaNCPspeaks
@mahancpspeaks
एक संवाद, एक विश्वास आणि सुरळीत जनजीवनाची नवी दिशा म्हणजेच मा. श्री. अजितदादांचा जनसंवाद!
@AjitPawarSpeaks
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळं शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं, घरांचं तसंच जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यासोबतच काही ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानीही झाली आहे. या संकटकाळात बळीराजाच्या आणि आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी समाजाच्या सर्व स्तरांतून सहकार्याचा ओघ सुरू झाला आहे.
आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साधना सहकारी बँक, हडपसर यांच्या वतीनं ₹२५ लाखांचा, तसंच प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व नगरसेवक श्री. अजित घुले यांनी ₹१,११,१११ चा, कै. रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानतर्फे ₹१ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यासाठी माझ्याकडे सुपूर्द केला. याशिवाय हडपसर विधानसभा मतदारसंघाचे शिक्षक सेल अध्यक्ष श्री. लालासाहेब खलाटे, श्री. अजिनाथ भोईटे आणि श्री. अमित कांबळे यांनी प्रत्येकी ₹११,००० चा धनादेश सुपूर्द केले.
राज्यात आलेल्या या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला पुन्हा सक्षमपणे उभं करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल सरकारच्या वतीनं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुणे येथील प्रशासकीय भवनात आज ‘राजर्षि शाहू सहकारी बँक लिमिटेड’च्या वतीनं राज्यातील पूरग्रस्तांसाठी आयोजित विशेष सामाजिक उपक्रमास उपस्थित राहिलो.
या कार्यक्रमात पूरग्रस्त भागांतील नागरिक व शेतकरी बांधवांना मदत म्हणून बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. ११ लाखांचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीनं या उदात्त व सामाजिक जाणिवेने प्रेरित उपक्रमाबद्दल बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, काही ठिकाणी दुर्दैवाने जीवितहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन शेतकरी आणि नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा. शांताराम धनकवडे, उपाध्यक्ष सौ. कमल ज्ञानराज व्यावरे, संस्थापक संचालक श्री. सुधाकर हरिभाऊ पन्हाळे तसंच बँकेचे मान्यवर संचालक व सभासद उपस्थित होते. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील एरंडवणे येथे आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शिक्षण मंडळाच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत, विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या तसंच संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाहीसाठी योग्य त्या सूचना दिल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेतील सर्व सभासदांनी मोठ्या आत्मीयतेनं माझा सत्कार केला. या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याबरोबरच गेल्या काही दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेली जीवितहानी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवरांचं दुर्दैवी निधन याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण नियामक मंडळाचे सर्व सदस्य, सभासद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसामान्यांचा ‘जनसंवाद’ आता चिंचवड-करांसाठी!
लगेच ७८८८५६६९०४ वर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा, तुमच्या समस्या नोंदवा. १५ ऑक्टोबरला होणाऱ्या जनसंवादात समोरासमोर चर्चा करून, तुमच्या समस्येचं निराकरण करूया!
‘जनसंवाद’ व्हॉट्सॲप चॅटबॉट लिंकवर क्लिक करा: wa.me/917888566904?text=Hi
#जनसंवाद #चिंचवडThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
विद्यार्थीदशेपासून सामाजिक कार्याची ओढ जपणारे आणि नगरसेवक ते राज्यमंत्री असा उल्लेखनीय राजकीय प्रवास करणारे आमचे सहकारी, माजी राज्यमंत्री स्व. बाबा सिद्दीकी यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपल्या कवितांमधून प्रगल्भ विचार आणि वास्तववादी दृष्टिकोन शब्दबद्ध करणाऱ्या, हळव्या मनाच्या भावना अत्यंत सहजतेने शब्दांत मांडणाऱ्या प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शांताबाई_शेळके
#shantabaishelke -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसामान्यांच्या हितासाठी, निराधारांच्या आधारासाठी, युवकांच्या कल्याणासाठी जनसंवादातून सुरळीत जनजीवन हा प्रयत्न आमचा लोकहितवादी!
#जनसंवाद -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
चला, एकजुटीनं जनसंवादातून विकासाची क्रांती घडवू..!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
लोकसेवेचा रथ पुढे हाकत आम्ही चाललो आहोत.. सर्व समाजघटकांचा शाश्वत विकास, हेच आमचं ध्येय आहे, हेच आमचं उद्दिष्ट आहे..!
This media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित ‘८५ वा औंध संगीत महोत्सव २०२५’ हा भव्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रतिष्ठित महोत्सवाच्या निमित्तानं ‘रियाझ २०२५’ या स्मरणिकेचं प्रकाशन देखील पार पडलं.
याप्रसंगी मी औंध संगीत महोत्सवाने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभव वृद्धीत दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
या सोहळ्यात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर पद्मश्री पं. श्री. उल्हास कशाळकर, पद्मश्री श्री. तालयोगी सुरेश तळवलकर आणि पं. श्री. अरुण कशाळकर यांनी उपस्थित राहून नवोदित कलाकारांना मोलाचं मार्गदर्शन केलं.
📍 औंध कला मंदिर, सातारा -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपलं राज्य आणि देश नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल, यात काही शंका नाही.
कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि सातत्याच्या जोरावर कु. आयुष पाटील ह्या दादानं त्याच्या अलौकिक कलेतून साकारलेलं माझं चित्र हे खरोखरंच अप्रतिम आहे. आयुषला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसंवाद: संवादातून समस्यांचं निराकरण करणारा अभिनव उपक्रम!
#जनसंवादThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आपला माणूस म्हणून माझ्यावर ठेवला जाणारा विश्वास, मला मिळणारा आशीर्वाद आणि त्यातून घडणारा आपुलकीचा जनसंवाद..!
📍खडकवासला
#जनसंवाद -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
जनसंवादातून लोकसेवा!
खडकवासला मतदारसंघातून पुन्हा एकदा जनसंवादाचा कार्यक्रम हाती घेतला. या माध्यमातून जनतेच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणं, हीच माझी सर्वोतोपरी भूमिका राहील, असा विश्वास सर्वसामान्यांना दिला.
#जनसंवाद -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा विचार करून मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलाची पाहणी केली. पुलाचं काम लवकरात लवकर आणि उत्तम दर्जा राखून पूर्ण व्हावं, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारित सूचना केल्या. त्यानंतर शिवणे-नांदेड पुलाजवळील हरिहर बिलो केदारेश्वर महादेव मंदिर परिसरालाही भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली तसंच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कै. ह. भ. प. हरिभाऊ पाटलू चौधरी चौक, पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारजे परिसरातील सर्व्हिस रोडच्या कामाची आज पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या गुणवत्तेपासून वाहतुकीच्या सोयीपर्यंत सर्व बाबींचा आढावा घेतला.
त्याचप्रमाणे न्यू अहिरे गाव (वारजे माळवाडी, पुणे) प्रवेशद्वार येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
A nation progresses when its girls rise and are given equal opportunity to thrive.
On #internationaldayofthegirlchild2025, let us empower every girl to be the change she envisions, leading the way with resilience, strength and commitment. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशातील प्रत्येक ग्रामीण भाग हा सुशिक्षित व सुसंस्कृत व्हावा, गावं ग्रामोद्योग संपन्न व्हावीत, गावांनीच देशाच्या गरजा भागवाव्यात, प्रत्येक गावाला सक्षम नेतृत्व मिळावं, अशी दूरदर्शी संकल्पना आपल्या साहित्यातून व संबोधनांतून मांडली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#संत_तुकडोजी_महाराज
#santtukdojimaharaj -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
खडकवासला भागातील जनसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘जनसंवाद’ घेऊन येतोय.
आपल्या समस्या नोंदवण्यासाठी ७८८८५६६९०४ वर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा. भेटुयात.. खडकवासला जनसंवादात!
स्थळ: नवले लॉन्स, नवले उड्डाणपुलाजवळ, पुणे
‘जनसंवाद’ व्हॉट्सॲप चॅटबॉट लिंकवर क्लिक करा: wa.me/917888566904?text=Hi
#जनसंवाद #खडकवासला -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील सिद्धी गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री. विकास अण्णा पासलकर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह तसंच श्री. सुभेदार शंकरराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली ४५ माजी सैनिकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा, कार्यसंस्कृती आणि समाजकल्याणाच्या दिशेनं पक्षाची सुरू असलेली वाटचाल याबाबत आजच्या मेळाव्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपलं राज्य सरकार सकारात्मक असून त्या दृष्टीनं पावलं टाकत असल्याचं स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचं सांगितलं. याशिवाय पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर जलद गतीनं कामं सुरू असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, हे देखील स्पष्ट केलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक कार्यकर्त्यानं सज्ज व्हावं, लोकांशी थेट संपर्क साधावा आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करावं, अशा सूचना केल्या. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन प्रगतीची वाटचाल आपल्याला करायची आहे, असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नव्या सहकाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल आणि त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदाऱ्या दिल्या जातील.
पुणे आणि रायगड जोडणारा महत्त्वाचा रस्ता लवकरच सुरू होणार आहे. ज्यामुळे आर्थिक तसंच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम हा आपला अभिमान आहे, त्यातून प्रेरणा घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख अधिक दृढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीनं, निस्वार्थ भावनेनं आपापली कामं केली, तर महाराष्ट्राच्या विकासाची गती आणखी वाढेल. कारण एक मुठ बनली की, ताकद निर्माण होते आणि हीच ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्या यशाच्या शिखरावर नेईल, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त केला. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
मागितलं तेवढं प्रेम नि आशीर्वाद राष्ट्रवादी परिवारानं मला दिलं.. मी एकटा नव्हे, तर परिवाराची ताकद पाठीशी आहे, हा विचारच मला ऊर्जा देतो..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज सदाआनंद नगर येथे भव्य राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री. सदानंद कृष्णा शेट्टी, सौ. सुजाताताई शेट्टी, देवकीबाई शेट्टी, श्री. भीमराव पाटोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना संबोधित केलं.
पक्षाच्या विचारधारेचा पाया म्हणजे काम आणि प्रामाणिकपणा आहे. जनतेच्या प्रश्नांवर निष्ठेनं काम केलं, तर लोक आपोआप सोबत उभे राहतात, यावर माझा ठाम विश्वास असल्याचं स्पष्ट केलं. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर आपला राष्ट्रवादी परिवार पुढे वाटचाल करत आहे. जनकल्याणासाठी सदैव तत्पर राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोरपडे पेठ येथील पाच लाभार्थ्यांकडे नवीन घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. सर्व लाभार्थ्यांचं मनापासून अभिनंदन केलं. प्रत्येक कृतीत लोकहित हीच आपल्या राज्य सरकारची भूमिका आहे, असं स्पष्ट केलं.
आजचं हे राष्ट्रवादी परिवार मिलन म्हणजे केवळ पक्षप्रवेश नव्हे, तर विचारांचं एकत्रीकरण आहे. आपण सगळे मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी आणि लोककल्याणासाठी अजून जोमानं काम करूया, असं आवाहन केलं.
📍स्व. मातोश्री पद्मावती अम्मा कृष्णा शेट्टी व्यापारी संकुल, पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
वय छोटे मात्र स्वप्नांचे पंख मोठे..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील यशोदीप चौकात राष्ट्रवादी परिवारातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी गाठभेट झाली, सर्वांची विचारपूस केली. यावेळी कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येकाच्या हाकेला आदरपूर्वक प्रतिसाद देताना मिळालेला आनंद फार मोठा आहे.
तसंच कोंढवे येथील भैरवनाथ भेळ व अमृततुल्य येथे कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या, परिसरातील समस्या ऐकून घेत त्यावरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. त्याचप्रमाणे वारजे सर्वे येथील विवोला सोसायटी व सरायू भेळ सेंटर याठिकाणी देखील राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. यावेळी जिल्हा पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, याबद्दल फेडरेशनचे मनापासून आभार मानले.
लोकांशी प्रत्यक्ष भेट, प्रेमानं संवाद आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणं, हीच खरी जनसेवा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यसंस्कृती आहे.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कोल्हेवाडी फाटा येथील मेजवानी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या संदर्भातील आपापले विषय माझ्यासमोर मांडले. यादरम्यान भारतमातेचे सुपुत्र, शहीद शरद दिगंबर मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. सौरभ नाना मते यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट दिली, मनमोकळा संवाद साधला. जनतेशी जिव्हाळ्याचं नातं जपणं, कार्यकर्त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं, हीच आपल्या राष्ट्रवादी परिवाराची भूमिका कायम राहील.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. रमेश खेडेकर यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट दिली आणि खेडेकर परिवारासोबत दुपारच्या स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी खेडेकर परिवारानं मला दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी अमूल्य आहे. मनापासून आभार मानतो.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आज साईबा अमृततुल्य आणि माऊली अमृततुल्य येथे राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम स्नेहमय वातावरणात पार पडला. साईबा अमृततुल्यच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नव्या ऊर्जेनं, नव्या विश्वासानं आणि विकासाच्या निर्धारानं आपला राष्ट्रवादी परिवार अधिक सक्षम होत आहे, याचा मला समाधान आहे.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
📍पुणे -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार आपल्याला करायचा आहे.. परिवारातील सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.. चिमुकल्यांच्या भावविश्वातील पंखांना बळ द्यायचं आहे.. जनकल्याणाच्या कार्याला गती द्यायची आहे..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
त्रिमूर्ती चौकातील तोरणा अमृततुल्य येथे सदिच्छा भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उत्साहानं माझं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रत्येकानं आपल्या समस्या आणि निवेदनं मांडली. त्यानंतर दत्तनगर मुख्य चौकातील जय हरी भेळ येथे सर्वांसोबत पाणीपुरी व भेळचा आनंद घेतला. आपल्या माणसांसोबत खाण्यापिण्याचा आस्वाद घेणं, याहून मोठं सुख नाही.
याचबरोबर अमृत भेळ येथे राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं महेंगावच्या उपसरपंच धनश्रीताई विजय भुमकर आणि श्री. विजय सदाशिव भुमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसंच नरेगाव येथील माऊली अमृततुल्य येथे भेट दिली. यावेळी याठिकाणी उपस्थित सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या, आवश्यक ती पावलं उचलून सर्व प्रश्न सोडवले जातील, असं आश्वासन दिलं.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माझ्या राष्ट्रवादी परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री. माणिक राजपूत यांची अचानक झालेली भेट आणि हा प्रेमळ संवाद, हीच माझी खरी ऊर्जा... हेच माझ्या अविरत कामाचं खरं बळं..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माणसाला माणुसकीचा आधार, माणुसकीला जागतो आपला राष्ट्रवादी परिवार..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुण्यातील कानिफनाथ चौक, गुलाब नगर येथे श्रीकृष्ण वडेवाले येथे झालेल्या परिवार मिलन कार्यक्रमात ‘रणांगण’ या पुस्तकाचं अनावरण केलं; त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला, सोबतच गरम गरम चहाचा आस्वाद घेतला.
बालाजी नगर परिसरातील धनेश्वर प्रतिष्ठान शिवमंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं. स्थानिक नागरिकांशी स्नेहपूर्ण गप्पा झाल्या, त्यांची विचारपूस केली, अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर धनकवडी बसस्टॉप येथे उपस्थित राहून ग्रामदैवत श्री जानुबाई देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. या प्रसंगी देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित कार्यकामात उपस्थितांना संबोधित करत पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आजची सकाळ, खडकवासलातील माझ्या राष्ट्रवादी परिवारासोबत..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलनThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
माझ्या प्रत्येक हाकेला तुमचा प्रतिसाद हा फार मोलाचा आहे..!
आज राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं सदानंद भेळ याठिकाणी सदिच्छा भेट दिली.
यावेळी बालाजी नगर व्यापार असोसिएशन सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या आपुलकीनं माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. या भेटीगाठीच्या दरम्यान लोकांनी त्यांच्या समस्या, अडचणी माझ्यासमोर मांडल्या, त्या समजून घेत आपण त्यांचं निराकरण करू, असा विश्वास दिला.
📍बालाजी नगर, पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
पुन्हा स्नेहपूर्ण भेट, पुन्हा आपल्या माणसांशी जिव्हाळ्याचा संवाद..!
आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ अभियानांतर्गत राजीव गांधी नगर, राजगड चाळ परिसर आणि बिबवेवाडीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. शांताराम आंबेडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत अल्पोहाराचा आनंद घेतला.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्या परिवारातील जमलेल्या तमाम सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आणखी कार्यदक्ष राहण्यास प्रेरणा मिळाली.
असाच बंधुभाव सदैव असू द्या. जनकल्याणाचं कार्य करण्यास यातूनच मला ऊर्जा मिळत राहील.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन -
Ajit Pawar reposted
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis seeing off PM Narendra Modi as he leaves from Mumbai.
🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई येथून रवाना, याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई से रवाना, इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति।
🕔 5.10pm | 9-10-2025📍Mumbai | संध्या. ५.१० वा. | ९-१०-२०२५📍मुंबई.
@narendramodi @Dev_Fadnavis
#maharashtra #devendrafadnavis #mumbai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब हे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ होत असताना राज्यपाल मा.श्री. आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांसह उपस्थित राहून त्यांना निरोप दिला.
📍राजभवन, मुंबई
@narendramodi @maha_governor @Dev_Fadnavis @mieknathshinde -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कर्नाटक राज्यातील माजी आमदार श्री. मोहिउद्दीन बावा यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींसह विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
‘एक कॉल- समस्येची नोंद- थेट भेट आणि समस्येचं निराकरण’ याच सोप्या पद्धतीनं तुमच्या सरकारी समस्या सोडवण्यासाठी ‘जनसंवाद’ व्हॉट्सॲप हेल्पलाईन!
लगेच ७८८८५६६९०४ वर कॉल किंवा व्हॉट्सॲप करा. तुमची समस्या नोंदवा आणि थेट भेट घेऊन तुमच्या समस्या सोडवून घ्या!
‘जनसंवाद’ व्हॉट्सॲप चॅटबॉट लिंकवर क्लिक करा: wa.me/917888566904?text=Hi
#जनसंवाद #खडकवासला -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Revered business icon and beacon of excellence Sh. Ratan Tata ji's vision continues to guide India to dream big while his kindness will remain an inspiration for the countless lives he touched.
Tributes to the visionary leader who redefined leadership with humility and vision, on his death anniversary.
#ratantata -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
नवे प्रकल्प राजधानीला अर्थात मुंबईला नवे पंख देणारे..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल..!
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो. यानिमित्तानं उपस्थितांसमोर विकसित महाराष्ट्राला घेऊन असलेल्या माझ्या भावना व्यक्त केल्या.
आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं तसंच मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या राज्य सरकारच्या कार्यक्षमतेमुळे तसंच मोदी साहेब आणि एकूणच केंद्र सरकारच्या ठाम पाठबळामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. मी मोदी साहेब यांच्यासह सर्वांचे मनापासून आभार मानतो.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा भुयारी मेट्रो मार्ग सुरु झाल्यानं शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही, तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान, सोयीस्कर, सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे. कफ परेड, गिरगाव, काळबादेवी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवा जोडली गेली आहे. प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
त्याचप्रमाणे एमएमआरडीएनं साकारलेलं 'मुंबई वन' हे ॲप म्हणजे वन मुंबई - वन ॲप या संकल्पनेची झलक दाखवतो. या ॲपच्या मदतीनं आपल्याला लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, बस इ. सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार आहे. हा ॲप मुंबईला आणखी युनायटेड, कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवेल. त्याचबरोबर आज सुरु होत असलेलं 'अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम' हे युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे दमदार पाऊल आहे. शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम उपयुक्त व्हावं, हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे.
आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशानं विकासाची नवी झेप घेतली आहे. 'विकसित भारत २०४७' या ध्येयाकडे आपण वेगानं वाटचाल करतोय. या प्रवासात आपला महाराष्ट्र अग्रस्थानी राहील, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत समन्वयानं, वेगानं काम करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरु झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करताहेत, ही आपली मोठी ताकद आहे. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आपल्याला अजून विकासाचे अनेक टप्पे गाठायचे आहेत.
यंदाच्या अतिवृष्टीनं उद्भवलेल्या पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र राज्य सरकारच्या वतीनं शेतकरी बांधवांना तातडीनं मदत पोहोचवण्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम सुरु आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शहा यांच्याशी देखील चर्चा झाली असून केंद्र सरकार मदतीचा हात देईल, असा मला ठाम विश्वास आहे.
@narendramodi @Dev_Fadnavis @mieknathshinde
#maharashtra #viksitmumbai -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
कराड उत्तरचे माजी आमदार, माजी क्रीडा व उद्योग राज्यमंत्री श्री. जनार्दन उर्फ शामराव बाळकृष्ण आष्टेकर साहेब यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या निधनानं तळमळीनं काम करणारा लोकसेवक हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना.
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
Proud moment for India!
Congratulations to @kmainiofficial for making history as the first Indian to win an F2 race in Monaco.
As our national anthem echoed through Monte Carlo, the tricolour soared high with pride.
Best wishes for your journey ahead!
#kushmaini #f2monaco #indiaontrackThis media couldn't be displayed. See it on the original post. -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks
सर्वसामान्यांच्या गरजांची जाण ठेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे कुशल प्रशासक, राजकारणात राहून समाजकारण करण्यात अधिक समाधानी राहणारे मुत्सदी नेते, प्रभावी वक्ते तसंच सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रेरणादायी राजकीय प्रवास करणारे धोरणी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मनमिळाऊ, हसतमुख व्यक्तिमत्वाच्या देशमुख साहेबांनी राज्याच्या कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात त्यांचं योगदान हे मोलाचं राहिलं आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन!
#विलासराव_देशमुख
#vilasraodeshmukh

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































